ग्रेपफ्रुटचे उगमस्थान, महत्त्व आणि ग्रेपफ्रुटचा भौगोलिक प्रसार । Grapefruit Sheti । ग्रेपफ्रुट पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन । ग्रेपफ्रुट पिकासाठी हवामान । ग्रेपफ्रुट पिकासाठी जमीन । ग्रेपफ्रुट पिकासाठी हवामान । ग्रेपफ्रुट पिकासाठी जमीन । ग्रेपफ्रुट पिकाच्या सुधारित जाती । ग्रेपफ्रुट पिकाची अभिवृद्धी । ग्रेपफ्रुट पिकाची लागवड पद्धती । ग्रेपफ्रुट पिकास हंगाम । ग्रेपफ्रुट पिकास लागवडीचे अंतर । ग्रेपफ्रुट पिकाचे वळण । ग्रेपफ्रुट पिकाची छाटणी । ग्रेपफ्रुट पिकास खत व्यवस्थापन । ग्रेपफ्रुट पिकास पाणी व्यवस्थापन । ग्रेपफ्रुट पिकातील आंतरपिके । ग्रेपफ्रुट पिकातील आंतरमशागत । ग्रेपफ्रुट पिकातील तणनियंत्रण । ग्रेपफ्रुट पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । ग्रेपफ्रुट पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । ग्रेपफ्रुट पिकातील फळांची काढणी आणि उत्पादन । ग्रेपफ्रुट पिकातील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण । ग्रेपफ्रुट पिकातील फळांची साठवण, फळे पिकविण्याच्या पद्धती आणि विक्रीव्यवस्था ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
ग्रेपफ्रुटचे उगमस्थान, महत्त्व आणि ग्रेपफ्रुटचा भौगोलिक प्रसार :
ग्रेपफ्रुटचे उगमस्थान दक्षिण चीन आहे. ग्रेपफ्फुटमधील रस आणि सालीच्या आतला पांढरा अल्बीडो खाण्यायोग्य असतो. थकवा दूर होण्यासाठी तसेच भूक लागण्यासाठी हे फळ उत्तम आहे. ज्या ठिकाणी संत्रा – मोसंबी साधत नाही अशा ठिकाणी ग्रेपफ्रुटची लागवड यशस्वी होते. चीनमधून या फळाचा प्रसार भारतात आणि इतर देशांतही झाला.
ग्रेपफ्रुट पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन :
भारतात ग्रेपफ्रुटची लागवड कमी असून महाराष्ट्रात 1,000 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचा अंदाज आहे. वार्षिक उत्पादन 15 हजार टनांच्या आसपास मिळते.
ग्रेपफ्रुट पिकासाठी हवामान आणि ग्रेपफ्रुट पिकासाठी जमीन :
या पिकास समशीतोष्ण प्रकारचे हवामान मानवते. कडाक्याची थंडी, बर्फ, दव यास मानवत नाही. विविध प्रकारच्या जमिनीत ग्रेपफ्रुट लागवड करता येते. मात्र अशा जमिनीत चुनखडी नसावी आणि पाण्याचा निचराही चांगला असावा.
ग्रेपफ्रुट पिकाच्या सुधारित जाती :
ग्रीन, पिंक या दोन जाती प्रामुख्याने गराच्या रंगावरून ओळखल्या जातात. ग्रेपफ्रुटची टॅन्जेलो म्हणून एक संकरित जात आहे.
ग्रेपफ्रुट पिकाची अभिवृद्धी आणि ग्रेपफ्रुट पिकाची लागवड पद्धती :
ग्रेपफ्रुटची अभिवृद्धी जंबेरी या खुंटावर डोळे भरून केली जाते. लागवडीसाठी हम चौरस पद्धतीने 0.75 X 0.75 X 0.75 मीटर मापाचे खड्डे खणून त्यात खत, माती भरून पावसाळयापूर्वी तयारी केली जाते.
ग्रेपफ्रुट पिकास हंगाम आणि ग्रेपफ्रुट पिकास लागवडीचे अंतर :
ग्रेपफ्रुटची लागवड जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी अशा तीन हंगामांत केली जाते. जमिनीच्या मगदुरानुसार 6 x 6 मी. अथवा 7 x 7 मी. अंतरावर लागवड करावी.
ग्रेपफ्रुट पिकाचे वळण आणि ग्रेपफ्रुट पिकाची छाटणी :
सुरुवातीला झाडांची वाढ एका खोडावर करून घ्यावी. झाडाचे खोड 1 मीटर सरळ उंच वाढण्यासाठी, खोडावरील तसेच खुंटजोडाच्या खालच्या भागावरील फुटी लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात वरचेवर काढून टाकाव्यात. फुले-फळे येण्यासाठी ग्रेपफ्रुटच्या झाडाची छाटणी करण्याची गरज नाही.
ग्रेपफ्रुट पिकास खत व्यवस्थापन आणि ग्रेपफ्रुट पिकास पाणी व्यवस्थापन :
ग्रेपफ्रुटचे पूर्ण वाढीच्या झाडास पुढीलप्रमाणे खते द्यावीत.
खताचे नाव | जून | ऑक्टोबर | फेब्रुवारी |
व्हर्मिकंपोस्ट | 10 | 10 | 10 |
पेंड | 2 | 2 | 2 |
19:19:19 | 1 | 1 | 1 |
सूक्ष्म द्रव्ये मिश्रण | 0.5 | 0.5 | 0.5 |
पाणी व्यवस्थापन –
ग्रेपफ्रुटच्या झाडाला पाणी नियमित द्यावे. पावसाळयात 15-20 दिवसांनी आणि इतर वेळी 8-10 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. आळयात पाणी साचू देऊ नये. तसेच खोडास ओलावा लागू नये म्हणून बांगडी पद्धतीने पाणी द्यावे.
ग्रेपफ्रुट पिकातील आंतरपिके, ग्रेपफ्रुट पिकातील आंतरमशागत आणि ग्रेपफ्रुट पिकातील तणनियंत्रण :
ग्रेपफ्रुटच्या बागेत सुरुवातीच्या काळात पपई, शेवगा, लिली, निशीगंध, मोगरा यांसारखी आंतरपिके घ्यावीत. आंतरमशागत करताना आळी वरचेवर चाळून घेऊन तण- विरहित ठेवावीत. तणांचा बंदोबस्त करण्यासाठी आच्छादने आणि तणनाशकांचा वापर करावा त्यासाठी ग्रामोक्झोन हे तणनाशक सोईचे आहे.
ग्रेपफ्रुट पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण
फळमाशी :
ही कीड पक्व फळात अंडी घालते. आतील अळीमुळे फळे खराब होतात, गळून पडतात आणि नासतात. या किडीच्या नियंत्रणासाठी लिंडेन, मॅलॅथिऑन ही कीडनाशके वापरावीत. बाग स्वच्छ ठेवावी. पीडित फळांचा नायनाट
करावा.
मावा :
ही कीड पानांवरील व कोवळ्या शेंड्यांवरील रस शोषून नुकसान करते. नियंत्रणासाठी नुवान, नुवाक्रान कीडनाशकाच्या 1/2 फवारण्या कराव्यात. (3) पांढरी माशी ही कीड पानांच्या खालच्या बाजूस वाढते. पानांतील रस • शोषून नुकसान करते व काजळी रोग वाढण्यास कारणीभूत ठरते. या किडीच्या नियंत्रणासाठी नुवान, मॅलॅथिऑन या कीडनाशकांच्या 3/4 फवारण्या कराव्यात.
ग्रेपफ्रुट पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :
ग्रेपफ्रुट झाडावर डिंक्या, मूळकूज हे रोग आढळतात. या रोगाच्या बंदोबस्तासाठी जमिनीत पाण्याचा निचरा करणे, खोडास पाणी लागू न देणे तसेच खोडावर बोर्डो पेस्ट लावणे या उपायांनी या रोगांचे नियंत्रण करता येते.
ग्रेपफ्रुट पिकातील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण :
ग्रेपफ्रुटमध्ये शारीरिक विकृती आढळत नाहीत. तथापि, फांदी कलम जोडाजवळ गाठ वाढते. यावर उपाय म्हणजे कलमे बांधताना योग्य खुंटाची निवड करावी. तसेच जमिनीत चुनखडीचे प्रमाण अधिक असल्यास पानांवर झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट यांचे 2/3 फवारे द्यावेत.
ग्रेपफ्रुट पिकातील फळांची काढणी आणि उत्पादन :
फळे झाडावर तयार झाल्यानंतर आणि फळांचा रंग बदलल्यानंतर फळे काढावीत. चांगल्या वाढलेल्या एका झाडापासून वर्षभरात 150 ते 200 फळे मिळतात. दर हेक्टरी उत्पादन 12 ते 16 टन मिळते.
ग्रेपफ्रुट पिकातील फळांची साठवण, फळे पिकविण्याच्या पद्धती आणि विक्रीव्यवस्था :
ताजी फळेच विक्रीस पाठविण्याची पद्धत आहे. फळे काढल्यानंतर ती 8 / 10 दिवस खराब न होता टिकतात. या काळात फळांना आकर्षक असा पिवळा रंग येतो. पोत्यांत अगर करंड्यांत बांधून फळे विक्रीसाठी पाठवावीत.
सारांश :
ग्रेपफ्रुट हे लिंबूवर्गीय फळझाड असून संत्री – मोसंबी – लिंबू नंतर लागवडीखाली आहे. समशीतोष्ण हवामान आणि मध्यम प्रकारची जमीन या फळपिकास चांगली मानवते. ग्रेपफ्रुटची लागवड कलमापासून 6 ते 8 हम चौरस मीटर अंतरावर करतात. याची फळे घोसात लागतात आणि एका झाडापासून वर्षात 150-200 फळे मिळतात.