पुण्यातील पौराणिक महादेव भुलेश्वर मंदिर Bhuleshwar Mandir

भुलेश्वर मंदिर पुणे पत्ता | Bhuleshwar Mandir Address | भुलेश्वर मंदिर Bhuleshwar Mahadev Mandir | भुलेश्वर मंदिराच्या दर्शनाच्या वेळा | भुलेश्वर मंदिरात कसे जायचे | भुलेश्वर मंदिराजवळील पर्यटन स्थळे

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

भुलेश्वर मंदिर पुणे पत्ता : Bhuleshwar Mandir Address

भुलेश्वर रोड, माळशिरस, पुणे, महाराष्ट्र, 412104, भारत

भुलेश्वर मंदिर Bhuleshwar Mahadev Mandir (पुणे पर्यटन) :

हिंदू पौराणिक कथेनुसार हे मंदिर पाच पांडवांनी बांधले होते. याशिवाय भुलेश्वर मंदिराजवळ भरतगाव येथे भरत राजाचे दुसरे मंदिर बांधले आहे. भुलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार यादव शासकांच्या काळात 1230 मध्ये करण्यात आला. ज्या किल्ल्यावर मंदिर आहे त्याला दौलतमंगल किल्ला म्हणतात, ज्याला कधी कधी मंगलगड देखील म्हणतात. या मंदिराच्या बांधकामासाठी काळा बेसाल्ट (AA प्रकार) खडक आणण्यात आला होता जो आजूबाजूच्या तपकिरी बेसाल्टपेक्षा वेगळा आहे ज्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे

या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे.

येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी १३ व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८ व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८ व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.

या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात आहे ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत.

पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरीत्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवऱ्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे

या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते.

कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरीत्या आढळतो.

यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर मुघलांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे.

मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीस्वरूपातले दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या काशीखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो.

देवीसहस्रनामांत या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्‍न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्त्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत.

१७३७ मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी स्वतः लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आहे.

भुलेश्वर मंदिराच्या दर्शनाच्या वेळा :

भुलेश्वर मंदिराची वेळ पहाटे ५ ते रात्री ८. यावेळी भगवान शिवाची पूजा केली जाते.

दिवसाची वेळ
सोमवारी सकाळी 4 ते रात्री 9
मंगळवारी सकाळी 5 ते रात्री 8
बुधवारी सकाळी 5 ते रात्री 8
गुरुवारी सकाळी 5 ते रात्री 8
शुक्रवारी सकाळी ५ ते रात्री ८
शनिवारी सकाळी 5 ते रात्री 8
रविवारी सकाळी 4 ते रात्री 8.30 वा.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ :

येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी 6 ते 4 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8. मे आणि सप्टेंबरमध्ये पक्षी जवळच्या नारायणबेट टेकडीवर स्थलांतर करतात. या महिन्यांत, मंदिराची एक दिवसाची सहल पक्षी निरीक्षणासाठी जवळच्या नारायणबेट टेकडीवर वळसा घालून पूर्ण केली जाते.

भुलेश्वर मंदिरात कसे जायचे :

रस्त्याने : पुण्याहून स्वारगेट बस स्थानकासाठी नियमित बसेस आहेत. हे मंदिर डोंगरावर वसलेले असल्याने दुरूनच दिसते.

हवाई मार्गे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ मंदिराजवळ आहे.

रेल्वेने : यवत रेल्वे स्टेशन मंदिराजवळ आहे.

भुलेश्वर मंदिराजवळील पर्यटन स्थळे :

  • श्री मयुरेश्वर मंदिर मोरगाव
  • मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य
  • नेचर नेस्ट एग्रो-टूरिज्म
  • लवथळेश्वर मंदिर
  • नाझरे धरण
  • मल्हारसागर
  • मल्हार मंदिर
  • मल्हार भक्ती निवास
  • बाणाई मंदिर

अष्टविनायकातील पहिला गणपती श्री मयुरेश्वर गणपती मंदिर, मोरगाव

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )