।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
मुलगी पसंत आहे.
त्या दोघांचा ब्रेक अप झाला होता. त्याला अजुन नोकरी लागायची होती, पण ती थांबायला तयार नव्हती. शेवटी ती त्याला सोडून गेली आणि तो सतत तिला आठवून रडत राहायचा. प्रेम, विश्वास, भावना यावरचा विश्वास उडून गेला होता त्याचा.
त्या गोष्टीला ३ वर्ष झाली, पण त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. घरचे तर नेहमी मागे लागायचे पण हा नेहमी टाळाटाळ करायचा.
पण एकदा त्याची आई त्याला न विचारताच मुलीकडच्याना बोलावते. तो येतो ऑफीस मधून सगळे बसलेलेच असतात….
सगळे समोर असल्यामुळे तो टाळाटाळ न करता तेथे गप्प बसतो. मुलीकडे पाहायची तर इच्छा नसते, पण घरचे सगळे खुपच आग्रह करतात. बोलण्यासाठी बाहेर घेऊन जाण्याचा आग्रह करतात आणि दुसऱ्या दिवशी दोघांची भेट ठरवतात.
कसा तरी तिला नकार द्यायचा हाच विचार तो रात्र भर करत असतो. दुसऱ्या दिवशी ते भेटतात. संध्याकाळचे ४ वाजले असतात. तेवढयात त्याला ऑफीस मधून फोन येतो. तसा ही त्याला तिला नकार द्याचा असतो. बोलण्याची पण इच्छा नसते, म्हणून तो तिला बोलतो, “मला ऑफीस मध्ये जरा थोडा वेळ काम आहे, तुमची हरकत नसेल तर आपण जाऊया का… ?
” ती” ठीक आहे” दोघेही टॅक्सीत बसतात. पूर्ण वेळ शांतच. कोणीच काहीच बोलत नाही. ऑफीस येतं. ते बिल्डिंगजवळ येतात. तो तिला म्हणतो वर चल… पण ती म्हणते उगीच ऑफीस मधले गैर समज करतील. मी थांबते खाली तूम्ही या जाऊन आणि तो जातो.
तो ऑफीस मध्ये जातो… काम करत असतो. त्याचे साहेब त्याला बोलावतात आणि त्याला प्रमोशनचं लेटर देतात आणि बाहेर देशात जाण्याची संधी पण आहे असं सांगतात. तो खूपच खुश होतो. नंतर त्याचे साहेब बोलतात की आलाच आहेस तर आता मला एक प्रेज़ेंटेशन तयार करून दे. . मला लवकरात लवकर ते इमेल करायचं आहे. तो साहेब नाराज होतील म्हणून तयार होतो आणि लागतो कामाला. ती खाली वाट बघत आहे हे तो विसरुनच जातो.६ वाजतात नंतर ७… ८… ८:३० फाइनली त्याचा प्रेज़ेंटेशन तयार होतं. तो जातो साहेबांना द्यायला. ते पण खुश होतात साहेब “जा आता घरी जा आणि घरच्याना पण आनंदाची बातमी दे.” ते ही वाट बघत असतील ना?
त्याला अचानक आठवतं… तो तिला खालीच सोडून आला होता आणि या प्रेज़ेंटेशन मुळे विसरूनच गेला होता. ती गेली असेल निघून असाही त्याला वाटत, पण जर थांबली असेल तर…
तो लगेच निघतो तिथून. मन खूपच अस्वस्थ असतं त्याचं. तो गेट बाहेर येतो… पाहतो तर काय. ती असते एका आडोशाला उभी… त्याला काय बोलाव सुचत नाही.
तो “सॉरी गं मी विसरुनच गेलो होतो… मला वाटला तू गेली असणार. तू गेली का नाहीस…? मला फोन तर करायचा ना.
“ती “अरे तूम्हीच तर बोलला की, थोडा वेळ काम आहे म्हणून. मला वाटलं, याल लगेच आणि फोन करायला तुमचा नंबर आहे का माझ्याकडे. मनात आलं, तुमच्या घरी तुमच्या बाबांना विचारावा नंबर… पण मग ते तुम्हालाच ओरडले असते. नंतर माझ्या घरच्याना विचारलं असतं, तर त्यांच्यापण मनात तुमच्या विषयी गैर समज झाला असता. वर यावसं वाटलं, पण परत ऑफीस मधे तुम्हाला डिस्टर्ब होईल म्हणून नाही आले. आणि तूम्ही बोलला होताना.. येतो. मग थांबले तुमची वाट बघत.
तिला काय उत्तर द्यावं, हेच समजत नव्हत त्याला. पण तीचं मन आवडलं त्याला. तो म्हणाला “मला आवडली तू.
” ती” अरे पण असं आचानक. आपण अजुन काही बोललो पण नाही. तू ओळखतही नाही मला अजुन नीट… लगेच असं ठरवायचं कारण.. ?
” तो” हो कारण आहे. पण मला एक सांगायच आहे तुला. मी एका मुलीवर खूप प्रेम करत होतो. ती ही करत होती. पण लग्नासाठी ती तयार नव्हती. तिला माझ्या प्रेमा सोबत. माझे पैसे नाव प्रसिद्धी हे सगळं ही हवं होतं. पण तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. मी तिच्याकडून थोडा वेळ मागितला. पण तो ही ती द्यायला तयार नव्हती.. शेवटी गेली ती सोडून मला. त्यानंतर मला प्रेम आणि विश्वास सर्व निरार्थक वाटू लागलं. म्हणून मी नेहमी लग्नाला टाळाटाळ करायचो.
तुला ही नकार द्याचा हेच ठरवल होतं आधीच. पण आज जे झालं, त्याने माझे डोळे उघडले. जिच्यावर मी इतकं प्रेम करत होतो, तीने मला कधी वेळ दिलाच नाही. आणि आज माझ्या फक्त एका शब्दावर तू इतका वेळ थांबलीस, आणि मी विसरलो होतो… हे ऐकून सुद्धा तू मला समजून घेतलस. कदाचित प्रेम होण्याला अजुन वेळ असेल आपल्यात. पण मला तुझा स्वभाव आवडला. ते पुरेसं आहे आपल्या संसारसाठी…. हो ना….?”
“जर तुलाही मी आवडलो असेल तर…. सांग? ?”
ती हळूच लाजेने नजर खाली घेते. त्याला तिचं उत्तर समजतं, तो आईला फोन करतो आणि बोलतो. “मला मुलगी पसंत आहे”…!
मित्रांनो आपण कोणावर प्रेम करतो, ते तर महत्वाचे आहेच… पण आपल्यावर कोणी प्रेम करत असेल आणि ती आपल्याला समजून घेऊन आपली कदर करत असेल, तर अशी व्यक्ती आपल्या साठी जास्त महत्वाची आहे. कारण अशाच व्यक्ती सोबत आपण नेहमी आयुष्यभर आनंदी राहू शकतो.