Namo Shetkari Samman Nidhi Yojana 2023 |नमो शेतकरी सन्मान निधी 2023 |सन्मान निधी |Namo shetkari | PM Kisan Samman Nidhi Yojana|
नमस्कार ! जय महाराष्ट्र !
Namo Shetkari Samman Nidhi Yojana :
नुकतेच 9 मार्च रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये मिळतील आणि शेतकऱ्यांना १ रुपयाची पीक विमा योजना देखील मिळू शकेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये मिळतील. आणी यासह नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना महाराष्ट्र अंतर्गत ₹ 6000 रुपये देखील दिले जातील. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहेत. त्यापैकी 50% महाराष्ट्र राज्य सरकार आणि 50% केंद्र सरकार देईल. म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरमहा ₹ 1000 ची आर्थिक मदत दिली जाईल. याचा फायदा १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना होणार आहे. राज्य सरकारने 6,900 कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2023 पासून 12,000/- रुपये वार्षिक सन्मान निधी :
- प्रत्येक शेकऱ्याला केंद्र सरकार तर्फे प्रत्येक वर्षी 6,000/- रुपये PM Kisan Nidhi (पी. एम. किसान निधी) म्हणून भेटणार
- तसेच प्रत्येक महाराष्ट्रातील शेतकऱ्यास महाराष्ट्र सरकार तर्फे नमो शेतकरी महा सन्मान निधी तून प्रत्येक वर्षी 6,000/- रुपये भेटणार
- महाराष्ट्र राज्यातील 1.15 कोटी शेतकरी कुटुंबास या योजनेचा लाभ मिळणार आहे
- महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेचा 6,900/- कोटी रुपये इतका भार उचलणार आहे
नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेची ठळक वैशिष्ट्य : Namo Shetkari Samman Nidh
- नव्याने आलेल्या महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला जो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत मांडला.
- केंद्र सरकारने अमृतकाळ बजेट सादर केल्यानंतर अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास या ‘पंचामृतावर’ आजचं बजेट असल्याचं अर्थमंत्री फडणवीसांनी सांगितलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडला
नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेची उधिष्ट
भारत हा कृषीप्रधान देश आहे, देशातील 75% लोक शेती करतात, देशातील सर्व शेतकरी आर्थिकदृष्ट्या शेतीवर अवलंबून आहेत, हे लक्षात घेऊन भारत सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली आहे. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे. या योजनेद्वारे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले जीवनमान उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांना स्वावलंबी व सक्षम बनवणे. या योजनेस जोडून महाराष्ट्र सरकार तर्फे नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा समावेश केला आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेकऱ्यांना वार्षिक 12,000/- रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.
महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृधि योजना 2022
नमो शेतकरी सन्मान निधीसाठी गरजेची कागदपत्र :
- अर्जदाराकडे हेक्टरपर्यंत जमीन असावी.
- शेतजमिनीची कागदपत्रे असावीत.
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- शेतीची माहिती (शेतीचा आकार, किती जमीन आहे)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
नमो शेतकरी सन्मान निधीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा !
- महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 मध्ये नमो शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली आहे.
- या योजनेसाठी लवकरच अर्ज भरले जातील.त्यानंतर, अधिकृत वेबसाइट लिंक तयार झाल्यावर तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल.
- म्हणूनच आमच्या या वेबसाइटशी कनेक्ट रहा.आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ.
महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृधि योजना 2022 | महाराष्ट्र वृद्धावस्था पेंशन योजना