महाराष्ट्र बाल संगोपन योजना

आज आपण बाल संगोपन योजना महाराष्ट्र 2022 किंवा अनाथ मुलांची योजना यासंबंधी माहिती पाहणार आहोत. बाल संगोपन योजना, तिची उद्दिष्टे, फायदे, पात्रता,  आवश्यक कागदपत्रे, बाल संगोपन योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांची निवड प्रक्रिया, पात्रता, काम, अनुदान वितरण प्रक्रिया आदी सर्व माहिती पाहणार आहे. , Baal Sangopan Yojana Maharashtra,

नमस्कार ! जय महाराष्ट्र !

महाराष्ट्र बाल संगोपन योजना 2022

महाराष्ट्र सरकार तर्फे महिला व बाल विकास विभागामार्फत बाल संगोपन योजना सन २००८ पासून राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत मुलाला त्याच्या शिक्षणासाठी प्रतिमहा आर्थिक मदत राज्य शासनाकडून दिली जाते. या योजनेअंतर्गत कुटुंबातील एकापेक्षा अधिक मुले देखील या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. जसे की कुटुंबात एखादे आर्थिक संकट आले, ज्यामुळे मुलांना त्यांचे आई-वडील गमवावे लागले, घटस्फोटित असतील, पालक रुग्णालयात दाखल असतील अशा कुटुंबातील मुलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळतो. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर आमचा हा लेख संपूर्ण वाचून या योजनेचा आवश्य लाभ घ्या. या योजनेची आर्थिक मदत ही प्रतिमहा मुलांना दिली जाते. covid-19 च्या विषाणूंच्या संसर्गाने जी मुले अनाथ झाली आहेत, त्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. यामध्ये जर पालकांपैकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल आणि दुसरा कमाई न करणारा सदस्य असेल. तर या परिस्थितीत बालसंगोपन योजनेअंतर्गत मुलाची नोंदणी केली जाऊ शकते. सरकारला या योजनेची व्याप्ती वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुलांना रुपये ११२५/- ची आर्थिक मदत दिली जाते. ती आता २,५००/- रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. तसेच अशा मुलांना मोफत शिक्षण हि दिले जाऊ शकते.

योजनेचे नावमहाराष्ट्र बाल संगोपन योजना
विभागमहिला व बालविकास मंत्रालय महाराष्ट्र सरकार
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील मुले ज्यांचे वय १ ते १८ वर्ष्या पर्यंत आहे.
योजनेचे उद्धिष्टलहान मुलाचे जीवन सुधारणे
अधिकृत वेबसाईटमहाराष्ट्र बालसंगोपन योजना
बाल संगोपन योजने ची माहिती

बाल संगोपन योजनेचे उद्दिष्ट

महाराष्ट्र राज्य सरकारअंतर्गत राबवलेल्या या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्व पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. राज्यातील अनाथ, एक पालक असलेली बालके, मृत्यू, घटस्फोट, अविवाहित मातृत्व, परित्याग, विभक्तीकरण, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे, इत्यादी कारणामुळे अनाथ झालेल्या मुल्लांना आर्थिक स्थेर्य प्राप्त करून देणे.राज्यातील पालक आर्थिक अडचणीमुळे त्यांच्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाहीत. त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहिले जातात आणि बेरोजगारीचे प्रमाण देखील वाढते. या सर्व गोष्टींचा विचार करता महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत राज्यातील असहाय मुलांच्या विकासाच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविली जात आहे

बाल संगोपन योजनेसाठीची पात्रता

  • Baal Sangopan या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलाचे वय १ ते १८ वर्ष या दरम्यान असावे.
  • या योजनेअंतर्गत अनाथ, बेघर मुले, या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र असतील.
  • अर्जदार लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे

बाल संगोपन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र :

  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • अर्जदाराच्या पालकांचा फोटो
  • पालकाचा मृत्यू झाला असल्यास मृत्यूदाखला
  • बँक पासबुक झेरोक्स
बालसंगोपन योजनेचा लाभ कोणत्या मुलांना मिळू शकेल ?

अनाथ ,जी मुले दत्तक देणे शक्य होत नाही.एक पालक असलेली मुले,पालकांचा मृत्यू किवा घटस्फोट, अविवाहित मातृत्व, परित्याग, इत्यादी कारणांमुळे विघटित झालेल्या एका पालक असलेल्या कुटुंबातील कुष्ठरोग व जन्मठेप शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके. तीव्र मतिमंद, एचआयव्हीग्रस्त बालके, पालक अपंग आहेत अशी बालके,अति हेटाळणी व दुर्लक्षित पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव कुटुंबातील बालके बाल कामगार विभागाने प्रमाणित केलेले.

बालसंगोपन योजनेकरिता स्वयंसेवी संस्थांची निवड प्रक्रिया कशी करतात

या योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांची निवड करण्याचे अधिकार महाराष्ट्र सरकारला राहतील. स्वयंसेवी संस्थेस १०० पेक्षा जास्त मुलांसाठी शासन निर्णयान्वये मान्यता व अनुदान दिले जात नाही.

Maharashtra Nav Tejaswini Yojana – महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना ऑनलाइन अर्ज

आता उजनीसह आणखी पाच धरणांची पाणी साठवम क्षमता वाढणार काय आहे बातमी सविस्तर वाचा ?

बालसंगोपन योजनेसाठी स्वयंसेवी संस्थेची पात्रता :

स्वयंसेवी संस्थेला कुटुंब व बालविकास क्षेत्रातील कार्याचा कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. तरच त्या स्वयंसेवी संस्थेला बालसंगोपन हि योजना राबवता येईल.संस्था किंवा संघटनेकडे कमीत कमी २ सामाजिक शास्त्र विषयावरील प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते असावेत.संघटनेची कार्यकारी समिती असणे आवश्यक आहे.

बालसंगोपन योजनेसाठी स्वयंसेवी संस्थेची कामे कोणती ?
  • गरजू बालकांची निवड करणे.
  • बालकांचे संगणकीय रेकॉर्ड ठेवणे. ही स्वयंसेवी संघटनेची जबाबदारी असेल
  • पालक कुटुंबांचा शोध घेणे.
  • संगोपन करणाऱ्या कुटुंबास मार्गदर्शन करणे. देखरेख ठेवणे
  • गृहभेटी अहवाल संचालनालयास सादर करणे.
बाल संगोपन योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :

बाल संगोपन योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांना खालील प्रक्रियांचे पालन करावे लागेल.

  • सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र बालसंगोपन योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल.
  • या होम पेजवर तुम्हाला स्कीम्स पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
  • आपल्याला या पृष्ठावर स्क्रोल करून थोडे खाली जावे लागेल.
  • खाली गेल्यावर, तुम्हाला बाल संगोपन योजना (मुलांसाठी कुटुंब आधारित काळजी) विभाग दिसेल.
  • तुम्हाला या विभागात डाउनलोड या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्या समोर PDF फॉरमॅट ओपन होईल. तुम्हाला ही pdf डाउनलोड करावी लागेल.
  • डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यात विचारलेली सर्व माहिती टाकावी लागेल.
  • आता तुमच्या समोर PDF फॉरमॅट ओपन होईल. तुम्हाला ही pdf डाउनलोड करावी लागेल.
  • डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यात विचारलेली सर्व माहिती टाकावी लागेल.
  • माहिती भरल्या नंतर, आपल्याला आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
  • नंतर तुम्हाला संबंधित विभागात जाऊन सबमिट करावे लागेल, अशा प्रकारे तुमचा अर्ज भरला जाईल.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )