डिजिटल वोटर कार्ड ,Digital Voter Id Card ,घरपोच वोटर कार्ड
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
Electronic voter card :
नवीन मतदारांना डिजिटल वोटर कार्ड त्यांच्या घरी घरपोच मिळणार आहे. नवीन मतदारांसाठी मोफत घरपोच मतदान कार्ड दिले जाते. परंतु ज्यांच्याकडे यापूर्वीच मतदान कार्ड आहे अशा लोकांना जर नवीन मतदान कार्ड घ्यायचे असेल तर ते फक्त पंचवीस रुपयात नवीन मतदान कार्ड घरपोच मिळू शकतात. तुमच्याकडे असलेले जुने मतदान कार्ड हरवले असेल किंवा खराब झाले असेल तर अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन कमिशन कडून आता नवीन मतदान कार्ड घरपोच दिले जाणार आहे.
यासाठी सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही फक्त 25 रुपयात मतदान कार्ड ऑर्डर करू शकता.तेही घरपोच
इलेक्शन कमिशन कडून वोटर हेल्पलाइन नावाचे एप्लीकेशन देखील सुरू करण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही आपल्या मतदान कार्ड मध्ये दुरुस्ती करू शकता.
नाव जन्मतारीख फोटो इत्यादी गोष्टी जर तुम्हाला तुमच्या मतदान कार्ड बदलून घ्यायचे असेल तर या सुविधा देखील वोटर हेल्पलाइन ॲप मध्ये देण्यात आले आहेत.
तुम्ही वोटर हेल्पलाइन ॲप वर तुमच्या मतदान कार्ड मध्ये दुरुस्ती करून नवीन मतदान कार्ड घरपोच मागू शकता.