हिंदू संस्कृती मध्ये गोत्र व ( Gotra And Pravar ) प्रवर यांना एवढे का महत्व आहे ?

गोत्र व प्रवर । Gotra And Pravar । प्रमुख ३२ गोत्र व त्यांची प्रवर । प्रवर म्हणजे काय ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

गोत्र व प्रवर (Gotra And Pravar):

धार्मिक विधी करताना बऱ्याच वेळा आपले गोत्र काय असा प्रश्न गुरुजी विचारतात तेंव्हा गोत्र म्हणजे काय असा प्रतिप्रश्न करणारे देखिल असा तात, अशा वेळेला पुर्वजांपैकी कोणी एक पुरुष असे उत्तर देउन वेळ मारुन नेणारे काही जण असतात. पण तसे नसून गोत्र ही वैदिक धर्माने दिलेली देणगी आहे.

जन्मवंश शास्त्रदृष्ट्या अतंत्य सूक्ष्मस्तरीय एक मानवशाखा आहे. “धर्मसिंधु” ग्रंथामध्ये गोत्राचे लक्षण पुढील प्रमाणे दीलेले आहे,

‘तत्र गोत्र लक्षणम् – विश्वामित्रो जमदग्निर भारद्वाजोsथ गौतमः | अत्रिर्वसिष्ठः कश्यप इत्येते सप्तऋष्यः ||’

अर्थात, विश्वामित्र, जमदग्नि, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, आणि कश्यप हे सात ऋषी आहेत. व आठवे ऋषी अगस्त्य हे होत. यापैकी प्रत्येक ऋषीचे आपत्य म्हणजे गोत्र होय. गोत्रांची संख्या अगणीत असली तरी धर्माने त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली आहे. त्या त्या ऋषींच्या नावांना गोत्र असे म्हणतात.

गोत्र हे एका पुरुष- पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचे नाव असते. पाणिनीने संस्कृतमध्ये गोत्राचे वर्णन “अपत्यम् पौत्रप्रभृती गोत्रम्” असे केले आहे. म्हणजे “मुलाच्या मुलापासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम”. गोत्रे ही बहुधा ऋषींची नावे असतात. उदा. कश्यप गोत्र म्हणजे कश्यप ऋषींपासून सुरू झालेल्या वंशातील लोक होत.

बौधायनसूत्रानुसार अगस्त्य, कश्यप, गौतम, जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ आणि विश्वामित्र, या ८ ऋषींपासून ८ प्राथमिक गोत्रे तयार होतात.

गोत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आश्वलायन-श्रौतसूत्रानुसार वसिष्ठ गणामध्ये चार उपविभाग आहेत: उपमन्यू, कुंदिन, पराशर आणि वसिष्ठ. या चारांमध्ये पुन्हा उप-उपविभाग आहेत. ज्यांना गोत्र असे म्हणातात. म्हणजे वर्गीकरण प्रथम गणांत, नंतर पक्षांत व नंतर गोत्रांत होते. आजही भृगू आणि अंगिरस गण अस्तित्वात आहेत. बौधायनानुसार मुख्य ८ गोत्रांचे पक्षांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. उपमन्यूंची प्रवरे इंद्रप्रमाद भारद्वसू व वसिष्ठ; पराशर गोत्रातील प्रवरे पाराशर्य, वसिष्ठ व शाक्त्य; कुंदिन गोत्राची कौंडिण्य, मैत्रात्रवरुण व वसिष्ठ ही होत.

धर्म, सांस्कृतिक परंपरा, आचार व वैदिक विचार यांच्यातील विविधतेमुळे ब्राह्मणांच्यात पुन्हा पोटजाती निर्माण झाल्या. वेदकाळातील ब्राह्मण वेगवेगळ्या वेदाच्या शिकवणीनुसार वेगळे झाले. एकाच शाखेतील विद्वान ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली विविध पंथ निर्माण झाले. या विद्वान ऋषींनी दिलेल्या शिकवणीला सूत्रे असे म्हणतात. प्रत्येक वेदाची स्वतःची सूत्रे आहेत. सामाजिक, नैतिक व कायदे यांच्या सूत्रांना धर्मसूत्रे, विविध धार्मिक विधींच्या सूत्रांना श्रौतसूत्रे तर घरगुती विधींशी संबंधित सूत्रांना गृह्यसूत्रे असे म्हणतात.

अनेक ब्राह्मणांनी विविध नियम तयार केले. उदा: अंगिरस, अत्रि, आपस्तंब, उषानस्‌, कात्यायन, गौतम, दक्ष, पराशर, बृहस्पती, बौधायन, मनू, यम, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, विष्णू, व्यास, लिखित, शंख, शतताप, संवर्त आणि हरित. या २१ ऋषींनी स्मृतिलेखनाची सुरुवात केली. यातील आपस्तंब, गौतम, बौधायन आणि वसिष्ठ यांच्या स्मृती सर्वांत जुन्या आहेत.

यास्काच्या निरुक्तात म्हटले आहे की “ब्रह्मम् जानति इति ब्राह्मणम्”. म्हणजेच ज्याला अंतिम सत्य माहिती आहे तो म्हणजे ब्राह्मण. परंपरेनुसार ब्राह्मण हिंदू समाजातील पुजारी आणि पंडित म्हणून काम करत आले आहेत. आज मात्र ब्राह्मण विविध क्षेत्रात गुंतलेले दिसतात व त्यांची धार्मिक परंपरा आणि संस्कृती ही दैनंदिन जीवनात फार कमी प्रमाणात वापरली जाते.

