जाणून घ्या खरबूज लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Kharbuj Lagwad Mahiti Kharbuj Sheti) – Kharbuj Farming

खरबूज लागवड । Kharbuj Lagwad । Kharbuj Sheti । खरबूज उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । खरबूज पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन । खरबूज पिकास योग्य हवामान । खरबूज पिकास योग्य जमीन । खरबूज पिकाच्या सुधारित जाती । खरबूज पिक अभिवृद्धी । खरबूज पिक लागवड पद्धती । खरबूज पिकास हंगाम । खरबूज पिकास लागवडीचे अंतर । खरबूज पिकास वळण । खरबूज पिक छाटणी । खरबूज पिक खत व्यवस्थापन । खरबूज पिक पाणी व्यवस्थापन । खरबूज आंतरपिके, आंतरमशागत आणि तणनियंत्रण । खरबूज पिकाच्या महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । खरबूज पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । खरबूज पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

खरबूज लागवड : Kharbuj Lagwad : Kharbuj Sheti :

खरबूज हे कमी दिवसांत, कमी पाण्यात आणि कमी कष्टांत येणारे वेलवर्गीय फळ आहे. पावसाळा संपल्यानंतर, हलक्या वाळूयुक्त जमिनीत, नदीपात्रात या फळपिकाची लागवड केली जाते. या फळांना शहरातून मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. खरबुजाच्या फळात पाचक, रुचकर आणि औषधी गुणधर्म आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांत हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. महाराष्ट्रात, तापी, पांझरा, मांजरा, गिरणा या नद्यांच्या पात्रात आणि आजूबाजूस या पिकाची मोठी लागवड होते.

खरबूज उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार :

उगमस्थान :

खरबुजाचे मूळस्थान दक्षिण सहारा वाळवंट हे मानले जाते. महत्त्व – पिकलेले फळ रुचकर, पाचक असते. पक्व फळाच्या गरात दर 100 ग्रॅममध्ये खालील अन्नघटक असतात.

अन्नघटकप्रमाण (%)अन्नघटकप्रमाण (%)
पाणी95चूना0.03
शर्करा3.5स्फुरद0.01
प्रथिने0.3लोह0.001
स्निग्धांश0.2जीवनसत्त्व ‘क’0.03
तंतुमय पदार्थ0.4रिबोफ्लेवीन0.008
खनिजे0.4उष्माक17 कॅलरीज
खरबुजाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण
भौगोलिक विस्तार :

खरबुजाची लागवड उष्ण हवामानात होते. वाळवंटी प्रदेशात आणि कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात तसेच कोरड्या हवामानात हे पीक चांगले येते. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या भागात खरबुजाची लागवड होते. अलीकडे महाराष्ट्रातील सोलापूर, उस्मानाबाद आणि सांगली या भागातही खरबुजाचे पीक घेतले जाते. उत्तर कोकण किनारपट्टी आणि नाशिक भागातही या पिकाची लागवड वाढत आहे.

खरबूज पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन :

खरबुजाच्या पिकाखालील निश्चित असे क्षेत्र उपलब्ध नाही. तथापि, महाराष्ट्रात फळांचे व्यापारी उत्पादन भाग 1 पाठपुस्तिका 2 73
दरवर्षी 50 हजार हेक्टर क्षेत्रावर खरबूज लागवड होते असा अंदाज आहे. खरबुजाचे सरासरी हेक्टरी उत्पादन 15 ते 20 टन आणि अधिकमत उत्पादन हेक्टरी 35 ते 40 टन येते.

खरबूज पिकास योग्य हवामान आणि खरबूज पिकास योग्य जमीन :

या पिकास उष्ण व कोरडे हवामान मानवते. थंड अथवा दमट हवामानात या पिकाची चांगली वाढ होत नाही व गुणवत्ताही कमी असते. खरबुजासाठी हलकी, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. क्षारयुक्त, दलदलीची जमीन या पिकास मानवत नाही. नदीपात्रातील वाळूची, नदीकाठची पोयट्याची जमीन खरबुजाच्या लागवडीसाठी उत्तम समजली जाते.

खरबूज पिकाच्या सुधारित जाती :

1) अर्का राजहंस, 2) अर्का जीत, 3) पुसा शरबती, 4) हरामधु, 5) सोना, 6) गीता, 7) सावित्री, 8) दिप्ती, इत्यादी.

खरबूज पिक अभिवृद्धी आणि खरबूज पिक लागवड पद्धती :

खरबुजाची लागवड बिया टोकून केली जाते. हेक्टरी 1 ते 2 किलो बी पुरेसे होते. खरबुजाची लागवड रुंद वरंब्यावर अथवा उभट साऱ्यावर मध्ये पाट पाडून केली जाते. बांगडी पद्धतीने आळी करूनही खरबुजाची लागवड करता येते.

खरबूज पिकास हंगाम आणि खरबूज पिकास लागवडीचे अंतर :

खरबूज लागवड हिवाळा संपत येताच म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करतात. लागवड 2 मीटर x 0.5 मीटर या अंतरावर करावी.

खरबूज पिकास वळण आणि खरबूज पिक छाटणी :

खरबुजाच्या वेलीवर 50 टक्के फळधारणा झाल्यास वाढते शेंडे खुडावेत म्हणजे फळे वाढण्यास आणि लवकर तयार होण्यास मदत होते. यास ‘पिंचिंग’ असे म्हणतात.

खरबूज पिक खत व्यवस्थापन आणि खरबूज पिक पाणी व्यवस्थापन :

या पिकास सेंद्रिय खत तसेच रासायनिक खतांचा वापर हे दोन्ही चांगले मानवतात. अर्धवट कुजलेले सेंद्रिय खत त्यासाठी वापरू नये. लागवडीपूर्वी दर हेक्टरी बायोमील 1.5 ते 2 टन, आणि फुले लागताना 19:19:19 हे खत हेक्टरी 250 ते 300 किलो या प्रमाणात घालावे. खरबुजाच्या पिकास 6 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. खरबुजाच्या वेलीजवळ पाणी साचू देऊ नये; तसेच खोडास पाणी लागू देऊ नये.

खरबूज आंतरपिके, आंतरमशागत आणि तणनियंत्रण :

खरबुजामध्ये सुरुवातीच्या महिनाभरात तयार होणारे मेथी अथवा करडई भाजी म्हणून घ्यावी. एक दोन खुरपण्या करून खोडाजवळ माती मोकळी करावी, तसेच तणे काढून टाकावीत.

खरबूज पिकाच्या महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :

नागअळी :

ही कीड खरबुजाची पाने पोखरून नुकसान करते. त्यामुळे फळे लागण्यास उशीर होतो.
या किडीच्या नियंत्रणासाठी मॅलेथिऑन (50%) फवारणी करावी.

लालभुंगेरे :

ही कीड खरबुजाची पाने व फुले कुरतडून खाते. या किडीच्या नियंत्रणासाठी एन्डोसल्फान 80% प्रवाही 10 मिली. 10 लीटर पाण्यात घेऊन फवारावे.

फळमाशी :

ही कीड फळात अंडी घालून फळ नासवते.
या किडीच्या नियंत्रणासाठी कार्बारिल या कीटकनाशकाची फवारणी करावी.

खरबूज पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :

मर :

या रोगामुळे खरबुजाच्या वेलीचे खोड व मूळ कुजते.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी जमिनीचा निचरा सुधारावा, ट्रायकोडर्मा वापरावे.

भुरी :

या रोगामुळे खरबुजाच्या पानांवर राखाडी भुकटी पसरते.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी कॅलिक्झीन या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करावी.

केवडा :

या रोगामुळे खरबुजाची पाने केवडतात व गळून पडतात.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी ॲलिएट या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

करपा :

या रोगामुळे खरबुजाची पाने करपतात.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी वेलीवर बावीस्टीन फवारावे.

खरबूज पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री :

खरबुजाचे पक्व फळ वेलीवरून थोड्या देठासह कापून घ्यावे. फळ काढणीयोग्य
असल्याचे पुढील लक्षणांवरून ओळखावे :

1) फळाचा बाह्य रंग बदलतो, 2) फळ देठापासून मोकळे सैल होते, 3) फळास एक विशिष्ट प्रकारचा गंध सुटतो, 4) खरबुजाची फळे लागवडीपासून 80 ते 120 दिवसांत तयार होतात. हेक्टरी सरासरी उत्पादन 15-20 टन तर अधिकतम उत्पादन 35-40 टन येते. काढलेली फळे सावलीत ठेवावीत. आदळ-आपट न करता करंड्यांतून विक्रीसाठी पाठवावीत.

सारांश :

खरबूज हे वेलवर्गीय फळपीक असून उष्ण व कोरड्या हवामानात चांगले उत्पादन देते. या पिकास वाळूसर, उत्तम निचऱ्याची जमीन मानवते. हे पीक सेंद्रिय आणि नत्र- स्फुरद-पालाशयुक्त खतास चांगला प्रतिसाद देते. खरबुजाची लागवड बी टोकून करतात. खरबुजाची फळे लागवडीपासून 80 ते 120 दिवसांत तयार होतात. फळे रुचकर, स्वादयुक्त असतात. फळे उन्हाळयात तयार होतात. खरबुजाचे हेक्टरी 15-20 टन सरासरी उत्पादन मिळते. खरबुजाच्या काही जातींत चांगली निगा राखल्यास हेक्टरी 30-35 टनांपर्यंत उत्पादन मिळते. महाराष्ट्रात नदीपात्रात आणि नदीकाठी खरबुजाची लागवड होते. अलीकडे खरबुजाची हलक्या आणि मध्यम जमिनीतही यशस्वी लागवड होऊ लागली आहे.

जाणून घ्या जांभूळ लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Jambhul Lagwad Mahiti Jambhul Sheti) – Jambhul Farming

Recent Post

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )