भक्ताच्या मदतीस धावून येणार महाराष्ट्राचा कुलदैवत जेजुरीचा खंडोबा (Khandoba Mandir Jejuri)

जेजुरी खंडोबा मंदिर पत्ता । खंडोबा मंदिर जेजुरी । Khandoba Mandir Jejuri । जेजुरी मंदिर । देवा खंडोबा विषयी अधिक माहिती । श्री खंडोबा ची पाच प्रतीके । जेजुरीला कसे जायचे ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

जेजुरी खंडोबा मंदिर पत्ता : श्री क्षेत्र मार्तंड देवस्थान जेजुरी ,श्री क्षेत्र जेजुरी ता .पुरंदर जिल्हा पुणे ४१२३०३

खंडोबा मंदिर जेजुरी (Khandoba Mandir Jejuri) (पुणे दर्शन) :

पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे हे देवस्थान आहे. जेजुरीचा खंडोबा हा महाराष्ट्राचे कुलदैवत आहे उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु आता जेजुरी या ठिकाणी नव्याने बांधलेले देऊळ आहे. तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे म्हणजे इ.स.१७१२ चे देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास आहे. औरंगजेबाने १,२५,००० चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले, असाही उल्लेख सापडतो.खंडोबा देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत. सुमारे 200 पाय-या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवलाख पायरीचा (९ लाख पाय-या) डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे.

सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन कालीन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. तलवार उंच धरून जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणा-या व्यक्तीला बक्षिस देण्याची पद्धत आहे. दस-याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते.तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.

जेजुरी मंदिर

खंडोबा मंदिर हे महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोतालच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोतालच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले.

निसर्गाच्या सन्निध्यात असलेल्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे ३०० मीटर उंच डोंगरावर व ५ किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.

गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी संतरता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.

मंदिर परिसर

जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला आहे. दुर्दैवाने शिखर-शिंगणापूर प्रमाणेच येथेही दाक्षिणात्य शैलीचे या वास्तूशी पूर्ण विशोभित शिखर नव्याने बांधण्यात आले आहे. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत.

देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे. यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करीत या भंडाऱ्यांची उधळण होते. तळी भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घ्यावयाचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावयाची व मग खोबऱ्याची उधळण करावयाची.मंदिरात चांदी-पितळेचे तीन मूर्ति-जोड होते. एक सोन्याचा जोड इ.स. १९४२ च्या सुमारास चोरीला गेला बाकी शिल्लक आहेत.

ऐतिहासिक महत्व

सह्याद्रीच्या डोंगर रांगा मध्ये घनदाट जंगलात असलेली ही लवमुनीची तपोभुमी दक्षिणे मध्ये मणि मल्ल राक्षसांचे छळाला कंटाळून विस्थापित झालेल्या ऋषीनी येथील लव आश्रमात आश्रय घेतला व मल्ल राक्षसांचे छळा पासून मुक्त करण्याची शंकरांना विनवणी केली.शंकरांनी या भूमीवर मार्तंड भैरव अवतार धारण केला. ही भुमी पवित्र झाली. मणि मल्ल वधा नंतर मार्तंडानी येथेच आपली राजधानी वसवली आणि ही भुमी जयाद्री म्हणून प्रसिद्ध पावली.

मार्तंड भैरवाचे अवतार कार्य संपले आणि अनंतकाळ लोटला कडेपठारी प्रस्थानपिठी मार्तंड भैरव मंदिरात नांदतच होते.येथेही राजधानी ठिकाणी मार्तंड भैरवाचे मंदिर उभे राहिले. मंदिरांचे व्यवस्थेसाठी दाने इनामे दिली गेली आणि जयाद्री ची जेजुरी नगरी वसली. लोकश्रद्धा भक्तीतून तिचे वैभव वाढत राहिले.येथे भक्तांनी मंदिराची अनेक कामे केली व भव्य मंदिर उभे राहिले. गडावरील मंदिराचे गर्भगृहाचे बाहेरील बाजूस असेलेल्या यक्ष मूर्ती खाली मात्र एक भक्त आपली नाम मुद्रा सोडून गेला ईस १२४६ चा हा येथील ज्ञात असलेला पहिला शिलालेख

गडाचे पूर्वेचा लोक वस्तीचा भाग जुनी जेजुरी म्हणून ओळखला जातो.पण पायरी मार्ग, कमानी यांचा विचारकरता येथील पायथ्याचे पहिल्या कमानीवर ईस १५११ चा शिलालेख आहे ईस १५११ मधेच चेंतन्य महाप्रभू नामक बंगाली संताने जेजुरीस भेट दिल्याचे वर्णन आहे या वर्णनात येथे मुरुळीची संख्या मोठी होती व महाप्रभूनी त्यांचे प्रबोधन केल्याचा उल्लेख आहे.एक बंगाली महापुरुष जेजुरीस भेट देतो यावरून याकाळी जेजुरी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होती हे निश्चीत.

प्रसिद्ध पावत असलेल्या या जेजुरीच (jejuri) महात्म्य शब्दबद्ध करण्याच काम याच काळात ईस १५४० च्या दरम्यान ज्ञानदेव या लेखकाने “जयाद्री महात्म्य ” या ग्रंथाचे माधमातून केले. ईस १६५१ चें दरम्यान जेजुरी मंदिराच्या पुजाऱ्या मध्ये वादविवाद सुरु झाले व ते जिजाऊ साहेबाकडे कडे निवाड्या साठी गेले जिजाऊनी निवाडा देऊन वाद मिटवले, पुढे ईस १६५३ मध्ये हाच निवाडा शिवाजी महाराजांनी कायम केला.

देवा खंडोबा विषयी अधिक माहिती

रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो. सोमवती अमावास्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आहे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतारदिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानूबाई यांचा विवाह झाला, अशी श्रद्धा आहे. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस असून, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबाभक्तांची श्रद्धा आहे.

खंडोबाच्या उपासनेत भंडारा (हळदीची पूड) फार महत्वाची आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो.

तळी भरणे म्हणजे एका ताह्मणात विड्याची पाने, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताह्मण “सदानंदाचा येळकोट’ किंवा “येळकोट येळकोट जय मल्हार’ असे मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलतात, नंतर दिवटी-बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो.

खंडोबाला नवस बोलणे व फेडणे याला महत्त्व आहे. दीपमाळा बांधणे. मंदिर बांधणे किंवा जीर्णोद्धार करणे. पायर्‍या बांधणे, ओवरी बांधणे. देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजे ठरावीक दिवशी देवदर्शनास जाणे. पाण्याच्या कावडी घालणे. उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतीकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या-मुरळीकडून देवाची गाणी म्हणवणे, यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. देवाची गदा म्हणजे वारी मागणे. तळी भरणे, उचलणे, दही-भाताची पूजा देवास बांधणे. पुरण-वरण व रोडग्याचा नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या-मुरळी यांना भोजन घालणे. कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे-भंडारा उधळणे

श्री खंडोबा ची पाच प्रतीके :

लिंग : हे स्वयंभू, अचल अगर घडीव असते.

तांदळा : ही एक प्रकारची चल शिळा असून, टोकाखाली निमुळती होत जाते.

मुखवटे : हे कापडी किंवा पिटली असतात.

मूर्ती : या उभ्या, बैठ्या, घोड्यावर. तर काही धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात.

टाक : घरात पूजेसाठी सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा.

खंडेरायाच्या जेजुरीत दरवर्षीप्रमाणे पारंपारिक पद्धतीने ‘मर्दानी दसऱ्याचे’ आयोजन करण्यात येते. तब्बल 15 तासांपेक्षाही जास्त काळ हा सोहळा चालतो. जवळजवळ 42 किलोंची तलवार एका हातात जास्तीत जास्त वेळ तोलून धरण्याची आणि दातात उचलून मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धा या ठिकाणी रंगते.

जेजुरीला कसे जायचे?

जेजुरी पुण्यापासून सुमारे ४८ किलोमीटर आणि सोलापूरपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर आहे.

रस्त्याने: पुण्याहून आणि महाराष्ट्रातील इतर अनेक मोठ्या शहरांमधून जेजुरीपर्यंत अनेक बससेवा उपलब्ध आहेत.

रेल्वेमार्गे: जेजुरी रेल्वे स्थानक हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे जिथून अनेक लोकल ट्रेन पुणे आणि महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांमधून धावतात.

मंदिराचा दैनंदिन दिनक्रम

मंदिर उघडण्याची वेळ सकाळी ०५. ००

सकाळी ०५. ०० ते ०६. ३० आरती अभिषेक

दुपारी १२.३० ते ०१. ३० अभिषेक

दुपारी ०१. ३० ते ०२. ३० नंतर नैवेद्य व महाप्रसाद वाटप

रात्री ०९. ०० वाजता शेजारती अभिषेक आणि नंतर मंदिर बंद होते

पुण्याचे प्रसिद्ध असे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )