महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र – Mahatma Jyotiba Phule Mrutyupatra

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

महात्मा जोतिबा फुले : (Mahatma Jyotiba Phule)

१० जुलै १८८७ रोजी महात्मा फुल्यांनी मृत्यूपत्र तयार करून ते हवेलीचे सबरजिस्टार यांच्याकडे दि. १८ जुलै १८८७ रोजी दुपारी १ ते २ वाजण्याचे दरम्यान रीतसर नोंदवले. त्यात जोतीरावांनी आपल्या मिळकतीचा तपशील देऊन आपल्या मृत्यूनंतर ती आपण मुलगा मानलेल्या. ‘यशवंताच्या मालकीची होईल असे म्हटले आहे. आपण तसेच आपली पत्नी सावित्रीबाई यांचे निधन होईल तेव्हा आपल्या मृतदेहाचे दहन करू नये तर वडिलोपार्जित रीतिरिवाजाप्रमाणे ते. मिठात घालून पुरावे अशी इच्छाही त्यांनी व्यक्‍त केली आहे.

महात्मा फुल्यांचे है मृत्यूपत्र डॉ. बाबा आढाव यांनी महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या पुरोगामी सत्यशोधक नियतकालिकाच्या (वर्ष २, अंक 1) जानेवारी. १९७६ च्या अंकात प्रथम प्रकाशित केले. खरे म्हणजे फुलले समग्र वाडू:मयाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आवृत्तीत प्रथमच प्रसिद्ध झालेला सर्व मजकूर हा मुळात बाबा आदावांनी पुरोगामी
सत्यशोधकाच्या अंकात वेळोवेळी प्रसिद्ध केला आहे. फुले वाड:मयाचे अभ्यासक त्याबद्दल सदैव. त्यांचे अणी राहतील.

सत्यमेव जयते

उईल्पत्र तारीख १० रविवार, जुलै सन १८८७ इसवी, माहे आषाढ व॥ ५ ते दिवसी, मी जोतीराव गोविंदराव फुले, पैठ, गंज, शहर पुणे, धंदा कंतर्याक्टर, कारणे उईलपत्र लिहून ठेवितो की माझी उमर अजमासे साठ-पासष्ठ वर्षांची झाली आहे, माझा वडील भाऊ राजाराम गॉविदराव फुले होता तो मयत झाला. तो व मी बहुता दिवासापासून विभक्त असोन, ज्याचा तो आपआपला रोजगार धंदा निरनिराळा करून निर्वाह करीत आलो आहोत. तो व मी उभयता विकत झाल्या दिवसापासून प्रयेकानी आपआपला स्वत:चा उदीम व्यापार करून स्थावर व जंगम माल मिळकत मिळविली आहे. तिचा ज्याचा तो मालक आहे. व माझे लग्नाचे स्त्रीचे पोटी पुत्र नसल्याकारणाने, गंज पेठेत रा. रा. केसोपंत सिंदीचे वाड्यात राहाणाऱ्या काशी नावाचेस स्त्रीस मुलगा होताच माझे लग्नाचे स्त्रीने त्या मुलाचे स्वत: नाळ कापून तिने त्याचे आपले पोटच्या मुलासारखे संरक्षण केले व आम्ही उभयतांनी त्याचे बारवे दिवशी यशवंत नाव ठेविले. त्याची उमर आता सुमारे तेरा वर्षांची आहे व तो अज्ञान आहे. सबब आम्हा उभ्रयतांचे पश्‍चात आमचे इस्टेटीचे संरक्षण चांगले शेतीने व्हावे व तिची अफरातफर वगैरे होऊ नये याकरिता आम्ही उभयतांनी आपले समक्ष आपले पुरे समजुतीने, सरळ विचार करुन, आमचे उभयतांचे पश्‍चात आमचा मुलगा चिरंजीव यशवंत याने कशी वर्तणूक व वहिवाट करावी,

त्या इस्टेटीचा तपशील खाली लिहिल्याप्रमाणे :-

तुकडी पुणे, पोट तुकडी सब रजिस्टर हवेली याचे हद्दीतील पेठ गंज येथे आमची घरे आहेत.
ती.

१ प्रत. घर नंबर ३९५, खण ११, एक मजला, नवे बांधले आहे. त्याचे कंपाउंडांत आड खणून बांधून काढिला आहे. त्याची कंपाउंडासुद्दा मोजणी दक्षिण-उत्तर सुमारे लांबी फूट ६५ दक्षिणेकडील व पश्‍चिम सुमारे रुंदी फूट ४५ व उत्तरेकडील पूर्व-पश्‍चिम सुमारे रुंदी फूट २८ आहे. याची. चतु-सौमा पूर्वेस रस्ता असून पलिकडे तुंबडीवाल्े वैराग्यांची घरे व बापूआई पौठवाल्याचे घर आहे. पश्‍चिमेस आमचे शौचकुपास जाणे-येण्याच्या बोळापलिकडे आमचा भाऊ राजाराम यांचे वाटणीचे व त्यांचे खाजगत खरेदीचे मिळून दोन घरे आहेत. दक्षिणेलगत बोळापलिकडे रामचंद्र किसन कुंभार यांचे घर व बाबाजी राणोजी फुलले यांची बखळ आहे व उत्तरेलगत रस्ता असून पल्निक्डे म्युनिसिपालिटीचे दोन पाण्याचे हाऊद आहेत. या जाग्यांत काही जागा मी स्वत: खरेदी केली,
काही लिलावांत खरेदी केली व काही जागा आमचे वाटणीची आहे. त्या सर्व जाग्यावर मी काही बंगले व बाकी सर्व साधे घर बांधले आहे. या सर्वाचा आम्ही घरात राहून मालकीने उपभ्नोग घेत. आहोत.

1 प्रत-घर नंबर 3९४ चे तीन खण दीड मजला दुधई आहे. याची पुढले ओट्यासुद्ा पूर्व-पश्‍चिम सुमारे लांबी फूट 3२ व दक्षिण-उत्तर रँदी सुमारे फूट १६ आहे. याची चतु-सीमा पूर्वलगत रामचंद्र किसन कुंभार यांचे घराचा पिछवडा आहे. पश्‍चिमेस अंगणापलिकडे खंडूजी कृष्णाजी व बाबाजी राणोजी फुल यांची घरे आहेत. दक्षिणेलगत सटवाजी कृष्णाजी फुले यांचे घर आहे व उत्तरेलगत. बाबाजी राणोजी फुलले यांची बखळ आहे. हे घर आमचे वडिलोपार्जित मालकीचे असून माझे वाटणीस आले आहे व त्याचा उपभोग मी घेत आहे. या दोन्ही घरांचा शेतखाना घराचे हद्दीबाहेर आहे. व तो मौ नमुन्याप्रमाणे बांधला आहे. तो माझे मालकीचा असून त्यावर दुसरे कोणाचा हक्‍क, मालकी, वहिवाट वगैरे बिलकुल नाही.

1 प्रत बखळ जागा-इची दक्षिण-उत्तर सुमारे लांबी फूट ४३, पूर्व-पश्‍चिम सुमारे रुंदी फूट २८ आहे. चतुःसीमा पूर्वेलगत राजाराम गोविंदराव फुलले यांचे स्वत: खरेदीचे घर नंबर 3९७ चे आहे, त्याचा पिछोडा आहे. पश्‍चिमेलगत बोळापलिकडे महमद मीरखोँ मुसलमानाचे घर आहे, दक्षिणेलगत बोळापलिकडे हरीबा फुले यांचे मोडके घराची बखळ आहे व उत्तरेलगत रस्त्यापललिकडे
ओपाजी कुंभाराचे घराचा पिछोडा आहे. ही बखळ जागा मी राजाराम गोविंदराव फुलले याजपासून खरिदी करून घेतली व तिचा उपभोग मी घेत आहे.

1 प्रत दुसरी बखळ जागा-तिची लांबी रुंदी लिलावपत्रात लिहिल्याप्रमाणे. इची चतुःसीमा पूर्वलगत. बोळापलिकडे नारायण मुकुंदा कांडगा यांचे घराची बाजू आहे. पश्‍चिमेलगत बोळापलिकडे बाळाजी दुलमाजी आल्हाटाचे घराचा पिछोडा आहे. दक्षिणेलगत बोळापल्िकडे बाबाजी मुकुंदा कांडगा यांचे घराची आघाडी आहे व उत्तरेलगत खंडाजी कुसाजी फुले यांचे घराची बाजू आहे. ही बखळ जागा. लिलावात विकत घेऊन मालकीने आम्ही उपभोग घेत आहोत.

1 प्रत बखळ जागा-पूर्वी तीर्थरूप गोविंदराव शेटीबा फुलले यांनी जोतीबा विठोबा फुलले यांचे घर लिलावात विकत घेतले होते. तै हल्ली पडल्यामुळे त्याची बखळ झाली आहे. या बखळ जाग्यात. आमचा निम्मा वाटणीचा भाग आहे व निम्मा भाग राजाराम गोविंदराव फुले यांचा आहे व १ जिल्हा पुणे, तालुके पुरंधर, मौजे खानवडी या गावी आम्हा फुल्यांचा वडिलोपार्जित नऊ खणांचा
दुधई वाडा दोन कंपाउंडाचा आहे, व त्याचप्रमाणे त्या गावातील वाड्यांत, शेतांत, जमिनीतील विहीरीवर, मळ्यावर वगैरे हक्क बाबतीत आमचे तीर्थरूप गोविंदराव शेटीबा फुले यांची निम्मी वाटणी आहे. त्या सर्वामध्ये निम्मी वाटणी आमचे वडील बंधु राजाराम गोविंदराव फुले यांची व॒ निम्मी वाटणी माझी आहे.

याप्रमाणे माझी स्थावर मिळकत आहे. शिवाय माझे घरांत जंगम इस्टेट आहे. तिची माहिती मला व माझे स्त्रीस ठाऊक आहे. त्या सर्वाचे आम्ही उभयता मालक आहोत. आमचे

उभयतांचे पश्‍चात आमचा मुलगा यशवंत हा आमचे स्थावर व जंगम वगैरे हर प्रकारचे माल मिळकतीचा मालक असून तो जाणता व सज्ञान झाल्यावर त्याजल्ला केवळ तशी वहिवाट व मालकी करून त्याने आपले वंशपरंपरेने सुखरूप उपओग घेऊन मालकी करावी. आमचे माल मिळकतीवर आमचे भाऊबंद व पुतण्या गणपतराव राजाराम फुलले वगैरे हर कोणाची वारसा मालकी अथवा वारसा अथवा दावा नाही व कोणतेही प्रकारचा माझे मिळकतीवर बिलकूल कोणाचा हक्क नाही. आमचे सर्व स्थावर जंगम व पुढे होणाऱ्या माल्ल मिळकतीचा मात्रक आमचा मुलगा. यशवंत हा आहे. सांप्रत तो अज्ञान आहे. सबब मी व माझे कुटुंब सावित्री त्याचे पालनपोषण करून त्यास विद्याशिक्षण देत आहोत. त्याचे मुख्य कारण हेच की. चिरंजीव यशवंताने ईश्‍्वरप्ीत्यर्थ आपले सर्वोपरी गांजलेले अज्ञानी दोन दुबळ्या शूद्रादि अतिशूद्र मानव बांधवांस त्यांचे मानवी अधिकारांचे हक्‍क त्यास समजावून दैऊन त्यांची धूर्त, ठक, मानवद्रोही आर्यभट ब्राहमणांचे कचाट्यापासून सुटका करण्याचे कामी आपले आयुष्य, आपले सर्वस्व खर्ची घालून चिरंजीव
यशवंताने जन्माचे सार्यक करून घ्यावे आणि आपल्या तारणाऱ्या इंग्रज सरकारच्या हरेक कामी. उपयोगी पडण्याकरिता आपल्या जीवाकडे पाहू नये. अज्ञानी लोकांच्या वेड्या समजुतीप्रमाणे. चिरंजीव यशवंताचे लग्न झाले असो किंवा नसो, मी जोतीराव गोविंदराव फुलले व माझी लग्नाची भार्या सौभाग्यवती सावित्रीबाई भ्रतार जोतीराव फुले या उभयतांचे मृत्यूनंतर आम्हा उभयतांविषयींचे सर्व विधी सल्यसमाजोक्त करावयास फक्त चिरंजीव यशवंतास मात्र अधिकार आहे. व आम्हां उभयतांच्या शबांस वडिलोपार्जित रितीरिवाजाप्रमाणे शक्तीनुसार मिठात घालून पुरावे. आर्यांचे पाहून आमचे प्रेतांस कधी दहन करू नये. चिरंजीव यशवंत आमचे मृत्युसमयी हजर नसल्यास सत्यशोधक समाजापैकी जो कोणी सभासद हजर असेल त्यास मात्र सर्व विधी करण्यास अधिकार आहे.

माझे मृत्युमागे चिरंजीव यशवंताने नेहमी शाळेत जाऊन योग्य अभ्यास करून मॅट्रिक पास. होऊन बाकीच्या पदव्या संपादन करण्याकरिता प्रयत्न न करिता उनाड परकी लोकांचे मुलासारखी वर्तणूक करू लागला, तर माझे स्त्रीने सत्यशोधक समाजातील सभासदांचे बहुमताने चि. यशवंतास माझे वाटणीचे पुण्यातील घर नंबर ३९४ चे अथवा खानवडी येथील माझे वाटणीचे वाइयातील,
शेतांतील, मळ्यातील व विहिरीतील हिस्सा देऊन त्यास बाकी सर्व इस्टेटीमध्ये रद्द करावा. आणि समाजातील सभासदांचे बहुमताने यशवंताचे जागी माळी, कुळवाडी, धनगर वगैरे शूद्र समाजातील जो कोणी मुलगा सर्व मुलांत हुशार व लायक निघेल त्यांस माझ्या मालमिळकतीचा मालक करून त्याचे हातून सर्व कामे चालवून घ्यावीत. सारांश, शूद्रादि अतिशूद्रास दासानुदास मानणाऱ्या

आर्यभट ब्राहमण जातीसह त्यांच्या अनुयायांचीसुद्दा माझे शवावर व तत्संबंधी करीत असलेल्या विधीवर सावलीसुद्धा पटू देऊं नये, म्हणून निर्माणकर्त्याची नमपूर्वक प्राथना करून ही उईल आम्ही आपले राजीखुशीने व अक्कलहुशारीने शुद्धीत असता लिहून ठेविली आहे. ता. १० माहे जुलै, सन १८८७ इसवी

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )