अश्विन शुद्ध महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा का म्हणतात । कोजागिरी पौर्णिमेला कराची पूजा विधी | Ashwin shudh pornimela kojagiri pornima ka mhantat | Kojagirir purnima puja vidhi |

शरद पौर्णिमा | कोजागिरी पौर्णिमा | अश्विन शुद्ध पौर्णिमा | पौर्णिमेची रात्र | कोजागिरी पूजाविधी मांडणी | कोजागिरी पौर्णिमा पूजाविधी मांडणी | कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मी प्राप्ती | अक्काबाई पौर्णिमा । अलक्ष्मी पौर्णिमा । शरद पौर्णिमेला लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी ‘या’ गोष्टी निश्चित करा | कोजागरी पौर्णिमेच्या रात्री खीर का खाल्ली जाते | कोजागिरी पौर्णिमेला का केले जाते जागरण | शरद पौर्णिमेला या गोष्टी चुकूनही करू नका | कोजागिरी पौर्णिमा व्रत कथा | कोजागिरी पौर्णिमे दिवशी आटलेल्या दुध पिण्याचे महत्व |

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

कोजागिरी पौर्णिमा । Kojagiri Purnima | Sharad Purnima

पौर्णिमेची रात्र,चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा.
अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे. हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12. 39 या 39 मिनिटात करायचा असतो.
भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र ,कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकरांनी आपल्या घरीच करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना अमृताचा (दूध )नैवेद्य करावा

पूजाविधी मांडणी

मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर.…

  1. लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर श्री गुरुपीठातून घेतलेले सिद्ध श्री यंत्र ठेवावे. हे यंत्र उपलब्ध नसल्यास सुपारी ठेवावी.
  2. त्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून श्री गुरु पिठातून घेतलेले सिद्ध लक्ष्मी कुबेर यंत्र ठेवावे हे यंत्र उपलब्ध नसल्यास सुपारी ठेवावी.
  3. तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या किंवा गडवा त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा.
  4. चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा
    . अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावी.
    रात्री ठीक बारा ते साडेबारा या ३० मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे. जेणेकरून चंद्रदेवता शलाका रुपात अमृताचा प्रसाद देतात.
  5. साडेबाराला पूजेच्या पाटा समोर पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळदीकुंकू पांढरी फुले अक्षता अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व खालील प्रार्थना म्हणावी.
    ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय l शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा l l
    दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा.
    जर पूजनासाठी सुपारींचा वापर केला असेल तर याच सुपार्‍या जपून दरवर्षी पुजाव्यात.
    व दर कोजागिरीस व लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्यांची पूजा करावी.
    12 ते 12.30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी

लक्ष्मी प्राप्तीची सेवा….

  • श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळा जप
  • श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ
  • श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ
  • श्री कुबेर मंत्र 1 माळ
  • 16 वेळा श्री सूक्त
  • व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा
  • गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा.


ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे.
लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा लक्ष्मी! अनेक प्रकारची आहे वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे. कृपाळू आहे ती हित करणारी आहे . पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे.

मोठ्या बहिणीस अक्काबाई / अलक्ष्मी म्हणतात तिची अवकृपा झाली की, लोक म्हणतात अक्काबाईचा / अलक्ष्मी फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते. पण जे जागरण करतात,वरील सेवा करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते कोण जागतो आहे ? को जागर्ती ? यावरून या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडले. याच पौर्णिमेचे रात्री राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो. आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पहात असतो. वारंवार तो कोजागर्ता असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले आहे.

कोजागिरी पौर्णिमा व्रत कथा

प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती.

एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन-संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले.

कोजागिरी पौर्णिमे दिवशी आटलेल्या दुध पिण्याचे महत्व ?

अमृत प्राप्तीसाठी देव-दानवांमध्ये स्पर्धा लागली होती आणि त्यातूनच सागर मंथन घडले. सागराच्या पोटातून अनेक उत्तमोत्तम रत्ने बाहेर पडली. लक्ष्मी सागरातून प्रकट झाली, तो दिवस म्हणजे आश्विन पौर्णिमा! श्रीमहालक्ष्मी मातेचा जन्मदिवस म्हणून ही पौर्णिमा प्रसिद्ध आहे. कोजागिरीच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांमध्ये असतो. चंद्र यावेळी पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो. ऋग्वेदात म्हटले आहे, की ‘चंद्रमा मनसो जात:’ ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र मनावर थेट प्रभाव टाकतो. आयुर्वेदानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र प्रकाशात आटीव दुधात अनेक रोगांवरील औषधी वनस्पती मिसळून रामबाण औषधे निर्माण केली जातात.

भगवान श्रीकृष्ण सोळा कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात व्रजभूमीत, अर्थात वृंदावनात भगवंताने महारासलीला-रासक्रीडा केली होती. याप्रसंगाचे स्मरण म्हणून वैष्णव भक्त रासोत्सव करतात. या पौर्णिमेला रात्री लक्ष्मीची, कुबेराची, व ऐरावतावर आरूढ इंद्राची पूजा करतात. दिवसभर उपवास, पूजन, जागरण यांचे महत्त्व आहे. या तिन्ही देवतांची रात्रीच्या पहिल्या प्रहरी पूजा करून, पोहे व नारळाचे पाणी नैवेद्य म्हणून अर्पण करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. उत्तररात्रीपर्यंत जागरण करून सकाळी स्नान करून या कोजागिरी व्रताचे पारणे करण्याची परंपरा आहे. या रात्री घरातील ज्येष्ठ अपत्याचे औक्षण करून आश्विनी साजरी करण्याची परंपरा आहे.

पावसाळा संपून सर्वत्र सुंदर हिरवेगार वातावरण असते. नवीन पीक आलेले असते म्हणून या पौर्णिमेला कोकणात ‘नवान्न पौर्णिमा’ असेही म्हणतात. धान्य लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घराला नवीन धान्याचे तोरण बांधतात. दाराबाहेर लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळ्या घालतात, दिवे लावतात. सर्वजण चंद्रप्रकाशात गाणी, भजने म्हणतात.

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री खीर का खाल्ली जाते ?

शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्णावस्थेत असतो, पावसाळ्यानंतर आकाशही स्वच्छ असते. आख्यायिकेनुसार रात्री तांदूळ-दुधाची खीर धातूच्या भांड्यात (तांबे किंवा पितळ नव्हे) ठेवून स्वच्छ कापडाने बांधून मोकळ्या आकाशात ठेवली जाते. चंद्राच्या प्रकाशात ठेवल्यानंतर ते खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार, दुधामध्ये लैक्टिक अॅसिड असते, जे चंद्राच्या स्वच्छ किरणांपासून जंतूनाशक शक्ती प्रदान करते. यामुळे दमा, त्वचा रोग आणि श्वसनाच्या आजारात विशेष फायदा होतो, असे सांगितले जाते.

कोजागिरी पौर्णिमेला का केले जाते जागरण ?

शरद पौर्णिमेच्या (कोजागरी) चांदण्यात रात्र जागवण्याची परंपरा आहे. त्याला कारणही तसेच आहे. या पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. तसेच या दिवशी खीर खाण्याचीही परंपरा असून, चंद्राच्या किरणांमध्ये विशेष शक्ती असते असाही समज आहे.

चंद्राच्या किरणांमध्ये असे अमृत शरद पौर्णिमेशी संबंधित विविध मान्यता प्रचलित आहेत. धार्मिक मान्यतेनुसार या रात्री चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात, जे विविध आजारांचा नाश करतात. त्यामुळे जागरण करून चंद्राची किरणे अंगावर घेण्यासाठी नागरिकांचा प्रयत्न असतो.

शरद पौर्णिमेला लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी ‘या’ गोष्टी निश्चित करा

पांढरे शंख

असे मानले जाते की, समुद्रमंथनाने तयार होणारे पांढरे शंख लक्ष्मीला अतिशय प्रिय मानले जातात. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये ५ पांढरी शंख लाल कपड्यात बांधून ठेवा आणि पूजेनंतर ही शंख आपल्या धन ज्या ठिकाणी ठेवतात तिथे ठेवा. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहील

पान

लक्ष्मी देवीला पान अतिशय प्रिय मानले जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी पूजेत लक्ष्मी देवीला पान अर्पण करावे आणि स्वतःही सेवन करावे. शास्त्रामध्ये पान हे समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. लक्ष्मी देवीला सुपारी अर्पण करा आणि घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून वाटा.

तुळशी पूजन

मान्यतेनुसार, तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते आणि शरद पौर्णिमेला तुळशीची पूजा करणे खूप शुभ आहे. ज्या घरामध्ये तुळशीची नित्य पूजा केली जाते त्या घरातील लोकांवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते. शरद पौर्णिमेच्या दिवशी तुळशी जवळ तुपाचा दिवा ठेवा आणि सौभाग्याचं लेणं अर्पण करा. दुसऱ्या दिवशी या वस्तू एखाद्या गरजू विवाहित महिलेला दान करा. असे केल्याने तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर राहील.

शरद पौर्णिमेला या गोष्टी चुकूनही करू नका

हिवाळ्यात गरम दूध पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. या दिवशी चुकूनही दारूचे सेवन करू नये. तो अशुभ मानला जातो. शरद पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही पैशाचे व्यवहार करू नयेत. या दिवशी कोणत्याही व्यक्तीला कर्ज दिल्यास लक्ष्मीचा कोप होतो. शरद पौर्णिमेच्या दिवशी सवाश्न महिला घरी आल्यास तिला रिकाम्या हाताने परत जाऊ देवू नये. शक्य झाल्यास त्यांची ओटी भरावी.

उदकशांती पूजा म्हणजे काय ? (Udakshanti Puja Mhanje Kay)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )