जाणून घ्या पपनस लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Papanas Lagwad) – Pomelo Farming

पपनस पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार | Papanas Sheti । पपनस पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन | पपनस पिकास हवामान आणि पपनस पिकास लागवड योग्य जमीन | पपनस पिकाच्या सुधारित जाती | पपनस पिकाची अभिवृद्धी आणि पपनस पिकाची लागवड पद्धती | पपनस पीक लागवड हंगाम | पपनस पीक लागवडीचे अंतर | पपनस पिकास वळण आणि पपनस पिकास छाटणी | पपनस पिकास खत व्यवस्थापन | पपनस पिकास पाणी व्यवस्थापन | पपनस पिकातील आंतरपिके | पपनस पिकातील आंतरमशागत | पपनस पिकातील तणनियंत्रण | पपनस पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण | पपनस पिकातील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण | पपनस पिकाच्या फळांची काढणी आणि पपनस पिकाचे उत्पादन | पपनस पिकाच्या फळांची साठवण, पपनस फळे पिकविण्याच्या पद्धती आणि विक्री |

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

पपनस लागवड : (Pomelo Farming)

लिंबूवर्गातील पपनस प्रकार अनेक ठिकाणी लागवडीखाली आहे. महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात याची लागवड आहे. सिट्स ग्रैंडीस आणि सिट्स मॅक्झिमा या प्रकारांना पपनस असे म्हणतात. पमेलो नावानेही काही ठिकाणी या फळास संबोधिले जाते. उष्ण कोरडे हवामान या पिकास मानवत असले तरी उष्ण व दमट हवामानातही हे तग धरू शकते. गर व रस खाण्यासाठी, पेय तयार करण्यासाठी, लोणचे करण्यासाठी या फळाचा वापर करतात. मोठ्या शहरातून तसेच पेक्टीन लोणची करण्यासाठी हे फळझाड वाढविण्यास वाव आहे. या घटकाच्या अभ्यासानंतर आपल्याला पननसाचे व्यापारी महत्त्व सांगता येईल. पपनसच्या उत्पादनासाठी येणाऱ्या अडचणी सोडविता येतील.

पपनस पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार :

उगमस्थान :

पपनस फळझाडाचे उगमस्थान दक्षिण चीन भागातील आहे.

महत्त्व :

पपनस फळे व रस खाण्यासाठी, पेक्टीन, सरबते, तसेच लोणची करण्यासाठी वापरतात.

भौगोलिक प्रसार :

दक्षिण चीनमधून या झाडाचा प्रसार भारत, म्यानमार, जपान, फ्लोरिडा, स्पेन, इटली, इत्यादी देशांत झाला आहे.

पपनस पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन :

या फळझाडाखाली फारसे क्षेत्र नाही. ठाणे जिल्ह्यांत तसेच नजीकच्या गुजरात भागात तुरळक लागवड आहे. अंदाजे क्षेत्र 100 हेक्टर असून वर्षाला 1,000 टन उत्पादन मिळते.

पपनस पिकास हवामान आणि पपनस पिकास लागवड योग्य जमीन :

या पिकास समशीतोष्ण प्रकारचे हवामान मानवते. कडक थंडी, गारपीट, धुके यांपासून झाडांना त्वरित इजा होते. मध्यम खोलीची, गाळाची, उत्तम निचऱ्याची जमीन या फळझाडास योग्य असते.

पपनस पिकाच्या सुधारित जाती :

पिवळे पपनस, गुलाबी पपनस या प्रमुख जाती आहेत. या जाती फळातील रसाच्या रंगावरून पडल्या आहेत.

पपनस पिकाची अभिवृद्धी आणि पपनस पिकाची लागवड पद्धती :

पपनसाची अभिवृद्धी रंगपूर लाईम किंवा जंबेरी या खुंटावर डोळे भरून करावी. अभिवृद्धी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करावी. पपनसाची लागवड हम चौरस पद्धतीने करावी. ठरावीक अंतरावर 0.75 X 0.75 X 0.75 मीटर आकाराचे खड्डे उन्हाळ्यापूर्वी खोदून ते खत मातीने भरून घ्यावेत.

पपनस पीक लागवड हंगाम आणि पपनस पीक लागवडीचे अंतर :

लागवडीचा हंगाम –

1) जून-जुलै, 2) सप्टेंबर-ऑक्टोबर, 3) जानेवारी-फेब्रुवारी यातून निवड करावी.
ठेवावे.

जमिनीच्या प्रकारानुसार लागवडीचे अंतर 6 x 6 मीटर किंवा 7×7 मीटर एवढे

पपनस पिकास वळण आणि पपनस पिकास छाटणी :

झाडांची वाढ एकाच खोडावर करून घ्यावी. खोड सरळ वाढण्यासाठी मीटरभर उंचीपर्यंतच्या तसेच खुंटावरच्या फुटी काढून टाकव्यात. झाडाचा विस्तार समप्रमाणात आणि डेरेदार होण्यासाठी फांद्याची संख्या विरळणी करून मर्यादित ठेवावी. पाणफोक आणि दाटीच्या फांद्या छाटून टाकाव्यात. पपनसाला फुले येण्यासाठी नियमित छाटणीची गरज नाही.

पपनस पिकास खत व्यवस्थापन आणि पपनस पिकास पाणी व्यवस्थापन :

पपनसाच्या पूर्ण वाढीच्या झाडांना पुढीलप्रमाणे खते घालावीत.

खताचे नावफुले येण्याच्या वेळीफळवाढीच्या काळात
कंपोस्ट खत10 टन हेक्टरी
5:10:5500 कि. / हेक्टरी
पेंड1 टन / हेक्टरी
18:46100 कि / हेक्टरी
मॅग्नेशियम सल्फेट50 कि. / हेक्टरी
झिंक सल्फेट50 कि. / हेक्टरी
पाणी व्यवस्थापन :

पाण्याच्या पाळ्या पावसाळ्यात गरजेप्रमाणे, हिवाळ्यात 8/10 दिवसांनी उन्हाळ्यात 5/6 दिवसांनी द्याव्या. पाणी देताना आळ्यात पाणी साचून राहणार नाही आणि खोडाला ओल लागणार नाही अशी काळजी घ्यावी.

पपनस पिकातील आंतरपिके / पपनस पिकातील आंतरमशागत / पपनस पिकातील तणनियंत्रण :

लागवडीनंतर पहिली 3-4 वर्षे पपई, शेवगा, तसेच लिली, गोल्डन रॉड ही पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत. खोडाजवळ, खोडांना इजा न करता चाळणी करावी. तणनियंत्रणासाठी निंदणी, खुरपणी आच्छादने, आणि रासायनिक तणनाशके यांचा वापर करावा.

पपनस पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :

नागअळी (लीफ मायनर ) :

ही कीड पाने पोखरून नुकसान करते. एन्डोसल्फॉन, फारसा ही कीडनाशके एक- दोन वेळा फवारावीत.

पाने खाणारी अळी :

ही अळी नवीन पाने कुरतडून झाडांचे शेंडे निष्पर्ण करते. कार्बारिल 50 टक्के 2/3 वेळा 8-10 दिवसांच्या अंतराने फवारल्यास किडीचा बंदोबस्त होतो.

पपनस पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :

मूळकूज :

या रोगामुळे मुळांची कूज होऊन झाडे मरतात. पाण्याचा निचरा न झाल्यास हा रोग बळावतो. जमिनीतील पाण्याचा निचरा सुधारून बोर्डोमिश्रण अथवा बुरशीनाशकाचे ड्रेचिंग ( जिरवणी) करावी.

डिंक्या :

खोड-फांद्या यांवरील साल फाटून त्यातून डिंक पाझरतो. सालीचा रंग विटकरी बनून झाड वाळण्यास सुरुवात होते. या फळझाडाची भारी आणि निचरा न होणाऱ्या जमिनीत लागवड करू नये. खोडावर बोर्डो पेस्ट लेप दरवर्षी नियमितपणे लावावा.

पपनस पिकातील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण :

पपनसामध्ये शारीरिक विकृती आढळत नाहीत. तरीसुद्धा जातिवंत कलमेच लागवडीसाठी वापरणे योग्य होय.

पपनस पिकाच्या फळांची काढणी आणि पपनस पिकाचे उत्पादन :

फळावरील रंग बदलल्यानंतर फळे काढावीत. पूर्ण तयार फळेच फक्त काढावीत. पूर्ण वाढलेल्या एका झाडापासून वर्षभरात सुमारे 100 फळे मिळतात.

पपनस पिकाच्या फळांची साठवण, पपनस फळे पिकविण्याच्या पद्धती आणि विक्री :

पपनस फळे काढणीनंतर 8-10 दिवस टिकतात. साठवणीसाठी खास तंत्र वापरत नाही. तसेच फळे पिकविण्यासाठी खास यंत्रणा नाही. पपनसाची तयार फळे करंड्यात भरून विक्रीसाठी शहरातील मंडईमध्ये पाठविली जातात.

सारांश :

पपनस हे लिंबूवर्गातील फळपीक आहे. फळे मोठी व रसदार असतात. समशीतोष्ण हवामानात आणि उत्तम निचरा होणाऱ्या सकस जमिनीत पपनसाची वाढ चांगली होते. पपनसाचे उत्पादन वाढण्यासाठी झाडांना फुले येण्याच्या वेळी आणि फळे वाढत असताना खते घालावीत. नियमितपणे पाणी देताना खोडांना ओलावा लागू देऊ नये. पपनसाच्या पूर्ण वाढलेल्या एका झाडावर वर्षभरात 100 फळे लागतात.

जाणून घ्या संत्रा लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Santra Lagwad) – Orange Farming

Recent Post

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )