श्री स्वामी समर्थ,स्वामी समर्थ । समाधी मठ । वटवृक्ष संस्थान । महाराजांच्या चर्मपादुका । हाक्याचा मारुती । जंगमांचे शिव मंदिर । मुरलीधर मंदिर । शेखनूर दर्गा । मालोजीराजांचा किल्ला । शिवपुरी ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
वटवृक्ष संस्थान
वटवृक्ष संस्थान येथे स्वामी समर्थ महाराजांनी देह सोडताना सगळ्यांना उपदेश केला की ‘वडाच्या पारंबीला धरून रहा.’
समाधी मठ
महाराजांची समाधी.
महाराजांच्या चर्मपादुका
समाधी मठाच्या शेजारीच शिष्य चोळप्पा यांच्या घरात आजही महाराजांच्या चर्मपादुका आहेत. सुमारे १ फुट लांबीचे पाउल आहे.
गुरुमंदिर
श्री बाळप्पा महाराजांची समाधी. व्यवस्थापकांना सविस्तर माहिती विचारावी.
हाक्याचा मारुती
स्वामींनी सत् शिष्य बाळाप्पा यांना नामजप करण्यास सांगितले ते हे मंदिर तळघरात आहे व तेथे आजही जाता येते.
जंगमांचे शिव मंदिर
स्वामींनी शिवलींगावर शेणी रचून अग्नी पेटविला. जंगम चिडले व स्वामींना मारण्यास आले. तीन दिवस अग्नी पेटत होता. तीन दिवसानंतर शिवलींगाला काहीही हानी न होता , ते अधिक तेजस्वी झाले.
जोशी मठ.
स्वामी दर्शनाशिवाय भोजन करणार नाही’ हा नियम तुटू नये म्हणून आजारी भक्ताला लाकडी पाटावर स्वामींनी स्वत:ची पदचिन्हे उमटवून दिली. तो पाट आजही आहे.
मुरलीधर मंदिर .
मुंबईहून स्वामी दर्शनास आलेले ‘स्वामीसुत’ ह्या मंदिरात स्वामींची वाट पहात बसले होते. स्वामींच्या दर्शनास गेलेल्या एका श्रीमंत भक्तास स्वामी म्हणाले ”माझ्या समोर दिवे पेटवण्याऐवजी माझा सुत काळोखात बसला आहे तेथे रोषणाई कर. गिरगावातील कांदेवाडी येथील मठ स्थापन करणारे तेच हे स्वामीसुत !
शेखनूर दर्गा
स्वामी कित्येकदा ह्या दर्ग्यावर येत. मन्नत मागण्याकरता आलेल्या कित्येकंना स्वामी सांगत की दर्ग्यावर चादर चढवा. तिथल्या फकीरंना भोजन द्या.
मालोजीराजांचा किल्ला
महादरवाजावर असलेल्या गणपतीच्या मुर्तीस सहज हात लाऊन स्वामी जात असत्. आपला हात उडी मारुन देखील पोचत नाही. येथे एक लहानसे संग्रहालयही आहे.
शिवपुरी.
सुर्योदय आणि सुर्यास्त ह्या वेळी अग्निहोत्र कसे करावे? अग्निहोत्र म्हणजे काय ? इ. महत्वाची माहिती येथे सांगतात. सविस्तर माहिती आणि अग्निहोत्रात सहभाग घेण्याकरता शिवपुरी येथे सुर्यास्ताच्या साधारण १ तास आधी पोचावे.