।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
आई
आईने मुलाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला…
“बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला, तुझं आजारपण, पडणं, रडणं, दुखणं, भरवणं, शिकवणं, काय काय नाही केलं. स्वत:च जगणंच विसरले रे मी.”
मुलगा म्हणाला…
“आता मी भरपूर उच्चशिक्षण घेऊन, लवकरच मी मस्त पैकी चांगली मोठी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व मग मी जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन.”
आई स्मितहास्य करीत म्हणाली…
“अरे वेडया ! हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करतच आहेत की, अन हो ! तू जेव्हां खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा ऐहिक सुखाची गरजच नसेल मला.”
मुलगा म्हणाला…
“बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू फक्त आराम करीत बस “
आई आता हसली म्हणाली…
“सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच इच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न करावं ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून तुम्ही दोघांनी एकमेकाना साथ द्यावी, समजून घ्यावं व सुखाने, आनंदात, सुखी, समाधानी एकत्र नांदावं बस झाले.”
मुलगा थोडवेळ विचार करुन आईला म्हणाला.
“आता तूच सांग ना आई मला ! मी काय करावं तुझ्यासाठी?”
आता आईची कळी खुलली, ती मुलाला म्हणाली..
हे बघ तुझे लग्न होईल, तूला मुलबाळ होतील व तू तुझ्या संसारात गर्क होऊन जाशील, त्यावेळी तुला आमची आठवण कदाचित येणार नाही, तुझ्या संसारात आम्ही कधीच ढवळा ढवळ करणार नाहीत, पण जरा आमच्याकडे थोडे लक्ष असुदे, त्यासाठी दर महिन्याला वेळ काढून आम्हाला भेटण्यासाठी येशील ना.!!!
“ऐक ! जोपर्यन्त मी जिवंत असेन, तोपर्यन्त तू मला जेथे कुठे नोकरी व्यवसाय करशील तेथून नेहमी दर महिन्याला मला भेटायला ये, माझ्याशी मायेने, प्रेमाने मनमोकळया आठवणींवर गप्पा मार. आई म्हणून हीच अपेक्षा आहे माझी.”
“जेव्हां देवळात देवासमोर उभा राहशील, तेव्हां माझ्यावतीने सुध्दा प्रार्थना कर. की मी जेव्हां मरेन तेव्हा मला तू खांदा देण्यासाठी जेथे तू असशील तेथून जरूर नक्कीच हजर राहशील. तसेच माझ्या आठवणीसाठी गोरगरिबांना अन्नधान्य, दानधर्म कर.
_लक्षात ठेव तुझ्या हातून कुठलही गैर, वाईट कृत्य होऊ देवू नकोस, कोणतही व्यसन करु नकोस, भ्रष्टाचार, चोरी लबाडी, बेईमान, गद्दारी, अहंकार, गर्व करू नकोस.
कोणतही अस कृत्य तुझे हातून होऊ देवू नकोस की ज्यामुळे समाजात आमची मान खाली झुकेल. तू केलेलं प्रत्येक चांगलं काम मला सुख, समाधान व आनंद देईल. म्हणून आत्ता पासूनच सर्वांशी प्रेमाने वाग, जवळपास असलेल्या गुरुजन, लहान थोर, जेष्ठ मंडळी, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी या प्रत्येकाचा आदर कर, मान मर्यादा ठेव, यथायोग्य मान ठेव.
“लक्षात ठेव तुला जन्म देताना झालेल्या वेदना व वाढविताना झालेले कष्ट, हे मी स्वेच्छेने स्वीकारले होते, तुझ्यावर उपकार नाही केले मी, तो आमचा दोघांचा निर्णय होता.
देवाने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्या पदरात टाकले व मला एक सुवर्ण संधी दिली, एका त्याच्या कलाकृतीला घडविण्याची. त्याबद्दल त्या देवाची मी सदैव ॠणी असेनच. तू मला निखळ आनंद व साथ दिली.
तूझ्याहातून घडणारे प्रत्येक कार्य म्हणजेच मी तुझ्यावर मनःपासून केलेल्या सुसंस्काराचा मोबदला असेल.
मुला करशील का रे हे सर्व तुझ्या आईच्याइच्छा पूर्ण करण्यासाठी, नक्कीच कर?
त्याचवेळी निशब्द मुलाच्या डोळयातून वाहणारे आनंदी अश्रु खूप काही बोलत होते.
धन्य धन्य ती प्रत्येक माता, तिचे निरपेक्ष व निस्वार्थ प्रेम फक्त ती माताच करु शकते, त्रिवार वंदन त्या प्रत्येक मातेला
‘नाती’ टिकवण्यासाठी सत्य सोडायचं नसतं, कारण नात्यासाठी सत्य नसतं, सत्यासाठी नाती असतात. नाती क्षणिक असतात. सत्य अजरामर आहे. नाती स्वार्थासाठी जोडली जातात, त्यातील देवाण-घेवाण संपताच ती संपून जातात. अखेर नाती इथेच राहतात. पण सत्य बरोबर येतं!
🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका, वाद वाढऊ नका, दुसऱ्याच्या वहीवाट संपत्तीवर आपली समजून वागू नका, ते पाप आहे .
🌺समाजातील खोट्या राजकारणी व स्वार्थी, मतलबी लोकांपासुन दूर रहा, खोट्या अफवानवर विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.
🌺”प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा”.