१५ ऑगस्ट १९४७ | स्वातंत्र्य दिन | Independence Day | Indian Independence Day | Tryst with Destiny | तिरंगा ध्वज फडकावण्याबाबत | वंदे मातरम् | राष्ट्रीय गीत | ट्रिस्ट विथ डेस्टिनी | २६ जानेवारी |
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
स्वातंत्र्य दिन : Independence Day : (भारत)
स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे… ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
स्वातंत्र्य आणि अखंड भारताचे विभाजन
हिंदुस्तान टाईम्स वृत्तपत्रात १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली
सकाळी 08 : 30 – गव्हर्नर जनरल आणि मंत्र्यांचा शासकीय निवासस्थानात शपथविधी झाली
सकाळी 09 : 40 – संविधान सभा आणि मंत्र्यांचे प्रस्थान
सकाळी 09 : 50 – संविधान सभेपर्यंत राज्य मोहीम
सकाळी 09 : 55 – गव्हर्नर जनरल यांना शाही सलामी
सकाळी 10 : 30 – संविधान सभेत राष्ट्रध्वज फडकवणे
सकाळी 10 : 35 – सरकारी घरापर्यंत राज्य ड्राइव्ह
संध्याकाळी 06 : 00 – इंडिया गेट येथे ध्वजवंदन सोहळा
संध्याकाळी 07 : 00 – प्रकाश 07 : 45 pm – फटाक्यांची आतषबाजी रात्री 08 : 45 – शासकीय निवासस्थानी अधिकृत डिनर रात्री 10 : 15 – शासकीय निवासस्थानी स्वागत
15 ऑगस्ट 1947 या दिवशीचा कार्यक्रम झाला
स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या नवीन सीमा ओलांडून लाखो मुस्लिम, शीख आणि हिंदू निर्वासितांनी पायी प्रवास केला. नवीन सीमांच्या दोन्ही बाजूंच्या हिंसाचारात 250,000 ते 1 दशलक्ष लोक मरण पावले. संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, गांधी हे हत्याकांड थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी कलकत्ता येथे राहिले, परंतु 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन घोषित करण्यात आला आणि नवीन देश पाकिस्तान अस्तित्वात आला मोहम्मद अली जिना यांनी कराचीत पहिले गव्हर्नर जनरल म्हणून शपथ घेतली.
भारताच्या संविधान सभेचे पाचवे अधिवेशन १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात भरले. या अधिवेशनाचे अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद होते. या सत्रात जवाहरलाल नेहरू यांनी Tryst with Destiny नावाचे भाषण करून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.
सभेच्या सदस्यांनी औपचारिकपणे राष्ट्रसेवेची शपथ घेतली. महिलांच्या एका गटाने भारतातील महिलांचे प्रतिनिधित्व केले आणि औपचारिकपणे विधानसभेत राष्ट्रीय ध्वज सादर केला. अधिकृत समारंभ नवी दिल्ली येथे झाला ज्यानंतर भारत एक स्वतंत्र देश बनला. नेहरूंनी पहिले पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आणि व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी पहिले गव्हर्नर जनरल म्हणून पदभार स्वीकारला. लोकांनी महात्मा गांधींचे नाव घेऊन उत्सव साजरा केला. गांधींनी मात्र अधिकृत कार्यक्रमात भाग घेतला नाही. त्याऐवजी, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी कलकत्त्यात जमावाशी संवाद साधला, ज्या दरम्यान त्यांनी 24 तास उपवास केला.
15 ऑगस्ट 1947 रोजी सकाळी 11 : 00 वाजता, संविधान सभेने भारताच्या स्वातंत्र्याचा सोहळा सुरू केला, ज्यामध्ये अधिकारांचे हस्तांतरण झाले. घड्याळाचे काटे मध्यरात्री वाजत असताना भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि एक स्वतंत्र राष्ट्र बनले.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या दिवशी Tryst with Destiny ( नियतीने दिलेले वचन ) हे प्रसिद्ध भाषण दिले.
Tryst with Destiny
बर्याच वर्षांपूर्वी, आपण नियतीला वचन दिले होते आणि आता वेळ आली आहे की आपण आपले वचन पूर्णतः नाही तर मोठ्या प्रमाणात पाळावे. मध्यरात्रीच्या झटक्याने, जेव्हा जग झोपेल, तेव्हा भारत जीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागे होईल. तो क्षण येतो, परंतु इतिहासात क्वचितच, जेव्हा आपण जुन्यातून बाहेर पडून नवीनमध्ये प्रवेश करतो, जेव्हा एक युग संपतो, जेव्हा एखाद्या राष्ट्राचा दीर्घकाळ दडपलेला आत्मा मुक्त होतो. या पवित्र प्रसंगी आपण स्वतःला भारत आणि तेथील लोकांच्या सेवेसाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवतेच्या सेवेसाठी पुन्हा समर्पित करण्याची शपथ घेत आहोत हे योग्य आहे…. आज आपण दुर्दैवाच्या युगाचा अंत करत आहोत. आणि भारत पुन्हा स्वतःला शोधत आहे. आज आपण जे यश साजरे करतो ते नवीन संधी उघडण्याचे फक्त एक पाऊल आहे. आणखी मोठे विजय आणि यश आमची वाट पाहत आहेत. भारताची सेवा करणे म्हणजे लाखो आणि लाखो पीडितांची सेवा करणे. याचा अर्थ गरिबी, अज्ञान आणि संधीची असमानता नष्ट करणे. प्रत्येक डोळ्यातील अश्रू पुसले जावेत हीच आपल्या पिढीतील महान माणसाची इच्छा आहे. हे आपल्याला शक्य होणार नाही, पण जोपर्यंत लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत तोपर्यंत आपले काम संपणार नाही. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आज पुन्हा एकदा भारत जागृत आणि स्वतंत्र झाला आहे. भविष्य आपल्याला बोलावत आहे. आपण कुठे जावे आणि काय केले पाहिजे, जेणेकरून आपण सामान्य माणसाला, शेतकरी आणि कामगारांना स्वातंत्र्य आणि संधी मिळवून देऊ शकू, आपण गरिबी हटवू शकू, आपण एक समृद्ध, लोकशाही आणि प्रगतीशील देश बनवू शकू. आपण अशा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संस्था कशा निर्माण करू शकतो ज्या प्रत्येक स्त्री-पुरुषासाठी जीवनाची परिपूर्णता आणि न्याय सुनिश्चित करू शकतील? जोपर्यंत तेथील लोकांचे विचार किंवा कृती संकुचित आहे तोपर्यंत कोणताही देश महान होऊ शकत नाही.
— ट्रिस्ट विथ डेस्टिनी भाषणातील काही भाग, जवाहरलाल नेहरू
इतिहास
इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते… १९ व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २० व्या शतकात महात्मा गांधी ह्यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व केले. १९२९ साली लाहोरच्या सत्रात काँग्रेसने ‘संपूर्ण स्वराज्या’ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी ही तारीख भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली काँग्रेसने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्यासाठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे मुख्य प्रवाहापासून वेगळे झाले व त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे… तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले…..
पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले… अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला…..
स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताची राज्यघटना तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता… प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत, तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले…..
भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये- कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते… भारताचे पंतप्रधान हे दरवर्षी भाषण देतात. या दिवशी लाल किल्ला येथे भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्यादिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तिपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.
२००२ पूर्वी सामान्य भारतीयाला फक्त स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची परवानगी देण्यात आली होती… २६ जानेवारी २००२ पासून यात बदल करण्यात आले. त्यानुसार कोणताही नागरिक कोणत्याही दिवशी ध्वज फडकवू शकतो.
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक …
१)१५ ऑगस्टला पंतप्रधान ध्वज फडकवतात तर २६ जानेवारीला राष्ट्रपती ध्वजारोहण करतात… यामागील कारण आपला देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपतिपद अस्तित्वातच आलेलं नव्हतं…..
२) १५ ऑगस्टला राष्ट्रीय ध्वज उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो… त्याला ध्वजारोहण म्हणतात तर, २६ जानेवारीला ध्वजाची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून ध्वज अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून ध्वज फडकवला जातो…..
३)१५ ऑगस्ट १९४७ ला इंग्रजांचा ध्वज (युनियन जॅक) खाली उतरला व भारताचा ध्वज वर चढवला… म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर २६ जानेवारी १९५० ला भारताचा ध्वज होताच पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून ध्वज बंद घडीत बांधून वर नेऊन दोरी ओढीत वरच्यावर गाठ सुटून ध्वज हवेत मोकळा केला जातो, म्हणून त्याला ध्वज फडकवणे म्हणतात…..
४) १५ ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर, २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर ध्वज फडकवला जातो… आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.
तिरंगा ध्वज फडकावण्याबाबत हे आहेत १० प्रमुख नियम
१. तिरंगा ध्वज हा लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा… झेंडा आयताकार असायला हवा. लांबी आणि रुंदीचे प्रमाण ३:२ असे असावे. केशरी रंग खालील बाजूस ठेवून झेंडा फडकवू नये…..
२. सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान तिरंगा फडकविता येतो. तिरंगा कधीही जमिनीवर ठेवता येत नाही… झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये. काही प्रसंगी सरकारी आदेश असल्याशिवाय सरकारी इमारतीवरील तिरंगा अर्ध्यावर आणण्यास मनाई आहे…..
३. तिरंगा कधीही पाण्यात बुडवू नये. झेंड्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये… तिरंग्याचा कोणताही भाग जळालेला असल्यास तसेच तिरंग्याबद्दल अवमानकारक टिपण्णी केल्यास तीन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात…..
४. तिरंग्याचा व्यावसायिक वापर करू नये. तिरंग्याचा गैरवापर कुणी करत असेल, तिरंगा वस्त्र म्हणून वापरत असेल किंवा मृतदेहाभोवती तिरंगा लपेटत असेल तर (शहीद जवान वगळून) तो तिरंग्याचा अपमान समजला जातो.
५. तिरंग्याचा गणवेश म्हणून वापर करू नये… जर एखादी व्यक्ती कमरेच्या खालील वस्त्रासाठी तिरंग्याचा कापड म्हणून वापर करत असेल, तर तो तिरंग्याचा अपमान आहे. तिरंग्याचा रुमाल किंवा उशीसाठीही वापर करता येणार नाही…..
६. तिरंग्यावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत… विशेष प्रसंगी किंवा राष्ट्रीय दिन जसे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकविण्यापूर्वी त्यात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास हरकत नाही…..
७. एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावरील टेबल झाकण्यासाठी किंवा मंचाची सजावट करण्यासाठी तिरंग्याचा वापर करू नये… गाडी, रेल्वे किंवा विमानाचे छत वा अन्य भाग झाकण्यासाठी तिरंग्याचा वापर करता येणार नाही. एखाद्या इमारतीत तिरंग्याचा पडदा लावण्यासही सक्त मनाई आहे…..
८. फडकविलेला तिरंगा त्याच स्थितीत कायम राहायला हवा. फाटलेला, मळलेला वा चुरगळलेला तिरंगा फडकवू नये… त्यावर योग्य पद्धतीने पुढील सोपस्कार करावे…..
९. तिरंगा एखाद्या मंचावर फडकवला असल्यास, वक्ता भाषण करत असताना तिरंगा त्याच्या उजवीकडे असणे आवश्यक आहे…..
१०. अन्य झेंडा किंवा पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा त्याच्यावर किंवा त्याच्याबरोबर लावू नये.
वंदे मातरम्’ चा मराठी अर्थ.
सध्या ‘वंदे मातरम्’ ची सोशल मिडीयावर चर्चा रंगत आहे! ही अर्थातच चांगली गोष्ट आहे, कारण वंदे मातरम हे आपलं ‘राष्ट्रीय गीत’ आहे पण सोशल मिडीयावर पोस्ट टाकणाऱ्या किती मंडळींना वंदे मातरम्चं एक तरी कडवी पाठ आहे ? निदान त्याचा अर्थ तरी माहित आहे का ? कडवी पाठ नसतील तर अर्थ तर लांबची गोष्ट आहे
इतिहास
१८७५ साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं हे गीत त्याकाळात स्वातंत्रासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्याचं काम करत होतं. त्यावेळी हे गीत इस्लाम विरोधी नव्हतं किंवा हिंदुत्ववादाचं प्रतिकही. सर्वजण् वंदे मातरम त्याच जोशात म्हणायचे. मूळ गीतात एकूण पाच कडवी आहेत, त्यातील पाहिलं कडवं १९५० साली आपण राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं.
चला तर जाणून घेऊ काय आहे आपल्या राष्ट्रीय गीताचा नेमका अर्थ :
मूळ वंदे मातरम् !
वन्दे मातरम्
सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
सस्यश्यामलाम् मातरम्।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम् ॥ १ ॥
वन्दे मातरम् ।
मराठी अर्थ
हे माते मी तुला प्रणाम करतो. पाण्याने परिपूर्ण, फळांनी बहरलेली, दक्षिणेच्या वायू लहरींनी शामल (शांत) भासणारी, बहरलेल्या पिकांनी समृद्ध अश्या माझ्या मातेला मी प्रणाम करतो. शुभ्र चांदण्यांमुळे बहरलेल्या इथल्या रात्री आल्हाददायक असतात. फुलांच्या राजींनी, वृक्षांनी मढवलेली इथली जमीन शोभून दिसते. पाण्याची अवीट गोडी, मधुर बोली, सुख समृद्धी देणारी हे माता, माझा तुला प्रणाम !