गावरान संस्कृती , कृषी पर्यटन , कृषी दर्शन, ग्रामीण संस्कृती दर्शन , ग्रामीण जीवनशैलीची अनुभूती । Agritourism Business – ( कृषी पर्यटन उद्योग ) । कृषी पर्यटन कसे सुरू करू शकतो । कृषी पर्यटन व्यवसायासाठी लायसेंन्स आणि रेजिस्ट्रेशन (License And Registraion for Agri-tourism) । कृषी पर्यटन केंद्राच्या नोंदणीसाठी कोणते कागदपत्र लागतील । कृषी पर्यटनास महाराष्ट्र सरकारकडून मिळणारे लाभ । कृषी पर्यटनासाठी या सुविधा असणे गरजेचे । कृषी पर्यटनांमध्ये या सुविधा पुरवल्या गेल्याच पाहिजेत ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
Agritourism Business – ( कृषी पर्यटन उद्योग )
जर तुम्ही ग्रामीण भागात राहात असाल आणि शेतकरी असाल तर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर या हा व्यवसाय नेमका कसा सुरु करायचा ते पाहू कारण शहरे व तेथील लोकसंख्या सातत्याने वाढत चालली आहे. शहरी लोकांचे जीवन बंदिस्त झाले आहे. पूर्ण एसी असलेले बंद फ्लॅट, ऑफिसमध्ये टेलिव्हिजन, संगणक किंवा मोबाईलच्या समोर दिवसरात्र काम करण्यामध्ये किंवा आधुनिक technology च्या युगात गुंतलेल्या लोकांना बाह्य निसर्गाचा स्पर्शही होत नाही.
छोट्या ( एकल ) कुटुंबामुळे नातेवाईकही मर्यादित व शहरी असण्याची शक्यता अधिक असते. आज मध्यमवयीन असलेल्या अनेकांना त्यांचे बालपण आठवत असले तरी त्यांची मुले मात्र त्यापासून वंचित आहेत. त्यामुळे ग्रामीण जीवनाचा आनंद देणाऱ्या कृषी दर्शन केंद्र बनवल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत तयार होतील.
कृषी दर्शन हे सामान्य पर्यटनाच्या तुलनेमध्ये थोडी नावीन्यपूर्ण संकल्पना आहे. हा शेतीपूरक असा व्यवसाय असून, सामान्य हॉटेलिंग किंवा मनोरंजन पार्कच्या तुलनेमध्ये त्यांचे वेगळेपण लक्षात घेतले पाहिजे. शेती कामांचा अनुभव, ग्रामीण व नैसर्गिक वातावरण, पाळिव जनावरांशी संबंधित काही कामे यांचा अनुभव आणि आनंद लोकांना घेता येईल.
ग्रामीण व वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांचा स्वाद घेता येतो. शेतातील उत्पादने थेट खरेदी करण्याची संधी मिळते. ग्रामीण लोकांचे दैनंदिन जीवन, तसेच सांस्कृतिक ग्रामीण कार्यक्रम आणि परंपरा यांची माहिती मिळते. यातून ग्रामीण आणि शहरी बागांमध्ये समन्वय निर्माण होईल.
शेतकऱ्यांना यातून अतिरिक्त उत्पन्नासोबत विविध उत्पादनांना कायमस्वरूपी ग्राहक मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांना रोजगाराची संधी मिळते. कृषी पर्यटन हे अनेकांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत झाला आहे.
कृषी पर्यटन कसे सुरू करू शकतो
कमीत कमी क्षेत्र असलेले शेतकरी दोन हेक्टर जमीन, ग्रामीण राहणीमानातील शेतघरे, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, ग्रामीण पाण्याचा एखादा जलस्रोत आणि पर्यटकांना विविध सेवा जसे गावातील प्राण्यांचा वावर,बैलगाडी ,वेगवेगळ्या शेती प्रयोग मस्त्य शेती , कुकुट पालन , शेळी पालन, प्राणी संगोपन यांची माहिती सांगणे तसेच ग्रामीण जेवणाच्या पद्धती जसे सारवलेले घर चुलीवरील जेवण गावातील मोकळीकता व मनोरंजन देण्याची इच्छा, थोडा बोलका स्वभाव इतक्या भांडवलावर कोणताही शेतकरी कृषी पर्यटन केंद्र सुरू करू शकतो.
वैयक्तिक शेतकरी व्यतिरिक्त कृषी सहकारी संस्था, अशासकीय संस्था, कृषी विद्यापीठे आणि कृषी महाविद्यालये येथील अशी केंद्रे सुरू करता येतात. काही वैशिष्ट्यपूर्ण ग्रामपंचायतींही शेतकऱ्यांच्या मदतीने अशी केंद्रे सुरू करू शकतात.
कृषी पर्यटन केंद्राचे ठिकाण :
कृषी पर्यटनातील यशासाठी पर्यटन केंद्राचे स्थान हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. केंद्राचे स्थान हे शहरापासून पोहोचण्यास सोपे आणि चांगली नैसर्गिक पार्श्वभूमीचे असावे. शहरी पर्यटकांना निसर्ग आणि ग्रामीण जीवनाचा आनंद लुटण्यात रस निर्माण होईल असे वातावरण असणे गरजेचे.
या केंद्रापर्यंत पोहोचणारे महामार्ग, रस्ते आणि रेल्वे मार्ग असल्यास अधिक उपयुक्त ठरते. कृषी पर्यटनाबरोबरच काही ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळ जवळ असल्यास मोलाचा फायदा होतो.
कृषी पर्यटन : खालील कारणांमुळे सध्या कृषी-पर्यटनाला मोठा वाव आहे.
पर्यटनामध्ये अन्न, निवास, मनोरंजन आणि प्रवासाचा खर्च सर्वांत कमी ठेवणे शक्य आहे. त्यामुळे शहरातील श्रीमंत वर्गासोबतच मध्यमवर्गीयही याचा फायदा घेऊ शकतात. कृषी पर्यटनाची व्याप्ती मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचते.
शहरी वातावरणात राहणाऱ्या लोकांना नेहमीच खेड्यांबद्दल, तेथील अन्न, वनस्पती, प्राणी, लाकूड, हस्तकला, भाषा, संस्कृती, परंपरा, पोशाख आणि ग्रामीण जीवनशैली इ. विषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते.
सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी आणि संपूर्ण कुटुंबाला समोर ठेवून मनोरंजनाचे विविध उपक्रम लोकांना आकर्षित करतात. त्यात ग्रामीण खेळ, सण, खाद्यपदार्थ, पेहराव आणि नैसर्गिक घटकांचा समावेश केल्यास विविध प्रकारचे मनोरंजन प्रदान करता येते.
गावांकडील सण, परंपरा, संस्कृती, भाषा, हस्तकला, पेहराव यांचे आकर्षण लोकांना असते. शेती आणि शेतकऱ्यांच्या सभोवतालचे वातावरण, एखाद्या कृषी उत्पादनाची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहता येणे इ. लोकांना आवडते. त्यातही सर्वाधिक उत्पादनाचे रेकॉर्ड करणारे शेतकरी, सर्वांत जास्त पशू उत्पन्न देणारी फार्म, प्रक्रिया युनिट्स, नावीन्यपूर्ण शेती पद्धती याकडे तर अन्य शेतकरीही आकर्षित होतात.
ताजी भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य उत्पादने, काही प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, सेंद्रिय अन्न निर्मिती व विक्रीलाही मोठा वाव आहे. बैलगाडी स्वारी, उंट स्वार, नौकाविहार, मासेमारी, हर्बल वॉक, ग्रामीण खेळ आणि आरोग्य (आयुर्वेदिक) विषयक सुविधा यांचाही समावेश पर्यटनात करता येतो.
आधुनिक जीवनामध्ये ताणतणाव प्रचंड वाढलेले असल्यामुळे शांत ठिकाण हेही आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. अलीकडे मोबाईलमुळे दिवसरात्र कधीही कामाला जुंपल्यासारखी स्थिती आहे. अशा स्थितीत काही काळ तरी मोबाईल व अन्य स्क्रीनपासून दूर राहण्यालाही लोक प्राधान्य देत आहेत.
त्याला निसर्गाची जोड दिल्यास पर्यटनाला मोठा वाव आहे. नैसर्गिक वातावरण नेहमी व्यस्त जीवनापासून दूर असते. पक्षी, प्राणी, पिके, पर्वत, पाणवठे, गावे शहरी लोकसंख्येला पूर्णपणे भिन्न वातावरण देतात.
कृषी पर्यटनामुळे शहरी विद्यार्थ्यांनाही ग्रामीण जीवनाविषयी ज्ञान देणे शक्य होते. शालेय सहलीसाठी उत्तम पर्याय देता येतो. शहरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील अनुभवाची संधी मिळू शकते. उत्तम शेती व उच्चतम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे शेतावर प्रशिक्षण असेही काही कार्यक्रम राबवता येतात. वेगवेगळे सेमिनार, कंपन्याचे छोटे कार्यक्रम यासाठी हॉटेलऐवजी चांगला पर्याय यातून देता येतो.
कृषी पर्यटन व्यवसायासाठी लायसेंन्स आणि रेजिस्ट्रेशन (License And Registraion for Agri-tourism)
- MTDC Registration ( Maharastra Tourism ) – कृषी पर्यटन केंद्र सुरु करण्यासाठी तुम्ही Directly MTDC किंवा महाराष्ट्र Tourism Department ला भेट देऊ शकता. तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
- Food License
- GST Registration
- Fire Safety Clearance Certificate
- लोक निवास असल्यास बांधकाम परवानगी आवश्यक.
कृषी पर्यटन केंद्राच्या नोंदणीसाठी कोणते कागदपत्र लागतील
- अर्जदाराची जमिनीची कागदपत्रे ( ७/१२ उत्तरे, ८ अ )
- आधार कार्ड/ पॅन कार्ड
- Food License Certificate
- वैयक्तिक शेतकरी वगळला इतरांसाठी विविध कायद्या अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र
- वीज बिल
- लोक निवास असल्यास बांधकाम परवानगी आवश्यक.
- विविध कायद्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्थांमार्फत कृषी पर्यटन केंद्र करिता अर्ज करण्यास अधिकार प्राप्त झालेल्या व्यक्तीचे Authorization Letterनोंदणी शुल्क २५००/- ऑनलाईन पद्धतीने gras.mahakosh.gov.in या वेबसाइट वर भरून चलनाची कॉपी सादर करणे.
कृषी पर्यटनास महाराष्ट्र सरकारकडून मिळणारे लाभ ?
- कृषी पर्यटन केंद्रास पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळेल
- नोंदणी प्रमाणपत्र च्या आधारे तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळू शकते
- पाणलोट आधारित योजना, शेततळे यांसारख्या योजनांसाठी, कृषी पर्यटन केंद्रांना प्राधान्य दिले जाईल
- Agri- Tourism सेंटर ला ग्रीनहाऊस, फळबाग, भाजीपाला लागवड यांसारख्या योजना उपलब्ध करून दिल्या जातील
- त्याच बरोबर तुम्हाला प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देखील मिळेल.
कृषी पर्यटनासाठी या सुविधा असणे गरजेचे
- ग्रामीण स्वरूपाचे सर्व राहणीमान किमान आवश्यक सुविधांसह फार्महाउस असावे.
- शेतीतील समृद्ध संसाधने, झाडे, वेली, औषधी, सुगंधी वनस्पती यांच्या नावानिशी लागवड केलेली असावी.पाण्याची सोय, जलस्रोत जवळ असावा.
- पर्यटकांना स्वारस्य शेती काम, स्वयंपाक किंवा अन्य शेतीपूरक कामे करता येईल, अशी सुरक्षित सोयी कराव्यात.
- आपत्कालीन वैद्यकीय सेवा.
- मासेमारी, पोहण्यासाठी विहीर किंवा तलाव, वेगवेगळे खेळ साधने, नेमबाजी इ.
- शेळी फार्म, इमूपालन, रेशीम शेती, ग्रीन हाउस इ.
कृषी पर्यटनांमध्ये या सुविधा पुरवल्या गेल्याच पाहिजेत ?
- नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्री अशा तिन्ही जेवणासाठी वेगवेगळा अस्सल ग्रामीण मेनू असावा.
- पर्यटकांना ग्रामीण खेळ, कामांमध्ये सहभागी होण्याची संधी.
- संस्कृती, पेहराव, कला, हस्तकला, सण, ग्रामीण परंपरा याबद्दल माहिती देण्याची सोय. काही कलांचे प्रात्यक्षिकही देता येते.
- घोडेस्वारी, बैलगाडी, पाण्यात म्हशीची स्वारी, तुमच्या तलावात किंवा जवळच्या तलावात मासेमारीची सुविधा इ.
- फळे, मका, शेंगदाणे, ऊस आणि इतर शेतातील ताजी व प्रक्रिया उत्पादने उपलब्ध करावीत.
- लोकनृत्याचा कार्यक्रम, शेकोटी, लोकगीते, भजन, कीर्तन, लेझिम नृत्य,इ. कार्यक्रम पाहणे व सहभागी होण्यास संधी द्या.