जाणून घ्या गेलार्डिया लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Gaillardia Lagwad Mahiti Gaillardia Sheti) – Gaillardia Farming (Blanket Flowers)

गेलार्डिया लागवड । Gaillardia Lagwad | Gaillardia Sheti | Blanket Flowers | गेलार्डिया लागवडीचे महत्त्व । गेलार्डिया लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन ।गेलार्डिया लागवडी योग्य हवामान । गेलार्डिया लागवडी योग्य जमीन । गेलार्डिया फुलाच्या उन्नत जाती ।गेलार्डिया पिकाची अभिवृद्धी । गेलार्डिया पिकाची लागवड पद्धती । गेलार्डिया लागवडीचा हंगाम । गेलार्डिया पिकाचे खत व्यवस्थापन । गेलार्डिया पिकाचे पाणी व्यवस्थापन ।गेलार्डिया पिकाच्या महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण ।गेलार्डिया पिकातील तणांचे नियंत्रण । गेलार्डिया फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

गेलार्डिया लागवड । Gaillardia Lagwad | Gaillardia Sheti | Blanket Flowers |

गेलार्डियाची फुले आपल्याकडे गलांड्या या नावाने परिचित आहेत. परदेशात या फुलाला ब्लॅकेट फ्लॉवर किंवा इंडियन ब्लॅकेट असे म्हणतात. या फुलांचा फुललेला ताटवा ब्लॅकेटची किंवा गालिचाची आठवण करून देतो. म्हणून या फुलांना ब्लॅकेट फ्लॉवर्स असे म्हणतात. गेलार्डिया हे अत्यंत कणखर व भरपूर उत्पादन देणारे फुलझाड आहे. विविध प्रकारच्या जमीन व हवामानांतील लागवडीपासून या फुलझाडांचे भरपूर उत्पादन मिळते. या फुलांतील भरपूर पाकळ्या, फुलांचा आकर्षक आकार, रचना व रंग आणि टिकाऊपणा या सर्व गुणांमुळे गेलार्डियाची फुले प्रामुख्याने विविध सजावटींसाठी सर्रासपणे वापरतात. महाराष्ट्रातील उष्ण हवामानाच्या काळात म्हणजेच एप्रिल-मेमध्येही या फुलांचे चांगले उत्पादन मिळते. यामुळे कडक उन्हाळ्यातही या फुलांपासून फुलांची गरज भागविता येते. उन्हाळ्यात लग्नसराईचा मोसम जोरात असल्यामुळे आणि अन्य फुले बाजारात कमी प्रमाणात येत असल्यामुळे गेलार्डियाच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळतो. याशिवाय शेवंती आणि गेलार्डिया या फुलांमध्ये बरेच साम्य आहे. या कारणामुळे शेवंतीला एक पर्याय म्हणून आज या फुलाकडे पाहिले जाते. या सर्व कारणांमुळे गेलार्डियाच्या फुलशेतीला भरपूर प्रमाणात वाव निर्माण झाला आहे.

गेलार्डिया लागवडीचे महत्त्व । Importance of Gelardia Cultivation.

गेलार्डिया हे सुंदर रंगाचे आणि मुक्तपणे फुलणाऱ्या फुलांचे लोकप्रिय फुलझाड आहे. गेलार्डियाची फुले डेझीप्रमाणे लांब दांड्याची, एकेरी किंवा दुहेरी, मोठी, टिकाऊ आणि आकर्षक रंगाची असतात. यामुळे विविध प्रकारच्या सजावटींसाठी या फुलांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. गेलार्डियाच्या फुलांनी फुललेला ताटवा गालिचासारखा दिसतो. म्हणून या फुलझाडाची बागेतून आणि. इमारतीच्या परिसरामध्ये सुशोभनासाठी ताटव्यात कडेने (बॉर्डर) व कुंपणाभोवती लागवड करतात. गेलार्डियाची फुले हारासाठी आणि थोड्याफार प्रमाणात गुच्छ बनविण्यासाठीही उपयोगात येतात. याशिवाय समारंभामधील मंडप, स्टेज, रथ, पडदे यांच्या सजावटीसाठी या फुलांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यात लग्नसराई आणि इतर समारंभ खूप मोठ्या प्रमाणात असतात. या काळात फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. परंतु उन्हाळ्यात इतर फुलांचे उत्पादन कमी होते. गेलार्डिया मात्र उन्हाळ्यातही चांगला येतो. असे जरी असले तरी ह्या फुलाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यास आणि या पिकाचे किफायतशीर उत्पादन मिळविण्यास बराच मोठा वाव आहे.

गेलार्डिया लागवडी खालील क्षेत्र । गेलार्डिया पिकाचे उत्पादन । Areas below Gelardia cultivation. Gaillardia crop yield.

गेलार्डियाचे मूळ स्थान उत्तर अमेरिकेत असून जगातील सर्व देशांतून कमीजास्त प्रमाणात या फुलांची लागवड केली जाते.
महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील सोलू, आळंदी, मरकळ, वडगाव, लोणंद, रासे, चन्होली, जेजुरी, उरळीकांचन, यवत, येणेर, कुसूर, इत्यादी ठिकाणी; नाशिक जिल्ह्यात वणी, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर परिसर, इत्यादी ठिकाणी; नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी, सारोळा, सुपे व हंगे, या ठिकाणी; सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, तर उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर भागात या फुलांची लागवड होते. याशिवाय कोल्हापूर, सातारा आणि ठाणे परिसरात गेलार्डियाची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये या फुलझाडाच्या लागवडीस भरपूर वाव असूनही ठरावीक जिल्ह्यांमध्ये या फुलझाडाची लागवड होत असल्यामुळे या पिकाखालील क्षेत्र नगण्य आहे. उन्हाळ्यात सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या फुलझाडाची लागवड केल्यास या पिकापासून चांगला नफा सहज मिळू शकतो.

गेलार्डिया लागवडी योग्य हवामान । गेलार्डिया लागवडी योग्य जमीन । Climate suitable for Gaillardia cultivation. Land suitable for Gaillardia cultivation.

गेलार्डियाच्या पिकाला उष्ण व दमट हवामान चांगल्या प्रकारे मानवते. हे पीक काटक असल्यामुळे हवामानातील फेरबदल मोठ्या प्रमाणात सहन करू शकते. परंतु पिकाच्या किफायतशीर उत्पादन व चांगल्या प्रतीच्या फुलांसाठी मोकळी हवा, मध्यम तापमान आणि भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. सावलीतील जागा, भरपूर पाऊस आणि 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असलेल्या ठिकाणी या फुलझाडाची चांगली वाढ होत नाही. मात्र अवर्षण व उष्ण हवामान यांसारख्या परिस्थितीवर हे पीक मात करू शकते.
मात्र गेलार्डियाची विविध प्रकारच्या उत्तम निचऱ्याच्या जमिनीत लागवड करता येते. हलक्या मध्यम प्रतीच्या, सुपीक पोयट्याच्या जमिनी अधिक उत्पादनासाठी चांगल्या समजल्या जातात. अयोग्य निचऱ्याच्या भारी व खारवट जमिनी गेलार्डियाच्या लागवडीसाठी अयोग्य असतात. गेलार्डियाच्या लागवडीसाठी जमीन निवडताना मध्यम पोयट्याच्या व जमिनीचा सामू 5 ते 8 दरम्यान असलेल्या जमिनीला अग्रक्रम द्यावा.

गेलार्डिया फुलाच्या उन्नत जाती । Advanced varieties of Gelardia flower.

गेलार्डिया हे फुलझाड लहान झुडपाप्रमाणे असून डौलदार वाढते. या फुलझाडांची उंची 45 ते 60 सेंमी. असते. फुले सिंगल आणि डबल अशा दोन प्रकारची असतात. फुलांचा व्यास 5 ते 8 सेंमी. एवढा असून फुलांना लांब पातळ दांडे असतात. फुले गर्द पिवळा, जांभळट, फिकट पिवळा, नारिंगी, तपकिरी, तांबडा, इत्यादी रंगाची असतात.
गेलार्डियाच्या जातीचे प्रामुख्याने पिकटा आणि लॉरेंझियाना अशा दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करतात.

पिकटा प्रकार :

या प्रकारच्या जातींना मोठ्या आकाराची परंतु एकेरी फुले लागतात. या प्रकारामध्ये इंडियन चीफ रेड (लाल रंगाची फुले) व पिकटा मिक्स्ड् या दोन जाती लोकप्रिय आहेत.

लॉरेंझियाना प्रकार :

या प्रकारातील फुले ही मोठी, दुहेरी व गुबगुबीत असतात. या जातींना एकाच बहारात विविध रंगांची फुले येतात. या प्रकारामध्ये सनशाईन, गेएटी डबल मिक्स्ड (विविध रंगांची फुले), डबल ट्रेटा फिएस्टा (साधारणतः 7.5 सेंमी. व्यासाची मोठी, लाल व पिवळ्या फुलांची जात), इत्यादी जातींचा समावेश होतो.
वरील प्रकाराशिवाय गेलार्डियाच्या गेलार्डिया ग्रैंडिफ्लोरा या प्रकारातील जाती बहुवर्षीय असून त्यामध्ये सन गॉड, वरगंडी, रूबी, वरिअर, ग्लोबीन, इत्यादी जातींचा समावेश होतो. या जातींना मोठ्या आकाराची पिवळसर केशरी आणि लाल रंगाची फुले येतात.

गेलार्डिया पिकाची अभिवृद्धी । गेलार्डिया पिकाची लागवड पद्धती । Growth of Gelardia crop. Cultivation method of Gelardia crop.

गेलार्डियाची अभिवृद्धी बियांपासून करतात. त्यासाठी सुरुवातीला गादीवाफ्यावर बी पेरून रोपे तयार करावी लागतात. रोपे तयार करण्यासाठी साधारणतः 1 ते 1.2 मीटर रुंद, 10 ते 15 सेंमी. उंच आणि आवश्यकतेप्रमाणे योग्य लांबीचे गादीवाफे तयार करून घ्यावेत. हे गादीवाफे तयार करताना दर चौरस मीटर क्षेत्राला 12 ते 15 किलो चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. गेलार्डियाचे बी वजनाने हलके असते. एक हेक्टर क्षेत्रावर गेलार्डियाची लागवड करण्यासाठी चांगली उगवणक्षमता असलेले 200 ते 250 ग्रॅम बी गादीवाफ्यावर पेरावे. बी पेरताना दोन ओळींत 10 सेंमी. अंतर ठेवून 1 ते 1.25 सेंमी. खोल पेरावे. थंडीच्या दिवसांत गेलार्डियाचे बी लवकर उगवत नाही. म्हणून लावडीपूर्वी हे बी गरम पाण्यात तासभर भिजवून ठेवतात. गादीवाफ्यावर बियांची पेरणी केल्यानंतर चाळलेल्या बारीक शेणखताने बी झाकून घ्यावे आणि झारीने गादीवाफ्यांना त्वरित पाणी द्यावे. अशा प्रकारे पेरणी केल्यास 7 ते 8 दिवसांत गादीवाफ्यावरील सर्व बी उगवून येते. गादीवाफ्यावरील रोपे 4 ते 9 पानांवर आल्यावर म्हणजेच 3 ते 4 आठवडे वयाची झाल्यावर बागेत लावावीत.
गेलार्डियाच्या लागवडीसाठी जमीन तयार करताना योग्य प्रकारच्या जमिनीची उभी- आडवी नांगरणी करून घ्यावी. मशागत करताना हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे आणि 45 ते 60 सेंमी. अंतरावर सऱ्या काढून घ्याव्यात. यानंतर सरीच्या एका बाजूस 45 ते 60 सेंमी. अंतरावर रोपांची लागवड करावी. रोपांची जास्त मर होऊ नये यासाठी उन्हाळ्यात रोपांची लागवड सकाळी अथवा दुपारी चार वाजल्यानंतर करावी.

गेलार्डिया लागवडीचा हंगाम । Gelardia planting season.

गेलार्डिया हे काटक फुलझाड असल्यामुळे वर्षभरात केव्हाही लागवड करता येते. महाबळेश्वरसारख्या जास्त पावसाच्या प्रदेशात हे पीक पावसाळ्यात न घेता पावसाळा संपल्यानंतर घेतात. पाऊसमान आणि फुलांना असलेली मागणी लक्षात घेऊन खरीप, रब्बी अथवा उन्हाळी हंगामात लागवड करावी. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जून, ऑक्टोबर आणि फेब्रुवारी या महिन्यांत गेलार्डियाची लागवड करतात. मे-जूनमध्ये पेरणी केलेल्या पिकाची फुले पावसाळ्यात, सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये पेरणी केलेल्या पिकाची फुले हिवाळ्यात तर फेब्रुवारी-मार्च महिन्यांत पेरणी केलेल्या पिकाची फुले उन्हाळ्यात अशा प्रकारे जवळजवळ वर्षभर गेलार्डियाची फुले मिळतात.

गेलार्डिया पिकाचे खत व्यवस्थापन । गेलार्डिया पिकाचे पाणी व्यवस्थापन । Fertilizer Management of Gelardia Crop. Water Management of Gelardia Crop.

लागवडीपूर्वी हेक्टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत टाकावे.. लागवडीच्या वेळी हेक्टरी 25 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश ही खते द्यावीत. लागवडीनंतर एक महिन्याने पहिली खुरपणी झाल्यानंतर पिकाला हेक्टरी 30 किलो नत्राचा दुसरा हप्ता वरखते म्हणून द्यावा.
रोपांची लागवड केल्यानंतर सुरुवातीला 2-3 पाण्याच्या पाळ्या 3 ते 4 दिवसांच्या अंतराने पिकाला द्याव्यात. मात्र यानंतर जमिनीचा मगदूर व हवामान यांचा विचार करूनच 6 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

गेलार्डिया पिकाच्या महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण । Important pests, diseases and their control of Gelardia crop.

गेलार्डियावर किडी व रोगांचा फार कमी प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. तरी काही वेळा मावा, फुलकिडे आणि पाने खाणाऱ्या अळ्या या किडींचा उपद्रव दिसून येतो. या किडींच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 15 मिलिलीटर नुवाक्रॉन किंवा 20 मिलिलीटर मेटासीड हे कीटकनाशक मिसळून 1-2 वेळा फवारणी करावी.
गेलार्डियाच्या पिकावर पावसाळ्यात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम डायथेन एम-45 या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

गेलार्डिया पिकातील तणांचे नियंत्रण । Weed control in Gaillardia crops.

गेलार्डियाच्या पिकामध्ये हरळी, लव्हाळा, पांढरी फुली, शिंपी, एकदांडी, घोळ, कुंदा, जर्मन काटा, इत्यादी तणे उगवतात. या तणांच्या नियंत्रणासाठी लागवडीनंतर साधारणतः एक महिन्याच्या अंतराने एक किंवा दोन वेळा निंदणी व खुरपणी करावी. याशिवाय लागवडीपासून एका महिन्याच्या अंतराने दोन वेळा या पिकाला मातीची भर घालावी.

गेलार्डिया फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । Harvesting, production and sale of Gaillardia flowers.

रोपांच्या लागवडीपासून साधारणतः दोन ते अडीच महिन्यांत गेलार्डियाला फुले येण्यास सुरुवात होते. फुलोरा आल्यानंतर साधारणतः 18 ते 25 दिवसांत फुले तोडणीला येतात आणि पुढे जवळजवळ 10 ते 12 आठवडे तोडणीचा हंगाम चालू राहतो. फुलांची तोडणी करताना 10 ते 15 सेंमी. लांबीच्या दांड्यासह फुले झाडावरून छाटून घ्यावीत.
यानंतर गेलार्डियाच्या फुलांची प्रतवारी करून चांगली सुटी फुले किंवा 10 ते 12 फुलांच्या एक या प्रमाणाच्या 300 ते 400 जुड्या एका करंडीत भराव्यात व नंतर विक्रीसाठी बाजारात पाठवाव्यात. गेलार्डियाच्या फुलांचे उत्पादन व प्रत वाढविण्यासाठी पहिल्या तोडणीनंतर पिकावर अनुक्रमे 1% युरिया आणि 10 पीपीएम तीव्रतेच्या एनएए या संजीवकाची फवारणी करावी.
गेलार्डियाच्या प्रत्येक झाडापासून साधारणतः 25 ते 30 फुले मिळतात. एक हेक्टर क्षेत्रावरील लागवडीपासून सुमारे 400 ते 500 करंड्या भरण्याइतकी फुले मिळू शकतात. फुलांच्या प्रत्येक करंडीला 25 रुपये एवढा बाजारभाव मिळतो.

जाणून घ्या ग्लॅडिओलस लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Gladiolus Lagwad Mahiti Gladiolus Sheti) – Gladiolus Farming

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )