देवपूजा ,देवपूजा कशी करावी ,देवांची पूजा करतानाचे काही महत्वाचे नियम,Dev Puja Sahitya,dev puja kashi karavi,dev puja vidhi
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
अशी करा देवपूजा :
देव पूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे. प्रातःकाली स्नानानंतर देवपूजा करावी. सर्व पूजा सामग्री एकत्र करून, देवासमोर बसावे. पाणी भरलेला पाण्याचा तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा. प्रथम कलशातील जलात पवित्र नद्यांचे आवाहन करावे. त्यातील जलाने प्रथम शंखाची पूजा करावी, शंख जलाने भरावा. त्यातील पाण्याने आपले शरीर आणि सामुग्री यावर शंख जल प्रोक्षण करावे. भुशुद्धी, भूतशुद्धी यथायोग्य करून पूजा सुरवात करावी.
क्रम नसोडता न्यास करावा. पुरुषसूक्ताने (किंवा त्या त्या देवतेच्या सूक्ताने) देवांच्या मूर्तीवर दोन हात, दोन पाय, गुडघे कंबर, बेंबी, हृदय, कंठ, मुख, नेत्र, मस्तक या स्थानी अभिषेक करावा. मूर्तीला साक्षात देवरूप मानून पूजा करावी. तत्पूर्वी आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान हे उपचार करावेत. नंतर वस्त्र, यज्ञोपवित, गंध, फुल, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व पुष्पांजली हे १६ एकूण उपचार पुरुषसूक्ताचे एकेक ऋचेने देवाला द्यावे. गंधा नंतर अलंकार, चांगले भोग वाहावे. नैवेद्याला चार प्रकारचे अन्न द्यावे. श्रेष्ठ उपचार, विडा, दक्षिणा, आरती, फळे, स्तवन, गायन, नाच, वाद्ये, ब्राह्मणभोजन या उपचाराने देवाला संतुष्ट करावे.
पूजेच्या आरंभी घंटानाद करावा, धूप, दीप देताना घंटा वाजवावी. नैवेद्य, समर्पणानंतर आचमन देत जावे. देव पूजेच्यावेळी स्नान घालताना, महादेवाशिवाय अन्य देवाला शंखाचे पाणी अर्पण करावे.
आपल्या घराच्या बागेतील आणलेली फुले उत्तम, अरण्यातून आणलेली फुले मध्यम, विकत आणलेली फुले कनिष्ठ होत. पांढरी फुले उत्तम, लाल फुले माध्यम, काळीं फुले कनिष्ठ होत. शीळी फुले वर्ज्य करावी. फुलास भोक पडले असेल, बारीक किडे फुलात असतील, आपोआप गाळून पडलेली फुले, मळ लागलेली फुले, डाव्या हाताच्या स्पर्श झालेली, पाण्यात घातलेली फुले, फुलांचे तुकडे देवाला वाहू नये. बकुळ, कमळ, अशोक, चमेली, दुर्वा, बेलपत्र, शमी, कुश, देवाला वाहावे. तुळस, कण्हेर, मोगरा, अशोक ही विष्णूला उत्तम होत. कांचन, आकाव (रुई) धोत्रा, सेमल कुडा हि विष्णूला वाहू नयेत. गणपतीला तुळशी, देवीला दुर्वा, महादेवाला काळी, लालफुले, केवडा, निंब, आदी वाहू नये. महादेवाला पांढरी फुले, बेलपत्र वाहावी. गणपतीला दुर्वा व लाल फुले वाहावी. विष्णूस तुळशी व पिवळी फुले वहावीत. दत्तात्रेयानां तुळस बेल व पिवळी व पांढरी फुले वाहावी.
देवपूजा न करिनर । पावे त्वरित यमपूर ।। नरक भोगी निरंतर । ऎक ब्राह्मणा एकचित्ते ।। (गुरुचरित्र अध्याय ३७)
गुरुचरित्रात उल्लेखल्या प्रमाणे “गुरु पूजा मनोभावेसी । प्रत्यक्ष तुष्टे श्रीगुरु मूर्ती ।।” “वेदोक्त मंत्र करोनि वाची । विधिपूर्वक पुजावे ।।” (गुरुचरित्र). कपीत्य, केतकी, शशांक व श्याम पुष्पे वर्जावी. देवपूजा पूर्ण झाल्यावर धूप, दीप नैवेद्य अर्पण करावे. साष्टांग नमस्कार करावा. देवतांची पूजेत काही त्रुटी असल्यास माफी मागावी. सकल क्षेमसाठीही प्रार्थना करावी.
- येणे विधी पूजा करिता । काम्य होय तुम्हा त्वरिता । चातुर्वेद्ध पुरुषार्था । लढत तुम्ही अवधारा ।।
तिर्थ प्रसाद प्राशनाबाबत शास्त्र. - तिर्थ घेताना उजव्या हाताची गोकर्ण मुद्रा (अंगठ्याजवळचे बोट वाकवून गायीच्या कानासारखी मुद्रा करावी.) करून त्यामध्ये तिर्थ घ्यावे.
- देवाचे तिर्थ अग्नितीर्थ (तळ हाताच्या खोलगट भागात घेऊन) ते आत्मतीर्थाने आवाज न करता प्राशन करावे.
- तिर्थ म्हणून घेतले जाणारे उदक किंवा पंचामृत अत्यल्पच (उडीदाचे डाळी येव्हढे) असावे. कारण तिर्थाचे रूपांतर लाळेत व्हावे. मलामध्ये होऊ नये असा शास्त्रसंकेत आहे.
- सामान्यतः देवपूजा केल्यानंतर दोनदा व उपवासदीका मूळे अन्न ग्रहण होणार नसेल तर तीनदा तिर्थ घ्यावे. मंदिरात गेल्यावर एकदाच तिर्थ घ्यावे.
- शुद्धोदकाने तिर्थ ग्रहण केल्यावर हातावरील तिर्थलेशाचा मास्तकास स्पर्श केल्यास देवगौरवं साधला जातो.
- देवपूजा केल्यानंतर तिर्थ एखाद्या झारीत ठेवावे व ते परगावी जाताना, महत्वाच्या कामास जाताना, दिवसभरात कुटुंबियांकडून परपीडा, परनिंदा, पैशून्यदी पाप घडल्यास देव दर्शन घेऊन तिर्थ घ्यावे.
- तिर्थ घेताना उजव्या हातात तिर्थ व डाव्या हातात तिर्थ भरलेले पात्र असू नये. त्याने तिर्थ भरलेले पात्र उछिष्ठ होते. अपवाद- झाकणी झाकलेली झारी.
- तिर्थ प्रसाद शक्यतो पुरोहित किंवा जेष्ठ व्यक्तीकडून घ्यावा. अपवाद- आपण स्वतः पूजा केल्यास, सोवळ्यात असल्यास व दुसरे कोणी उपस्थित नसल्यास तिर्थ प्रसाद खाली बसून घ्यावा.
- आपण बसलेल्या आसनावर (पूजा करताना) बसून तिर्थ प्रसाद ग्रहण करू नये.देवपूजा समाप्त झाल्यावरच तिर्थ प्रसाद ग्रहण करावा.
- देवाच्या गाभाऱ्यात तिर्थ घेऊ नये.तिर्थ घेताना ते जमिनीवर सांडू नये. तिर्थ प्रसाद ओलांडून जाऊ नये.
- तिर्थ घेताना “अकाल मृत्यू हरणं सर्व व्याधी विनाशानं। (देवाचे नांव)पदोदकं तीर्थं जठरे धारयाम्याहं “।। हा मंत्र म्हणून तिर्थ घ्यावे.
- तिर्थ घेताना ‘प्रथमं कायाशूध्यर्थ । द्वितीयं धर्मासाधनं त्रितीयम मोक्षमपनुयात’ असे म्हणून ३ वेळा तिर्थ प्राशन करतात. वरील विधी निषेधाचा अंगीकार करून गुरुतीर्थ ग्रहण केल्यास शरीर शुद्धी, धर्मसाधन व मोक्षप्राप्ती होते.
नक्की वाचा आयुष्यात किमान एकदा तरी पंढरपूर वारी का अनुभवावी. ?