पाच पांढऱ्या लक्ष्मीवर्धक वनस्पती ज्या आपल्या घरासाठी आहेत उत्तम

लक्ष्मीवर्धक , लक्ष्मी , पांढऱ्या वनस्पती

पाच पांढऱ्या लक्ष्मीवर्धक वनस्पती

1.पांढरी रुई


हिला श्वेत मांदार असेही म्हणतात. या वनस्पतीत लक्ष्मीचा वास असतो. याची 14 वर्षे पूजा केली असता त्याच्या बुडाशी ( खोडात) गणपती तयार होतो(त्यांचा वास राहतो). अनेक अध्यात्मिक गोष्टी साठी या वनस्पतींचा उपयोग होतो….( दिंडोरी प्रणित मराठी संस्कृती मराठी अस्मिता या पुस्तकात उपयोग आहेत)


2.पांढरी कन्हेर


ही वनस्पती लक्ष्मीकारक असून हिच्या ठायी लक्ष्मीचा वास आहे. म्हणून ही वनस्पती घरात लावणे अंत्यत शुभ असते. याला शेवग्याच्या शेंग सारखी छोटीशी फल स्वरूपात शेंग येत असते . आल्यास तिची पंचोपचार पूजा करून तिजोरीत अथवा पूजेत ठेवावी.

3.पांढरी शेवंती


ही वनस्पती देवीची प्रतीक असल्याने देवीचा निवास असलेली ही वनस्पती घरात असणे हे सर्वच कार्यासाठी शुभ असते.

4.पांढरी भुईरिंगणी


हिला लक्ष्मणा असेही म्हणतात.इंद्रजित व लक्ष्मण यांच्या युद्धात लक्ष्मणाला शक्ती लागून ते बेशुद्ध पडले होते .त्यावेळेस रामभक्त हनुमानाने द्रोणागिरी आणला असता त्यात संजिविनी नामक पांढरी भुईरिंगणी लक्ष्मणाला औषध स्वरूपात दिली होती.म्हणून तिला लक्ष्मणा असेही म्हणतात.हिला वांग्यासारखे पिवळे फळ येते.
यामध्ये दोन प्रकार आहेत… वेल आणि वनस्पती…..ही वेल स्वरूपात न लावता वनस्पती स्वरूपातील लावावी.. इतर उपयोग पुस्तकात आहेत.

5.पांढरी जास्वंदी


जास्वंद ही अत्यंत औषधी वनस्पती असल्याने हीचा अनेक आजारांवर उपयोग होतो. स्त्रियांच्या आजारांसाठी विशेष गुणकारी. लाल जास्वंद जसे गणेश प्रिय आहे तशी पांढरी जास्वंद लक्ष्मी प्रिय आहे .(आणि लक्ष्मी म्हणजे नक्की काय ? तर जो हा मानव देह मनुष्याला मिळाला आहे तो सुदृढ, निरोगी असणे)
अशा या पाच वनस्पती घरात असणे अत्यंत शुभ असते.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )