रुपया । सिरीयल नंबर । रुपया नोटांचे मटेरियल । ५०० आणि १००० च्या नोटा । किती नोटा छापू शकते RBI । रुपया छपाईला किती खर्च येतो । नाणी । ५ च्या नाण्यापासून ब्लेड । नाण्यावर खास खूण । कमी खर्चात करा या देशांची सफर ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
रुपया
भारतात चलनाचा (करन्सी) इतिहास २५०० वर्ष जुना आहे. याची सुरुवात एका राजाने केली होती. जर इंग्रजांना शक्य झाले असते, तर आज भारताचे चलन पौंड असते. परंतु रुपया मजबूत असल्यामुळे तसे होऊ शकले नाही. गोष्ट सन १९१७ मधील आहे, जेव्हा रुपया १३ अमेरिकन डॉलर च्या बरोबर होता. मग १९४७ मध्ये भरत स्वतंत्र झाला आणि 1 रुपया = 1$ करण्यात आले. पुढे हळूहळू भारतावर कर्ज वाढत गेले, तेव्हा इंदिरा गांधींनी कर्ज चुकते करण्यासाठी रुपयाची किंमत अर्धी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आजपर्यंत रुपयाची किंमत घसरतच आली आहे.
स्वातंत्र्याच्या नंतर पाकिस्तानने तोपर्यंत भारतीय चलन वापरले, जोपर्यंत त्यांनी स्वतःच्या चालू शकणाऱ्या नोटा छापल्या नाहीत. भारताच्या व्यतिरिक्त इंडोनेशिया, मॉरीशस, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांची देखील करन्सी रुपया आहे.
नोटांवरील चित्र.
प्रत्येक भारतीय नोटेवर कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा फोटो छापलेला असतो. जसे २० रुपयांच्या नोटेवर अंदमान बेटाचा फोटो आहे, तर १० रुपयांच्या नोटेवर हत्ती, गेंडा आणि सिंह छापलेला आहे, १०० रुपयांच्या नोटेवर डोंगर आणि ढगांचे चित्र आहे. याशिवाय ५०० रुपयांच्या नोटेवर स्वातंत्र्याच्या आंदोलनाशी निगडीत ११ मूर्तींचा फोटो छापलेला आहे. भारतीय नोटेवर तिची किंमत १५ भाषांमध्ये लिहिली जाते. भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा जो फोटो छापलेला असतो, तो फोटो तेव्हा काढण्यात आलेला होता, जेव्हा गांधी, तत्कालीन बर्मा आणि भारतात ब्रिटीश सेक्रेटरीच्या रुपात कार्यरत असलेल्या फ्रेडरिक लॉरेन्स याला कलकत्ता स्थित व्हाईसराय हाउस मध्ये भेटायला गेले होते. १९९६ मध्ये हा फोटो नोटांवर छापण्यास सुरुवात झाली. त्यापूर्वी नोटेवर अशोक स्तंभ छापला जात असे.
RBI ने जानेवारी १९३८ मध्ये पहिल्यांदा ५ रुपयांची पेपर करन्सी छापली होती. ज्यावर किंग जॉर्ज – ६ चा फोटो होता.
सिरीयल नंबर.
नोटांवर सिरीयल नंबर अशासाठी टाकलेला असतो, जेणेकरून रिझर्व्ह बँकेला समजू शकेल की, या क्षणी मार्केटमध्ये किती चलन आहे. सुरक्षा कारणांसाठी नोटांच्या सिरीयल नंबर मध्ये I, J, O, X, Y, Z ही अक्षरे नसतात.
नोटांचे मटेरियल.
भारतीय नोट सामान्य कागदाच्या नव्हे तर कॉटन पासून बनलेल्या असतात. त्या इतक्या मजबूत असतात की, नोट नवीन असेल तर तुम्ही तिच्या दोन्ही कडा पकडून ती नोट फाडू शकत नाही. जर तुमच्याकडे अर्ध्याहून अधिक (५१%) फाटलेली नोट असेल तरी तुम्ही बॅंकेत जाऊन ती बदलून अनु शकता.
५०० आणि १००० च्या नोटा.
भारताच्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा नेपाळ मध्ये चालत नाहीत, आणि आता तर त्या भारतातही चालत नाहीत. ५०० रुपयांची पहिली नोट १९८७ मध्ये आणि १००० रुपयांची पहिली नोट २००० साली बनवण्यात आली होती. सध्या त्या दोन्ही नोटा बंद झाल्या आहेत आणि १०००, ५०० रुपयांची नवी नोट बाजारात आल्या परंतु मोदी सरकारने त्या देखील बंद केल्या व नवीन ५०० व २००० च्या नोटा चलनात आणल्या आहेत.
किती नोटा छापू शकते RBI ?
According to RBI, भरत दर वर्षी २००० करोड करन्सी नोटा छापतो. RBI स्वतःला हव्या तेवढ्या नोटा छापू शकते ? नाही, तसे नाहीये. RBI स्वतःला वाटेल तेवढ्या नोटा छापू शकत नाही, तर ती फक्त Rs. १०,००० पर्यंतच्या नोटा छापू शकते. जर याहून अधिक नोटा छापायच्या असतील तर तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक्ट, १९३४ मध्ये बदल करावा लागेल.
जर आपल्याकडे मशीन आहेत तर आपण अगणित नोटा का छापू शकत नाही? आपण किती नोटा छापायच्या हे मुद्रा स्फीति, जीडीपी ग्रोथ, बँक नोट्स ची रिप्लेसमेंट आणि रिझर्व्ह बँकेचा स्टॉक यांच्यावर निर्धारित होते.
आजच्या घडीला भारतात अनेक प्रकारच्या बनावट नोटा आहेत परंतु प्रशासनाचे याकडे बारकाईने लक्ष आहे. अशा आहे की ही परिस्थती सुधारेल.
एके काळी भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी 0 ची नोट 5thpillar नावाच्या बिगर सरकारी संस्थेकडून चलनात आणलेली होती. 1938 या वर्षी रु. १०,००० ची नोट देखील छापली गेली परंतु १९७८ मध्ये त्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या.
छपाईला किती खर्च येतो.
एका नोटेच्या छपाईला किती खर्च येतो पाहूया.
Rs. 1= Rs.1.14
Rs.10 =Rs. 0.66Rs.
Rs.20 = Rs.0.94Rs.
Rs.50= Rs.1.63
Rs.100 = Rs.1.20
Rs.500 = Rs.2.45
Rs.1,000 = Rs.2.67
Rs.2,000 = अजूनपर्यंत माहिती मिळालेली नाही.
ही माहिती जुन्या चलनाची आहे नवीन चलनात भरपूर बदल झालेले आहेत.
नाणी.
१ रुपयात १०० पैसे असतील, ही गोष्ट १९५७ साली लागू करण्यात आली होती. त्या आधी रुपया १६ आण्यांमध्ये विभागला जायचा. स्वातंत्राच्या नंतर तांब्याची नाणी बनत असत. त्यानंतर १९६४ मध्ये एल्युमिनियम ची आणि १९८८ मध्ये स्टेनलेस स्टीलची नाणी बनायला सुरुवात झाली.
५ च्या नाण्यापासून ब्लेड ?
एक वेळ अशी होती, जेव्हा बांग्लादेश ब्लेड बनवण्यासाठी भारताकडून ५ रुपयांची नाणी मागवत असे. ५ रुपयांच्या एका नाण्यापासून ६ ब्लेड बनत असत. एका ब्लेडची किंमत २ रुपये होती. त्यामुळे ब्लेड बनवणाऱ्याचा चांगला फायदा होत होता. हे पाहून भरत सरकारने नाणे बनवण्याचा धातूच बदलून टाकला. १० रुपयांचे नाणे बनवण्यासाठी Rs. ६.१० खर्च येतो.
नाण्यावर खास खूण.
प्रत्येक नाण्यावर वर्षाच्या खाली एक खास खूण बनलेली असते, ते निशाण पाहून समजू शकते की हे नाणे कुठे बनलेले आहे.
मुंबई – हीरा [◆]
नोएडा – डॉट [.]
हैदराबाद –तारा [★]
कोलकाता – कोणतीही खूण नाही.
कमी खर्चात करा या देशांची सफर.
डॉलर च्या तुलनेत रुपया नक्कीच कमजोर आहे, परंतु तरीही काही देश असे आहेत, ज्यांच्या चलना पुढे रुपया खूप मोठा आहे. तुम्ही कमी खर्चात या देशांची सफर करण्याचा आनंद लुटू शकता.
Rs. 1 in
नेपाळ = 1.60 नेपाळी रुपया.
आइसलैंड = 1.94 क्रोन.
श्रीलंका = 2.10 श्रीलंकन रुपया.
हंगरी ₹ = 4.27 फोरिंट.
कंबोडिया ₹ = 62.34 रियाल.
पेराग्वे₹ = 84.73 गुआरनी.
इंडोनेशिया = 222.58 इंडोनेशियन रूपया.
बेलारूस = 267.97 बेलारूसी रुबल.
व्हिएतनाम = 340.39 व्हिएतनामी डॉन्ग.