बीड जिल्हा माहिती (Beed District Information)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

बीड जिल्हा – Beed District (महाराष्ट्रातील ३६ जिल्हे Maharashtra 36 District)

बीड जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी आहे. जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात हिंदी व्यतिरिक्त मराठी, उर्दू, तेलुगू या भाषादेखील बोलल्या जातात.बीड जिल्ह्यातील माजलगाव हा एक सधन तालुका आहे.

बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ (किमी वर्ग) १०,४३९ असून जिल्ह्याची लोकसंख्या (२००१ जनगणना) नुसार २१६१२५० इतकी आहे महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येत (%) मध्ये 2.23% इतकी आहे बीड जिल्ह्याची घनता (प्रती किमी वर्ग) शहरी क्षेत्रफळ (%) २०७.०४ आहे तसेच जिल्ह्यातील साक्षरता दर (%) १७.९१ असून जिल्ह्यात एकूण तहशिल ९३६ आहे

बीड जिल्ह्याच्या चतुःसीमा

१} पूर्वेला : परभणी जिल्हा २} पश्चिमेला : अहमदनगर जिल्हा ३} उत्तरेला : जालना जिल्हा आणि औरंगाबाद जिल्हा ४} दक्षिणेला : लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा

बीड जिल्ह्याचे प्रशासकीय विभाग – Administrative Division of Beed District

बीड जिल्ह्याचे विभाजन २ उपविभागांमध्ये करण्यात आले आहे. त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत.

  • बीड उपविभाग
  • अंबेजोगाई उपविभाग

या उपविभागांचे विभाजन ११ तालुकामध्ये पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.

  • बीड
  • किल्ले धारूर
  • अंबेजोगाई
  • परळी-वैद्यनाथ
  • केज
  • आष्टी
  • गेवराई
  • माजलगाव
  • पाटोदा
  • शिरूर
  • वडवणी
  • शिरूर व वडवणी या तालुक्यांची निर्मिती २६ जून १९९९ ला करण्यात आली.

जिल्ह्यात ६० जिल्हा परिषद मतदारसंघ असून ११ पंचायत समित्या आहेत.
एकूण गावे १३४६ तर १०१९ ग्रामपंचायती आहेत. विद्युतीकरण झालेली ग्रामीण गावे : १३७

राजकीय संरचना – Political structure

लोकसभा मतदारसंघ
१} बीड (लोकसभा मतदारसंघ)
२} बीड विधानसभा मतदारसंघ
३} केज विधानसभा मतदारसंघ
४} आष्टी विधानसभा मतदारसंघ
५} गेवराई विधानसभा मतदारसंघ
६} परळी विधानसभा मतदारसंघ
७} माजलगाव विधानसभा मतदारसंघ

बीड लोकसभा मतदारसंघ (बीड लोकसभा मतदारसंघातील पूर्वीपासून चे खासदार)

लोकसभाकालावधीखासदाराचे नावपक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७रामचंद्र गोविंद परांजपे
दुसरी लोकसभा१९५७-६२रखमाजी धोंडिबा पाटिलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा१९६२-६७द्वारकादास मंत्रीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१नाना रामचंद्र पाटिलमा क प
पाचवी लोकसभा१९७१-७७सयाजीराव त्रिंबकराव पंडितभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८०गंगाधरअप्पा महारुद्रप्पा बुरांडे
सातवी लोकसभा१९८०-८४केशरबाई सोनाजीराव क्षीरसागरभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा१९८४-८९केशरबाई सोनाजीराव क्षीरसागरभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा१९८९-९१बबनराव दादाबा ढाकणेजनता दल
दहावी लोकसभा१९९१-९६केशरबाई सोनाजीराव क्षीरसागरभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८रजनी अशोकराव पाटीलभारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९जयसिंगराव गायकवाड पाटीलभारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा१९९९-२००४जयसिंगराव गायकवाड पाटीलभारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा२००४-२००९जयसिंगराव गायकवाड पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४गोपीनाथ पांडुरंग मुंडेभारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा२०१४-२०१९गोपीनाथ पांडुरंग मुंडे (रिक्त)भारतीय जनता पक्ष

बीड विधानसभा मतदारसंघ (बीड विधानसभा मतदारसंघातील पुर्वीचे आमदार)

कालावधीआमदार नावपक्ष
१९६७-१९७२एस. बी. चावरेकाँग्रेस
१९७२-१९७८सय्यद अली देशमुखकाँग्रेस
१९७८-१९८०आदिनाथ लिंबाजी नवले
१९८०-१९८५राजेंद्र साहेबराव जगताप
१९८५-१९९०सिराजुद्दिन सफदरअली देशमुखकाँग्रेस
१९९०-१९९५सुरेश निवृत्ती नवलेशिवसेना
१९९५-१९९९सुरेश निवृत्ती नवलेशिवसेना
१९९९-२००४सय्यद सलीम सय्यद अलीराष्ट्रवादी
२००४-२००९सुनिल धांडेशिवसेना
१००९-२०१४जयदत्त क्षीरसागरराष्ट्रवादी
२०१४-२०१९जयदत्त क्षीरसागरराष्ट्रवादी,शिवसेना
२०१९संदिप क्षीरसागरराष्ट्रवादी

आष्टी विधानसभा मतदारसंघ (आष्टी विधानसभा मतदारसंघातील पुर्वीचे आमदार)

कालावधीआमदार नावपक्ष
१९५२ – १९५७रखमाजी गावडे
१९५७ – १९६२विश्‍वनाथभाऊ आजबे
१९६२ – १९६७भाऊसाहेब आजबे
१९६७-१९७२ऍड. निवृत्तीराव उगले
१९७२-१९७८श्रीपत कदम
१९७८-१९८०लक्ष्मणराव जाधवकाँग्रेस
१९८०-१९८५भीमराव धोंडेअपक्ष
१९८५-१९९०भीमराव धोंडेकाँग्रेस
१९९०-१९९५भीमराव धोंडेकाँग्रेस
१९९५-१९९९साहेबराव दरेकरअपक्ष
१९९९-२००४धस सुरेश रामचंद्रभाजप
२००४-२००९धस सुरेश रामचंद्रभाजप
२००९-२०१४धस सुरेश रामचंद्रराष्ट्रवादी
२०१४धोंडे भीमराव आनंदरावभाजप

माजलगाव विधानसभा मतदारसंघ (माजलगाव विधानसभा मतदारसंघातील पुर्वीचे आमदार)

कालावधीआमदार नावपक्ष
१९६२ – १९६७श्रीपादराव कदमभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७-१९७२एस. त्रिभुवनभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७२-१९७८त्रिभुवन शंकरन नातुभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७८-१९८०सुंदरराव आबासाहेब सोळंकेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९८०-१९८५गोविंदराव सिताराम डक
१९८५-१९९०मोहन दिगंबरराव सोळंके
१९९०-१९९५राधाकृष्ण साहेबराव पाटिलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९९-२००४बाजीराव सोनाजीराव जगताप
२००४-२००९प्रकाशदादा सुंदरराव सोळंके

बीड जिल्ह्याची भौगोलिक माहिती – Geographical Information of Beed District

बीड जिल्हा समुद्रापासून दूर आहे. बीड जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. जिल्ह्यातील उत्तर भाग सपाट मैदानी आहे. जिल्ह्याच्या मध्य-दक्षिण भागात बालाघाटचे डोंगर आहेत. येथे चिंचोली, नेकनूर हे भाग येतात. या भागास मांजरथडी असेही म्हणतात. मांजरसुभ्याहून बीडकडे जाताना पालीघाट लागतो. गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. या भागास गंगथडी असेही म्हणतात. हा सुपीक भाग गाळापासून बनला आहे. यात गेवराई, माजलगाव व परळी या तालुक्यांचा समावेश होतो.

बीड जिल्ह्यातील हवामान – Weather in Beed District

जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणत: उष्ण व कोरडे आहे. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मे महिन्यात तापमान महत्तम असते. डिसेंबर महिन्यात तापमान कमीतकमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी होते. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील उंचावरील बालाघाट डोंगराळ प्रदेशातील हवामान काहीसे थंड आहे तर सखल भागात ते उबदार व थोडेसे दमट आहे. अंबेजोगाई तालुक्यातील हवामान अधिकच आल्हाददायक असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधील पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून पाऊस अनियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बराचसा भाग अवर्षणग्रस्त आहे. जो पाऊस पडतो त्याचे जिल्ह्यातील वितरणही असमान आहे. पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत गेलेले आढळून येते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील अंबेजोगाई, केज, माजलगाव, परळी, धारूर आदी तालुक्यात तो तुलनात्मकदृष्टया अधिक पडतो तर गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर यांसारख्या तालुक्यात तो खूपच कमी पडतो. जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा, बीड, माजलगाव, केज, आष्टी या तालुक्यांचा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश होतो. येथील लोक दुष्काळाचा सामना करतात .

बीड जिल्ह्यातील जलसिंचन पद्धती

बीड जिल्ह्यात विहिरी, कूपनलिका व नद्या ही पाणीपुरवठ्याची मुख्य साधने आहेत. जिल्ह्यात बीड व आष्टी या भागात विहिरी तुलनात्मकदृष्टया अधिक आहेत. बीड शहरात माजलगाव तलाव व बिंदुसरा तलावातून पाणी पुरवठा होतो. बीड शहराला ऐतिहासिक पाणीपुरवठा करमारी खजाना विहिरीद्वारे होत असे.

बीड जिल्ह्यातील नद्या – Rivers in Beed District

  • गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद-बीड, जालना-बीड व परभणी-बीड अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. ती जिल्ह्याच्या गेवराई, माजलगाव व परळी तालुक्यांतून वाहत जाते.
    जिल्ह्यातील सिंधफणा, वाण, सरस्वती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. रेना नदी, वाण नदी व सरस्वती नदी या बीड जिल्ह्यातील मध्य डोंगराळ भागात उगम पावतात व दक्षिणकडे वाहत जाऊन पुढे गोदावरीस मिळतात.
  • मांजरा ही बीड जिल्ह्यातील दुसरी महत्त्वाची नदी आहे. ही नदी पाटोदा तालुक्यातील हरिश्चंद्र बालाघाटच्या पर्वतरांगामध्ये उगम पावते. ही नदी सुरुवातीस उत्तर – दक्षिण असा प्रवास करून नंतर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बर्‍याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे काम केले आहे. मांजरा नदी सुमारे ७२५ कि.मी. अंतराचा प्रवास करत आंध्र प्रदेशात जाऊन गोदावरी नदीस मिळते. बीड जिल्ह्यातील केज, रेना, लिंबा व चौसाळा या मांजरा नदीच्या उपनद्या असून त्या बालाघाटच्या डोंगराळ प्रदेशात उगम पावून जिल्ह्यातच मांजरा नदीस मिळतात.
  • सिधंफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकड्यांत उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंदर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण सिधंफणा नदीवर आहे.
  • बिंदुसरा नदी बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावते. ही सिधंफणाची एक उपनदी आहे. बिंदुसरा नदीवर बीडजवळ जिल्ह्यातील मोठा धरणप्रकल्प आहे. ही नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणेस मिळते. पुढे सिंदफणा गोदावरीला मिळते.
  • कुंडलिका ही सिंधफणेची एक उपनदी बीड जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिंधफणेस मिळते.
  • सीना नदी जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैर्ऋत्य सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले. आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.
  • पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाते. पुढे सौताडा येथे विंचरणेचा प्रवाह सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो. येथील धबधबा प्रसिद्ध आहे.

बीड जिल्ह्यातील धरण प्रकल्प – Dam Project in Beed District

बीड जिल्ह्यात २ मोठे, १६ मध्यम व १२२ लघु प्रकल्प आहेत. माजलगाव व मांजरा हे मोठे प्रकल्प आहेत. बीड शहराला माजलगाव व बिंदूसरा प्रकल्पामधून पाणी पुरवठा होतो. इतर धरण प्रकल्प :- सिंदफणा (शिरूर), बेलपारा (शिरूर), महासांगवी (पाटोदा), वाण (परळी) ,बोरणा (परळी) ,बोधेगाव (परळी), सरस्वती (वडवणी), कुंडलिका (वडवणी), वाघेबाभूळगाव (केज), शिवनी (बीड), मणकर्णिका (बीड), सौताडा (पाटोदा), मेहकरी (आष्टी), कडा (आष्टी), कांबळी (आष्टी), रूटी (आष्टी), तलवार( आष्टी), हिंगेवाडी (शिरूर), नागतळवाडी, वेलतुरी, लोणी, पारगाव, कोयाळ, खुंटेफळ, पिंपळा, गोलंग्री, सुलतानपूर, कटवट, जरुड, जुजगव्हाण, ईट, मैंदा, अंबा, मन्यारवाडी, शिंदेवाडी, मादळमोही, दासखेड, इंचरणा, मस्साजोग, कारंजा, होळ, मुळेगाव, जनेगाव, तांदुळवाडी, पहाडीपारगाव, साळींबा, नित्रुड, शिंदेवाडी, वांगी, चिंचोटी, तिगाव, लोणी, सांगवी, ढालेगाव, मांजरा (धनेगाव), वगैरे

बीड जिल्ह्यात घेतली जाणारी पिके – Crops Grown in Beed District

  • एकूण पिकाखालील क्षेत्र : ६६२ हजार हेक्टर
  • एकूण ओलीत क्षेत्र : २३६ हजार हेक्टर
  • एकूण वनक्षेत्र : २६ हजार हेक्टर
  • एकूण पडीत क्षेत्र : १२३ हजार हेक्टर
  • एकूण दुसोटा क्षेत्र : हजार हेक्टर

जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतात. ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे खूप उत्पन्न असलेले प्रमुख पीक असून ते दोन्ही खरीप व रब्बी अशा हंगामांत घेतले जाते. शिवाय कापूस हे महत्त्वाचे खरीप नगदी पीक आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, उडीद, तीळ, जवस, मसूर, सोयाबीन, मिरची, ऊस, कांदा, वगैरे अन्य पिकेही जिल्ह्यात घेतली जातात.. बीड जिल्हा हा तेलबिया व भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यातील पाटोदा, बीड, माजलगाव, अंबेजोगाई, केज, शिरूर, आष्टी या तालुक्यात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. बाजरीची शेती प्रामुख्याने पाटोदा, शिरूर, आष्टी, माजलगाव, केज या तालुक्यात केली जाते. भुईमुगाचे उत्पादन प्रामुख्याने आष्टी, अंबेजोगाई, केज येथे होते. कापूस उत्पादनात आष्टी, माजलगाव, बीड व गेवराई तालुके अग्रेसर आहेत.

आष्टी, केज, माजलगाव, बीड, गेवराई व वडवणी या तालुक्यात ऱब्बी ज्वारी होते. आष्टी, केज, माजलगाव, बीड, गेवराई या तालुक्यात गहू पिकतो. आष्टी, पाटोदा, बीड व केज येथे हरभऱ्याचे उत्पादन निघते. करडईची लागवड आष्टी, माजलगाव, गेवराई इत्यादी तालुक्यामध्ये केली जाते.

जिल्ह्यात बागायती शेतीसुद्धा थोड्या प्रमाणात होते. उसाची लागवड आष्टी, बीड, माजलगाव, गेवराई, अंबेजोगाई इत्यादी तालुक्यामध्ये केली जाते. बीड, अंबेजोगाई या तालुक्यांत द्राक्षाचे उत्पादन होते. गोदावरी व मांजरा या नदयाकाठी कलिंगडाचे उत्पन्‍न घेतले जाते. आंबे उत्पादनात आष्टी, बीड, अंबेजोगाई, नेकनूर आघाडीवर आहेत. नेकनूर येथे काला पहाड व अंबेजोगाई येथे पेवंदी हे आंबे प्रसिद्ध आहेत. याशिवाय पेरू, मोसंबी, केळी यांचेही उत्पन्‍न घेतले जाते. या जिल्हय़ात २००८ झालेल्या पशुगणनेनुसार जवळपास साडेदहा लाख जनावरे आहेत. यात साडेसहा लाखांपर्यंत दुधाळ जनावरे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दूधउत्पादन हा शेतकर्‍यांचा मोठय़ा प्रमाणावर जोडधंदा मानला जातो. आठ सरकारी व चार खासगी दूध संघाच्या माध्यमातून दूधसंकलन केले जाते.

बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग – National Highway in Beed District

  • कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ बीड जिल्ह्यातून जातो. या महामार्गावरून हा जिल्हा गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील शहरांशी जोडला गेला आहे.
  • सोलापूर-औरंगाबाद-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ बीड जिल्ह्यातून जातो. हा महामार्ग औरंगाबाद, धुळे, उस्मानाबाद आणि सोलापूर ह्या शहरांना जोडतो.

बीड जिल्ह्यातील प्रमुख रस्ते – Major Roads in Beed District

  • प्रमुख राज्य महामार्ग २ (महाराष्ट्र) हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राज्य महामार्ग आहे. हा राज्य महामार्ग ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराला, बीड शहरासोबत जोडतो व ठाणे,अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातुन जातो. हा राज्य महामार्ग कल्याणपासून राष्ट्रीय महामार्ग २२२ मार्गे अहमदनगर पर्यंत येतो व नंतर बीडकडे वळतो. हा महामार्ग कल्याण, मुरबाड, आळे फाटा, अहमदनगर आणि बीड ह्या शहरांना जोडतो.
  • राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र) हा महामार्ग शहापूर – कळसूबाई – अकोले – संगमनेर – श्रीरामपूर – नेवासा – गेवराई असा जातो.
  • राज्य महामार्ग १६२ (महाराष्ट्र) हा महामार्ग अंबेजोगाई – तांडुलजा – मुरुड – कानेगाव – उजनी – अक्कलकोट असा जातो.
  • राज्य महामार्ग १६९ (महाराष्ट्र) हा महामार्ग रेणापूर – घाटनांदूर – पार्ली असा जातो.
  • राज्य महामार्ग १६८ (महाराष्ट्र) हा महामार्ग रेणापूर – नालेगाव – उदगीर – देगलूर असा जातो.

बीडपासून उत्तरेकडे जाणारा मार्ग गेवराईमार्गे जालना व शेवगावकडे जातो. बीडपासून पूर्वेकडे जाणारा मार्ग माजलगावमार्गे पाथरीकडे जातो. दक्षिणेकडे जाणारा मार्ग केजमार्गे कळंबकडे जातो तर दुसरा दक्षिणेकडे मांजरसुभामार्गे उस्मानाबाद व सोलापूरस जातो. बीडपासून पश्चिमेकडे जाणारा मार्ग आष्टीमार्गे अहमदनगरकडे जातो.

बीड जिल्ह्यातील रेल्वे मार्ग – Railway Lines in Beed District

जिल्ह्यात परळी हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे (२६१ कि.मी.) काम आगामी काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात लोहमार्ग अंबेजोगाई व परळीत आहे. येथे एक लोहमार्ग परभणी (गंगाखेड) तर एक लोहमार्ग लातूर (उदगीर) येथून येतो. घाटनांदूर हे रेल्वे स्थानक आहे.

बीड जिल्ह्यातील साखर कारखाने – Sugar Factories in Beed District

  • परळी वैजनाथ सहकारी साखर कारखाना, परळी
  • कडा सहकारी साखर कारखाना, आष्टी
  • जय भवानी सहकारी साखर कारखाना, गेवराई
  • माजलगाव सहकारी साखर कारखाना, माजलगाव
  • गजानन सहकारी साखर कारखाना, बीड
  • विखे पाटील सहकारी साखर कारखाना, केज
  • अंबा सहकारी साखर कारखाना, अंबेजोगाई

बीड जिल्ह्यातील शिक्षण महाविद्यालये आणि शाळा – Education Colleges and Schools in Beed District

अभियांत्रिकी महाविद्यालये: (३)

  • सोमनाथ नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालय संस्था, परळी जिल्हा बीड
  • आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालय संस्था, बीड
  • बसवेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय संस्था, आंबेजोगाई जिल्हा बीड

वैद्यकीय महाविद्यालये: (२)

  • स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, आंबेजोगाई जिल्हा बीड

तंत्रनिकेतन:

  • शासकीय अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालय, बीड

कृषी महाविद्यालय:

  • आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड
  • छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी जिल्हा बीड
  • केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कृषी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, जिल्हा बीड
  • आदित्य कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, जिल्हा बीड
  • आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, जिल्हा बीड

अध्यापक विद्यालये:

  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था: १४
  • महाविद्यालये : ६५
  • माध्यमिक शाळा: ५५२
  • प्राथमिक शाळा: २०००
  • आदिवासी आश्रमशाळा: २

बीड जिल्ह्यातील रुग्णालय – Hospital in Beed District

  • जिल्हा सामान्य रुग्णालय: २
  • जिल्हा स्त्री रुग्णालय : १
  • जिल्हा क्षय रुग्णालय : १
  • खासगी रुग्णालये : १४
  • खासगी दवाखाने : २७
  • प्राथमिक आरोग्य केंद्रे : ५०
  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे : २७८
  • प्राथमिक आरोग्य पथके : २
  • ग्रामीण कुटुंब केंद्र :

Recent Post

भंडारा जिल्हा माहिती (Bhandara District Information)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )