महाराणी सईबाई शिवाजी भोसले : Maharani Saibai Shivaji Bhosale । कुटुंब आणि पार्श्वभूमी : Family and Background । महाराणी सईबाई यांच्या जीवनातील एक प्रसंग । सईबाईंचे प्रकृती अस्वास्थ्य । सईबाईंचे निधन : Saibai Death ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
पाच सप्टेंबर १६५९ रोजी आपल्या लाडक्या शंभूराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना व सर्व रयतेला सोडून सईबाई राणीसाहेब वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी निजधामाला गेल्या. आज त्यांचा स्मृतिदिन.
महाराणी सईबाई शिवाजी भोसले : Maharani Saibai Shivaji Bhosale
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी राणी सईबाई भोसले. त्यांना भारतीय इतिहासातील महान महिलांपैकी एक मानले जाते. शिवाजी महाराजांच्या मुख्य सहाय्यक आणि सल्लागार होत्या.ज्यांनी छत्रपती शिवाजी महारजांना प्रत्येक पावलावर साथ दिली. शिवरायांनाही त्यांची अपार ओढ होती. चला तर मग जाणून घेऊया महाराष्टाच्या या पहिल्या महाराणी सईबाईं बद्दल.
कुटुंब आणि पार्श्वभूमी : Family and Background
राव वणंगपाळ बारा वजीराचा काळ’ अशी म्हण ज्यांच्या शौर्यामुळे पडली, त्या शूर वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यातील मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या पोटी सईबाई राणीसाहेबांचा जन्म झाला होता. फलटणचे नाईक-निंबाळकर घराणे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक घराणे होय. त्यांची सोयरीक कायमच भोसले घराण्याशी होत राहिल्याने राजकीय व सामाजिकदृष्ट्या हे घराणे फार महत्त्वाचे मानले गेले.
सरबियाचे आई-वडील श्रीमंत आणि प्रतिष्ठित होते. मुधोजीराव नाईक निंबाळकर हे त्यांचे वडील होते जे एक उच्चभ्रू होते. त्यांनी एकदा 1644 ते 1676 पर्यंत फलटणचे 15 वा राजा (शासक) म्हणून काम केले. त्यांची आई रुबाई शिर्के कुटुंबातील सदस्य होती. फलटणचे 16 वे शासक बजाज राव हे त्यांचे भाऊ होते.
वरील पार्श्वभूमीवरून आपल्याला कळते की ती केवळ प्राचीन भारताची सामान्य नागरिक न्हवत्या . त्या राजघराण्यातील होत्या. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य असे होते जे प्रत्येक मुलीला हवे होते
नाव (Name) | सईबाई मुधोजीराजे निंबाळकर |
जन्म (Birthday) | २९ ऑक्टोबर १६३३ फलटण, महाराष्ट्र |
वडील (Father Name) | मुधोजीराजे निंबाळकर |
आई (Mother Name) | रुबाई मुधोजीराजे निंबाळकर |
भाऊ (Brother) | बाळाजीराव नाईक निंबाळकर |
पती (Husband Name) | छत्रपती शिवाजी महाराज |
सासू (mother in law) | जिजाबाई शहाजीराजे भोसले |
सासरे (father in law) | शहाजीराजे मालोजी भोसले |
मुले (Children) | मुलगा : छत्रपती संभाजी महाराज, मुली : अंबिकाबाई, राणूबाई, सखुबाई |
मृत्यू (Death) | ५ सप्टेंबर १६५९ (२६ वर्ष) राजगड, पुणे |
लग्न : Marriage
सईबाईंचा विवाह लहान वयातच पती शिवाजी महाराजांशी झाला. तेव्हा त्या जेमतेम दहा वर्षां च्या होत्या. म्हणूनच प्राचीन भारतीय इतिहासातील बहुतेक नोंदींमध्ये त्यांचे एकत्रीकरण हे बालपणीचे लग्न आहे. आई म्हणून जिजाबाईंनी दोघांचे चार हात करायचे ठरवले. सईबाई आणि शिवाजी महाराज यांचा विवाह १६ मे १६४० रोजी लालमहाल (पुणे) येथे झाला. हा विवाह शिवरायांची आई जिजाबाई यांनी पार पाडला.
शिवाजी महाराजांसाठी परिपूर्ण जुळणी शोधणे ही मोठी जबाबदारी होती. कारण शिवाजी महाराजांच्या पत्नीला स्वराज्याच्या कार्यात साथ द्यावी लागेल. जिजाबाई केवळ घर सांभाळण्यासारखे गुण शोधत नाहीत तर योद्धा कौशल्य आणि न्यायालयीन व्यवस्थापन देखील त्यांच्या सुनेमध्ये आहेत.
छत्रपती शिवरायांचे वडील शहाजी राजे हे त्यांची दुसरी पत्नी तुकाबाई यांच्यासोबत बंगलोरला राहत असत. त्यामुळे त्याचे वडील आणि एकोजी आणि संभाजी नावाचे दोन भाऊ लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. शिवाजीच्या वडिलांनी नंतर त्यांना बंगलोरला बोलावले, जिथे त्यांनी त्यांना या प्रदेशातील सर्वात मोठ्या विवाह सोहळ्यांपैकी एक बनवले.
नातेसंबंधांचा आढावा : Overview of relationship
सईबाई ह्या स्वतः शिवाजी, राजघराण्याला आणि संपूर्ण राज्यासाठी एक महान प्रेरणा होत्या. त्यांच्या वैयक्तिक गुणांमुळे शिवाजी महाराज इतके प्रभावित झाले की त्यांनी सईबाई यांना आपला वैयक्तिक सल्लागार म्हणून नियुक्त केले.
शिवाजीच्या जीवनातील तिचे स्थान अनपेक्षितपणे गेल्यावर स्पष्ट होते. त्याचे जीवन अंधार, चिंता आणि दुःखाने भरलेले होते.
त्यांच्या मृत्यूनंतर हळूहळू सोयराबाई यांना राजघराण्यात अधिकार मिळाला. पण ती तिची पदे भरूनही शिवरायांच्या हृदयात जागा भरू शकल्या नाही. त्यांच्या मृत्यूने कोणीही भरू शकणार नाही अशी पोकळी निर्माण झाली.
शिवाजीचे त्यांची पहिली पत्नी, सईबाई यांच्यावर प्रेम होते आणि अहवालात असे म्हटले आहे की “साई” हा त्यांचा मृत्यूशय्येवरील शेवटचा शब्द होता. सईबाई आणि शिवाजी राजे यांना संभाजी, राणूबाई, सकवारबाई आणि अंबिकाबाई अशी चार मुले झाली. त्यांचे लग्न केवळ 19 वर्षे टिकले.
महाराणी सईबाई यांच्या जीवनातील एक प्रसंग :
स्वराज्य निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात ज्यावेळी शिवाजी महाराजांनी तोरणा, राजगड, सिंहगड, चाकण हे किल्ले ताब्यात घेऊन राजगडावर इमारतींचे काम सुरु केले. ही बातमी अदिलशहापर्यंत गेल्यावर त्याने शिवाजी महाराजांना “तुम्ही पातशाही चाकर असून मुलुख मारता, किल्ले घेता, खजिना लुटता हे उत्तम करीत नाही. बरे झाले ते माफ असे. तुम्ही हुजूर येणे, तुम्हास दौलत देऊ, सरफराज करू” असा संदेश पाठवला.
आदिलशहाकडून संदेश आल्यावर शिवाजी महाराजांनी हा संदेश सईबाईंना सांगितला व विचारले की, “पातशाहाने कौल पाठवून भेटीस बोलावले आहे, जावे की न जावे?”
यावर सईबाई महाराजांना म्हणाल्या “आम्हा स्त्रियांस पुसावे असे नाही, महाराज काय समजोन पुसतात न कळे, थोर थोर लोक मुसद्दी आहेत, ज्यांचा भरवसा असेल त्यांस विचार पुसावा.”
यावर महाराज म्हणाले की “बरोबर आहे मात्र स्त्रियास्त्रियांत अंतर आहे. माता ही घराचे दैवत तर स्त्री म्हणजे घरचा प्रधान याजकरिता विचारले “
यानंतर सईबाई म्हणाल्या की “महाराजांचे वडील हुजूर आहेत, महाराजांनी पातशाही किल्ले घेतले, मुलुख मारिला याकरिता हुजूर जावे हा सल्ला नाही, वडिलांवर दृष्टी ठेवून जाल तर बरे कसे दिसेल? राज्य करावे असेल तर श्रीशंकरजींस शरण जावे. श्री जे कार्य नेमून देतील ते पाहावे. राज्य करणे त्यास मोह कैसा? कंबरेस दाली बांधावी (तलवार लावण्याचा कमरपट्टा बांधून लढण्याची तयारी करावी). पुढे जे होणे ते होईल.”
सईबाईंचा हा धीरोदात्त सल्ला ऐकून शिवरायांना अतिशय आनंद झाला आणि शिवरायांना शहाजीराजांनी कर्नाटकातून पोवळ्याचा पलंग, चार लाख होनांचा सोन्याचा कमरपट्टा, जिन्हें बखतरे, टोप आणि फिरंग तलवार अशा मौल्यवान वस्तू जलमार्गाने पाठवल्या होत्या त्यापैकी सोन्याचा कमरपट्टा सईबाईंना भेट म्हणून दिला आणि सईबाईंच्या सल्ल्यानुसार कमरबंदी (लढण्याची तयारी) केली.
शिवचरित्रातील या एका प्रसंगातून महाराणी सईबाईंचे संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या नजरेसमोर उभे राहते.
सईबाईंचे प्रकृती अस्वास्थ्य :
सईबाईंनी वयाच्या 24 व्या वर्षी 14मे 1657 साली संभाजी महाराजांना जन्म दिला. आणि त्यांना बाळांतव्याधी ने ग्रासले त्या अंथरुणाला खिळल्या, कुठलीही औषधी लागू पडत नव्हती…दूरदूरचे वैद्य बोलाविले…देवाला नवस-सायास बोलले गेले…कौल लावला…देव पाण्यात ठेवले. परंतु काहीच उपाय चालेना! प्रकृती ढासळतच गेली. महाराजांची द्विधा मनस्थिती झाली होती…एकीकडे खान स्वराज्य गिळंकृत करण्याकरता आ वासून उभा होता आणि दुसरीकडे सईबाईंच्या प्रकृतीत कश्यानेही फरक पडत नव्हता.
अश्या प्रतिकूल परिस्थितीतही महाराज हवा-पालटा साठी सईबाईंना घेऊन प्रतापगडावर गेले…समवेत जिजाबाई देखील होत्या.
सईबाईंच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे महाराज चिंतीत असायचे परंतु सतत रयतेचा विचार करणाऱ्या शिवाजी महाराजांना उसंत तरी कुठे? खानाशी झुंज देण्याचा विचार स्वस्थ बसू देत नव्हतां. कोणावर काय जवाबदारी सोपवायची…असे सगळे मनसुबे मनात सुरु असतांना मधातच सईबाईंचा विचार महाराजांच्या मनात अस्वस्थता निर्माण करी. हवा-पालटाचा देखील काहीही परिणाम झाला नाही सईबाईंच्या प्रकृतीत कणभर देखील फरक पडला नाही.
आईसाहेब आणि सईबाई राजगडावर परत आल्या. महाराजांचा आणि सईबाईंचा स्नेहबंध हा अनोखा होता लहानपणीची निरागस मैत्री, त्या वयात जुळलेले रेशीमबंध, रुसवे-फुगवे, भांडणे अश्या अनेक घटना महाराजांच्या मनात पिंगा घालीत असत. राजगडावरून सईबाईंच्या प्रकृतीच्या बातम्या प्रतापगडावर येत असत…येणारी प्रत्येक बातमी महाराजांचा काळजाचा ठोका चुकवीत असे. एकदा महाराजांकरता संदेश आला…त्यांना राजगडावर बोलाविले होते…महाराज सईबाईंना भेटायला गेले.
सईबाईंना राजगडावरची हवा सहन होत नसल्याने राजांनी त्यांच्याकरता शिवापटण येथे वाडा बांधला होता. सईबाई या ठिकाणी राहात असत. राजे आणि सईबाई यांच्यात संवाद झाला आणि राजे माघारी गेले… खानाला तोंड देण्याची जय्यत तयारी प्रतापगडावर सुरु होती… मावळखोरी महाराजांकडून लढणार हे ऐकून सगळ्यांचा उत्साह दुणावला होता. आई जगदंबा पाठीशी आहे असा विश्वास सर्वांच्या मनात वाढू लागला.
सईबाईंचे निधन : Saibai Death
परंतु काळाने डाव साधला, सईबाईंची प्रकृती आणखीन खालावली. अनेक प्रयत्न करून देखील नियती नमली नाही. 5 सप्टेंबर 1659…भाद्रपद वद्य चतुर्दशीला सईबाई गेल्या. दोन-सव्वा दोन वर्षांचे लहानगे संभाजीराजे मातृसुखाला पारखे झाले. कधीही परत न येणाऱ्या वाटेवर सईबाई कायमच्या निघून गेल्या.
सईबाईंनंतर संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांच्या आजी जिजाबाईंनी केला !