जाणून घ्या कर्दळी लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Kardali flower Lagwad Mahiti Kardali Sheti) – Kardali Farming

कर्दळी लागवड । Kardali Lagwad | Kardali Sheti | कर्दळ लागवडीचे महत्त्व । कर्दळ लागवडी खालील क्षेत्र । कर्दळ पिकाचे उत्पादन । कर्दळी लागवड । Kardali Lagwad | Kardali Sheti | कर्दळ फुलास योग्य हवामान । कर्दळ फुलास योग्य जमीन । कर्दळ पिकाच्या उन्नत जाती । कर्दळ पिकाच्या फुलांच्या मिश्रित रंगावरून जाती । कर्दळ पिकाची अभिवृद्धी । कर्दळ पिकाची लागवड पद्धती ।कर्दळ पिकास योग्य हंगाम । कर्दळ पिकास योग्य लागवडीचे अंतर ।कर्दळ पिकास वळण । कर्दळ पिकास छाटणीच्या पद्धती । कर्दळ पिकास खत व्यवस्थापन । कर्दळ पिकास पाणी व्यवस्थापन । कर्दळ पिकावरील महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण । कर्दळ फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । कर्दळीच्या कंदांची काढणी आणि साठवण ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

कर्दळी लागवड । Kardali Lagwad | Kardali Sheti |

आपल्याकडे व्यापारी तत्त्वावर कर्दळीची लागवड फारशी केली जात नाही. कर्दळीच्या झाडाला वर्षभर फुले येतात. मात्र फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य 1-2 दिवसांचे असते. कोलकाता येथील अँग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीद्वारे कर्दळीच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले आहे. त्यांनी कर्दळीच्या विविध संकरित जाती आणि प्रकार विकसित केले आहेत. असे असले तरी आपल्याकडे मात्र कर्दळीचा वापर शोभिवंत फुलझाड म्हणूनच मोठ्या प्रमाणात होतो. जगभर कर्दळीच्या सुमारे 50 प्रजाती उपलब्ध आहेत. कर्दळीची फुले आकर्षक आणि पांढरी, लाल भडक, लाल, नारिंगी, पिवळी, गुलाबी तसेच दोन किंवा जास्त रंगांची छटा असलेली असतात. कर्दळीच्या काही जातींची पाने ही विविध रंगांची आणि शोभिवंत असतात. त्यामुळेच कर्दळीचे स्थान उद्यानांमध्ये अटळ आहे.

कर्दळ लागवडीचे महत्त्व । Importance of Kardal cultivation.

आपल्याकडे कर्दळीच्या झाडाचे धार्मिक महत्त्व आहे. अनेक ठिकाणी कर्दळीच्या फुलापेक्षा खोडाचा किंवा झाडाचा उपयोग पूजेसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. विविध रंगी आणि आकर्षक फुलांमुळे कर्दळीची लागवड सार्वजनिक उद्यानात मोठ्या प्रमाणात केली जाते. कर्दळीला वर्षभर फुले येतात. कर्दळीचे पीक कणखर असून रोग आणि किडींचा प्रादुर्भावही या पिकावर अतिशय कमी प्रमाणात होतो.

अनुक्रम दाखवा

कर्दळ लागवडी खालील क्षेत्र । कर्दळ पिकाचे उत्पादन । Area under Kardal cultivation. Production of cardamom crop.

कर्दळीच्या पिकाचे उगमस्थान अमेरिका आणि आशिया खंडात समजले जाते. या पिकाची व्यापारी लागवड केली जात नसल्यामुळे त्याच्या लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनाबाबत निति आकडेवारी उपलब्ध नाही.

कर्दळ फुलास योग्य हवामान । कर्दळ फुलास योग्य जमीन । Suitable climate for Kardal flower. Land suitable for kardal flower.

कर्दळीच्या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. मध्यम ते हलक्या जमिनीत कर्दळीचे फुलपीक चांगले वाढते. मात्र अतिभारी जमिनी कर्दळीच्या लागवडीसाठी योग्य नसतात. खत आणि पाण्याचा योग्य पुरवठा केल्यास कर्दळीची वाढ हलक्या जमिनीतही चांगली होते. जमीन आणि हवामानाच्या बाबतीत कर्दळीचे पीक कणखर आहे. मात्र वातावरणात आर्द्रता आणि भरपूर सूर्यप्रकाश असणे आवश्यक आहे. थंड धुक्यामुळे कर्दळीच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो; कर्दळीची पाने खराब होतात.

कर्दळ पिकाच्या उन्नत जाती । Improved varieties of Kardal crop.

कर्दळीच्या विविध प्रजाती उपलब्ध आहेत. त्यांपैकी 3 प्रजातींची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते.

कॅना इंडिका :

या प्रजातीचे कंद जाड असतात. खोड हिरव्या रंगाचे आणि बारीक असते. झाडे 1 ते 1.2 मीटर उंच वाढतात. फुले फिकट गुलाबी रंगाची असतात.

कॅना फ्लॅसीडा :

या प्रजातीचे खोड बारीक असते. झाड 1.2 ते 2 मीटर उंच वाढते. फुले फिकट पिवळया रंगाची असतात.

कॅना ल्युटीया :

या प्रजातीची झाडे 1 ते 1.2 मीटर उंच वाढतात. फुले फिकट पिवळया रंगाची असतात. निदलपुंज हिरव्या रंगाचे असून त्यांच्या कडा पांढऱ्या असतात.

भारतामध्ये 1890 मध्ये कोलकाता येथील अॅग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटीत कर्दळीच्या विविध प्रजातींचा परस्परांशी संकर करून नवीन जाती विकसित करण्याचे काम सुरू झाले. त्यानंतरच्या 45 वर्षांत त्यांनी कर्दळीच्या अनेक संकरित जाती निर्माण केल्या आहेत.

झाडांच्या आकारानुसार आणि फुलांच्या रंगानुसार या जातींचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात.

उंच जाती :

उंच प्रकारातील जातींची झाडे 1 ते 1.5 मीटर उंच वाढतात. उद्याने आणि मोठ्या प्रमाणावरील वाफ्यातील लागवडीसाठी प्रामुख्याने उंच जाती निवडतात. उंच जातींचे फुलांच्या रंगानुसार पुढील पाच प्रकार पडतात.

लाल रंगाच्या जाती:

उदाहरणार्थ, दि प्रेसिडेंट, दि अॅम्बेसिडर, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, कारमीन किंग.

केशरी रंगाच्या जाती :

अमेरिकन ब्युटी, कॉपर जायंट, सन सेट कोल..

गुलाबी रंगाच्या जाती :

अलिपूर ब्युटी, कैंडी, लाब्रा, अॅप्रिकॉट किंग, डोरीस, प्रिन्स ऑफ वेल्थ.

कर्दळ पिकाच्या पिवळ्या रंगाच्या जाती :

मास्टर पीस, इंकन ट्रेस, बटर कप, अरोरा, बोरिॲलीस.

कर्दळ पिकाच्या पांढऱ्या रंगाच्या जाती :

व्हाईट क्वीन आणि रेडिओ.

कर्दळ पिकाच्या बुटक्या जाती :

या प्रकारातील जाती उंचीने कमी म्हणजे 0.5 ते 1.0 मीटर उंच वाढतात. काही जातींची उंची केवळ 30 सेंमी. असते.

फुलांच्या रंगानुसार ठेंगू जातींचे पुढील तीन प्रकार पडतात.

कर्दळ पिकाच्या नारिंगी रंगाच्या जाती :

ऑरेंज ग्लोरी, ऑरेंज ब्लूम, फेअर्ली, क्लिओपात्रा.

कर्दळ पिकाच्या गुलाबी रंगाच्या जाती :

हंगेरियन, डिपार्किंग डे.

पिवळया रंगाच्या जाती :

अॅप्रिकॉट, स्टार डस्ट.

कर्दळ पिकाच्या फुलांच्या मिश्रित रंगावरून जाती : Varieties based on mixed color of flowers of Kardal crop:

ह्या प्रकारातील जातींची फुले दोन किंवा जास्त रंगांच्या मिश्र छटा असलेली असतात. तसेच त्यांचे रंगानुसार आणि मिश्रणानुसार तीन प्रकार पडतात.

पिवळ्या ठिपक्यांच्या लाल रंगाच्या जाती :

उदाहरणार्थ, मिकॅडो, यलो किंग, हंबर्ट, पारसी लॅकॅस्टर, ग्लॅडिएटर, मिसेस लॅकॅस्टर.

पिवळसर केशरी कडांच्या गर्द केशरी जाती :

उदाहरणार्थ, रोसामुंडी कोलस

पिवळया कडांच्या लाल जाती :

उदाहरणार्थ, क्वीन चारोलेट.

आकर्षक पानांच्या जाती :

ह्या जातींच्या पानांना आकर्षक रंगीबेरंगी छटा असतात. उदाहरणार्थ, ब्लॅक नाईट, लाग्लोब, किंग हंबर्ट, ट्रिनाक्रिया, व्हेरिगेटा.

कर्दळीच्या विविध जाती पुढीलप्रमाणे आहेत.

जातवर्णन
अमेरिकन ब्युटीकेशरी रंगाची फुले
अँप्रिकॉटपिवळी फुले, पाकळयांच्या बुडाला गुलाबी रंगछटा
अॅसॉल्टऑर्किडसारखी दिसणारी लालसर रंगाची फुले
अरोरा बोरिॲलीसपिवळसर रंगाची फुले, पाकळयांच्या मध्यभागी गुलाबी रंग पसरलेला
कारमीन किंगआकर्षक लाल रंगाची फुले, पाकळ्यांच्या मध्यभागी पिवळा रंग.
क्लिओपात्राकेशरी रंगाची फुले, फिकट जांभळया रंगाची पाने.
डॅझलरऑर्किडसारखी दिसणारी लाल रंगाची फुले, पाने तपकिरी रंगाची.
डोरीसआकर्षक फिकट गुलाबी रंगाची फुले.
गोल्डन वेडिंगबुटकी झाडे, पिवळ्या रंगाची, जास्त काळ टिकणारी फुले
रोझिया जीर्जेंटियाअतिशय मोठ्या आकाराची गुलाबी रंगाची फुले
ऑरेंज परफेक्शनबुटकी झाडे, केशरी रंगाची फुले.
कर्दळीच्या विविध जाती पुढीलप्रमाणे आहेत.

कर्दळ पिकाची अभिवृद्धी । कर्दळ पिकाची लागवड पद्धती । Increase of Kardal crop. Cultivation method of Kardal crop.

कर्दळीची अभिवृद्धी न्हायझोम कंदापासून करतात. संकरित जाती निर्माण करण्यासाठी बियांपासून अभिवृद्धी केली जाते. कर्दळीच्या बियांचे आवरण टणक आणि कठीण असते. त्यामुळे बियांची रुजवण होण्यास जास्त काळ लागतो. बियांना उष्ण, जलप्रक्रिया केल्यानंतर किंवा बिया सँड पेपरवर घासल्यास त्यांची उगवण लवकर होते. कर्दळीचे कंद पावसाळयात जमिनीत राहिल्यास कुजत नाहीत. त्यामुळे लागवडीच्या वेळीच कंद जमिनीतून काढून लागवडीसाठी वापरावेत. लागवडीपूर्वी कंद 0.1 ते 0.2% कॅप्टान किंवा बेनोमिल या बुरशीनाशकामध्ये बुडवून लावल्यास बुरशीजन्य रोग होत नाहीत.
कर्दळीच्या लागवडीसाठी चांगली खोल नांगरट करावी. ढेकळे फोडून घ्यावीत आणि 10 x 10 मीटर आकाराचे वाफे तयार करावेत. प्रत्येक वाफ्यामध्ये 100 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. वाफ्यांमध्ये हायझोम कंदांची लागवड जून-जुलै महिन्यांत करावी.

कर्दळ पिकास योग्य हंगाम । कर्दळ पिकास योग्य लागवडीचे अंतर । Suitable season for Kardal crop. Suitable planting distance for Kardal crop.

कर्दळीचे कंद सर्वसाधारणपणे एप्रिल-मे महिन्यांत गोळा करून पावसाळयाच्या सुरुवातीला लगेचच त्यांची लागवड करावी. त्यामुळे हिवाळ्यापूर्वीच भरपूर मुळे फुटून जाड खोड तयार होते. हायझोम कंदाची लागवड वाफ्यामध्ये 30-40 सेंमी. x 30-40 सेंमी. किंवा 60 x 60 सेंमी. अंतरावर करावी. हायझोम कंद 4-5 सेंमी. खोल लावावेत आणि नंतर वाफ्यांना पाणी द्यावे.

कर्दळ पिकास वळण । कर्दळ पिकास छाटणीच्या पद्धती । Turn to Kardal crop. Pruning methods of Kardal crop.

कर्दळीच्या झाडाला वळण देण्याची आवश्यकता नसते. मात्र हायझोम कंदाच्या लागवडीनंतर 6-8 आठवड्यांनी पहिला फुलदांडा बाहेर पडतो. हा फुलदांडा काढून टाकावा. त्यामुळे झाडाची पुढची वाढ जोमाने होते. वाफ्यामध्ये वाढलेले तण काढून टाकावे. सुकलेली पाने तसेच फुले काढून टाकावीत.

कर्दळ पिकास खत व्यवस्थापन । कर्दळ पिकास पाणी व्यवस्थापन । Manure Management of Kardal Crop. Water Management for Kardal Crop.

पावसाळा संपल्यानंतर झाडाभोवती चाळणी करून उघड्या पडलेल्या कंदांना भर द्यावी. नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्यांत झाडाभोवतीच्या मातीमध्ये शेणखत मिसळून द्यावे.

कर्दळीच्या पिकाला 40 ग्रॅम नत्र, 20 ग्रॅम स्फुरद आणि 20 ग्रॅम पालाश प्रति चौरस मीटर या प्रमाणात खते द्यावीत. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशाची संपूर्ण मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. उरलेली नत्राची मात्रा पहिल्या खुरपणीच्या वेळी द्यावी. हिवाळयात कर्दळीच्या वाफ्यांना महिन्यातून किमान 1 ते 2 वेळा पाणी द्यावे. उन्हाळयात आवश्यकतेनुसार 3-4 दिवसांनी पाणी द्यावे.

कर्दळ पिकावरील महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण । Important pests, diseases and their control of Kardal crop.

कणखर फुलपीक असून या फुलपिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. पावसाळयात पाने आणि फुले खाणाऱ्या अळयांच्या आणि भुंग्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे फुलांचे नुकसान होते. या किडींच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 15 मिली. मॅलॅथिऑन मिसळून फवारणी करावी.

कर्दळ फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । Harvesting, production and sale of Kardal flowers.

कर्दळीची फुले प्रामुख्याने शोभेसाठी झाडावरच राहू दिली जातात. काढणीनंतर एक किंवा दोन दिवसच ही फुले टिकतात. कर्दळीला सर्वसाधारणपणे वर्षातून दोन वेळा फुले येतात. पहिला हंगाम सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यांत आणि दुसरा हंगाम फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यांत असतो.

कर्दळीच्या कंदांची काढणी आणि साठवण । Harvesting and storage of Kardal tubers.

कर्दळीच्या झाडाला फुले येऊन गेल्यानंतर पाने सुकू लागतात. या वेळी जमिनीतील कंद खणून काढावेत. कंदावरील माती काढून कंद स्वच्छ करावेत. कंदावरील 15 सेंमी. इतके खोड ठेवून बाकीचे खोड कापून काढावे. कंदाच्या गठ्ठयातील कंद वेगळे करावेत. त्यातील निरोगी कंद सावलीमध्ये आठवडाभर ठेवावेत. हे कंद नंतर लगेचच पावसाळयापूर्वी लागवडीसाठी वापरावेत.

सारांश ।

कर्दळीची लागवड प्रामुख्याने उद्यानात शोभेसाठी केली जाते. कर्दळीच्या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. कर्दळीच्या विविध जाती आणि प्रजाती उपलब्ध आहेत. कर्दळीची अभिवृद्धी न्हायझोम कंदापासून केली जाते. संकरित जाती निर्माण करण्यासाठी बियांपासून अभिवृद्धी केली जाते. कर्दळीच्या लागवडीसाठी 10 x 10 मीटर आकाराचे वाफे तयार करून त्यात 30-40 सेंमी. x 30-40 सेंमी. किंवा 60 x 60 सेंमी. अंतरावर हायझोम कंदाची 4-5 सेंमी. खोलीवर लागवड करावी.
कर्दळीच्या लागवडीनंतर 6-8 आठवड्यांनी पहिला फुलदांडा बाहेर पडतो. हा फुलदांडा छाटून टाकावा. त्यामुळे झाडाची पुढची वाढ जोमाने होते. कर्दळीचे झाड कणखर असून त्यावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणात होतो. मात्र पाने आणि फुले खाणाऱ्या अळयांचे आणि भुंग्यांचे योग्य वेळी नियंत्रण करावे.

जाणून घ्या कण्हेर लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Kanher Lagwad Mahiti Kanher Sheti) – Kanher Farming

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )