देव पूजा ची सुरुवात आणि पूजा कर्म (Dev Puja)

देव पूजेचा उगम आणि पूजा कर्म | नित्य पूजेत वापरण्यात येणारे घटक, पूजेच्या दृष्टीने त्यांचे महत्व | गंध……( चंदन) | स्नान | अक्षता | फुले | हळद कुंकू | धूप | दिप | आरती | नैवेद्य प्रसाद | नित्य कर्म पूजा विधि – उपासनेचा योग्य मार्ग |दैनंदिन पूजा पद्धत – नियम |

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

दैनंदिन पूजा पद्धत :

संसारात सुखी राहण्यासाठी देवावर श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सुख-समृद्धी टिकवायची असेल तर तुमची देवावर अढळ श्रद्धा असली पाहिजे. देवाचे स्मरण करून त्याची खऱ्या मनाने पूजा केली तर आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात असे म्हणतात. दुसरीकडे, हिंदू धर्मात, रोजची पूजा ही देवाच्या हृदयाच्या सर्वात जवळची मानली जाते. नित्य पूजा केल्याने ईश्वरप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. आज आम्ही तुम्हाला नित्य पूजा विधी, नित्य पूजा मंत्र आणि नित्य कर्म पूजा विधिचे काही महत्त्वाचे नियम सांगणार आहोत. रोज पूजा केल्याने मनात एकाग्रता राहते आणि इच्छाशक्ती वाढते. याशिवाय, हे आपल्याला सर्वात कठीण कार्ये करण्यास सक्षम करते.

देव पूजेचा उगम आणि पूजा कर्म

पूजाविधी जाणून घेण्यापूर्वी देवपूजेचा इतिहास, वैदिक संस्कृतीत देवपूजा कशी प्रविष्ट झाली, तसेच देवपूजेचे अधिकारी आणि पूजेचे विविध प्रकार कोणते हे जाणून घेणे क्रमप्राप्त आहे.

देवपूजा ही वैदिक नसून पौराणीक आहे, आणि दुसरे असे की, ही आर्यांना द्रविडांकडून मिळालेली बहुमूल्य देणगी होय..!

आर्य संस्कृती प्रारंभी यज्ञप्रधान होती. ते कधी सोमयाग करत, तर कधी पशुयाग करीत असत. हविर्द्रव्य अग्नीत समर्पण करून ते देवतांशी संबंध प्रस्थापित करीत. आर्यांच्या या यजनपध्दतीत पुष्प, पत्र, फुल, अक्षता, चंदन, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी वस्तूंना मुळीच स्थान नव्हते. “ऋग्वेदा” त “पूजा” हा शब्द कुठेही आढळत नाही.

“पूजा” हा शब्द आर्यांचा नसून द्रविडांचा आहे. देवधर्माचे कृत्य फुलांनी संपन्न करणे असा त्याचा साधा, सरळ अर्थ आहे. द्रविड भाषेत “पू” याचा अर्थ फूल असा असून “जेय्” हा धातू “करणे” या अर्थी आहे. “जेय्” मधल्या “य्” चा लोप होतो आणि ‘पू’ + ‘जे’ याचा पुष्पकर्म किंवा पुष्पालंकार असा अर्थ निष्पन्न होतो. याचा अर्थ असा की, द्राविड भाषेतूनच हा शब्द वेदोत्तर संस्कृत भाषेत आला.

द्राविड संस्कृतीला यज्ञकर्म माहित नव्हते. याचे कारण असे की, ती संस्कृती मुळापासूनच पूजक अर्थात पुष्पालंकाराने देवाला प्रसन्न करणारी आहे.
आर्य व द्रविड या दोन्ही संस्कृतींचा कालांतराने समन्वय झाला आणि त्यात द्रविडांची पूजा पध्दती आर्यांनी स्विकारली आणि यजन पध्दती द्रविडांच्या संस्कृतीत प्रविष्ट झाली. महाभारत काळी या पूजाप्रकाराला यज्ञकर्माच्या बरोबरीची प्रतिष्ठा प्राप्त झाली. सर्व पुराणे ही तर विविध पूजा पध्दतींसाठीच प्रसिद्ध आहेत. कुठलेही व्रत म्हटले, की तिथे कोणत्या ना कोणत्या तरी देवाची पूजा ही अपरिहार्यपणे येतेच. त्याशिवाय नित्यपूजा, नैमित्तिक पूजा, सणावारांच्या पूजा या आहेतच.

भारतात बौध्द धर्माच्या उत्कर्षानंतर यज्ञसंस्थेचा -हास झपाट्याने सुरू झाला. ब्राह्मण काळापासून यज्ञसंस्था कमालीची जटिल आणि गुंतागुंतीची बनली आणि यज्ञ करणे ही गोष्ट सामान्यांच्या आवाक्यातली राहिली नाही. दुसरे असे, की बौध्दांनी यज्ञातल्या पशुहत्येविरुध्द देशव्यापी मोहिम सुरू केली. साहजिकच यज्ञ-यागांचे प्रमाण कमी होऊन त्यांच्या जागी देवपूजेचा प्रचार आणि प्रसार वाढीस लागला. कारण ती यज्ञयागापेक्षा सुलभ होती, गुंतागुंतीची नव्हती. परिणामस्वरूप समाजाने पूजा पध्दतीचा सहजपणे स्विकार केला. यज्ञयाग हे सवर्णांसाठीच राखीव होते; पण पूजेचा अधिकार सर्व स्त्री- पुरुषांना मिळाला.

स्मृतिकाळात तर देवपूजा हे गृहस्थाचे विहित कर्तव्यच ठरले. सर्व वर्णाच्या स्त्री-पुरुषांना पूजेचा अधिकार आहे; परंतु प्राणप्रतिष्ठा झालेल्या शिवलिंगाची व शाळीग्रामाची पूजा स्त्री-शूद्रांना वर्ज्य होती. पूजकाने देह आणि मन यांची शुध्दी करून पूजेला बसावे. कुटुंबातील एकानेच मुख्य पूजा करावी. इतरांनी गंधपुष्पाक्षता किंवा बेल, तुळशी, दुर्वा वाहून नमस्कार करावा.

वास्तविक पाहता देवपूजेचा उगम नीच श्रेणीतील जाती- जमातींना धर्माचा व आत्मकल्याणाचा मार्ग प्राप्त व्हावा म्हणूनच झालेला आहे. ज्यांना यज्ञकर्माचा अधिकार दिला गेला नाही, ते सर्व पूजाकर्माचे अधिकारी होत, असा देवपूजेमागचा मूळ संकेत आहे. आचांडाल सर्व जातींना पूजेचा अधिकार देऊन पुराणांनी एकप्रकारे धार्मिक समतावादच प्रस्थापित केला, असे म्हटले, तर ते अतिशयोक्तिचे ठरणार नाही.

देवपूजेचा मूळ उद्देश’नृसिंहपुराणा’ त स्पष्टपणे सांगितला आहे, तो असा.
ब्राम्हणाः क्षत्रिया वैश्याः स्त्रियः शूद्रान्त्यजातयः। संपूज्य तं सुरश्रेष्ठं भक्त्यां सिंहवपुर्धरम् । मुच्यन्ते चाशुभैर्दुःखैर्जन्मकोटिसमुद्भवैः ।।
अर्थः ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, स्त्रिया, शूद्र, अंत्यज हे सगळे त्या सिंहशरीरधारी सुरश्रेष्ठाला (नृसिंह) भक्तीने पूजतात. ते त्यामुळे कोटिजन्मांमध्ये उत्पन्न झालेल्या अशुभातून व दुःखातून मुक्त होतात.

पूजा कर्म

आपण रोज जी देवपूजा करतो व ती का करत असतो या मागील शास्त्रीय कारण काय?
देवाची जी पूजा केली जाते त्यात देवाला खुष करणे हा उद्देश असला तरी गंध, अक्षता, फुले, धुप, दिप, उदबत्ती याने पुजा करण्यामागे शास्त्र आहे. माणसाप्रमाणे देवांचा स्वभाव नसल्याने देवाला खुष करण्याचा प्रश्नच येत नाही. भक्ति मार्गातील सर्व साधन पद्धती भक्तांचे देवाबद्दल असणारे भाव निर्माण करतात. शास्त्रोक्त पूजा केल्याने आपली भाववृद्धी होऊन ईश्वराचे अस्तित्व जाणवते.

नित्य पूजेत वापरण्यात येणारे घटक, पूजेच्या दृष्टीने त्यांचे महत्व

स्नान :

सर्वप्रथम आपण देवपूजा करताना देवघर स्वच्छ पुसून घेतो. त्यामुळे देवघरातून सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होते. आपण पूजत अससलेल्या देवतांच्या मूर्तित पवित्र लहरी याव्यात, मूर्तिवर चढलेली रजतमांची अपवित्र लहरींची पुट काढून टाकण्यासाठी देवांना नित्य स्नान घालणे आवश्यक आहे.

गंध……( चंदन) :

सर्व देवता गंधानुगामी असतात म्हणजे गंधाकडे आकर्षित होतात. देवतांच्या आपल्या पूजेतील मूर्तित आकर्षित होऊन रहावे यासाठी देवताना चंदन लावतात.

अक्षता :

न तुटलेले तांदुळ म्हणजे अक्षता. देवाना अक्षता वाहिल्यावर देवांची शक्ति त्या अक्षतांकडे आकर्षित होते. वाहिलेल्या अक्षतांमध्ये. त्या देवांची कंपने निर्माण होतात. गणेश मूर्ति, कलश, अथवा कोणत्याही देवतांची मुर्ति ठेवताना मूर्तिखाली तांदुळ ठेवतात. त्या तांदळात देवांची कंपन शक्ति येते हे तांदुळ नंतर रोजच्या तांदळात मिक्स करून भात खाल्ल्यास ती शक्ति आपल्यालाही मिळते.

फुले :

विशिष्ठ रंगाकडे त्या त्या देवता आकर्षित होतात. ऊदा, गणपती लाल रंगाकडे, शंकर सफेद रंगाकडे, विष्णु पिवळा रंग इ.
कोमेजलेल्या फुलांचा रंग बदलतो म्हणुन कोमजलेली फुले देवाला वाहु. नये.

हळद कुंकू :

कुंकु हळदीपासून बनवतात. हळद पृष्ठभागाखाली निर्माण होते म्हणून जमिनीवर वाढणार्या वनस्पतीपेक्षा हळदीत भूमि लहरी जास्त असतात.असे पृथ्वीतत्व असलेले हळद कुंकू वाहिल्याने मूर्तीतील दैवी लहरी जोरात प्रक्षेपित होतात. पृथ्वीवरील अनिष्ट शक्तिंचा त्रास होत नाही.पूर्वीच्या काळी स्त्रिया ठसठसशीत कुंकू लावत, पुरूषही टिळा लावूनच बाहेर पडत.

धूप :

धूप हे सुवासिक वायुरूप द्रव्य आहे. या सुगंधामुळे देवता पूजास्थळी आकर्षित होतात.. धूपाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. म्हणून सकाळ संध्याकाळ धूप ऊदबत्तीने पूजन.

दिप :

खरी पूजा आत्मज्योतीनेच करायची असते. आपली साधना अल्प असल्याने ते आपल्याला जमत नाही म्हणून संकेत रुपाने निरांजनात गाईच्या तूपात वात पेटवून देवांना ओवाळतात. तुपाच्या दिव्यातुन निघणार्या लहरी सुक्ष्म असल्याने त्या अतिसुक्ष्म अशा देवतांच्या लहरी अकृष्ट करू शकतात. म्हणून वाढदिवसाला निरांजनाने ओवाळणे हा भाग महत्वाचा आहे.

आरती :

आरती करताना घंटा व इतर वाद्ये वाजवतात. त्यामुळे मूर्तित आलेली देवतांची शक्ति बाहेर प्रक्षेपित व्हायला मदत होते. वाद्ये तालात वाजवावी. आरती सूरात म्हणावी. बेसूर वाद्ये वाजवणे व बेसूर आरती करणे म्हणजे वातावारणातील अनिष्ट शक्ति अकृष्ट करणे होय.

नमस्कार :

नमस्कार करतांना हाताचे तळवे एकमेकांना जोडले जातात. त्यामुळे एक विशिष्ट मुद्रा तयार होते. या मुद्रेमुळे आपण देवतांकडून येणार्या शक्ती, लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करू. शकतो.

नैवेद्य प्रसाद :

प्रत्येक देवतेचा प्रसाद ठरलेला असतो. त्या त्या देवताना त्यांच्या आवडीचा निवेद्य दाखविल्याने त्या देवतांची शक्ति लहरी नैवेद्यातील प्रसादात येतात. असा प्रसाद खाल्ल्याने आपणासही ती शक्ति मिळते.
फार फार वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी देवासंदर्भात प्रत्येक कृती शास्त्रोक्त पद्धतीने ठरवून दिलेली आहे. फक्त स्वधर्माचा अभ्यास कमी असल्याने काही बुद्धीवादी त्यास अंधश्रद्धा म्हणतात. शेवटी कृती भावपूर्ण केल्याशिवाय अनुभूती येत नाही.

प्रदक्षिणा :

प्रदक्षिणा घातल्याने देवतांच्या अष्टबाजूने येणाऱ्या लहरी आपण ग्रहण करू शकतो.

नित्य कर्म पूजा विधि – उपासनेचा योग्य मार्ग

  • सकाळी स्नान केल्यानंतर मंदिरात तूप आणि तेलाचा दिवा लावा.
  • आता मंदिराला अगरबत्ती किंवा अगरबत्तीने सुगंधित करा.
  • सर्व प्रथम गणेशाची पूजा करा आणि स्नान करून त्यांना वस्त्रे अर्पण करा. आता त्याच्या मूर्तीची धूप, रोळी, अक्षत आणि फुलांनी पूजा करा.
  • यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करून त्यांना धूप, दिवा, चंदन, जव आणि फुले अर्पण करा.
  • आता भगवान शंकराचे ध्यान करून त्यांना फुले, अक्षत, चंदन इत्यादी अर्पण करा.
  • यानंतर दुर्गा माँ आणि सूर्यदेव यांचे ध्यान करा आणि त्यांना फुले, दिवे इत्यादी अर्पण करा.
  • आता पंचदेवांना मिठाई आणि फळे अर्पण करा आणि शुद्ध पाणी अर्पण करा.
  • पंचदेवांची आरती करून जल अर्पण करा.
  • आरतीनंतर पंचदेवाची परिक्रमा करावी.
  • शेवटी, पुष्पहार अर्पण करून, पूजेदरम्यान झालेल्या चुकांसाठी क्षमा मागावी आणि दररोज खालील पूजा मंत्राचा जप करावा.

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्, पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्ण मेवा वशिष्यते। ॐ शांति: शांति: शांतिः

दैनंदिन पूजा पद्धत – नियम :

  • पंचदेवांना तुळशी अर्पण करू नये.
  • भांड्यात पाणी ठेवा, भांडे प्लास्टिकचे नसावे हे लक्षात ठेवा. यासाठी तांब्याचे भांडे सर्वोत्तम मानले जाते.
  • दुर्गा मातेच्या पूजेच्या वेळी तिला कोणत्याही प्रकारचा घास देऊ नका.
  • सूर्यदेवाला शंखाने अर्घ्य देऊ नका.
  • आंघोळ केल्याशिवाय तुळशीची पाने तोडू नयेत कारण शास्त्रात असे म्हटले आहे की जर कोणी स्नान न करता तुळशीची पाने उपटली तर अशी तुळशीची पाने देवाला पूजेच्या वेळी स्वीकारली जात नाहीत.

मंगळागौर (Mangalagaur)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )