ड्रॅगन फ्रुट लागवड कशी करावी त्यासाठी अनुदान किती मिळते ड्रॅगन फ्रुटचे रोग कोणते आणि त्याचे उपाय (Dragon Fruit Lagvad)

Dragon Fruit Lagvad , ड्रॅगन फ्रुट लागवड । ड्रॅगन फ्रुट लागवड कशी करावी । महाराष्ट्र शासनाचे ड्रॅगन फ्रुट लागवडीवर किती मिळणार अनुदान । आवश्यक असणारी कागदपत्रे । ड्रॅगन फ्रुट लागवड युक्त जमीन । ड्रॅगन फ्रुट लागवड युक्त हवामान । ड्रॅगन फ्रुट लागवडी साठी सिमेन्ट खांबाचे आकारमान । ड्रॅगन फ्रुट सिमेन्ट च्या खांबावर वर प्लेटचे आकारमान । Dragon Fruit (ड्रॅगन फ्रुट) फळधारणा । ड्रॅगन फ्रूट च्या रोपानचि छाटणी कधी करावी । Dragon Fruit (ड्रॅगन फ्रुट) खत व्यवस्थापन । ड्रॅगन फ्रूट च्या रोपांवर वर छाटणी झाल्यावर कोणत्या बुरशी नाशकांचा स्प्रे घ्यावा । ड्रॅगन फ्रूट च्या बागे तील भेसळ ढोस कोणता व किती वापरावा ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

Dragon Fruit :

ड्रॅगन हे फळ दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असल्याने लोकांमध्ये त्याची फार उत्सुकता आहे. हे फळ कॅक्टस कोरफड वर्गातील ही वनस्पती आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी, ही झाडी कायमची जळून जात नाहीत. मात्र झाडे जिवंत राहतील. या पिकाला रोग आणि किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.ड्रॅगन फळाची थायलंड, व्हिएतनाम, इस्राईल आणि श्रीलंका या देशात व्यापारी तत्त्वावर लागवडी केल्या जात आहेत. आता आपल्या भारत देशात गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, राज्यात सुद्धा लहान क्षेत्रावर व्यापारीदृष्ट्या पिकाची लागवड होत आहे. तसेच महाराष्ट्रातील कमी पावसाच्या क्षेत्रात उदा. सोलापूर, पुणे, सांगली येथे सुद्धा व्यापारी तत्त्वावर या पिकाची लागवड सुरू झाली आहे.या फळाची साल अतिशय पातळ व गर लाल व पांढऱ्या रंगाचा असून हे फळ चवीला खुप छान आहे. असे मानतात. हे फळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते व पांढऱ्या पेशीही वाढण्यास मदत होते.

महाराष्ट्र शासनाचे ड्रॅगन फ्रुट लागवडीवर किती मिळणार अनुदान :

ड्रॅगन फ्रुटमध्ये कॅल्शिअम , मिनरल्स, फॉस्फरस उपलब्ध असून ड्रॅगन फ्रुट अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे त्यास सुपर फ्रुट (Super Fruit) म्हणून देखील ओळखले जाते. ड्रॅगन फ्रुटचे पीक कमी पाण्यात देखील घेता येते. या फळामध्ये काही औषधी गुणधर्म दडलेले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता सरकारने २०२१-२२ वर्षांपासून राज्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत ड्रॅगन फ्रुट अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे.ड्रॅगन फ्रूट अनुदान वितरण करताना प्रति हेक्टर चार लाख रुपये इतके प्रकल्पमूल्य ग्राह्य धरण्यात येते आणि 40 टक्क्यांप्रमाणे एक लाख 60 हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात अनुदान हे देण्यात येत आहे.

आवश्यक असणारी कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ७/१२ उतारा
  • ८ अ उतारा
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखल ( अनुसूचित जाती , जमाती )
  • ७/१२ सामायीक असेल तर खातेदारांचे संमतीपत्र

ड्रॅगन फ्रुट लागवड युक्त जमीन :

ड्रॅगन फळ या पिकाच्या वाढीकरिता उत्तम पाण्याचा निचरा होणारी, जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थयुक्त, मध्यम हलकी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन अतिशय चांगली असते. अशा जमिनीत झाडांची वाढ भारी जमिनीतील झाडांपेक्षा जोमदार असते.

ड्रॅगन फ्रुट लागवड युक्त हवामान ?


ड्रॅगन फ्रुट हे उष्ण कटिबंधीय फळझाड असून झाडांच्या व फळांच्या वाढीकरिता साधारणतः २५ ते ३५ अंश सें.ग्रे. तापमान चांगले असते. त्याचप्रमाणे वार्षिक पर्जन्यमान ५०० ते १००० मि.मी. आवश्यक असून उष्ण व थोड्या प्रमाणात दमट हवामान आवश्यक आहे. मुख्य म्हणजे फळ वाढीच्या काळात भरपूर सूर्यप्रकाश असावा, परंतु सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त काळापर्यंत नसावी. सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त असल्यास अशा वेळेस झाडांना सावली करण्याची आवश्यकता असते.

ड्रॅगन फ्रुट लागवड कशी करावी ?

लागवडीपूर्वी सिमेंटचे खांब उभे करावे. प्रत्येक झाडाजवळ 10-15 किलो शेण मिसळावे. नवीन फुटवा खांबाला बांधावा, चारही बाजूंनी प्रत्येकी एक रोप लावावे. नवीन फूटवे खांबाच्या टोकाला निश्चित केलेल्या चौकोनी किंवा वर्तुळाकार प्लेटमधील छिद्रांद्वारे खांबाला बांधला पाहिजे. जमिनीच्या दिशेने आडवे वाढणारे फुटवे काढून टाकले पाहिजेत आणि सरळ वाढणाऱ्या फांद्या प्लेटच्या दिशेने वाढू द्याव्यात. रोगट व उन्हात जळलेल्या फांद्यांची छाटणी करावी आणि अनावश्यक फांद्यांची दरवर्षी निर्जंतुकीकरण कटर किंवा कात्रीने छाटणी करावी आणि बुरशीनाशकाची फवारणी करावी. पाणी ठराविक अंतराने द्यावे, एप्रिल-मे महिन्यात पाण्याचा ताण दिल्यास अधिक फुले येण्यास मदत होते. लागवडीपूर्वी वाफे तयार करताना चार झाडांना चारही बाजूंनी एकसमान खते द्यावीत, लागवडीनंतर 18 ते 24 महिन्यांनी फुले व फळे येण्यास सुरुवात होते आणि फुले आकाराने मोठी असतात आणि संध्याकाळी-रात्री बहरतात.

ड्रॅगन फ्रूट वेलांचा प्रचार कटिंग्ज किंवा बियाण्यांमधून केला जाऊ शकतो, परंतु व्यावसायिक उत्पादक सामान्यत: एकसमानता राखण्यासाठी कटिंग्जमधून पिकाचा प्रसार करतात. पिकाची मशागत करण्यासाठी जमीन दोन ते तीन वेळा नांगरून, चांगली हलवून, उन्हात तापवावी. वेलींना आधार देण्यासाठी 12 सेमी रुंद आणि 2 मीटर उंचीचे सिमेंटचे खांब उभे करावेत, प्रति हेक्टर 1200 ते 1300 खांब बांधावेत. दोन रोपांमधील आणि दोन ओळींमधील अंतर 3*3 मीटर असावे आणि 45 ते 50 सें.मी. उंचीची दोन ते तीन वर्षे जुनी झाडे वाढीव उत्पादन आणि निरोगी फळांसाठी वापरावीत. पीक लागवडीसाठी सर्वोत्तम वेळ जून-जुलै असून प्रत्येक खांबाला चार रोपे लावावीत.

लागवडी साठी सिमेन्ट खांबाचे आकारमान

५ ते 7 फूट उंची, ३.५-४ × ३.५-४ इंच (रुंद/जाड) वजन ४० ते ४५ किलो खांबाच्या टोकावरती एक रॉड-नट असावा. जो प्लेट बसवण्यासाठी उपयोगी ठरतो.

सिमेन्ट च्या खांबावर वर प्लेटचे आकारमान

५०-६० सेंमी लांबी × ५०-६० सेंमी रुंदी × ३-४ सेंमी जाडी) गोलाचा / चौकोन व्यास १२-१५ सेमी प्लेटचे वजन २०-२५ किलो

Dragon Fruit (ड्रॅगन फ्रुट) फळधारणा :

ड्रॅगन फ्रूट साधारणपणे लागवडीनंतर १८-२४ महिन्यांच्या आसपास फळ देण्यास सुरुवात होते.आणि फळ फुलल्यानंतर ३०-५० दिवसांत परिपक्व होते. फुले आकाराने मोठी, पांढऱ्या रंगाची, आणि संध्याकाळी-रात्री उमलणारी असतात. विविध अंतराने फुले आढळून येतात. फुले येण्याची वेळ पावसावर अवलंबून असते, जसा पाऊस सुरू होईल तशी फुले उमलण्यास सुरुवात होते. जूनपासून ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत फुले आढळून येतात. फळमाशीच्या नियंत्रणासाठी बागेत सापळे लावणे गरजेचे आहे.
परागीकरणापासून साधारणपणे एक ते सव्वा महिन्यात फळ तोडण्यास तयार होते. हे फूल संध्याकाळी-रात्री उमलत असल्याने वटवाघूळ, होक पतंग, आणि मधमाशी इत्यादी पासून मुख्यतः परागीकरण होते.

Dragon Fruit (ड्रॅगन फ्रुट) खत व्यवस्थापन :

सुरुवातीच्या वाढीच्या कालावधीत, चांगल्या वाढीस समर्थन देण्यासाठी पुरेसे खत प्रदान करणे महत्वाचे आहे. खतांचा समतोल प्रमाणात वापर करावा.लागवडीपूर्वी वाफे तयार करताना एका डांबाजवळील चार रोपांसाठी १० ते १५ किलो शेणखत आणि ५०-१०० ग्रॅम डीएपी चारही बाजूंना एकसारखे टाकावे.जमिनीच्या प्रकारानुसार खतांचे प्रमाण निश्‍चित करावे.खडकाळ जमिनीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी ५०० ग्रॅम नत्र, ५०० ग्रॅम स्फुरद आणि ३०० ग्रॅम पालाश या प्रमाणात चार भागांमध्ये वितरित करून पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी देण्यात आली. ८०० ग्रॅम नत्र,९०० ग्रॅम स्फुरद, ५५० ग्रॅम पालाश या मात्रेला सहा भागांमध्ये वितरित करून तिसऱ्या वर्षापासून फळांची तोडणी झाल्यानंतर, फुलधारणेपूर्वी, फुलधारणेपश्‍चात, फळधारणेच्या वेळी व फळांच्या वाढीच्या वेळी देण्यात आली.
योग्य वाढ झालेल्या झाडांना दरवर्षी १५ ते २० किलो शेणखत द्यावे. ठिबकद्वारे विद्राव्य खते,सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत.

ड्रॅगन फ्रूट च्या रोपानचि छाटणी कधी करावी ?

रोपांची छाटणी लागवडीनंतर चार वर्षांनी करावी, रोगग्रस्त किंवा वाकड्या फांद्या काढून टाकण्यावर लक्ष केंद्रित करावे. तीन वर्षांनी झाडाला छत्रीचा आकार द्यावा. छाटणीनंतर छाटलेल्या फांदीवर बुरशीनाशक काचा स्प्रे घेणे खुप गरजेचे आहे

ड्रॅगन फ्रूट च्या रोपांवर वर छाटणी झाल्यावर कोणत्या बुरशी नाशकांचा स्प्रे घ्यावा ?

Contact + Systemic Fungicideडोस प्रति एकर
औषधाचे नावड्रेचिंग प्रती एकर 200 लिटर पाणी.स्प्रे प्रती पंप 15 लिटर पाणी
Ridomil Gold400 gm / 200 Ltr,पाणी25gm / 15 Liter पंप
Amistar Top210 ml / 200 Ltr,पाणी20 ml / 15 Liter पंप
Saaf500 gm / 200 Ltr,पाणी25 gm / 15 Liter पंप
Tata Taquat500 gm / 200 Ltr,पाणी20 gm / 15 Liter पंप
Indofil Avatar500 gm / 200 Ltr,पाणी30 ml / 15 Liter पंप
Custodia500 ml / 200 Ltr,पाणी20 ml / 15 Liter पंप
Burshi Nashak qty for use

ड्रॅगन फ्रूट च्या बागे तील भेसळ ढोस कोणता व किती वापरावा ?

DAP – ५० kg २ bag.
10:26-26 ५० kg- १ bag.
MOP ५० kg. २ bag.
Ammonium Sulphate – ५० kg – १ bag
Yaara Complex – २५ kg. १ bag.
Yara Nitrabor – २५ kg – १ bag
निम गोळी पेंड – ५० kg. २ bag.
Bhesal Dos

Recent Post

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )