परमा एकादशी माहिती | परमा एकादशी व्रताची कथा | परमा एकादशी (Parma Ekadashi) |
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
परमा एकादशी माहिती :
॥ ॐ पुरूषोत्तमाय नमः ॥
वर्षात २४ एकादशी येतात. पण ज्या वर्षी अधिक किंवा पुरुषोत्तम मास येतो त्यावर्षी २६ एकादशी येतात. अधिक श्रावण मासातील कृष्ण पक्षातील एकादशीस Parma Ekadashi किंवा कमला म्हणतात. पुरूषोत्तम मासातील ही अंतिम एकादशी मोठी एकादशी म्हणून मानतात. अधिक मासातील कृष्ण पक्षातील ही एकादशी शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ ला आहे. शास्त्राप्रमाणे द्वादशीयुक्त एकादशीला व्रत करतात. दशमीयुक्त एकादशीस केलेले व्रत भगवान विष्णू स्वीकारत नाहीत. एकादशी समाप्ती १२ ऑगस्टला सकाळी ७.५८, पण सूर्योदयकालीन एकादशी १२ ऑगस्टला आहे आणि त्याच दिवशी व्रत करायचे आहे.
एकादशीस श्री विष्णूंची पंचामृत स्नान, अभिषेकासह षोडशोपचार पूजा करावी. पुजेमध्ये तांदुळाच्या अक्षता न वापरता तिळाच्या वा जवांच्या अक्षतांचा उपयोग करावा. पिवळ्या रंगाची फुले, तुलसी अर्चन करावे. एकादशीस तुळस तोडू नये, तसेच तुळशीला जल अर्पण करु नये. देवाला नैवेद्य अर्पण करतांना तुळशीचा वापर अवश्य करावा.
पुरूषोत्तम मासात श्री. विष्णूंची जास्तीत जास्त उपासना करतात. ह्या एकादशीचे व्रत करणाऱ्यास आध्यात्मिक सुखाबरोबर, अपार भौतिक आणि संसारीक सुखही प्राप्त होते. कायिक, वाचिक आणि मानसिक पापांतून मुक्तता होते.
श्री विष्णूंची कृपा आणि शुभाशिर्वाद प्राप्त होतात. श्री विष्णूंसह महालक्ष्मी देवीची कृपादृष्टीही राहते. त्यामुळे श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी परमा एकादशीचे व्रत आवर्जुन आचरावे.
परमा एकादशी व्रताची कथा
अधिक मासातील कृष्ण पक्षातील १२ ऑगस्ट रोजी “परमा एकादशी” आहे. भगवान श्रीकृष्णांनी, या एकादशीचे महात्म्य व कथा अर्जुनास सांगितली.
त्यानुसार, प्राचीन काळी कांम्पिल्य नावाच्या नगरात सुमेधा नावाचा ब्राह्मण व त्याची पवित्रा नावाची पत्नी रहात होती. ती धार्मिक व पतिव्रता होती. आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब असली तरीही , ते उभयता अतिथींची सेवा करण्यासाठी उत्सुक असत.
अशा परिस्थितीत, तो गरीब ब्राह्मण गरिबीला कंटाळून विदेशात जाण्याचा विचार करू लागला. त्यावेळी त्याची पत्नी म्हणाली; ” हे स्वामी, धन व संतती या दोन्ही गोष्टी पूर्व संचितानुसारच मिळतात. त्यामुळे त्या बाबत काळजी करू नये.”
एके दिवशी, महर्षी कौंडिण्य त्यांच्या घरी आले.या ब्राम्हण दांपत्याने महर्षी ची मनोभावे सेवा केली. परिणामी महर्षी नी ब्राम्हण दांपत्यास या परमा एकादशी चे व्रत करण्यास सांगितले. महर्षी पुढे म्हणाले, “अधिक मासातील, वद्य पक्षातील या परमा एकादशीचे व्रत केल्याने यक्षराज कुबेर धनवान झाला. हरिश्चंद्र, राजा झाला.”
असे सांगून महर्षी तिथून निघून गेले व ब्राम्हणाने, त्यांनी सांगितल्याप्रमाणे “Parma Ekadashi च्या” व्रताचे आचरण केले. परिणामी, प्रात:काळी घोड्यावर स्वार होवून एक राजकुमार आला व त्याने सुमेधा नावाच्या त्या ब्राम्हणाला भरपूर संपत्ती, धनधान्य व घरदार दिले. त्यामुळे त्या ब्राम्हण दांपत्याचे सर्व दु:ख नाहीसे झाले व ते सुखात, समाधानात व आनंदात राहू लागले.