महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना माहिती मराठी | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी लिस्ट | महाराष्ट्र सरकारी योजना | किसान कर्ज माफी लिस्ट | महात्मा फुले कर्ज योजना | महात्मा ज्योतिबा फुले योजना महाराष्ट्र | महाराष्ट्र शेतकरी कर्ज माफी यादी । महात्मा ज्योतीराव फुले कर्ज माफी योजना संपूर्ण माहिती । Mahatma Jyotiba Phule loan waiver scheme complete information.। महाराष्ट्र महात्मा जोतीबा फुले कर्ज माफी योजना संपूर्ण तपशील । Maharashtra Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme Complete Details । महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना उद्देश । Purpose of Maharashtra Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme । Mahatma Jyotiba Phule Loan Waiver List Update । महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना लिस्ट । Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme List । महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना कर्जमुक्ती स्थिती । Mahatma Jyotiba Phule Farmers Debt Relief Scheme Debt Relief Status । महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना प्रथमचरण । Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme First Phase । महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना यादी । List of Mahatma Jyotirao Phule Debt Relief Scheme । महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना फायदे । Mahatma Jyotiba Phule Farmers Debt Relief Scheme Benefits । महात्मा फुले कर्ज योजना अंमलबजावणी प्रक्रिया । Mahatma Phule Loan Scheme Implementation Process । महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना आवश्यक कागदपत्र । Documents required for Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme । महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया । Maharashtra Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme Offline Application Process । महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना लाभार्थी यादी कशी पहावी ? How to view Mahatma Jyotiba Phule loan waiver scheme beneficiary list ? Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
जगाच्या पाठीवर पहिले असता शेतकरी सर्वांसाठी अन्न पिकवतो, शेतीमध्ये काबाड कष्ट करतो घाम गाळून धान्य पिकवतो शेतकऱ्यांमुळे सर्वांना अन्न मिळते आपल्याला माहितच आहे, शेतकरी त्यांच्या शेतात अहोरात्र काबाड कष्ट करून अन्नधान्य, भाजीपाला पिकवतो शेतकरी कशाचीही काळजी न करिता उन असो कि पाऊस ते फक्त आपले काम करत असतात, इतके काबाड कष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवत असतो परंतु त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही, त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते.
कधी अतिवृष्टीमुळे त्यांच्या पिकांचे नुकसान होते तर कधी शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या पिकांचे नुकसान होते या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी हैराण होतो, या सततच्या नुकसानामुळे आणि त्यांच्या पिकांना योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना नेहमी कर्ज काढावे लागते, या सर्व बाबींमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी व कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे. वाचक मित्रहो आपण या लेखामध्ये महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2023 या योजने संबंधित संपूर्ण माहिती जसे की योजनेसाठी लागणारी कागदपत्रे. योजनेसाठी लागणारी पात्रता, अर्ज करण्याची प्रक्रिया इत्यादी माहिती पाहणार आहोत.
महात्मा ज्योतीराव फुले कर्ज माफी योजना संपूर्ण माहिती । Mahatma Jyotiba Phule loan waiver scheme complete information.
राज्यात मागील काही वर्षापासून दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, राज्यातील काही भागात दुष्काळसदृश्य परिस्थती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते तसेच राज्यातील काही भागात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते, महाराष्ट्र राज्यात एकूण 153 लाख शेतकरी आहेत, हे शेतकरी शेती आणि शेतीच्या संबंधित गरजा पूर्ण करण्याकरिता व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेत असतात, मागील काही वर्षात विविध भागात दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे आणि अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्यामुळे तसेच या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतीच्या संबंधित असलेल्या बँकांच्या कर्जाची परतफेड होऊ शकली नाही, त्यामुळे राज्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे तसेच यामुळे त्यांना नव्याने शेती संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी पिक कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन 2019 मध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या अंतर्गत सप्टेंबर 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पिक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत अल्पमुदतीच्या पिक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हि कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती.
महाराष्ट्र महात्मा जोतीबा फुले कर्ज माफी योजना संपूर्ण तपशील । Maharashtra Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme Complete Details
महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांनी 21 डिसेंबर 2019 मध्ये महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेचा शुभारंभ केला, या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील एप्रिल 2015 ते मार्च 2019 पर्यंत उचललेल्या अल्पमुदत पिक कर्जाची रक्कम, एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुद्दल आणि व्याजासहित थकीत असेल, अशी परतफेड न झालेली अल्पमुदत पिक कर्जाची रक्कम दोन लाख पर्यंत आहे, असे शेतकरी जर अल्पभूधारक किंवा अत्यल्पभूधारक असले तरी त्यांच्याकडे असलेले शेत जमीन क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाख रुपये पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल.
या योजनेच्या अंतर्गत एप्रिल 2015 ते मार्च 2019 वितरीत करण्यात आलेल्या अल्पमुदत पिक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर केले असेल आणि एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुद्दल व व्याजासहित थकीत असेल, अशी परतफेड न झालेली कर्जाची रक्कम दोन लाखापर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल.
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना या योजनेमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे अल्पमुदत पिक कर्जाचे केलेले पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन केलेले पिक कर्ज यांची दिनांक 30 सप्टेंबर रोजी वैयक्तिक शेतकऱ्याच्या सर्व कर्जखात्यांची एकत्रित थकबाकी रक्कम विचारात घेऊन प्रती शेतकरी कमाल 2 लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल.
- या योजनेच्या अंतर्गत ज्या अल्पमुदत पिक कर्ज खात्याची अथवा अल्पमुदत पिक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन केलेल्या कर्जखात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 30 सप्टेंबर रोजी थकबाकीची रक्कम 2 लाख रुपयापेक्षा जास्त असेल अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाही.
- या योजनेसाठी एक राज्यस्तरीय देखरेख व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल, यामध्ये वित्त विभाग, नियोजन विभाग, सहकार विभाग, यांचे सचिव तसेच रिझर्व बँक, नाबार्ड व राष्ट्रीयकृत बँक यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल.
- या योजनेची अंमलबजावणी करीत असतांना विभागामार्फत विविध घटकांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील व त्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल मा. मुख्य सचिव यांच्या मान्यतेने करण्यात येईल.
- या योजनेसाठी आवश्यकतेप्रमाणे तांत्रिक सेवा पुरवठादार यांच्या सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- या योजनेच्या अंतर्गत राष्ट्रीयकृत, खाजगी, व ग्रामीण बँकांच्या शेतकऱ्यांच्या अल्पमुदत पिक अनुउत्पादित कर्जांना किंवा अल्पमुदत पिक पुनर्गठीत अनुउत्पादित कर्जांना (NPA Accounts) कर्जमुक्तीचा लाभ देण्याबाबतचा निर्णय वित्त विभाग व सहकार विभागाचे सचिव स्तरीय समिती नेमून त्यांच्यामार्फत घेण्यात येईल.
महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना उद्देश । Purpose of Maharashtra Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme
समाजात अशी अनेक उदाहरणे दिसून येतील कि जिथे कर्जाच्या बोजामुळे शेतकरी आत्महत्या करतात त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची कुटुंबे निराधार होतात, शेतकरी अहोरात्र शेतीमध्ये घाम गाळत असतात शेतीसाठी कष्ट करीत असतात, बहुतांश वेळा येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठयाप्रमाणात नुकसान होते तर कधी पिकांना भाव मिळत नाही या सर्व समस्यांमुळे शेतकरी कर्जबाजारी होतो, राज्यातील अशा सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी, शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांमधून सोडविण्याचा दृष्टीने शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना संपूर्ण राज्यात राबविण्यास सुरु केली आहे.
या योजनेच्या अंतर्गत राज्यातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अल्पमुदतीचे दोन लाख रुपयेपर्यंतचे दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत घेतलेले पिक कर्ज राज्य शासनाकडून माफ करण्यात येईल. तसेच या योजनेचा लाभ राज्यातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांबरोबरच ऊस आणि फळबागांची शेती करण्याऱ्या व इतर पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेच्या अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये शासनाच्या निर्णयानुसार कर्ज माफीसाठी शेतकऱ्यांना कोणतीही अट असणार नाही या संबंधित विवरण भविष्यात मुख्यमंत्री कार्यालातून जारी केले जाईल. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दहा हजार कोटी रुपयांचे बजट जाहीर केले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी लिस्ट अपडेट । Mahatma Jyotiba Phule Loan Waiver List Update
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्र सरकारव्दारा योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येईल असे राज्य शासनाव्दारे जाहीर करण्यात आले होते, महाराष्ट्र महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत 11. 25 लाख शेतकऱ्यांना कर्ज मुक्तीचा लाभ देण्यात येणार असून जुलै पर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 8200/- करोड रुपये जमा केल्या जातील. महाराष्ट्र सरकारव्दारा हि योजना राज्यातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी तसेच त्यांना आधार व दिलासा देण्यासाठी सुरु केली आहे. शासनाकडून अपडेट करण्यात आले कि करोना महामारीमुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विलंब झाला आहे. परंतु ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. त्या सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणित करून ठेवावे असे निवेदन शासनाने केले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना लिस्ट । Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme List
महाराष्ट्र शासनाकडून महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेच्या लाभार्थ्यांची तिसरी यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये आले नाहीत, त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजने (MLPSKY) च्या तिसऱ्या यादीत तपासावे. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थी शेतकर्यांचे नाव योजनेच्या यादीत समाविष्ट असतील, त्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येईल.
या योजनेची यादी पाहण्यासाठी तुम्हाला जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतमध्ये भेट द्यावी लागेल. महाराष्ट्र शासनाने हि योजना लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी तसेच त्यांना या योजनेच्या माध्यामतून आर्थिक आधार देण्यासाठी राबविली आहे.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना कर्जमुक्ती स्थिती । Mahatma Jyotiba Phule Farmers Debt Relief Scheme Debt Relief Status
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांना आधार कार्डाच्या माध्यमातून सत्यापित करून नंतर त्या बँक खात्यांमध्ये धनराशी जमा केल्या गेली होती, या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे एकूण 7,06,500 बँक खाते उघडण्यात आले आहे, तसेच या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 4739.93 करोड रुपये जमा करण्यात आले आहे, असे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत अजूनही लाभ मिळालेला नाही त्यांनी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी योजनेमध्ये अर्ज करण्याची आवश्यकता आहे.
MJPSKY लाभार्थी लिस्ट
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दहा हजार करोड रुपयांचे बजट जाहीर केले आहे, महाराष्ट्र शासनाने या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी 22 फरवरी 2020 पर्यंत जाहीर करण्याचे ठरविले होते, ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2023 अंतर्गत येतील त्यांना या योजनेचा देण्यात येईल. महाराष्ट्र राज्यातील ज्या लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज केला आहे, ते शेतकरी लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव तपासू शकतात.
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना प्रथमचरण । Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme First Phase
राज्यातील विधानसभा सत्र समाप्त झाल्यावर माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीर केले होते कि शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळविण्याकरिता कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता असेल त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सहजतेने आणि सुलभतेने मिळवता येईल, त्याचप्रमाणे शासनाच्या निर्णयानुसार कर्जमाफीची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना या योजनेचा प्रथम चरणाला मार्च 2020 मध्ये सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी राज्यातील लाभार्थी शेतकरी या योजनेमध्ये अर्ज करून योजनेचा लाभ मिळवू शकतात.
महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना यादी । List of Mahatma Jyotiba Phule Debt Relief Scheme
शासनाकडून या योजनेच्या अंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ मिळवलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची प्रथम यादी जाहीर केल्या गेली होती त्या यादीमध्ये पंधरा हजारांच्यावर लाभार्थी शेतकऱ्यांची नावे होती, त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे, या यादीमध्ये पहिल्या यादीपेक्षा जास्त लाभार्थ्यांची नावे असण्याची शक्यता आहे, ज्या लाभार्थी शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीमध्ये नव्हती, ते लाभार्थी जाहीर झालेली दुसरी यादी तपासू शकतात. दुसरी लाभार्थी यादी तपासणीसाठी लाभार्थ्यांना आपल्या बँकेमध्ये, ग्रामपंचायत किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन पहावी लागेल. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची तिसरी यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना फायदे । Mahatma Jyotiba Phule Farmers Debt Relief Scheme Benefits
महाराष्ट्र राज्यातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व त्यांना आर्थिक सहाय्यता देण्यासाठी व त्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी शासनाने हि योजना सुरु केली आहे. या योजनेच्या संबंधित माहिती व लाभ खालीलप्रमाणे आहेत.
- महाराष्ट्र महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्ज माफी मिळणार आहे.
- हि योजना महाराष्ट्रातील अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
- या योजनेच्या अंतर्गत ऊस आणि फळबागांची शेती करणारे शेतकरी तसेच पारंपारिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
- या योजनेंतर्गत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतचे अल्पमुदतीचे पिक कर्ज आणि पुनर्गठीत पिक कर्ज माफ करण्यात येणार आहे.
- या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँका, ग्रामीण बँका किंवा व्यापारी बँकांमधून घेतलेले अल्पमुदतीचे पिक कर्ज किंवा पुनर्गठन केलेले पिक कर्ज माफ करण्यात येणार आहे.
- महाराष्ट्र राज्य सरकारव्दारा या योजनेच्या अंतर्गत मिळणारी कर्ज माफीची धनराशी थेट लाभार्थी शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा केली जाईल.
या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील नागरिक पात्र असणार नाही । The following citizens will not be eligible to get the benefit of this loan waiver scheme
- महाराष्ट्र राज्यातील आजी / माजी मंत्री / राज्य मंत्री / माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य / माजी विधानसभा / विधान परिषद सदस्य.
- केंद्र आणि राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन 25,000/- रुपयेपेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
- राज्य सार्वजनिक उपक्रम उदाः महावितरण, एस.टी. महामंडळ, इत्यादी व अनुदानित संस्था यांचे अधिकारी आणि कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन 25,000/- रुपयेपेक्षा जास्त असणारे)
- शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
- निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25,000/- रुपयेपेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).
- कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुत गिरणी, नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सहकारी दुध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन 25,000/- रुपयेपेक्षा जास्त असणारे) आणि पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)
महात्मा फुले कर्ज योजना अंमलबजावणी प्रक्रिया । Mahatma Phule Loan Scheme Implementation Process
मार्च 2020 पासून बँकांनी आधार कार्ड क्रमांक आणि कर्ज खात्याची रक्कम असलेल्या याद्या नोटीस बोर्डावर तसेच चावडीवर प्रसिध्द केल्या जातील.
- या याद्यांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल.
- महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2023 या योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक कर्ज खाते त्यांच्या आधार क्रमांकाबरोबर संलग्न करावे, त्याचप्रमाणे आधार क्रमांक विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न करण्यात यावा.
- राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या आधार क्रमांकाबारोबर युनिक आयडेंटिफिकेशन नंबर सोबत ठेवावा लागेल आणि त्यांच्या आधार क्रमांकाची आणि कर्जाच्या रकमेची पडताळणी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रावर जावे लागेल.
- जर पडताळणीनंतर केल्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असेल तर ती कर्ज माफीची रक्कम नियमानुसार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये जमा केली जाईल.
- यामध्ये शेतकऱ्यांचे कर्जाची रक्कम आणि आधार क्रमांक बाबत वेगळे मत असल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडण्यात येणार आहेत. या नंतर समिती निर्णय घेईल आणि अंतिम कार्यवाही करेल.
महात्मा फुले कर्ज माफी योजना 2023 यादी । Mahatma Phule Loan Waiver Scheme 2023 List
या योजनेंतर्गत जिल्हानिहाय यादी जारी केली जाईल, राज्यातील लहान आणि अल्पभूधारक शेतकरी महात्मा फुले कर्ज माफी योजना जिल्हानिहाय लाभार्थी यादी 2023 मध्ये त्यांचा जिल्हा निवडून त्यांची नावे तपासू शकतात. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील म्हणजे 68 गावांमधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी 24 फेब्रुवारीला आणि दुसरी यादी 28 फेब्रुवारीपासून जारी केली जाईल. एप्रिल महिन्याचा अखेरीस सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाईल, या MJPSKY जिल्हानिहाय लाभार्थी यादी 2023 मध्ये राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत पिकांसाठी अल्पमुदतीचे कर्ज घेतले आहे त्यांची नावे येतील, आणि त्या शेतकऱ्यांना दोन लाख पर्यंतचे पिक कर्ज माफ केल्या जाईल
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना आवश्यक कागदपत्र । Documents required for Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असेल, कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे असेल.
- या योजनेच्या अंतर्गत सरकारी नोकरी करणारे नागरिक किंवा आयकर भरणारे शेतकरी या योजनेचा लाभ मिळवू शकत नाही
- या योजनेच्या अंतर्गत राज्यातील अल्पभूधारक किंवा अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
- या योजनेच्या अंतर्गत राज्यातील ऊस आणि फळबागांची शेती करणारे व इतर पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
- बँक खात्यावर फक्त लाभार्थींची सही किंवा अंगठ्याचा शिक्का असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांचे आधार कार्ड आवश्यक आहे.
- अर्जदाराचे अधिवास प्रमाणपत्र
- अर्जदाराचा मोबाईल नंबर आवश्यक आहे.
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
महत्मा फुले कर्जमाफी योजना कर्जमाफी मंजूर जिल्हे । Mahatma Phule Loan Waiver Scheme Loan Waiver Approved Districts
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी यादी ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना पहायची आहे ते खालीलप्रमाणे जिल्ह्यातील यादीमध्ये त्यांच्या जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी पाहू शकतात, परंतु यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा लागेल, कारण महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीची यादी तपासण्यासाठी कोणतीही शासनाची अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिलेली नाही. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी यादी फक्त जनसेवा केंद्रांमध्ये उपलब्ध होऊ शकते, यासाठी जवळच्या जनसेवा केंद्रामध्ये जाऊन कर्जमुक्तीची यादी तपासावी लागेल
महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया । Maharashtra Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme Offline Application Process
महाराष्ट्र राज्यातील ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2022 या योजनेचा लाभ मिळवायचा आहे, त्यांना या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागेल त्यासाठी त्यांना योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार करून उदाः आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी कागदपत्र घेऊन जवळच्या बँकेत जाऊन योजने संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, योजने संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या आधार संलग्न बँकेच्या खात्यात कर्ज माफीची रक्कम जमा केल्या जाईल, अशा प्रकारे तुमची या योजनेमध्ये ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्ण होईल.
- या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या बँकेत जावे लागेल, तुम्हाला ज्या बँकेत खाते उघडायचे आहे.
- यानंतर बँकेमध्ये पूर्ण प्रक्रिया करून खाते उघडावे लागेल, तुमचे खाते बँकेत उघडल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक घेऊन बँकेत जावे लागेल.
- यानंतर योजने संबंधित सर्व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, योजने संबंधित कागदपत्रांची प्रक्रिया संपूर्ण झाल्यावर कर्जाची धनराशी तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
- महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेसाठी कोणतीही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया नाही, अर्ज करण्यासाठी लाभार्थी अर्जदारांना जवळच्या बँकेत जावे लागेल.
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना लाभार्थी यादी कशी पहावी ? How to view Mahatma Jyotiba Phule loan waiver scheme beneficiary list ?
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने केला जातो, परंतु अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही लाभार्थी यादी ऑनलाईन तपासू शकता, लाभार्थी यादी ऑनलाइन तपासण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया आहे.
- सर्वप्रथम अर्जदाराला या योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर जावे लागेल, वेबसाईटवर भेट दिल्यावर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल
- या होम पेजवर तुम्हाला लाभार्थी यादी चा पर्याय दिसेल, या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
- या पेजवर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल, यानंतर गाव निवडावे लागेल, यानंतर तुमच्यासमोर लाभार्थी यादी दिसेल.
- यानंतर तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेमध्ये तुमचे नाव तपासू शकता.
FAQ on महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना FAQ on Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme
Q. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना काय आहे ? What is Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme ?
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना महाराष्ट्र सरकारव्दारे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे, या योजनेच्या अंतर्गत लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांचे दोन लाख पर्यंतचे पिक कर्ज माफ करण्यात येणार आहे.
Q. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेमध्ये अर्ज कसा करावा ? How to apply for Mahatma Jyotiba Phule loan waiver scheme ?
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी जवळच्या बँक मध्ये जाऊन अर्ज करावा लागेल.
Q. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेचे फायदे काय आहे ? What are the benefits of Mahatma Jyotiba Phule loan waiver scheme ?
महाराष्ट्र शासनाव्दारा महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेच्या अंतर्गत अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांचे दोन लाख पर्यंतचे पिक कर्ज माफ करण्यात येत आहे, तसेच योजनेच्या अंतर्गत मिळणारी पिक कर्ज माफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा केली जाईल.
Q. आधार क्रमांक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी जोडलेला नसेल तर ? What if Aadhaar number is not linked with farmers’ bank accounts ?
बँकांनी संबंधित शाखानांतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व गावांतील बँक शाखा आणि गाव चावडी येथे लिंक न केलेली कर्ज खाती दर्शविणारी यादी प्रकाशित करणे आवश्यक आहे. बँकेच्या शाखेत त्यांचे आधार क्रमांक सबमिट करण्यासाठी शेतकऱ्यांना एसएमएस किंवा इतर कोणत्याही संपर्क माध्यमाने कळविण्यात यावे.
Q. या योजनेनुसार अल्प मुदतीच्या पिक कर्जाची व्याख्या काय आहे ? What is the definition of short term crop loan under this scheme ?
या योजनेच्या अंतर्गत अल्पमुदतीचे कर्ज म्हणजे हंगामी पिक कर्ज आणि KCC अंतर्गत कर्ज, सोन्यासाठी घेतलेले पिक कर्ज योजनेच्या निष्कर्षा अंतर्गत पात्र नाहीत.
Q. अल्प मुदतीच्या पिक कर्जाच्या कट ऑफ तारखा काय आहेत ? What are the cut off dates for short term pick loans
01-04-2015 ते 31-03-2019 या कालावधीत अल्प मुदतीचे पिक कर्ज वितरीत केले गेले आणि थकीत (मुद्दल + व्याज) आणि 30-09-2019 पर्यंत भरले न गेलेले.
Q. या योजनेनुसार पुनर्गठीत कर्जाची व्याख्या काय आहे ? What is the definition of restructured loan under this scheme ?
योजनेनुसार अल्पमुदतीची पिक कर्जे जी मध्यम मुदतीच्या कर्जात रुपांतरीत केली जातात.
Q. संयुक्त खात्याच्या बाबतीत सर्व संयुक्त खातेधारकांना आधार क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे काय ? In case of joint account all joint account holders are required to link Aadhaar number
होय, सर्व संयुक्त खातेधारकांना त्यांच्या कर्ज खात्याशी आधार क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे.
Q. आधार लिंकिंग, सीडिंग, किंवा ऑथेंटिकेशन (ई-KYC) म्हणजे काय ? What is Aadhaar Linking, Seeding, or Authentication (e-KYC) ?
आधार प्रमाणीकरण म्हणजे ती प्रक्रिया ज्याव्दारे आधार क्रमांक धारकाची जनसांखिकीय माहिती किंवा बायोमेट्रिक माहितीसह आधार क्रमांक त्याच्या पडताळणीसाठी सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटर (सीआयडीआर) कडे सबमिट केला जातो आणि अशा रिपॉझिटरमध्ये अचूकता किंवा त्याची कमतरता तपासली जाते. त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीचा आधार.
आधार सीडिंग हि एक प्रक्रिया आहे ज्याव्दारे सेवा प्रदात्यांच्या सेवा वितरण डेटाबेसमध्ये रहिवाशांचे आधार क्रमांक समाविष्ट केले जातात (या प्रकरणात सेवा प्रदाता बँक आहे) सेवा वितरणादरम्यान डेटाबेसचे डुप्लिकेशन आणि आधार आधारित प्रमाणीकरण सक्षम करण्यासाठी आधार लिंकिंग हि खातेधारकाने सबमिट केलेल्या स्वयंसाक्षांकित आधार प्रतीच्या आधारे कर्ज खात्याच्या (सीआयएफ) विरुद्ध बँक डेटाबेसमध्ये आधार क्रमांक मॅन्युअली पंच करण्याची प्रक्रिया आहे. कर्ज खाते जे अपलोड केले जाऊ शकते. कर्ज खात्यांसह आधार उपलब्ध नसल्यास, आधार लिंकिंग केले जाऊ शकते आणि नवीन लिंक केलेली कर्ज खाती पोर्टलवर अपलोड केली जाऊ शकतात.