दत्तावतार । श्री गुरुचरित्र वैशिष्ट्ये गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते । श्री गुरु दीपावली व भक्तांसाठी आठ रूपे । गुरुचरित्र अन्वयार्थ । पूर्व जन्मस्मृती । पतीस पत्नीचे योग्य मार्गदर्शन । गरीब श्रीमंत सर्व समानच. श्रद्धा व एकनिष्ठा हाच मापदंड. श्रीगुरु ब्रम्हस्वरूपी, । श्री गुरूंचा स्पर्श सहवास । भक्तांना रोगमुक्ती । नरसिंह सरस्वती, भिक्षा मागणे हि सुद्धा लीला । गुरु चरित्रातील इतर प्रसंग व गुरु बोध । श्री गणेश व गुरुचरित्रातील संदर्भ ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
दत्तावतार
श्री गुरू चरित्रातील प्रत्येक अध्याय हा दत्तभक्ताला मोलाचा संदेश देऊन जातो, म्हणून श्री गुरूचरित्राचे महत्व हे अनन्य साधारण असेच आहे. श्री गुरू चरित्राच्या पाचव्या अध्यायात माधांन्य समयी भिक्षेसाठी येणार्या अतिथी बाबत आस्था असणे गरजेचे आहे, त्यास रिक्त हस्ते पाठवू नये त्या रूपाने श्री दत्त गुरूयेऊ शकतात हा भाव असणे महत्वाचे आहे. माधान्ह काळी दत्तगुरू हे भिक्षा ग्रहण करतात. आजही श्री क्षेत्र गाणगापूर ईथे दत्तप्रभूंना भिक्षा दान केली जाते तसेच दक्षिण क्षेत्र कोल्हापूर ईथे मा जगदंबे कडून भिक्षा ग्रहण करतात. गुरूचरित्रातील पाचव्या अध्यायात पीठापूर या क्षेत्री आपळराज व त्याची पत्नी सूमती यांच्या कडे श्राध्द होते, अतिथी वेशात श्री दत्तात्रेय तिच्याकडे भिक्षा मागण्यास आले श्राध्दीय ब्राम्हण जेवले नसतांना माता सूमतीने त्यातील अन्न श्री दत्तात्रेयाला भिक्षा घातली त्या अतिथीदेवो भव आदरातिथ्याने श्री दत्तप्रभू प्रसन्न झाले व आपले खरे रूप दाखवून मनोकामना पूर्ण होईल असा आशिर्वाद दिला कालातंराने सूमती मातेस गणेश चतूर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने दत्तात्रेयाचा पहिला अवतार जन्माला आला. अशी ही श्रीपाद श्रीवल्लभा च्या जन्माची पाचव्या अध्यायाची कथा आहे. या शिवाय श्री गुरूचरित्रातील पाचव्या अध्यायाची घडलेली घटना श्री क्षेत्र पीठापूर या क्षेत्री घडली आहे. श्री दत्तप्रभूंचा पहिला अवतार या क्षेत्री झाल्याने दत्तप्रेमींना या स्थानाचे व क्षेत्राचे विशेष प्रेम आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार ज्या स्थळी झाला, ज्या गावांत त्यांचे बालपण गेले जिथे त्यांनी भ्रमण केली आपल्या लिला दाखवल्या, ती स्थळे पाहणे त्यास्थळांना भेटी देणे दर्शन घेणे तिथे अनूष्ठान करणे पूजा अर्चा करणे हा दत्तभक्ताचा आचार धर्मच बनून जातो तिर्थाटनाचा हा त्यामागिल एक ऊद्देश असतो.
पिठापूर पूर्वदेशी । होता ब्राह्मण उत्तमवंशी ।
आपस्तंभ शाखेसी । नाम आपळराजा जाण ॥१०॥
तयाची भार्या सुमता । असे आचार पतिव्रता ।
अतिथि आणि अभ्यागता । पूजा करी भक्तिभावे ॥११॥
ऐसे असतां वर्तमानी । पतिसेवा एकमनी ।
अतिथिपूजा सगुणी । निरंतर करीतसे ॥१२॥
वर्तता ऐसे एके दिवशी । आला दत्त अतिथिवेषी ।
श्राद्ध होते अमावस्येसी । विप्राघरी तै देका ॥१३॥
न जेवितां ब्राह्मण घरी । दत्ता भिक्षा घाली ते नारी ।
दत्तात्रेय साक्षात्कारी । प्रसन्न झाला तये वेळी ॥१४॥
त्रैमूर्तीचे रूप घेऊनि । स्वरूप दावियले अतिगहनी ।
पतिव्रता धावोनि चरणी । नमस्कारी मनोभावे ॥१५॥
दत्तात्रेय म्हणे तियेसी । माग माते इच्छिसी ।
जे जे वासना तुझे मानसी । पावसी त्वरित म्हणतसे ॥१६।।
माधान्ह समयी अतिथीकाळी । दत्तात्रेययेताति तये वेळी ।
विमूख न व्हावे तये काळी । भिक्षामात्र घालिजे ।३४।।
।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।।
श्री गुरुचरित्र वैशिष्ट्ये गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते
१. आपली चूक नसताना दुसर्याकडून झालेला त्रास, हे आपलेच प्रारब्ध असते.
२. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते.
३. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते.
४. यांत्रिक पणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा.
५. मनुष्य रूपातच बहुतेक गुरू भेटतात, पण कुणाला तरी गुरू मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरू भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. (आचरेकर सरांनी गालात मारलेली होती तरीही सचिन आज पाय धरतो. त्यांची चिकित्सा करत नाही).
६. काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे.
७. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही.
८. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जग राहाटी चालवावी हेच सांगितले.
९. महाराज वैश्विक शक्तीच्या सुचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते.
१०. अवतार हे काळाप्रमाणे होतात. दर वेळी एकाच रुपात येत नाहीत.
११. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र (जे असेल ते) आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल.
श्री गुरु दीपावली व भक्तांसाठी आठ रूपे
आठ रूप झाले आपण । अपार महिमा नारायण ।आठ रूप झाले आपण । अपार महिमा नारायण ।आठ रूप झाले आपण । अपार महिमा नारायण ।आठ रूप झाले आपण । अपार महिमा नारायण ।
श्रीगुरू गाणगापुरात असताना एक गमतीदार गोष्ट झाली. एकदा दिवाळीचा सण आला. श्रीगुरुंचे सात शिष्य श्रीगुरुंच्याकडे आले. या मंगल दिनी श्रीगुरुंचे चरण आपल्या घराला लागावेत असे प्रत्येकाला वाटत होते. या दिवाळीच्या दिवशी श्रीगुरुंनी आपल्या घरी यावे असे प्रत्येकाला वाटत होते. तशी त्यांनी श्रीगुरुंना विनंती केली. श्रीगुरुंना त्यांचे मन मोडवेना. तेव्हा ते शिष्यांना म्हणाले, “तुम्ही सगळेच माझे प्रिय शिष्य आहात. तेव्हा मी एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी कसा येणार ? तेव्हा मी कुणाच्या घरी येऊ ते आपापसात ठरवा व मला सांगा.” श्रीगुरुंनी आपल्याच घरी यावे असे त्या सातही शिष्यांना वाटत होते. त्यावरून त्यांचे भांडण सुरु झाले. त्यांचे काही केल्या एकमत होईना. मग श्रीगुरुंनी युक्ती केली. त्यांनी एकेका शिष्याला बाजूला बोलाविले व त्याला सांगितले, “मी तुझ्याकडेच येईन; पण हे कोणाला सांगू नकोस. आता तू शांतपणे आपल्या घरी जा.” अशारीतीने प्रत्येकाची समजूत काढून सर्वांना वाटेला लावले. त्यामुळे श्रीगुरू फक्त आपल्याच घरी येणार नाही म्हणून सर्वांना आनंद झाला. ते सार्वजण आपापल्या गावी गेले.
दिवाळीला श्रीगुरू बाहेरगावी आपल्या शिष्यांकडे जाणार ही बातमी मठातील भक्तांना समजली, तेव्हा ते श्रीगुरुंना म्हणाले, “स्वामी, दिवाळीसारख्या पवित्र दिवशी तुम्ही बाहेरगावी शिष्याकडे जाणार ? मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे ? तुम्ही दिवाळीत आम्हाला सोडून कोठेही जाऊ नये.” त्यांचे मनोगत लक्षात घेऊन श्रीगुरू त्यांना म्हणाले, “तुम्ही चिंता करू नका. आम्ही येथेच राहू.” ते ऐकून सर्वांना समाधान वाटले. दिवाळीच्या दिवशी श्रीगुरुंनी मंगलस्नान केले. आपल्या योग-सामर्थ्याने सात रूपे घेतली व एकेका रूपाने ते विविध गावांत राहणाऱ्या आपल्या सातही शिष्यांच्या घरी गेले. त्या सर्वांकडून त्यांनी पूजासेवा घेतली व मठातही राहिले. कार्तिकी पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्रीगुरुंचे ते सातही शिष्य गाणगापुरला मठात आले. त्यावेळी प्रत्येकजण सांगू लागला,”दिवाळीला श्रीगुरू फक्त आपल्याच घरी आले होते.” आणि आपण दिलेली वस्त्रे श्रीगुरुंच्याकडे असल्याचे दाखवू लागला. ते ऐकून सर्व शिष्य मोठ्या संभ्रमात पडले. पण गाणगापुरातील लोक म्हणाले, “श्रीगुरू तुमच्यापैकी कोणाकडेच आले नव्हते, ते मठातच होते. त्यांनी आमच्याबरोबर दिवाळी साजरी केली.”
हे सगळे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. श्रीगुरू साक्षात परमेश्वर आहेत. त्रैमूर्तींचा अवतार आहेत. भक्तांसाठी त्यांनी आठ रूपे घेतली हे रहस्य उघड होताच सर्वांनी श्रीगुरूंचा जयजयकार केला. ते म्हणाले, “परमेश्वरा, अनंत रूपे धारण करणारा तू त्रैमूर्ती भगवान आहेस. तुझे सामर्थ्य आम्हाला कसे बरे कळणार ?” त्यावेळी सर्वांनी श्रीगुरूंची स्तुती केली. दीपाराधना करून समाराधना केली.
ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, “श्रीगुरुंचे माहात्म्य हे असे आहे.” या प्रसंगाने श्रीगुरूनृसिंहसरस्वतींची ख्याती सर्वत्र झाली. ग्रंथकर सरस्वती गंगाधर सांगतात, “सज्जन हो ! तुम्ही श्रीगुरूंची आराधना करा. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे. जे मूर्ख असतात त्यांना श्रीगुरुसेवा करण्याची लाज वाटते. जे ज्ञानी असतात ते श्रीगुरुंचे नामामृत प्राशन करतात. श्रीगुरू हेच त्रैमूर्ती आहेत. हा संसारसागर तरुन जाण्यास श्रीगुरू हाच एक आधार आहे.
गुरुचरित्र अन्वयार्थ
प्रत्येक अध्यायात सुरुवातीला आणि शेवटी एकच मुद्दा अधोरेखित केला आहे की,
“अरे ! काही करू नकोस , तुझ्या सद्गुरुना शरण जा. तुझी श्रद्धा; भक्ती; एकाग्रता एवढी वाढव की त्या सद्गुरुनी सांगितलेला प्रत्येक शब्द फुलासारखा झेलता आला पाहिजे. कदाचित त्या फुलात काटे असतील ते तुला टोचतील, तरीसुद्धा तू तक्रार करू नकोस. कारण ते काटेसुद्धा तुझ्या अंतिम हितासाठीच असतील.”
गुरुचरित्राच पठण करणाऱ्या प्रत्येकाने आत्मशोधन करावे की, नेमके कशासाठी हे पठण करतो आहोत. आपला नेमका हेतू काय आहे ? तो शाश्वत आणि भव्य स्वरूपाचा आहे की संकुचित आणि अशाश्वत आहे. हे आत्मशोधन नित्य पठणाआधी भक्त करू शकला तर श्रीगुरूचरित्राच्या वाचनातून त्याला त्याच्या प्रगतीचा मार्ग आपोआप उलगडत जाईल नव्हे तर सद्गुरु तत्वाकडून काळजी घेतली जाईल, हे निश्चित. आपल्या पूर्व कर्माच्या प्रतिक्रिया ज्या दिवशी संपतील त्या दिवशी आपण आणि सद्गुरु / परमात्मा एकच होऊन जाल. पण तत्पूर्वी आपणच लावलेली पापाची बीजं भोगुन संपवावी लागतात. सत्कर्माने त्या बीजांची झालेली झाडे नष्ट करता येतात पण बीज मात्र भोगूनच संपवावे लागते. पूर्वकर्माची निष्कृती झाली की मग “मी तू पणाची झाली बोळवण” अशी अवस्था येते. तुमच्यात आणि सद्गुरुत वेगळेपणा उरतच नाही. तुम्ही संपूर्ण एकरूप झालेले असता.
१) पूर्व जन्मस्मृती
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज व श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या दत्तप्रभुंच्या दोनहीअवताराचे वैशिष्टय, सतशिष्यास, निजभक्तास पुर्वस्मृती व रृणानुबंध ज्ञात करून देणे. बाल श्रीपादांनी मातामह श्री बापन्नाचार्यांना अगदी गणेशपुत्र लाभ, लाभाद महर्षी, सत्यरृषीश्वर, नंद यादव, भास्कराचार्य हा पुर्वजन्मींचा प्रवास दाखवत बापन्नाचार्यांनी, “सोन्या तु नेमका कोण आहेस?” असे विचारताच त्यांच्या मस्तकास स्पर्श करून प्रयाग संगमावर स्नान करणारे शोडष वर्षीयमहावतार बाबा, शामाचरण लाहिरी, कर्दळी वनांतप्रवेश करणारे श्री नरसिंह सरस्वती स्वामी, बाहेर पडणारे श्री स्वामी समर्थ, यवन वेशातील “अल्लामालीक” म्हणणारे फकिर श्रीसाईबाबा हा चलतपटकाही क्षणांत दाखविला. १६ वर्षी पिठापुर सोडताना आई सुमती महाराणींस मस्तक स्पर्श करुन महालयअमावास्येस तिला झालेले दर्शन, आशिर्वाद व वचनदाखवते झाले. वयाच्या ८ वर्षी कारंजा सोडुन काशीक्षेत्री जाण्यास श्रीनरसिंह सरस्वती स्वामी निघाले. त्यांना आईच्या मस्तकास स्पर्श करताचतिला अंबिकेची पुर्वजन्माची कुरवपुर येथील श्रीपाद दर्शन,शनिप्रदोष व्रताशिर्वाद, वचन आठवले. बीदरचायवन बादशाह गाणगापुरला व्याधी शमनार्थ आलातेंव्हा श्री नरसिंह सरस्वती स्वामिंनी “का रे रजका? कोठे असतोस?” अशी हाक मारताच त्यास पुर्वजन्मीची स्मृती झाली व कुरवपुरातील त्याचा सेवक रजकाचा जन्म, श्रीपाद दर्शन व आशिर्वाद आठवला.
२) पतीस पत्नीचे योग्य मार्गदर्शन
स्त्रीने पतीला योग्य सल्ला दिल्याची काही उदाहरणे दत्त साहित्यात आढळतात, त्यातील एक गुरुचरित्रातील म्हणजे मित्रसह राजाचे उदाहरण, सेवकरूपी राक्षसाने फसवून नरमांस वाढले आणि ऋषींनी दिलेल्या शापाने राजा निराश झाला वास्तविक राजाला यातील काहीच कल्पना नव्हती यामुळे ऋषींना शाप देण्यासाठी त्याने हातात जल घेतले असता पत्नीने त्याला परावृत्त केले आणि ते जल पायावर सोडल्याने कल्माषपाद असे त्याला नामाभिधान मिळाले होणाऱ्या, त्या पापापासून वाचविले, दुसरे उदाहरण दत्त माहात्म्यातील, विष्णुदत्त ब्राह्मणाला ब्रह्मराक्षस प्रसन्न होतो आणि म्हणतो जे मनात असेल ते मागावे असे म्हणतो, इथे विष्णुदत्त ब्राह्मणाची व्दिधा मनस्थिती होते काय मागावे, घर, पुत्र, ऐश्वर्य, परलोक, काही न सुचल्याने तो पत्नीला विचारण्यासाठी घरात येतो तेव्हा ती म्हणते, मागू नका नश्वरा । श्री दत्ताची भेटी करा । ऐशा वरा मागावे । आणि त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात विष्णुदत्त ब्राह्मणाला दत्त दर्शन घडते अशी कथा आहे.
३) गरीब श्रीमंत सर्व समानच. श्रद्धा व एकनिष्ठा हाच मापदंड. श्रीगुरु ब्रम्हस्वरूपी,
एकदा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरला असताना मठामध्ये सात भक्त त्यांना दिवाळी करीता निमंत्रित करण्यासाठी आले, महाराज भक्त वत्सल आहेत आणि आपले प्रेमळ बोलावणे नाकारणार नाहीत हि सर्व भक्त मंडळींना खात्री होती पण सर्व एकत्र आल्यानंतर आता गुरुमहाराज कोणा एका ठिकाणी जाऊ शकतील व ते ठिकाण आपले असावे या साठी त्या सात भक्तांमध्ये कलह सुरु झाला, प्रत्येकाची विनंती ऐकून मठातील भक्त मंडळी काळजीत पडली. ऐन दिवाळीच्या दिवशी गुरुमहाराज मठात नाहीत हि कल्पना त्यांना करवेना. आता गुरुमहाराज काय निर्णय घेतात याकडे सर्व पाहू लागले, यावर गुरुमहाराजांनी एकेका भक्ताला जवळ बोलावले व सांगितले मी तुझ्या घरी येत आहे आता समाधानी असावे मात्र हे वर्तमान गुप्त ठेवावे. यावर आनंदित होऊन ते सात भक्त आपापल्या घरी जाते झाले, तेव्हा मठात भक्तगण म्हणू लागले, महाराज आम्हाला सोडून जाऊ नये, दिवाळी आम्हासोबत साजरी करावी. यावर गुरुमहाराज म्हणाले मान्य आहे, मी इथेच असेंन. काही दिवसांनी दिवाळी नंतर ते सात भक्त पुन्हा योगायोगाने दर्शनाला आले व त्यांची भेट झाली, अर्थातच गुरुमहाराजांनी आपल्या घरी येऊन आपल्याला आशीर्वाद दिले ते प्रत्येक जण सांगू लागला व त्याच्या पुष्ट्यर्थ आपण त्यांना दिलेली भेट मठात विराजमान असलेली दाखवू लागला, हा सगळा प्रकार पाहून मठामधील भक्तगण हस्तक्षेप करीत म्हणू लागले कि गुरुमहाराज इथे मठातच होते आणि आम्ही सर्व त्यांच्या सोबतच होतो, स्वपक्ष सिद्ध करताना कलह वाढू लागला तेव्हा गुरुमहाराज म्हणाले आता थोडं लक्ष द्या, मी सातही जागी गेलो होतो आणि इथेही होतो तेव्हा सर्वांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला व गुरुमहाराजांच्या अलौकिक लीलेबद्दल कौतुक व्यक्त करीत सर्व भक्त स्वस्थानी गेले.
४) श्री गुरूंचा स्पर्श सहवास
श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज संन्यासी होते अर्थात त्यांना इतरजनांचा स्पर्श त्याज्य होता. संपूर्ण गुरुचरित्रात केवळ एका जीवाचा स्पर्श नृसिंहसरस्वती स्वामीमहाराजाना झाला. गंगा नावाची साठ वर्षे वयाची स्त्री महाराजांच्या आशीर्वादाने कन्यारत्न प्राप्त करून घेते आणि दहा दिवसांनी जेव्हा ती महाराजांच्या दर्शनाला येते तेव्हा आशीर्वादाकरिता त्या बालकाला महाराजांसमोर ठेवते. महाराज अत्यंत प्रेमाने त्या मुलीला उचलून कडेवर घेतात. कडिये घेतले प्रीतीसी ।। असे तेव्हाचे वर्णन गुरुचरित्रात आहे. आधीच अवतार काळात जन्म दुर्लभ, त्यातही तो अवतार ज्या प्रांतात आहे त्यात होणे, त्या अवताराशी संबंध येणे आणि अशी गुरुकृपा मिळणे एकाहून एक दुर्लभ आहे. त्या मुलीची अनंत जन्मांची पुण्याई फळाला आली आणि महाराजांचा सहवासप्राप्त झाला,
५) भक्तांना रोगमुक्ती
गुरुचरित्र हा सिद्ध ग्रंथ आहे. प्रत्येक अध्यायात केवळ एकच नाही तर अनेक गोष्टी त्यात आढळतात, माहूरच्या विप्राचे गाणगापूरला येताच प्राणोत्क्रमण होते आणि गुरुमहाराज त्याला पुन्हा आयुष्य प्रदान करतात या वेळी केवळ आयुष्य न देता रोगरहित आयुष्य त्याला देतात हे लक्षात घेतले पाहिजे, असाध्य रोगाने प्राणोत्क्रमण झाले होते पण पुन्हा आयुष्य द्यायचे तर ते रोगरहित असले पाहिजे. हे त्या विप्राला मिळालेले आयुष्य म्हणजे रुद्र महिमा असल्याचे गुरुमहाराज नमुद करतात आणि त्याच्या पुष्टयर्थ रुद्रमहिम्याची एक कथा येते. त्यानंतर गुरुमहाराजांना ती विप्रस्त्री एखादा मंत्र द्यावा अशी विनंती करते, का तिला असा मंत्र मागावयाची बुद्धी व्हावी? या मागे गुरुमहाराजांना सोमवार व्रत सांगावयाचे होते आणि त्याच बरोबर स्त्री वर्ग मंत्र शास्त्राकरिता अनधिकारी आहे हे हि नमूद करावयाचे होते त्यामुळे कच-देवयानी आणि सीमंतिनी हि दोन आख्याने पुढे आली आहेत. श्रीगुरु अनेकांना रोगमुक्त करतात त्यात कुष्ठरोगी असो किंवा इतर व्याधीग्रस्त असो श्रीगुरु त्यांना व्याधीमुक्त करतात.
गुरुचरित्र कथा प्रसंग
६) नरसिंह सरस्वती, भिक्षा मागणे हि सुद्धा लीला
काही अज्ञानी भक्तांना प्रश्न पडायचा की हा ज्या दिवशी भिक्षा नाही मागत त्यावेळी काय करत असतील ती परीक्षा पाहायला एकटा ब्राह्मण गेला आणि तिथे एक नावाडी पण होता, व्रह्मण नरसिंह सरस्वतीचा रुद्र रूप वाटलं।तो घाबरून पळून गेला पण नावडी ला भिती वाटली नाही त्याला असे दिसले की, मध्यान्हकाळी नदीतून चौसष्ट योगिनी आल्या. त्यांनी श्रीगुरुंची पूजा केली. मग त्या श्रीगुरुंना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या. त्याचक्षणी नदी दुभंगली. सर्वजणी श्रीगुरुंसह आत गेल्या व काही वेळाने श्रीगुरुंना घेऊन बाहेर आल्या. मग श्रीगुरू एकटेच स्वस्थानी गेले. ते दृश्य पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले. दुसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणेच योगिनी आल्या व श्रीगुरुंना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या. त्याचक्षणी नदीप्रवाह दुभंगला. वाट निर्माण झाली. योगिनी श्रीगुरुंच्यासह आत शिरल्या. त्याचक्षणी तो नावाडीही त्यांच्या मागोमाग आत शिरला. दुभंगलेला नदीप्रवाह पूर्ववत झाला. आत गेलेल्या त्या नावाड्याला मोठे आश्चर्य वाटले. तेथे त्याला इंद्राच्या अमरावतीसमान वैभव संपन्न नगर दिसले. त्या नगरात रत्नखचित गोपुरे होती. श्रीगुरू तेथे जाताच त्या नगरातील लोक आरती घेऊन त्यांच्या पूजेसाठी आले. त्यांनी श्रीगुरुंना एका मंदिरात नेउन उच्चासनावर बसविले व त्यांची यथासांग पूजा केली. पूजा झाल्यानंतर त्यांना उत्तमोत्तम भोजन दिले. भोजन झाल्यावर श्रीगुरू बाहेर आले. त्याचवेळी श्रीगुरुंचे त्या नावाड्याकडे लक्ष गेले. त्यांनी त्या नावाड्याला विचारले, “तू येथे कशासाठी आलास?” तेव्हा तो नावाडी हात जोडून म्हणाला, “स्वामी, मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात. संसारमायेत अडकले त्यांना तुमचे स्वरूप समजत नाही. या संसारसागरात बुडणाऱ्या लोकांचा उद्धार करणारे तुम्ही साक्षात त्रिमुर्ती श्रीदत्तात्रेय आहात. ज्यांना तुमचे दर्शन घडते त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. त्यांचे इह-पर कल्याण होते.” त्या नावाड्याचे असे स्तवन केले असता श्रीगुरू प्रसन्न झाले. ते म्हणाले, “तुझे दैन्यदारिद्र्य गेले. तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती ती पूर्ण होईल; परंतु येथे जे काही पाहिलेस ते कुणालाही सांगू नकोस. जर वाच्यता केलीस तर तुझे मोठे नुकसान होईल.” असे सांगून ते नावाड्यासह औदुंबरापाशी आले. श्रीगुरूंचा निरोप घेऊन तो नावाडी आपल्या शेतात गेला. तेथे त्याला गुप्तधन सापडले. त्या धनामुळे त्याचे दुःखदारिद्र्य नाहीसे झाले. त्याची बायकामुले सुखी झाली. त्याला श्रीगुरुंच्या आशीर्वादाने ज्ञानप्राप्तीही झाली. त्या दिवसापासून तो आपल्या कुटुंबासह श्रीगुरूंची मनोभावे सेवा करू लागला. नरसिंह सरस्वती आपले वास्तव्या सोडून गाणगापूर पुरला निघेल त्या वेळी ६४ योगिनी नि प्रार्थना केली आम्हाला उपेक्षून तुम्ही जात आहात त्यावेळली महाराजांनी मनोहर पादुकां दिल्या, आणि चीर काळ वास्तव्य राहील असे सांगितलेगुरुचरित्रात ६४ योगिनींचा उल्लेख १९ व्या अध्यायात येतो . पणत्या अध्ययतील कथा समजायला १८ व्या अध्यायात ल जाऊन घ्यायचा घ्यावा लागतो. अध्याय १८ मध्ये श्रीगुरु अमारेश्वरी गरीब ब्राम्हणाचे घरी घेवाड्याच्या शेंगाची भाजी भिक्षेत घेऊन विप्राचे दारिद्र्य हरण करतात हे सर्वांना ज्ञात आहेच
तसेच भोजन पात्रही नसणाऱ्या श्री कुलकर्णींच्या घरी दगडावर कण्या घेऊन त्या कुळाचा जन्मोजन्मीचा उद्धार करतात. भिक्षा हे फक्त निमित्त भक्तांचा उद्धार हेच खरे उद्दीष्ठ!
गुरुचरित्र कथा प्रसंग व गुरु बोध
७) गुरु चरित्रातील इतर प्रसंग व गुरु बोध
गुरुचरित्र आणि दत्त माहात्म्य हे दत्त सांप्रदायातील दोन मुख्य ग्रंथ, मंत्रसिद्ध आणि लगेच प्रचिती देणारे. पण दत्त भक्ती हि दुर्लभ असल्याने ह्याच्या वाचनाचे आणि मननाचे भाग्य फार थोड्या जणांना लाभते. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ कोणत्याही कामनेशिवाय कायम वाचनात असावा अगदीच नाही तर नित्य पाच ओव्या तरी चुकवू नयेत असे थोरले महाराज म्हणत असत. पाहायला गेल तर एक मंत्रसिद्ध ग्रंथ आणि दुसऱ्या बाजूने पाहताच आपली संपूर्ण आचार संहिता. प्रत्येक अध्याय अत्यंत मृदू आणि संयम, नीतिमत्तेची पराकाष्ठा असलेला. चौदाव्या अध्यायात सायंदेव ब्राह्मण म्हणतो माझं रक्षण करा, पण त्या यवन मंडळींचा नायनाट करा असा शब्दही नाही, केवळ मला सांभाळा. अठ्ठेचाळिसाव्यात त्या शेतकऱ्याला महाराज विचारतात काय इच्छा आहे? तो म्हणतो, जरा माझ्या शेताकडे अमृत दृष्टीने पहा, ते छान पिकू द्या. वास्तविक प्रत्यक्ष परमात्मा समोर प्रसन्न उभा आहे, द्या दोन चार रांजण मोहरा! असं न मागता केवळ शेत उत्तम पिकाव, धन्य आहे. वांझ म्हैस दुध देऊ लागली म्हणून ते तसंच पुढ्यात ठेवलं का?? ते तापवून मग दिलं, अगदी छोटी गोष्ट पण शिकवण देणारी. साठ वर्षे होऊनही त्या स्त्रीला कन्या रत्न झालं पण केव्हा एकदा महाराजांना भेटते आणि आशीर्वाद घेते असा प्रकार नाही. दहा दिवस झाल्यावर मग ती महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आली. सायंदेवाला महाराज म्हणाले आता इथे येऊन सेवेत राहावे, यवन सेवेत मानधन भरपूर, बासर ब्रह्मेश्वरला / कडगंचीला स्थिरस्थावर पण सर्व सोडून तो सहकुटुंब सहपरिवार गाणगापूरला आला आणि गुरुमहाराजांबरोबर राहिला. पुढे कसं होईल, नोकरी कोण देईल, काही चिंता नाही. गुरुवाक्य प्रमाण !!
रजकाला महाराज म्हणाले राज्य ह्या जन्मी हवं कि पुढे? पुढचा जन्म कोणी पाहिला आहे असा विचार त्याने नाही केला, महाराज म्हणताहेत म्हणजे होणारच !! त्यात शंका नाहीच.
८) श्री गणेश व गुरुचरित्रातील संदर्भ
गणेशाचा संदर्भ गुरुचरित्रात तीन प्रकारे गुरुचरित्रात येतो.
अ) पहिला प्रकार
अध्यायाची सुरवात गणेशाच्या नावे होते, याचा अर्थ आपण मनोभावे गणेशाचे नुसते स्मरण केल्यास विघन पळून जातात.
ब) गणेशा च सुंदर वर्णन गुरुचरित्रातील पहिला अध्यायात आहे गुरुचरित्र कारणी गुरू चरित्र लिखाण।साठी ज्ञान मिळावे हया साठी प्राथना केली आहे. हे ॐ कारस्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या, पार्वतीसुता, गजानना मी तुला माझा नमस्कार असो तू लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध् आहेस. तुझ्याा हालणाऱ्या कांनापासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या साऱ्या भक्तांची सर्व संकटे दूर होतात, म्हणून तुला विघ्नांतक, विघ्नहर्ता असे म्हणतात. तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते. संकटरुपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू हातात परशू धारण केला आहेस. तू नागबंद म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस. हे चतुर्भुज, विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस. जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही त्यांचे सर्व मनोरथ तत्काळ सिद्धीला जातात. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते. हे लंबोदर गणेशा, तूच चौदा विद्यांचा, म्हणजे चार वेद, सहा वेदांगे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस. तूच वेद शास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस, म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात.हे गणेशा, अजिंक्य, अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकरांने तुझेच स्तवन केले होते. हरीब्र्म्हादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात. तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. हे कृपानिधी, गणनायका, हे मूषकवाहना, ॐकारस्वरूप, दु:खहर्त्या, विनायका मला बुद्धी दे. जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्ये सिद्धीला जातात. हे गणेशा, तू कृपासागर आहेस. तू सर्वांचा आधार आहेस. हे गजानना माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो. मला ज्ञान दे, बुद्धी दे, हे गणेशा, तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस. मी अज्ञानी आहे म्हणून तुझ्याा शरणी आलो आहे. गुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे. तुझी माझ्यावर पूर्ण कृपादुष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे.
क) गोकर्ण महाबळेश्वर कथा आहे रावणा कडून लिंग घेऊन कशी स्थापना केली याच वर्णन आहे हा गुरुचरित्रातील ६ वा अध्याय त्यात गणेशाच सुंदर वर्णन आहे.