।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
अहमदनगर जिल्हा – Ahmednagar district (महाराष्ट्रातील ३६ जिल्हे Maharashtra 36 District)
अहमदनगर जिल्हाहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. आजच्या परिस्थितीत अहमदनगर जिल्हा हा सर्वांत पुढारलेला आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात आहे ते राहाता तालुकात आहे.अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केला होता. ‘राळेगण सिद्धी’ अण्णा हजारे यांच्या आदर्श ग्राम या संकल्पनेतून राळेगण सिद्धी या खेड्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर ‘हिवरे बाजार’ पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून हिवरेबाजार हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले आहे.
ह्या शहराचा इतिहास पाहिला असता, ह्या शहरात अनेक शहरे अशी आढळतात. ज्याचे वैशिष्ट्य त्याच्या नावातच दडले आहे, जसे कि पाथर्डी शहरात पार्थ म्हणजेच महाभारत कालीन अर्जुन रडल्याचे आढळते. त्यामुळे पाथर्डी असे पडले. तिसगाव हे छोटेसे गाव ह्या गावात तीस वेशी आढळतात म्हणुन तिसगाव हे नाव पडले.
अहमदनगर जिल्ह्याचे भौगोलिक स्थान व महत्त्व – Geographical location and importance of Ahmednagar district
अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ चौ.कि.मी. तर लोकसंख्या इ.स. २०११च्या जनगननुसार ४५,४३,०८० इतकी आहे. राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा व औरंगाबाद जिल्हा; पूर्वेस बीड जिल्हा ; पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तर नैर्ऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणे जिल्हा हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणाऱ्या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रामुख्याने अकोले तालुका व संगमनेर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत.
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात (नगर, नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर) आहे. शिखराची समुद्रसपाटीपासून उंची १६४६ मीटर आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रमुख डोंगररांग हरिश्चंद्राची रांग या नावाने ओळखली जाते. जिल्ह्याचा काही मध्य भाग व उत्तर भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. तसेच जिल्ह्याचा दक्षिण भाग हा घोड नदी, भीमा व सीना या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, ढोरा, घोड नदी, कुकडी याही नद्या जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. गोदावरी या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची या जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. प्रवरा व गोदावरी नद्यांचा संगम नेवासे तालुक्यात होतो, या स्थळाला प्रवरासंगम असे म्हटले जाते.
अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात भंडारदरा येथे प्रवरा नदीवर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो.
मुळा नदीवर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण राहुरी तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून अहमदनगर शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास ज्ञानेश्वरसागर असे म्हटले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे.
भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते – Geographically the district is divided into three parts
पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश – Western hills
अकोले तालुका आणि संगमनेर तालुका यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि हरिश्चंद्रगड यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत.कळसूबाई,जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे,१६४६ मीटर याच भागात आहे.
मध्य भागातील पठारी प्रदेश – Central plateau region
पारनेर तालुका आणि नगर तालुका आणि संगमनेर तालुक्याचा, श्रीगोंदा तालुक्याचा व कर्जत तालुक्यांचा काही भर यात मोडतो.
उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश – Northern and Southern Plateaus
यात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, [[शेवगाव तालुका|शेवगाव तालुक्याचा] उत्तरेकडील प्रभाग येतो.या भागात गोदावरी, प्रवरा, घोड, भीमा आणि सीना नद्यांचे खोरे येते.
हवामान – the weather
अहमदनगर जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान आल्हाददायक आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग आहे. (क्र. ५०) जातो. तसेच [[राष्ट्रीय महामार्ग २२२|कल्याण-अहमदनगर हा राष्ट्रीय महामार्ग २२२ पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो. पुणे-[[अहमदनगर] हा जाणारा महत्त्वाचा राज्यमार्ग असून अहमदनगरला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती अहमदनगर-पुणे या मार्गावर. अहमदनगर रेल्वे स्थानक हे दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी. चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून अहमदनगर-बीड-परळी आणि पुणतांबा-शिर्डी रेल्वे मार्ग आहे. संगमनेरहून रंधा धबधब्याकडे जाताना लागणारा विठे घाट व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट – हे नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
विशेष
मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे.ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला, आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला राज्यातील जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
अहमदनगर जिल्हा ओळखला जातो तो सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली आहे. (१९२३), तसेच राज्यातील पहिला साखर कारखाना स्थापन केला (जून, १९५०), आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ श्री. धनंजयराव गाडगीळ या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.होय
ऐतिहासिक महत्त्वाचे – Historically important
या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात अगस्ती ऋषींनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर (आत्ताच्या नगर जिल्ह्याच्या परिसरात) वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे.
निजामशाही – Nizamshahi
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले.या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये नगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगरवर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
इ.स. १९४२चे चलेजाव आंदोलन – A.D. Chalejaw Andolan of 1942
इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार – ए – खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ – Ahmednagar Lok Sabha Constituency
हा मतदारसंघ अहमदनगर शहर,कर्जत-जामखेड,पारनेर,राहुरी,शेवगाव व श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
शिर्डी (लोकसभा मतदारसंघ) – Shirdi (Lok Sabha Constituency)
हा इ.स. २००९पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ श्रीरामपूर, शिर्डी, अकोले, संगमनेर, कोपरगाव, नेवासा या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.अहमदनगर जिल्हयाचे विभाजन करुन कोपरगाव जिल्हा करण्यात यावा यासाठी कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रवींद्र जगताप हे अनेक वर्षापासून लढा देत आहे.त्यांनी कोपरगाव जिल्हा क्रुती समिती स्थापन करून शासन दरबारी लढा देत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – Assembly Constituency of Ahmednagar District
- अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ
- पारनेर विधानसभा मतदारसंघ
- कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ
- शेवगांव विधानसभा मतदारसंघ
- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ
- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ
- राहुरी विधानसभा मतदारसंघ
- शिर्डी विधानसभा मतदारसंघ
- अकोले विधानसभा मतदारसंघ
- कोपरगाव विधानसभा मतदारसंघ
- नेवासा विधानसभा मतदारसंघ,
- संगमनेर विधानसभा मतदारसंघ
तसेच जिल्ह्यात ७५ अहमदनगर जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
अहमदनगर जिल्हयाचे विभाजन करुन कोपरगाव जिल्हा करण्यात यावा यासाठी कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रवींद्र जगताप हे अनेक वर्षापासून लढा देत आहे.त्यांनी कोपरगाव जिल्हा क्रुती समिती स्थापन करून शासन दरबारी लढा देत आहे.
शेती – Agriculture
ज्वारी हे नगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे. अलीकडच्या काळात, जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुलेही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.
कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राहुरी येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले (१९६८) कृषी विद्यापीठ होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात, तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते.स्थापनेनंतर राहुरी विद्यापीठाचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकर्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे – Tourist places in Ahmednagar district
- रेणूका माता मंदिर धामणगाव देवी
- अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी
- चांदबिबीचा महाल
- चिंकारा व माळढोक अभयारण्य
- जगदंबा मंदिर, मोहटा
- जगदंबामाता मंदिर, टाहाकरी
- श्री ढोकेश्वर मंदिर
- भगवानगड
- भंडारदरा धरण
- भुईकोट किल्ला, अहमदनगर
- रेणुकामाता मंदिर, केडगाव
- शनी-शिंगणापूर
- साईबाबा मंदिर, शिर्डी
- सिद्धटेक
- हरिश्चंद्रगड
- साईबाबा तपोभूमी मंदिर, कोपरगाव
- कोल्हार,भगवती माता मंदिर
- रांजण खळगे निघोज
- मेहराबाद अहमदनगर
- श्रीगोदा
अहमदनगर जिल्ह्यात महत्त्वाची ठिकाणे – Important Places in Ahmednagar District
दायमाबाद- पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ.
निळवंडे धरण- प्रवरा नदीवरील धरण.
मुळा धरण- मुळा नदीवरील धरण.
अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत – Ahmednagar district has a total of 4 sub-divisions and 14 talukas.
- अकोले (संगमनेर उपविभाग)
- कर्जत (कर्जत उपविभाग)
- कोपरगाव (संगमनेर उपविभाग)
- जामखेड (कर्जत उपविभाग)
- नगर (अहमदनगर उपविभाग)
- नेवासा (श्रीरामपूर उपविभाग)
- पाथर्डी (अहमदनगर उपविभाग)
- पारनेर (अहमदनगर उपविभाग)
- राहाता (श्रीरामपूर उपविभाग)
- राहुरी (श्रीरामपूर उपविभाग)
- शेवगांव (अहमदनगर उपविभाग)
- श्रीगोंदा (अहमदनगर उपविभाग)
- श्रीरामपूर (श्रीरामपूर उपविभाग)
- संगमनेर (संगमनेर उपविभाग)
नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा कर्जत उपविभाग) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहमदनगर येथे स्थापण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील नद्या – Rivers in Ahmednagar district
आढळा नदी, कडा, कडी, कांबळी, केरी, केळी, कुकडी नदी, कौतिकी, गोदावरी नदी, घोडनदी नदी, ढोरा नदी, प्रवरा नदी, बोकडी, भीमा नदी, मुळा नदी, मेहेकरी, सीना नदी, हंगा नदी