ॲव्होकॅडो लागवड |Avocado Lagwad | Avocado Sheti |ॲव्होकॅडो पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । ॲव्होकॅडो पिक लागवडीखालील क्षेत्र । ॲव्होकॅडो पिक उत्पादन । ॲव्होकॅडो पिकाच्या सुधारित जाती । ॲव्होकॅडो पिकाची अभिवृद्धी । ॲव्होकॅडो पिकाची लागवड । ॲव्होकॅडो पिकाचे खत व्यवस्थापन । ॲव्होकॅडो पिकाचे पाणी व्यवस्थापन । ॲव्होकॅडो पिकातील आंतरपिके । ॲव्होकॅडो पिकातील आंतरमशागत । ॲव्होकॅडो पिकातील तणनियंत्रण । ॲव्होकॅडो पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । ॲव्होकॅडो पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । ॲव्होकॅडो फळांची काढणी, उत्पादन व विक्री ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
ॲव्होकॅडो लागवड |Avocado Lagwad | Avocado Sheti |
ॲव्होकॅडो यास बटर फ्रुट असेही म्हणतात. सर्व फळांत पौष्टिक फळ म्हणून याची नोंद आहे. महाराष्ट्रात या फळाची लागवड फारशी नाही. अलीकडे जागतिक व्यापार खुला झाल्यामुळे पुढील काळात हे फळ निर्यात होण्याची संधी आहे व याची लागवड होणे संभव आहे.
ॲव्होकॅडो पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।
या फळाचे उगमस्थान मेक्सिको हे आहे. मानवी आहारात या फळाचे स्थान महत्त्वाचे आहे. पक्व फळातील खाण्यायोग्य 100 ग्रॅममध्ये खालील घटक आढळतात.
अन्नघटक | प्रमाण | अन्नघटक | प्रमाण |
प्रथिने | 1.7 ग्रॅ. | मंगल | 4.21 मिग्रॅ. |
स्निग्ध पदार्थ | 26.4 ग्रॅ. | स्फुरद | 38 मिग्रॅ. |
शर्करा | 5.1 | पालाश | 36.8 मिग्रॅ. |
तंतुमय पदार्थ | 1.8 | सोडियम | 3 मिग्रॅ. |
चुना | 10 मिग्रॅ. | गंधक | 28.5 मिग्रॅ. |
क्लोरीन | 11 मिग्रॅ. | कॅरोटीन | 0.17 मिग्रॅ. |
तांबे | 0.45 मिग्रॅ. | अस्कार्बिक अॅसिड | 16 मिग्रॅ. |
लोह | 0.60 मिग्रॅ. | नियासीन | 1.10 मिग्रॅ. |
मॅग्नेशियम | 35 मिग्रॅ. | थियामीन | 0.16 मिग्रॅ. |
ॲव्होकॅडो समशीतोष्ण कटिबंधातील फळझाड असून त्याची लागवड मेक्सिको,
पेरू, जमैको, फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, इत्यादी देशांत होते. श्रीलंकेमधून 80 वर्षांपूर्वी या फळाचे दक्षिण भारतात आगमन झाले.
ॲव्होकॅडो पिक लागवडीखालील क्षेत्र । ॲव्होकॅडो पिक उत्पादन ।
जगात या फळझाडाखाली 1.50,000 हेक्टर क्षेत्र असून उत्पादन 16,45,000 टन इतके आहे. भारतात कर्नाटक, तामीळनाडू, केरळ या राज्यांत या फळझाडाची लागवड होते.. 1.2.3 हवामान आणि जमीन
या फळझाडास समशीतोष्ण प्रकारचे हवामान आणि मध्यम प्रतीची, उत्तम निचऱ्याची जमीन मानवते.
ॲव्होकॅडो पिकाच्या सुधारित जाती ।
पक्व फळाच्या गराच्या रंगावरून अॅव्होकॅडोच्या यलो, परपल, ग्रीन जाती ओळखल्या जातात.
ॲव्होकॅडो पिकाची अभिवृद्धी । ॲव्होकॅडो पिकाची लागवड ।
ॲव्होकॅडोची अभिवृद्धी बियांपासून तसेच शेंडाकलम आणि डोळे भरून केली जाते. 1.2.6 हंगाम आणि लागवडीचे अंतर
एक वर्ष वयाची रोपे जून-जुलै ते सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात लावून लागवड करतात. अॅव्होकॅडो लागवड करावयाची जात आणि जमीन यांवरून लागवडीचे अंतर 8 X 8 मीटर, 10X10 मीटर किंवा 12 X 12 मीटर असे ठेवावे.
ॲव्होकॅडो पिकाचे खत व्यवस्थापन । ॲव्होकॅडो पिकाचे पाणी व्यवस्थापन ।
ॲव्होकॅडोचे हेक्टरी 15 टन उत्पादन येण्यासाठी पुढीलप्रमाणे खते घालावीत.
नत्र | 40 कि. | स्फुरद | 25 कि. |
पालाश | 60 कि. | चुना | 11 कि. |
मॅग्नेशियम | 10 कि. | जस्त | 0.5 कि. |
ॲव्होकॅडो पिकातील आंतरपिके । ॲव्होकॅडो पिकातील आंतरमशागत । ॲव्होकॅडो पिकातील तणनियंत्रण ।
पहिली पाच वर्षे लसूण हे आंतरपीक घ्यावे. दरवर्षी नियमितपणे खोडाभोवती मशागत करून स्वच्छता ठेवावी. वेळोवेळी तणे काढावीत. खोडाभोवती आच्छादन करून ओलावा टिकवावा व तणांचाही बंदोबस्त करावा.
ॲव्होकॅडो पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।
पांढरी माशी, खवले कीड, पिठ्या ढेकूण आणि लाल कोळी या महत्त्वाच्या किडी आहेत. शिफारस केल्याप्रमाणे कीडनाशके फवारून या किडींचे नियंत्रण करावे.
ॲव्होकॅडो पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण ।
कोलिटोट्रिकम, फुजारियम, सर्कोस्पोरा, स्कॅब, मूळकूज हे प्रमुख रोग अॅव्होकॅडो या फळझाडावर आढळतात. शिफारस केल्याप्रमाणे बुरशीनाशकांचा वापर करून या रोगांचे नियंत्रण करावे.
ॲव्होकॅडो फळांची काढणी, उत्पादन व विक्री ।
ॲव्होकॅडोस डिसेंबर – जानेवारीमध्ये फुले येऊन मे-जूनमध्ये फळे तयार होतात. तयार फळे अलगदपणे काढावीत. पूर्ण वाढलेल्या एका झाडावर महाराष्ट्रात 200 फळे येऊन त्यांचे वजन 150 किलो भरते. फळांची विक्री शक्य तेवढ्या लवकर करावी. फळे काढणीनंतर 8 – 10 दिवस टिकतात. अॅव्होकॅडोची फळे झाडावर पिकत नाहीत; म्हणून काढणीनंतर खोलीच्या तापमानाला 8-10 दिवस ठेवल्यास फळे पिकतात.
सारांश ।
ॲव्होकॅडो हे फळझाड समशीतोष्ण हवामानात वाढणारे असून श्रीलंकेतून ते भारतात आले. महाराष्ट्रात याची लागवड फारशी नाही. तथापि, त्यातील पौष्टिकता आणि निर्यातसंधी यावरून नजीकच्या काळात याची लागवड वाढण्याची शक्यता आहे.
ॲव्होकॅडोची लागवड रोपे लावून अथवा शेंडे कलमे लावून 8-10 मीटर अंतरावर करावी. कलमी झाडांना 6 वर्षांनंतर तर रोपापासूनच्या झाडांना 10 वर्षांनंतर फळे येतात. अॅव्होकॅडोचे झाड 70-80 वर्षे उत्पादन देते. एका झाडावर 150 किलो व दर हेक्टरी 15 टनांचे उत्पादन मिळते.