जाणून घ्या डाळ मिल उद्योगासाठी किती मिळेल अनुदान ? आणि कोण कोण असेल पात्रदार (Dal Mil Business)

छोटा डाळ मिल उद्योग : Dal Mil Business

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

महाराष्ट्र शासनाकडून कमी भांडवल उभारणीतही सर्व प्रकारच्या डाळी तयार करण्यासाठी छोटा डाळ मिल यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे.
Dal Mil Business हे यंत्र ग्रामीण स्तरावर घरगुती उद्योग म्हणून स्वयंरोजगारास उत्कृष्ट आहे.कड धान्याचे डाळी मध्ये रुपांतर करण्यासाठी दाल मिल उद्योग हा चांगले पैसे मिळवून देणारा व्यवसाय आहे.कृषी यांत्रिकीकरण ही केंद्र व राज्यसरकारची एकत्रित योजना आहे यामध्ये केंद्र सरकार 60 टक्के निधि व राज्य सरकार 40 टक्के निधि देते. यामध्ये शेतकर्‍यांना विविध प्रकारच्या अवजरांकरिता अर्ज करता येतात उदा.ट्रॅक्टर, पावर टिलर, ट्रॅक्टर चलित अवजारे, स्वयंचलित अवजारे इत्यादी. आज आपण या लेखा तुन डाळ मिल उदयोगासाठी अनुदान बाबत माहिती घेणार आहोत.

  • डाळ मिल अनुदान साठी पात्रता
  • डाळ मिल साठी अर्ज कसा करावा
  • अर्जची आवश्यक कागदपत्रे
  • निवड कशी केली जाते
  • अनुदान किती मिळते
  • यंदा डाळ मिल अनुदानासाठी निवड
१) Dal Mil Business पात्रता

डाळ मिल अनुदान साठी पात्रता अर्जदार महाराष्ट्रातील शेतकरी असणे किंवा महिला गट यांना लाभ मिळेल

२) Dal Mil Business अर्ज प्रक्रिया

डाळ मिल अनुदान साठी अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाईट वर सुरु आहे,

३)अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

शेतकर्‍यांसाठी कागदपत्रे
7/12
8 अ
आधार कार्ड
बँक पासबुक

महिला बचत गटांसाठी सुरवातील अर्ज करताना बचत गटाचे प्रमाण पत्र लागेल नंतर निवड झाल्यावर कृषी विभागाच्या मागणी प्रमाने कागदपत्रे द्यावे लागेल

आता जमीन ,प्लॉट मोजणे झाले अगदी सोपे तेही गुगल च्या मदतीने

४) निवड कशी केली जाते

ऑनलाइन अर्ज केल्यावर महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाइन सोडती द्वारे लाभार्थी निवड केली जाते. निवड झाल्यावर लाभर्थ्याला आवश्यक कागदपत्रे आपलोड करावी लागतात. त्यानंतर पूर्वसंमती पत्र दिले जाते.

५) अनुदान किती मिळते

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य अंतर्गत प्रत्यक्ष खर्चाच्या ६० टक्के किंवा कमाल रु.१. २५ लाख इतके आर्थिक सहायता अनुदान म्हणून मिळते,तसेच कृषि यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत अनुदान मर्यादा पुढील प्रमाणे आहे.अल्प/अत्यल्प/महिला/अजा /अज भूधारक – प्रत्यक्ष खर्चाच्या ६० टक्के किंवा कमाल १. ५० लाख बहू भूधारक – प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल १. २५ लाख

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )