देवीची ओटी कशी भरावी ? (Devi Chi Oti Kashi Bharavi)

Devi Chi Oti Kashi Bharavi । देवीची ओटी भरताना घायची काळजी । देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय । देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत । विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो । देवीचे तत्त्व तत्त्वाशी संबंधित रंग रंगांचे प्रमाण (टक्के) ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

देवीची ओटी भरताना घायची काळजी

खण-नारळाने देवीची ओटी भरणे, हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे… हा उपचार शास्त्र समजून अन् भावपूर्ण केला, तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो. सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या लेखातील पुढील ज्ञान (माहिती) वाचून देवीची ओटी योग्यरित्या भरून पूजकांनी देवीची कृपा संपादन करावी.

१. देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय?


देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरून (खण आणि साडी अर्पण करून) करणे, म्हणजे देवीच्या निर्गुण तत्त्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय… देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्त्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास साहाय्य होते.

२. देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत

अ. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी… कारण देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते…..

आ. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत… नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे.

इ. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी… यामुळे देवीतत्त्व जागृत होण्यास साहाय्य होते.

ई. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावेत.

उ. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी, तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे…..

३. विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो?


त्या-त्या देवीला तिचे तत्त्व जास्तीतजास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणार्‍या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या-त्या देवीचे तत्त्व जीवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते… पुढील सारणीत काही देवींची नावे आणि त्या देवींचे तत्त्व जास्तीतजास्त अन् लवकर आकृष्ट करणारे रंग (त्या-त्या देवीच्या तत्त्वाशी संबंधित रंग) दिले आहेत…..

देवीचे तत्त्व तत्त्वाशी संबंधित रंग रंगांचे प्रमाण (टक्के)

१. श्री दुर्गादेवी : तांबडा (लाल)


२. श्री महालक्ष्मी : तांबडा + केशरी. ६० + ४०


३. श्री लक्ष्मी : तांबडा + पिवळा.४० + ६०


४. श्री सरस्वती : पांढरा.


५. श्री महासरस्वती : पांढरा + तांबडा. ६० + ४०


६. श्री काली : जांभळा.


७. श्री महाकाली : जांभळा + तांबडा.८० + २०

पंढरपूर महाद्वार काल्या विषयी हे जाणून घ्या ? (Pandharpur Mahadwar Kala)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )