चातुर्मासात कांदा का वर्ज्य असतो ?

kanda , कांदा , चातुर्मास , लसूण

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

चातुर्मासात

चातुर्मासात कांदा लसूण खाण्यास मनाई का असते याचे पौराणिक कारण त्या मागे एक पौराणिक कथा आहे की, समुद्रमंथनातून निघालेले अमृत मोहिनी रूप घेतलेले विष्णु भगवान जेव्हा सर्व देवाना वाटत होते, तेव्हा एक राक्षस देव बनून त्यांच्यात येऊन बसला होता, विष्णूंनी त्यास देव समजून अमृत दिले.पण तेव्हा त्यास सूर्य व चंद्राने बघितले की हा राहू आहे. तेव्हा भगवान विष्णुंनी लगेच त्याचे मस्तक धडा वेगळे केले. पण राहूच्या मुखात ते अमृत पोहचले होते. त्यामुळे राहू अमर झाला होता.

भगवान विष्णु द्वारा राहूचे मस्तक कापल्यावर त्याच्या तुटलेल्या मस्तकातून काही अमृताचे कण जमीन पडले त्यापासून कांदा आणि लसूणाची निर्मिती झाली. हे अमृताच्या थेंबापासून बनले म्हणून यामुळे अनेक रोग बरे होऊ शकतात, हे दोन्ही कंद फार औषधी आहेत. पण हे अमृताचे थेंब राक्षसाच्या मुखातून होऊन खाली पडले आहेत म्हणून या कांदा व लसणाला उग्रदर्प आहे. व हे कंद राक्षसाच्या अंगातून पडून तयार झाले म्हणून कांदा लसूण अपवित्र आहेत. म्हणून भगवंताच्या नैवेद्यासाठी याचा वापर केला जात नाही.

असे म्हटले जाते की, जो कोणी कांदा लसूण खातो, त्याचे शरीर राक्षसासारखे मजबूत होते. व त्याच बरोबर त्याची बुध्दी, विचार राक्षसासारखे दूषित होतात. हे कांदा लसूण मांसासमान मानले आहे. जो कांदा लसूण खातो त्याचे मन व शरीर तामसिक स्वभावाचे होते.कांदा जास्त खाल्ल्यामुळे ध्यान भजन पूजेत मन लागत नाही. सर्व सेवा पतन होते. म्हणून कांदा लसूण खाणे शास्त्राने मनाई केली आहे.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )