माझी कन्या भाग्यश्री योजना माहिती Majhi Kanya Bhagyashree Yojana Mahiti

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023 | माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन अर्ज | MKBY Application Form | मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र 2023 | माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज, फॉर्म PDF, पात्रता, योजनेचे लाभ | शासकीय अनुदान योजना 2023 । माझी कन्या भाग्यश्री योजना उद्दिष्टे । Majhi Kanya Bhagyashree Yojana Objectives । Maharashtra Majhi Kanya Bhagyashree Yojana Features । माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता व नियम । Majhi Kanya Bhagyashree Yojana Eligibility and Rules । महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना लाभ । Majhi Kanya Bhagyashree Yojana Benefits । माझी कन्या भाग्यश्री योजना आवश्यक कागदपत्र । Majhi Kanya Bhagyashree Yojana Required Documents । माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 सुधारित योजनेची कार्यपद्धती । Procedure of Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 Revised Scheme । माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज करण्याची प्रक्रिया । Majhi Kanya Bhagyashree Yojana Application Process ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

माझी कन्या भाग्यश्री योजना । (Majhi Kanya Bhagyashree Yojana)

महाराष्ट्र सरकार राज्याच्या नागरिकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना आणि सेवा राबवीत असते, याच धोरणाला अनुसरून राज्यातील मुलींसाठी राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु केली, या योजनेच्या माध्यामतून महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शक्षण व आरोग्य यांच्या मध्ये सुधारणा करणे मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे, याचबरोबर समाजामध्ये मुलींच्या जन्मा विषयीचे नकारत्मक विचारांमध्ये सुधारणा करून मुलींच्या विषयी सकारात्मक विचार निर्माण करणे तसेच बाल विवाह रोखणे आणि मुला इतकाच मुलींचा जन्म दर वाढविणे हा उद्देश समोर ठेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यात 2014 मध्ये सुकन्या योजना सुरु करण्यात आली आहे, सुकन्या योजनेचा लाभ 1 जानेवारी 2014 पासून जन्मणाऱ्या मुलींना करिता लागू आहेत.

याच प्रमाणे केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ हि योजना फेब्रुवारी 2014 पासून सुरु केली आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये हि योजना लागू करण्यात आली आहे. सदर योजनेसाठी भारतातील शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती, यानंतर सुकन्या योजनेचे लाभ कायम ठेऊन माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित हि योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून सुरु करण्यात आली. वाचक मित्रहो या लेखामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 संबंधित संपूर्ण माहिती देत आहोत, यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, शासनाचा निर्णय, पात्रता, अर्ज करण्याची पद्धत आणि योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे इत्यादी माहित आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती

महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देण्यासाठी त्याचबरोबर शिक्षणाची खात्री देणे आणि मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे, यासाठी 1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा राज्यामध्ये शुभारंभ केला, हि योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व दारिद्य रेषेखाली येणाऱ्या कुटुंबात जन्माला येणाऱ्या दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे दारिद्र्य रेषेवरील (APL) कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सुद्धा या योजनेचा काही प्रमाणात लाभ देण्यात येणार आहे. शासनाच्या वित्त विभागाने सुचविल्याप्रमाणे 1 एप्रिल 2016 लागू करण्यात आलेली माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये अमुलाग्र बदल करून शासन निर्णयानुसार अधिक्रमित करून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.50 लाख रुपये पर्यंत आहे आशा समाजातील सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात येत आहे.

या योजनेमध्ये ज्या मातेने किंवा पित्याने एका मुलीच्या जन्मा नंतर लगेच एक वर्षाच्या आत परिवार नियोजन केले आहे, अशा कुटुंबातील मुलीच्या नावाने 50,000/-रुपये सरकार व्दारा बँक मध्ये जमा केले जाईल, त्याचप्रमाणे या योजने मध्ये ज्या माता किंवा पित्याने
दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर लगेच परिवार नियोजन केले आहे, त्यांना परिवार नियोजन केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावाने शासनाकडून 25000/–25000/- रुपये बँकेमध्ये जमा केले जाईल. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत महाराष्ट्रातील एका व्यक्तीच्या दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळेल, या योजनेच्या अंतर्गत सुरवातील ज्या दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख पर्यंत होते त्याच कुटुंबाना या योजनेचा लाभ देण्यात येत होता. शासनाच्या नवीन निर्णयानुसार या योजनेच्या अंतर्गत मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढऊन एक लाखावरून 7.5 लाख रुपये करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत या योजने अंतर्गत अधिकचे लाभ देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.

योजनामाझी कन्या भाग्यश्री योजना
योजनेची सुरुवात1 एप्रिल 2016
राज्यमहाराष्ट्र
अधिकृत वेबसाईटmaharashtra.gov.in
लाभार्थीराज्याच्या मुली
उद्देशमुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे
विभागमहिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र
व्दारा सुरु केलीमहाराष्ट्र सरकार

माझी कन्या भाग्यश्री योजना उद्दिष्टे । Majhi Kanya Bhagyashree Yojana Objectives

महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 सुरु करण्याचा उद्देश मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारत्मक विचार निर्माण करणे, लिंग निवडीस प्रतिबंध घालणे तसेच मुलींच्या शिक्षणाविषयी समाजाला प्रोत्साहन देणे, समाजामध्ये परंपरेनुसार मुलाच्या जन्मावर आनंदोत्सव साजरा केल्या जातो परंतु मुलींच्या जन्मानंतर असे घडत नाही, जनमानसाची हि मुलींबद्दलची मानसिकता बदलविणे आणि त्यांना मुलींचे योग्य पालनपोषण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जाते, या योजने अंतर्गत मिळणाऱ्या आर्थीक मदतीव्दारे मुलीनी आपले शक्षण पूर्ण करावे जेणेकरून पुढे निर्माण होणारी मातांची पिढी हि शिक्षित होईल आणि त्यामुळे पुढे येणारी त्यांची मुले व मुली आरोग्यसंपन्न आणि शिक्षित निर्माण होईल व त्यामुळे मुलगा आणि मुलगी हा भेदभाव कमी होण्यास मदत होईल, हा शासनाचा उद्देश आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र योजनेचा उद्देश राज्यातील विषम लिंगअनुपात सुधारणे त्याच बरोबर मुलींचे प्रमाण वाढविणे, आणि तसेच मुलींच्या शिक्षणामध्ये या आर्थिक मदतीचा उपयोग करता येईल, या योजनेंतर्गत आर्थिक मदत देऊन मुलींना शिक्षित आणि स्वयंपूर्ण बनविणे हा उद्देश शासनाचा आहे.

  • माझी कन्या भाग्यश्री योजनेचे आणखी काही उद्देश
    लिंग निवडीस प्रतिबंध करणे
    बालिकांचा जन्मदर वाढविणे
    मुलींच्या जीवनमानाबद्दल खात्री देणे
    मुलींचा समान दर्जा आणि शैक्षणिक प्रोत्साहनाकारीता समाजात कायमस्वरूपी सामुदायिक चळवळ निर्माण करणे
    मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे
  • सामाजिक महत्वाच्या संस्था म्हणून पंचायती राज संस्था, शहरी स्थानिक समित्या आणि स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांना या योजनेसाठी प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय महिला मंडळे, महिला बचत गट व युवक मंडळ यांचा सहभाग वाढविणे.
  • जिल्हा, तालुका आणि निम्नस्तरावर विविध संस्था व सेवा देणारे विभाग यांचा समन्वय घडवून आणणे. Maharashtra Majhi Kanya Bhagyashree Yojana (Features): योजनेचे स्वरूप देशातील मुलींचे सबळीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सुरवातीला बेटी बचाओ बेटी पाढाओ हि योजना सुरु केली होती, या योजनेसाठी भारतातील शंभर जिल्हांची निवड करण्यात आली होती, यामध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशीम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, व जालना या दहा जिल्हांची निवड करण्यात आली होती. या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुकन्या योजना राज्यामध्ये लागू केली होती, त्यानंतर या योजनेमध्ये अमुलाग्र बदल करून सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आली.

माझी कन्या भाग्यश्री योजना हि नवीन सुधारित योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाणार आहे, या योजनेच्या अंतर्गत समाजातील सर्व वर्गातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे, तसेच शासनच्या नवीन नियमानुसार दारिद्र्य रेषेवरील (APL) पांढरे रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींना सुद्धा या योजनेचा फायदा मिळणार आहे, या योजनांतर्गत सुरवातीला मुलगी सहा वर्षाची असतांना जमा रक्कमेच्या व्याजाची धनराशी मिळेल, या नंतर दुसऱ्या वेळेस मुलगी बारा वर्षाची झाल्यावर व्याजाची रक्कम मिळेल, तसेच मुलगी पूर्ण अठरा वर्षाची झाल्यावर तिला पूर्ण धनराशी मिळेल. योजनेमध्ये मुलगी आणि तिची माता याच्या नावाने बँकेमध्ये संयुक्त सेविंग खाते उघडण्यात येईल ज्यामध्ये सरकार व्दारा वेळोवेळी धनराशी जमा केल्या जाईल. महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मध्ये मुलीची शैक्षणिक पात्रता कमीतकमी दहावी असणे आवश्यक आहे.

Maharashtra Majhi Kanya Bhagyashree Yojana Features

देशातील मुलींचे सबळीकरन करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सुरवातीला बेटी बचाओ बेटी पाढाओ हि योजना सुरु केली होती, या योजनेसाठी भारतातील शंभर जिल्हांची निवड करण्यात आली होती यामध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशीम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, व जालना या दहा जिल्हांची निवड करण्यात आली होती. या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुकन्या योजना राज्यामध्ये लागू केली होती, त्यानंतर या योजनेमध्ये अमुलाग्र बदल करून सुधारित माझी कन्या भाग्यश्री हि योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आली,

माझी कन्या भाग्यश्री योजना हि नवीन सुधारित योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाणार आहे, या योजनेच्या अंतर्गत समाजातील सर्व वर्गातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे, तसेच शासनच्या नवीन नियमानुसार दारिद्र्य रेषेवरील (APL) पांढरे रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींना सुद्धा या योजनेचा फायदा मिळणार आहे, या योजनांतर्गत सुरवातीला मुलगी सहा वर्षाची असतांना जमा रक्कमेच्या व्याजाची धनराशी मिळेल, या नंतर दुसऱ्या वेळेस मुलगी बारा वर्षाची झाल्यावर व्याजाची रक्कम मिळेल, तसेच मुलगी पूर्ण अठरा वर्षाची झाल्यावर तिला पूर्ण धनराशी मिळेल. योजनेमध्ये मुलगी आणि तिची माता याच्या नावाने बँकेमध्ये संयुक्त सेविंग खाते उघडण्यात येईल ज्यामध्ये सरकार व्दारा वेळोवेळी धनराशी जमा केल्या जाईल.

महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मध्ये मुलीची शैक्षणिक पात्रता कमीतकमी दहावी असणे आवश्यक आहे, आणि मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता व नियम । Majhi Kanya Bhagyashree Yojana Eligibility and Rules

सुकन्या योजना माझी कन्या भाग्यश्री योजने मध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे सुकन्या योजनेच्या अटी आणि नियम हे माझी कन्या भाग्यश्री योजनेला लागू राहतील त्याचप्रमाणे सुकन्या योजनेमधील मुलींना माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये सामाविष्ट करण्यात आले आहे.
या योजनेच्या अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतेवेळी मातेने किंवा पित्याने परिवार नियोजनाचा दाखला सादर करणे आवश्यक आहेयोजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलींचे वडील महाराष्ट्राचे कायम निवासी असणे आवश्यक आहे योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज करतांना मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
योजनेमध्ये दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या तर त्या या योजनेस पात्र राहतील.या योजनेच्या अंतर्गत अठरा वर्षांनी मिळणारी डीपॉझीट केलेली मूळ रक्कम आणि त्यावर मिळणारी व्याजाची रक्कम प्राप्त करण्यासाठी मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण असले पाहिजे त्याचबरोबर मुलगी कमीतकमी दहावी उतीर्ण असणे आवश्यक आहे आणि मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे.
हि योजना दारिद्र्य रेषेखालील (BPL) तसेच दारिद्र्य रेषेवरील (APL) कुटुंबात जन्मणाऱ्या दोन मुलींना लागू असेल तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.एखाद्या कुटुंबाने अनाथ मुलीला दत्तक घेतले असेल तर त्या मुलीला त्या कुटुंबाची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ तिला मिळण्यात येईल, त्याचप्रमाणे बालगृहातील अनाथ मुलींसाठी हि योजना लागू राहील.

  • या योजनेमध्ये दोन प्रकारामध्ये योजनेचा लाभ मिळविता येतो एका मुलीच्याजन्मानंतर कुटुंबामध्ये मातेने किंवा पित्याने परिवार नियोजन करणे आणि तसेच दुसऱ्या प्रकारामध्ये दोन अपत्यांच्या जन्मानंतर परिवार नियोजन करणे आवश्यक आहे.
  • ज्या लाभार्थींचे खाते जनधन योजनेंतर्गत आहे त्यांना जनधन योजनेंतर्गत असणारे लाभ आपोआप मिळू शकतील, हि योजना आधारसोबत जोडण्यात येईल. योजनेच्या ठराविक मुदतीपूर्वी मुलीचा विवाह झाल्यास किंवा मुलगी दहावी उतीर्ण नसल्यास या योजनेचा लाभ मुलीच्या पालकांना होणार नाही आणि मुलीच्या नवे बँक खात्यामध्ये असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाच्या नावाने असणाऱ्या खात्यामध्ये जमा होईल.
  • माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 सुधारित या योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2017 जन्मलेल्या तसेच त्यानंतर जन्मलेल्या मुलींना लागू राहील. परंतु ज्या परिवारामध्ये एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना 1 ऑगस्ट 2017 पासून लागू करण्यात येत आहे. ज्या कुटुंबांना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पूर्वी एक मुलगी आहे व दिनांक 1 ऑगस्ट 2017 नंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास व माता किंवा पित्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर फक्त दुसऱ्या मुलीला रुपये 25,000/- इतका योजनेचा लाभ देय राहील.ज्या परिवारामध्ये पहिले अपत्य मुलगी आहे व दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास तिला हा लाभ देय राहील, परंतु तिसरे अपत्य जन्मल्यास त्यास हा लाभ अनुदेय नसेल. तिसरे अपत्य झाल्यास पहिल्या एक किंवा दोन अपत्यांचे लाभही बंद होतील.
  • या योजनेच्या अंतर्गत जर मुलीचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला तर मुलीच्या नावाने गुंतविण्यात आलेली मुदत ठेवीची रक्कम ठराविक मुदत संपल्यानंतर मुलीच्या पालकांना देण्यात येईल.या योजनेमध्ये प्रत्येक मुलीच्या नावाने स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येईल, तसेच मुलीच्या नवे रक्कम बँकेत जमा केल्यानंतर बँकेकडून देण्यात आलेल्या मूळ गुंतवणूक प्रमाणपत्राची प्रत लाभार्थ्यास देण्यात यावी व त्याची झेरॉक्स शासकीय कार्यालयात जमा करून ठेवण्यात यावी.योजनेच्या अंतर्गत अठरा वर्षांनी मुलीला मिळणारी एक लाख विम्याची रक्कम या धनराशीतून किमान 10,000/- रुपये मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करण्यात यावी, जेणेकरून मुलीला कायमस्वरूपी स्वावलंबी होता येईल.
  • ज्या कुटुंबाला एका मुलीच्या जन्मानंतर माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्यांनी एका वर्षाच्या आत कुटुंब नियोजन करून त्याचा प्रमाणपत्र संबंधित शासनच्या अधिकाऱ्या कडे अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी दोन मुलींनंतर सहा महिन्याच्या आत परिवार नियोजन शस्त्रक्रिया केली आहे, ते या योजनेचा लाभ मिळविण्यास पात्र राहतील.

महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना लाभ । Majhi Kanya Bhagyashree Yojana Benefits

महाराष्ट्र राज्यात सुरुवातीला असलेल्या सुकन्या योजनेचे लाभ कायम ठेऊन नवीन सुधारित माझी कन्या भाग्यश्री हि योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे, या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना अधिक लाभ देण्यात येणार आहेत, हि योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविली जाणार आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत दोन प्रकारच्या लाभार्थ्यांना लाभ मिळविता येतो.

  • लाभार्थी एक प्रकारामध्ये कुटुंबामध्ये एक मुलगी आहे व मातेने कुटुंब नियोजन केले आहे
  • लाभार्थी प्रकार दोनमध्ये कुटुंबामध्ये एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना योजनेचा लाभ देय राहील, परंतु ज्या कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये आहेत त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून नवीन निर्णयाप्रमाणे ज्या परिवारचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपये पर्यंत आहे अशा समाजातील सर्व नागरीकांसाठी लागू करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ खालीलप्रमाणे राहील.
  • पहिल्या प्रकारामध्ये कुटुंबामध्ये एका मुलीनंतर, मातेने किंवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून मिळणारी अनुदानाची रक्कम रुपये 50,000/- राष्ट्रीयकृत बँकमध्ये मुदत ठेव योजनेत गुंविण्यात येईल.
  • यानंतर बँकेमध्ये मुलीच्या नावे मुदत ठेवीत गुंतविलेले 50,000 रुपये रकमेवर सहा वर्षात देय असलेले फक्त व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल.
  • पुढे पुन्हा मुद्दल 50,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले फक्त व्याज वयाच्या बाराव्या वर्षी मुलीला काढता येईल
  • त्यांनंतर पुढे पुन्हा 50,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले व्याज प्लस मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी मुलीला काढता येईल.
  • कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यांनंतर माता किंवा पित्याने परिवार नियोजन शस्त्रक्रिया केली असेल आणि तसे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच 50,000/- रुपये एवढी रक्कम मुलीच्या नावाने जमा केल्या जाईल आणि अशा प्रकारे बँकमध्ये मुदत ठेवीमध्ये जमा केलेल्या रकमेवर त्यावेळी मुलीच्या वयानुसार देय असलेली व्याजाची रक्कम मुलीला मिळण्यात येईल.
  • दुसऱ्या प्रकारामध्ये कुटुंबामध्ये दोन मुलीनंतर मातेने किंवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून देय असलेली अनुदानाची रक्कम पहिल्या आणि दुसऱ्या मुलीच्या नावाने प्रत्येकी रुपये 25,000/- याप्रमाणे 50,000/- रुपये एवढी रक्कम दोन्ही मुलींच्या नावाने बँकेमध्ये मुदत ठेव योजनेमध्ये गुंतविण्यात येईल.
  • त्यानंतर बँकेमध्ये मुलीच्या नावे मुदत ठेवीत गुंतविलेले 25,000 रुपये रकमेवर सहा वर्षात देय असलेले फक्त व्याज मुलीला वयाच्या साहव्या वर्षी काढता येईल.
  • पुढे पुन्हा मुद्दल 25,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले फक्त व्याज वयाच्या बाराव्या वर्षी मुलीला काढता येईल
  • त्यांनंतर पुढे पुन्हा 25,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले व्याज प्लस मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी मुलीला काढता येईल.
  • कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यांनंतर माता किंवा पित्याने परिवार नियोजन शस्त्रक्रिया केली असेल आणि तसे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच 25,000/- रुपये एवढी रक्कम मुलीच्या नावाने जमा केल्या जाईल आणि अशा प्रकारे बँकमध्ये मुदत ठेवीमध्ये जमा केलेल्या रकमेवर त्यावेळी मुलीच्या वयानुसार देय असलेली व्याजाची रक्कम मुलीला मिळण्यात येईल.

माझी कन्या भाग्यश्री योजना आवश्यक कागदपत्र । Majhi Kanya Bhagyashree Yojana Required Documents

  • लाभार्थी मुलीचे पालक महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे, पालकाचे अधिकृत राहिवासी प्रमाणपत्र
  • मुलींचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
  • लाभार्थी कुटुंबाने योजनेसाठी अर्ज करतेवेळी एका मुलीनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र
  • योजनेसाठी अर्ज कारणाना लाभार्थी कुटुंबाने दोन मुलींच्या नंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • BPL श्रेणी रेशनकार्ड
  • मिळकत प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे मोबाइल नंबर
  • मुलीचे व मातेचे बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 सुधारित योजनेची कार्यपद्धती । Procedure of Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 Revised Scheme

माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेंतर्गत, मुलीचा जन्म झाल्यावर या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र मुलीच्या पालकांनी सबंधित ग्रामीण किंवा नागरी क्षेत्रातील नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका मध्ये जाऊन मुलीच्या जन्माची नोंद करावी.

मुलीच्या जन्माची नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी पालकांनी त्या विभागातील अंगणवाडी सेविकाकडे प्रपत्र-अ किंवा प्रपत्र-ब मध्ये अर्ज सादर करावा आणि योजनेला आवश्यक असलेले सर्व कागदपत्र अर्जासोबत जोडावे तसेच अंगणवाडी सेविकेने लाभार्थी पालकांकडून अर्ज भरून ध्यावा आणि अर्ज भरण्यास मदत करावी. या योजनेस आवश्यक असणारी सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, तसेच जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतील.

यानंतर अंगणवाडी सेविकेने योजनेचा अर्ज मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावा आणि मुख्य सेविका यांनी योजनेच्या अर्जांची पूर्ण पडताळणी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण बाल विकास प्रकल्प अधिकारी तेसेच अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी महिला व बाल विकास अधिकारी आणि जिल्हा परिषद, यांना एकत्रित यादी मान्यतेसाठी सादर करावी. अनाथ मुलींच्या बाबतीत या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर करण्याआधी सबंधित बाल कल्याण समिती यांचे मुलगी अनाथ असल्याचे प्रमाणपत्र सबंधित संस्थांनी प्राप्त करून घेऊन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्जदारांनी पूर्ण माहितीसह भरून दिलेले अर्ज कागदपत्रांसह वर नमूद केलेल्या सबंधित अधिकाऱ्यांनी मुलींच्या जन्मानंतर एका मुलीनंतर कटुंब नियोजन करणाऱ्या पालकांच्या बाबतीत एक वर्षाच्या आत आणि दोन मुलीवर कुटुंब नियोजन करणाऱ्या पालकांच्या बाबतीत सहा महिन्याच्या आत कुटुंब नियोजन केल्याचा दाखला जोडून सादर केलेले अर्ज स्वीकारावे, त्याचप्रमाणे अर्ज संपूर्ण भरला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रांसह सादर केला नसल्यास, अर्ज मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत अर्जदारास लेखी कळविण्यात यावे आणि वरील मुदती व्यतिरिक्त आणखी एक महिन्याची वाढीव मुदत देण्यात यावी, परंतु यानंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज दोन महिन्यापेक्षा जास्त काळ प्रलंबित ठेवता येणार नाही.

प्रधानमंत्री जनधन योजना बँक बचत खाते । Pradhan Mantri Jan Dhan Yojana Bank Savings Account

प्रधानमंत्री जनधन योजना, या योजने अंतर्गत लाभार्थी मुलगी आणि तिची माता याच्या नावाने संयुक्त बचत खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यात येईल तसेच या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना एक लाख रुपये अपघात विमा आणि पाच हजार रुपये ओव्हरड्राफ्ट आणि इतर लाभ देण्यात येतात. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत देण्यात येणारे लाभ लाभार्थ्यांच्या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत उघडलेल्या बँक बचत खात्यात देण्यात येईल. प्रधानमंत्री जनधन बचत खाते उघडण्यासाठी अर्जदारास अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका मदत करतील.

माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज करण्याची प्रक्रिया । Majhi Kanya Bhagyashree Yojana Application Process

महाराष्ट्र राज्यातील ज्या पात्र पालकांना माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट Official Website वर जाऊन माझी कन्या भाग्यश्री योजना चा एप्लिकेशन फॉर्म PDF डाऊनलोड करावा लागेल, अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती संपूर्ण तपशीलवार माहिती भरून आणि अर्जाला सर्व आवश्यक कागदपत्र जोडून, अर्ज संबधित महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल, अशा प्रकारे आपली माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

माझी कन्या भाग्यश्री योजना FAQ On Majhi Kanya Bhagyashree Yojana

Q. माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे ?

मुलींच्या संख्येमध्ये सुधार करणे, मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे त्याचबरोबर त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि मुलींना पुढील जीवनात स्वावलंबी बनविणे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने हि योजना संपूर्ण राज्यात सुरु केली आहे.

Q. माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हा सुरु झाली ?

महाराष्ट्र राज्यात सुरवातील सुकन्या योजना सुरु करण्यात आली होती त्या योजनेमध्ये संपूर्ण बदल करून अधिक लाभासहित माझी कन्या भाग्यश्री सुधारित हि योजना 1 ऑगस्ट 2017 पासुन सम्पूर्ण राज्यात राबविली जात आहे.

Q. माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये मिळणारी धनराशी मुलीला केव्हा मिळते ?

या योजनेंतर्गत ठराविक रक्कम मुलींच्या नावे बँकेमध्ये मुदत ठेवीमध्ये गुंतवली जाते आणि सुरवातीला मुलीच्या वयाच्या सहाव्या वर्षी त्यानंतर बाराव्या वर्षी गुंतविल्या रकमेवरचे फक्त व्याज आणि नंतर मुलगी अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर मुदत ठेवीची संपूर्ण रक्कम व्याजासह मुलीला देण्यात येते.

Q. माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र पालकांनी ऑनलाइन फॉर्म PDF डाऊनलोड करून किंवा योजनेच्या सबंधित कार्यालयात जाऊन योजनेचा अर्ज घेऊन आपल्या विभागातील अंगणवाडी सेविकेच्या मदतीने संपूर्ण अर्ज तपशीलवार भरून अर्जाला आवश्यक कागदपत्रे जोडून योजनेच्या सबंधित महिला व बाल विकास कार्यालयात जमा करावा.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )