विठू माऊलीचा महिमा । पंढरपूरचा महिमा । महिमा विठ्ठलाचा । चंद्रभागा । भक्त पुंडलिक । गोपाळपूर येथील कृष्ण मंदिर ।लखुबाई । नामदेव पायरी । विठ्ठल मूर्ती । विष्णुपद ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
चंद्रभागा.
वारकरी संप्रदायात चंद्रभागेला खूप महत्व आहे. आधी स्नान चंद्रभागेचे मग भगवंत कथा त्यानंतर विठ्ठलाचे दर्शन.. एक वेळेस विठ्ठलाचे दर्शन नाही झाले तरी। चालेल पण चंद्रभागेचे स्नान झाले पाहिजे. एवढे श्रेष्ठत्व चंद्रभागा नदीचे आहे. देवांनी तुकाराम महाराजांना विचारले, काय पाहिजे तुम्हाला? जे पाहिजे ते मागा… त्यावर तुकोबा म्हणाले, देवा मला काहीही नको. चंद्रभागेचे स्नान घडू दे… एवढे वारकरी संप्रदाय आणि चंद्रभागेचे जवळचे नाते आहे. भगवान शंकर ऋषींना सांगतात कि या भूतलावावरील सर्व तीर्थे रात्री बारा वाजता भक्त पुंडलिकासमोर स्नान करून पवित्र होऊन जातात. सर्व तीर्थांना पवित्र करणारे तीर्थ कोणते असेल तर ती चंद्रभागा. नुसती चंद्रभागा नदी पहिली तरी भूतलावरील सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते. सर्व दोष घालवण्याची शक्ती चंद्रभागा दर्शनात आहे. यामुळे सर्वोत्कृष्ट क्षेत्र आणि तीर्थ म्हणजे चंद्रभागा आहे.
भक्त पुंडलिक.
वारकरी संप्रदायात भक्त पुंडलिकाला आद्य स्थान आहे. भक्त पुंडलिकाचे दर्शन केल्याशिवाय विठोबाचे दर्शन रुजू होत नाही अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात. पुंडलिक मंदिरासमोर लोहदंड तीर्थ आहे कि त्यामध्ये दगडी नाव पाण्यावर तरंगते. त्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते कि गौतम ऋषींनी इंद्राला शाप दिला तेव्हा इंद्राला भग पडली. त्यातून मुक्त होण्याचा मार्गहि ऋषींनी सांगितला भूतलावार ज्या तीर्थामध्ये लोहरूपी पाषाण तरंगेल त्या तीर्था मध्ये स्नान केल्यानंतर मुक्ती मिळेल . तेव्हा फिरत फिरत इंद्रदेव दंडक अरण्यात आले असता पाषाण लोह्दंड तीर्थामध्ये तरंगला . इंद्राने त्यामध्ये स्नान केले. देव भगातून मुक्त झाला. तो पाषाण म्हणजे दगडी नाव. ती पाहण्यासाठी भाविकांबरोबर देश विदेशातून अभ्यासकही येतात.
गोपाळपूर येथील कृष्ण मंदिर.
पंढरपूर पासून दोन किलो मीटर आंतरवर असण्याऱ्या गोपाळपूर येथील कृष्ण मंदिराला खूप महत्व आहे कारण श्रीकृष्ण येथे सवंगड्या सोबत खेळला त्याने गोपाळ काला केला यामुळेच पौर्णिमे दिवशी संतांच्या पालख्या इथे येतात गोपाल काला करतात आणि आषाढी यात्रेच्या नेत्रदीपक सोहळ्याची सांगता होते याच ठिकाणी पांडुरंग संत जनाबाईला जात्यावर दळण दळू लागला इथेच जनाबाईची संसार पाहायला मिळतो या कारणांमुळे भाविक न चुकता कृष्ण मंदिराला भेट देतात जनाबाईची संसार पाहतात आणि आनंदानी गावी परत जातात
लखुबाई.
माता रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून पंढरपूरला आली आणि दिंडीर वनात लपून बसली . लपून बसली ती लखुबाई असे सांगितले जाते. लखुबाई दर्शनला भाविक आवर्जून येतात, विशेषतः महिला. त्यामागे अशी धारणा आहे कि दिंडीर वनातील लखुबाईचे अर्थात लपून बसलेल्या माता रुक्मिणीचे दर्शन घेतल्याने पतीला दीर्घायुष लाभते, संसार सुखाचा होतो. त्यामुळे महिला भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात.
नामदेव पायरी.
वारकरी संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य पूर्ण झाले तेव्हा संत नामदेव महाराजांनी विठ्ठलापाशी संजीवन समाधी घेण्याची इच्छा प्रकट केली. जेव्हा ही गोष्ट त्यांच्या परिवाराला समजली, तेव्हा आई , वडील, मुले आणि सुना यांनी त्यांच्यासमवेत समाधी घेण्याचे ठरविले. शके १२७२ आषाढ वद्य त्रयोदशी दिवशी संत नामदेव महाराजांसह त्यांच्या परिवारातील चौदाजणांनी संजीवन समाधी घेतली. संत नामदेवांनी पायरीची जागा का निवडली तर विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या संतांची चरण धूळ आपल्या अंगावर पडावी ही त्यामागील शुद्ध भावना होती म्हणून त्यांनी मंदिरा बाहेरील पायरीपाशी संजीवन समाधी घेतली कि जी आज नामदेव पायरी म्हणून प्रसिद्ध आहे भाविक प्रथम नामदेव पायरीचे दर्शन घेतात आणि मग विठ्ठल दर्शनला मंदिरात जातात .
विठ्ठल मूर्ती.
वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेनुसार विठ्ठलाची मूर्ती ना बसवली आहे, ना घडवली आहे तर ती स्वयंभू आहे. मात्र मूर्ती विज्ञान अभ्यासक ग. ह. खरे यांच्या मते मूर्ती पाचव्या शतकातील असावी. त्याबाबत एकमत नाही. आक्रमणाच्या वेळी ही मूर्ती काढून सुरक्षित ठिकाणी ठेऊन बडव्यांनी पुन्हा बसवली आहे . मूर्ती समचरण आहे देवाने कमरेवर दोन हात ठेवले आहेत कारण हा संसाररूपी भवसागर भक्तांसाठी कमरे एवढा आहे हे सांगण्यासाठी देवाने कमरेवर हात ठेवले आहेत अशी कल्पना शंकराचार्य यांनी केली आहे. कंठहार, मस्यकुंडले, डोक्यावर किरीट आहे आणि जो महादेवाच्या पिंडीसारखा आहे अशी आख्यायिका सांगितली जाते कि भगवान शंकर विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले तेव्हा मस्तकावर विराजमान झाले हातात कमळ आहे कारण कृष्ण अवतारात दैत्यांचा संहार केल्यानंतर कृष्णाने शस्त्रे खाली ठेवली कृष्णाचा दुसरा अवतार म्हणजे पांडुरंग त्यामुळे कृष्णाने भक्तांच्या स्वागतासाठी कमळ हातात घेतले आहे पांडुरंगाची मूर्ती सुंदर आहे म्हणून देवाला मदनाचा पुतळा म्हंटले जाते
विष्णुपद
पंढरपूर पासून दोन किलोमीटर अंतरावर चंद्रभागा नदी पात्रात विष्णुपद मंदिर आहे अशी आख्यायिका सांगितली जाते कि पंढरपूर अस्तित्वात येण्याआधी इथे गयासुर नावाचा राक्षस राहत होता जो तपस्वी होता त्याच्या दर्शनाने अबाल वृद्ध महापातकी यांचा उद्धार व्हायचा त्यामुळे यमलोकी कोणी जात नसे यावर यमाने देवाकडे याचना केली कि अस होत राहिले तर यमलोकी कोणीही येणार नाही त्यावर ब्रह्मदेवाने विष्णूच्या मदतीने गयासुराला पाताळात गाढले त्यामुळे जिते विष्णू चरणाचा स्पर्श झाला ते विष्णुपद तसेच इथे कृष्णचरण आहेत माता रुक्मिणी रुसून पंढरपुरा आली तेव्हा तिला शोधात आलेल्या कृष्णानी इथे गोपाळकाल केला बासरी वाजवली म्हणून कृष्णचरण पाहायला मिळतात ज्ञानोबा माउलीने संजीवन समाधी घेतली तेव्हा व्यथित होऊन भगवान पांडुरंग मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपदाला वास्तव्यासाठी आले त्यामुळे आजही मार्गशीर्ष महिन्यात देवाचे वास्तव्य विष्णुपदाला असते असे मानले जाते मंदिरातील सर्व नित्योपचार मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपदावर केले जातात या सर्व कारणांमुळे भाविक भक्तांच्या दृष्टीने विष्णुपदाचे अनन्य साधारण महत्व आहे म्हणूनच भाविक दर्शनाकरित न चुकता विष्णुपदला येतात.