कमरख लागवड |Kamrakh Lagwad | Kamrakh Sheti | कमरख पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।कमरख लागवडी खालील क्षेत्र । कमरख पिक उत्पादन ।कमरख पिकासाठी योग्य हवामान । कमरख पिकासाठी योग्य जमीन ।कमरखच्या सुधारित जाती ।कमरखाची अभिवृद्धी । कमरखाची लागवड ।कमरख पिकास योग्य हंगाम । कमरख पिकास योग्य लागवडीचे अंतर । कमरख पिकास वळण । कमरख पिकास छाटणी ।कमरख पिकास खत व्यवस्थापन । कमरख पिकास पाणी व्यवस्थापन ।कमरख पिकातील आंतरपिके । कमरख पिकातील आंतरमशागत । कमरख पिकातील तणनियंत्रण |कमरख पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।कमरख पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण ।कमरखच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
कमरख लागवड |Kamrakh Lagwad | Kamrakh Sheti |
कमरख हे फळ करंबोला तसेच स्टार अॅपल या नावाने ओळखले जाते. यात गोड आणि आंबट असे दोन प्रकार आहेत. या फळझाडाची लागवड कमी प्रमाणात असली तरी महाराष्ट्रातील काही भागात विशेष करून कोकण किनारपट्टीत या फळझाडाच्या लागवडीस चांगली संधी आहे.
कमरख पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।
कमरखचे मूळस्थान मलेशिया हे आहे. कमरख फळाच्या गोड प्रकाराची फळे सरबत, रस म्हणून वापरतात; तर आंबट प्रकारची फळे चिंचेऐवजी चटणीमध्ये वापरतात. कमरखमध्ये पुढील घटकद्रव्ये आढळतात.
अन्नघटक | गोड प्रकार | आंबट प्रकार |
पाणी | 90% | 90% |
शर्करा | 11% | 3.5% |
ब्रिक्स | 13 | 5 |
सामू | 5.0 | 2.5 |
रसाचे प्रमाण | 60% | 75% |
ऑक्झॅलिक अॅसिड | 0.04 | 0.07 |
कमरख फळे, जॅम, जेली, व लोणची तयार करण्यासाठीही वापरतात.
भौगोलिक विस्तार : कमरखची लागवड मलेशिया, सिंगापूर, तैवान, हवाई, फ्लोरिडा, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांत होते. भारतात कर्नाटक, केरळ भागात तुरळक लागवड आहे.
कमरख लागवडी खालील क्षेत्र । कमरख पिक उत्पादन ।
कमरखची लागवड अगदीच नगण्य असल्याने क्षेत्र आणि उत्पादनाच्या बाबतीत निश्चित माहिती उपलब्ध नाही.
कमरख पिकासाठी योग्य हवामान । कमरख पिकासाठी योग्य जमीन ।
कमरखच्या लागवडीसाठी समशीतोष्ण हवामान आणि निचरा होणारी जमीन योग्य असते.
कमरखच्या सुधारित जाती ।
कमरख फळांच्या स्टार किंग, थाई नाईट, व्हीलर, लुथो, जायंट सियाम, जंगल गोल्ड, इत्यादी जाती आपल्या देशात लागवडीखाली आहेत.
कमरखाची अभिवृद्धी । कमरखाची लागवड ।
कमरखाची अभिवृद्धी बियांपासून रोपे, भेट कलमे, गुटी कलमे या पद्धतींनी केली जाते. लागवडीसाठी पावसाळ्यापूर्वी 60 X 60 X 60 सेंमी. आकाराचे खड्डे खणून खतमातीने भरून घ्यावेत. अधिक पाऊस पडणाऱ्या भागात ऑक्टोबरमध्ये लागवड करावी; तर कमी पाऊस पडणाऱ्या भागात जून महिन्यात लागवड करावी.
कमरख पिकास योग्य हंगाम । कमरख पिकास योग्य लागवडीचे अंतर ।
कमरखच्या निवडक रोपांची अथवा कलमांची पावसाळ्यापूर्वी अथवा पावसाळ्यानंतर 7 X 7 मीटर किंवा 6X6 मीटर अंतरावर लागवड करावी. हेक्टरी झाडांची संख्या सरासरीने 280 एवढी ठेवावी.
कमरख पिकास वळण । कमरख पिकास छाटणी ।
झाडाची एका खोडावर आणि 1 मीटर खोड सरळ वाढवून वाढ करून घ्यावी. झाडांना डेरेदार वळण द्यावे. फुले येण्यासाठी छाटणी करण्याची गरज नाही.
कमरख पिकास खत व्यवस्थापन । कमरख पिकास पाणी व्यवस्थापन ।
कमरखसाठी पुढीलप्रमाणे प्रतिझाड खते देण्याची शिफारस आहे.
खते देण्याची वेळ | सेंद्रिय खत | नत्र, स्फुरद, पालाश / किलो |
एप्रिल | 25 | 1 |
जून | — | 4 |
सप्टेंबर | 25 | 1 |
जानेवारी | — | 4 |
कमरखाच्या झाडास, पावसाळयाखेरीज इतर हंगामात दर आठवड्यास पाणी द्यावे.
कमरख पिकातील आंतरपिके । कमरख पिकातील आंतरमशागत । कमरख पिकातील तणनियंत्रण |
लागवडीनंतर पहिली 5 वर्षे आंतरपिके घ्यावीत. त्यासाठी भाजीपाल्याची पिके योग्य ठरतात. त्यानंतर वर्षातून 2-3 वेळा आंतरमशागत करून आच्छादन करावे; म्हणजे पाण्याची गरज कमी होते व तणांचे नियंत्रण होते.
कमरख पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।
कमरखाच्या फळावर फळ पोखरणारी अळी, फळमाशी यांचा उपद्रव होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे कीटकनाशकांची फवारणी करावी.
कमरख पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण ।
कमरख फळझाडावर सर्कोस्पोरा, करपा आणि फळकूज या रोगांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे बुरशीनाशके फवारावीत..
कमरखच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।
फळे तयार होण्याचा कालावधी जानेवारी-फेब्रुवारी आणि सप्टेंबर-ऑक्टोबर असा वर्षातून दोन वेळा असतो. झाडावर तयार झालेली फळे अलगद काढावीत. फळे व्यवस्थित हाताळावीत. दोन बहारांचे मिळून एका झाडावर 100 किलो फळांचे उत्पादन मिळते.
सारांश ।
करंबोला अर्थात कमरख हे वर्षातून 2 वेळा फळे देणारे आकर्षक वाढणारे फळ झाड आहे. कमरख फळात दोन प्रकार आहेत. एक गोड व दुसरे आंबट फळांचे. महाराष्ट्रात कमरख लागवडीस आणि त्यापासून रस आणि लोणचे बनविण्यास चांगला वाव आहे. कमरखाची लागवड रोपे अगर कलमे वापरून 6 ते 8 हम चौरस मीटर अंतरावर केली जाते. पूर्ण वाढीच्या एका झाडापासून दोन बहारांची मिळून दरवर्षी 100 किलो फळे मिळतात.