दिवा लावण्याचे महत्व । देवाची पूजा करताना दिवा लावतात । दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी । दिवा विझल्यावर काय करावे । अधिकमासाच्या वाती ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
दिवा लावण्याचे महत्व ?
हिंदू संस्कृती आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा महत्त्वाचा संस्कार आहे. देवाचे पूजन करताना दररोज सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो. नवरात्रात किंवा विशेष अनुष्ठानावेळी चोवीस तास दिवा तेवत ठेवण्याचा संकल्प केला जातो. दिवा हे तेजाचे प्रतिक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते. अंधार कितीही गडद असला, तरी एक पणती अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते.
देवाची पूजा करताना दिवा लावतात
कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला. पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याचे, स्थिर राहण्याचे आवाहन अग्नी देवतेला केले जाते. यानंतर पूजा झाल्यानंतरही देवासमोर दिवा लावला जातो. आपल्याकडे तेलाचा आणि तुपाचा दिवा देवासमोर लावला जातो. कोणताही दिवा लावला तरी चालतो. मात्र, तुपाच्या दिव्याने अधिक सकारात्मकता येते असे सांगितले जाते. देवासमोर दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे स्थिर होते, अशी मान्यता आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते. अशा तुपाचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो; त्यावेळी वातावरण एकदम पवित्र होते. प्रदूषण दूर होते.
दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी
आपण जर तेलाचा दिवा लावत असाल तर, तो आपण आपल्या डाव्या हाताला ठेवावा आणि जर तुपाचा दिवा लावणार असाल, तर आपल्या उजव्या हाताला असायला हवा, असे सांगितले जाते. धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवावी.
आपल्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी. या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानण्यात आल्या आहेत.
पश्चिम दिशेला दिव्याची वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
दक्षिण यमाची दिशा असल्याने दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी, असे सांगितले जाते.
दिवा विझल्यावर काय करावे ?
देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला, तर तो अशुभ संकेत मानला जातो. मात्र, धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही.
देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा.
मात्र, दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला, तर त्यासाठी दीप पतन नावाची शांत करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा पडला, त्याच ठिकाणी ती शांत करावी, असे सांगितले जाते.
अधिकमासाच्या वाती
डावीकडून उजवीकडे
1. चक्र वाती 2. वृंदावन वाती 3. गोपुर वाती 4. 365 धागाच्या वाती 5. नवरत्न वाती
6. रुद्राक्ष बाती 7. लक्षदीप वाती 8. कार्तिक मास 210 धाग्याच्या वाती 9. पाच धाग्याच्या बिल्वपत्र वाहती 10. 108 धाग्याच्या वाती
11. बिल्ले वाती 12. 10 धाग्याच्या वाती 13. 3 धाग्याच्या वाती 14. कार्तिक मास 30 धाग्याच्या वाती 15. संकष्टी चतुर्थीच्या वाती
16. लक्ष्मी वाती 17. 3 कळ्याच्या वाती 18. 221 धाग्याच्या वाती 19. अष्टदल लक्ष्मी वाती 20. 5 धाग्याच्या लक्ष्मी वाती
21. गदा वाती ( हनुमान ) 22. मोग्गु वाती 23. कुच्चु वाती 24. 110 धाग्याच्या वाती 25. 50 धाग्याच्या वाती
26. अवळा वाती 27. डमरू वाती 28. 500 धाग्याच्या वाती 29. वेणी वाती 30. काडी वाती
31. मंगलारुती वाती 32. कट्ट वाती 33. फुल वाती.