खालील श्लोकात ब्राह्मणांची सहा कर्तव्ये दिली आहेत.

अध्यापनं अध्यययनम् यज्ञम् याज्ञम् तथा | दानम् प्रतिग्रहम् चैव ब्राह्मणानामकल्पयात्‌ ||

शिकणे, शिकवणे, यज्ञयाग करणे, करवून घेणे, दान घेणे व दान देणे ही ब्राह्मणांची सहा कामे आहेत. यास्क ऋषीच्या म्हणण्याप्रमाणे, जन्मना जायते शूद्रः संस्कारात्‌ भवेत्‌ द्विजः| वेद पाठात्‌ भवेत्‌ विप्रः ब्रह्म जानातीति ब्राह्मणः||

आणि,

तत्र मित्र न वस्तव्यं यत्र नास्ति चतुष्टयं | ऋणदाता च वैद्यश्च श्रोत्रियः सजला नदी ||

अर्थात, अरे मित्रा, ऋणदाता म्हणजे (अडचणीच्या वेळी) कर्ज देणारा, (आजारी पडल्यावर औषध देणारा) वैद्य, वेद पारंगत ब्राह्मण (म्हणजे श्रोत्रिय) आणि भरपूर पाणी असलेली नदी जिथे हे चार उपलब्ध नसतील तिथे वस्ती करू नकोस. (किंवा करू नये)

जन्मना ब्राह्मणो ज्ञेयः | संस्कारै: द्विज उच्चते || विद्यया याति विप्रत्वम् | त्रिभि: श्रोत्रिय उच्चते ||१|| (रघुवंश)

आणि,

क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा: | स्वयं जुह्वत एकर्षि श्रद्धयन्तः | तेषामेवैता ब्रह्मविद्यां वदेत | शिरोव्रतं विधिवद्यैस्तु चीर्णम् ||२|। – मुण्डकोपनिषद

प्रमुख ३२ गोत्र व त्यांची प्रवर


१ अत्रि: आत्रेय- आर्चासन- श्यावाश्व
२ अघमर्षण: वैश्वामित्र- अघमर्षण- कौशिक
३ आंगिरस: *आंगिरस- आंबरीष- यौवनाश्व
४ आयास्य: आंगिरस- आयास्य- गौतम
५ आर्ष्टिषेण: भार्गव- च्यावन- आप्न्वन- आर्ष्टिषेण- अनूप
६ उपमन्यु: वासिष्ठ- इंद्रप्रमद- आभ्रद्ववसु
७ कण्व: आंगिरस- आजमीढ- कण्व
८ कपि: आंगिरस- आमहीयव- औरुक्षयस
९ कश्यप: कश्यप- अवत्सार- नैधृव- अवत्सार- असित
१० कुत्स: आंगिरस- माधांत्र- कौत्स
११ कौंडिण्य: वासिष्ठ- मैत्रावरुण- कौंडिण्य
१२ कौशिक: वैश्वामित्र- अघमर्षण- कौशिक
१३ गार्ग्य: आंगिरस- शैन्य- गार्ग्य
१४ जामदग्न्य: भार्गव- च्यावन- आप्न्वन- और्व- जामदग्न्य
१५ नित्युन्द: आंगिरस- पौरुकुत्स्य- त्रासदस्यु
१६ नैध्रुव: काश्य्प- अव्त्सार- नैध्रुव
१७ पाराशर: वासिष्ठ- शाक्त्य- पाराशर
१८ बादराण: आंगिरस- पौरुकुत्स्य- त्रासदस्यु
१९ बाभ्र्व्य: वैश्वामित्र- देवरात- औदास
२० बिद: भार्गव- च्यावन- आप्न्वन- और्व- बिद
२१ भारव्दाज: आंगिरस- बार्हस्पत्य- भारव्दाज
२२ मित्रायु: भार्गव- च्यावन- देवोदास
२३ मुद्ग्गल: आंगिरस- भार्ग्याश्व- मौद्ग्गल्य
२४ यस्क: भार्गव- वैतहव्य- सावेतस
२५ रथीतर: आंगिरस- वैरुप- रथीतर
२६ वत्स: भार्गव- च्यावन- आप्न्वन- और्व- जामदग्न्य
२७ वासिष्ठ: वासिष्ठ- इंद्रप्रमद- आभ्रद्ववसु
२८ विष्णुवृद्ध: आंगिरस- पौरुकुत्स्य- त्रासदस्यु
२९ वैश्वामित्र: वैश्वामित्र- अघमर्षण- कौशिक
३० शांडिल्य: शांडिल्य- असित- देवल
३१ शालाक्ष: वैश्वामित्र- शालंकालय- कौशिक
३२ शौनक: भार्गव- शौनहोत्र- गार्स्तमद

प्रवर म्हणजे काय?


गोत्रांची संख्या अगणीत असली, तरी धर्माने त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली आहे. प्रत्येक गोत्रांना प्रर्वतक ऋषी असतात. काही गोत्रांना एक, काही गोत्रांना दोन, काही गोत्रांना तिन ते पाच पर्यंत प्रवर्तक असतात. या प्रवर्तक ऋषी गणांना प्रवर असे म्हणतात. काही समाजामध्ये आजही सप्रवर विवाह वर्ज केला जातो. तसेच उपनयन प्रसंगी बटूस गोत्र प्रवर, स्वतःची वेदशाखा, सूत्र, स्वतःचे नक्षत्र व चरण नाम ह्यांची माहीती करुन दीली जाते.

मृत्यू नंतर आत्म्याचा प्रवास (Mrutu Nantar Aatmyacha Pravas)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )