मोहरी तेलाचे फायदे । Mohari Tel । Mustard Oil Benefits

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

मोहरी तेल अर्थात राई तेल (Mustard Oil Benefits)

हिवाळ्यात मोहरीच्या तेलाचा वापर जेवणात करा किंवा औषधाच्या रुपात, हे प्रत्येक रुपात फायदेशीर ठरते. मोहरीच्या तेलात असे अनेक पोषकतत्त्व असतात जे आपल्या आरोग्य, केस आणि स्किनवर फायदेशीर असतात. यामुळेच मोहरीच्या तेलाचा वापर प्राचीन काळापासुन खाण्यासाठी व शरीरावर लावण्यासाठी केला जात आहे. परंतु खुप कमी लोकांना माहिती आहे की, मोहरीचे तेल पेनकिलरचे काम देखील करते. आज आम्ही तुम्हाला मोहरीच्या तेलाचे काही रामबाण उपाय सांगणार आहोत…

मोहरीच्या तेलात वेदनाशामक गुण आहेत. जर कान दूखत असेल तर दोन थेंब मोहरीचे तेल कानात टाका, वाटल्यास तुम्ही यामध्ये दोन-चार लसुनच्या पाकळ्या देखील टाकू शकता.

मोहरीचे तेल सौंदर्यवर्धक देखील आहे. रुप आणि सौंदर्य उजवळ्यासाठी बेसन आणि हळदीमध्ये मोहरीचे तेल टाकून लावा.

मोहरीचे तेल हृदयाला निरोगी ठेवते. काही दिवासांपुर्वी हावर्ड स्कूल ऑफ मेडिकल सायंस आणि सेंट जॉन मेडिकल कॉलजमध्ये सोबतच संशोधन केले ज्यातुन समजले की, मोहरीचे तेल खाणा-या 71 टक्के लोकांना हृदयाचे आजार झाले नाही.

जर संधिवाताने त्रस्त असाल तर मोहरीच्या तेलात कापूर टाकुन या तेलाने मालिश करा. वेदनेपासुन आराम मिळेल.

जर कंबर दुखी असेल तर मोहरीच्या तेलामध्ये थोडेसे हींग, ओवा आणि लसुन टाकून गरम करा आणि ते कंबरेला लावा.

नवजात शिशु आणि त्याची आई दोघांचीही मालिश करण्यासाठी मोहरीचे तेल फायदेशीर आहे. मोहरीच्या तेलाने मालिश केल्यानंतर अंघोळ घातल्याने शिशुला सर्दी होण्याची शक्यता नसते.

त्वचेच्या रोगांसाठी देखील मोहरीचे तेल फायदेशीर आहे. या तेलामध्ये धोत्र्याच्या पानांचा रस आणि हळद टाकून गरम करा. हे थंड झाल्यावर इफेक्टेड एरियावर लावा. डाग, खाज, रॅशेश दूर होतील.

जर चेह-यावर ब्लॅकहेड्स, पिंपल्स , सुरकूत्या असतील तर मोहरीचे तेल खुप फायदेशीर आहे. मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने शरीरावर सुरकूत्या पडत नाही.

मोहरीच्या तेलात थोडे हिना पावडर टाकून काही वेळ उकळा, नंतर हे गाळून केसांना लावा, केस गळतीची समस्या दूर होईल.

मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने रक्त वाढते. शरीरात स्फूर्ती येते. यामुळे शारीरिक थकावा देखील दूर होतो.

मोहरीच्या तेलात मीठ टाकून दात आणि हिरड्यांवर चोळल्याने दात मजबूत राहतात. यासोबतच हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या दूर होते.

पायांच्या तळव्यांवर मोहरीच्या तेलाने मालिश करुन झोपा, डोळ्यांची कमकुवतता दूर होईल.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )