पॅशनफ्रुट लागवड |Passion Fruit Lagwad | Passion Fruit Sheti |पॅशनफ्रुट पिकाचा उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।पॅशनफ्रुट लागवडी खालील क्षेत्र । पॅशनफ्रुट उत्पादन ।पॅशनफ्रुट पिकास योग्य हवामान । पॅशनफ्रुट पिकास योग्य जमीन ।पॅशनफ्रुट पिकाच्या सुधारित जाती ।पॅशनफ्रुट पिकाची अभिवृद्धी । पॅशनफ्रुट पिकाची लागवड । पॅशनफ्रुट पिकास योग्य हंगाम । पॅशनफ्रुट पिकास योग्य लागवडीचे अंतर । पॅशनफ्रुट पिक खत व्यवस्थापन । पॅशनफ्रुट पिक पाणी व्यवस्थापन । पॅशनफ्रुट पिकातील आंतरपिके । पॅशनफ्रुट पिकातील आंतरमशागत । पॅशनफ्रुट पिकातील तणनियंत्रण ।पॅशनफ्रुट पिकाच्या महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । पॅशनफ्रुट पिकाचे महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । पॅशनफ्रुट पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
पॅशनफ्रुट लागवड |Passion Fruit Lagwad | Passion Fruit Sheti |
पॅशनफ्रुट हे कृष्णकमळ प्रकारातील वेलवर्गीय फळ आहे. फळे मोसंबीसारखी गोल आणि हलकी असतात. या पिकास समशीतोष्ण हवामान मानवते. याची लागवड घरगुती आणि तुरळकच आढळते. या फळाचा रस करून तो निर्यात करण्याच्या दृष्टीने संधी आहे व लागवडीसाठी चांगली संधी आहे.
पॅशनफ्रुट पिकाचा उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।
उगमस्थान :
पॅशनफ्रुटचे उगमस्थान ब्राझील हा देश आहे.
महत्त्व :
या फळातील रसाचे पेय उत्तम बनते. पॅशनफ्रुटच्या रसात पुढीलप्रमाणे
अन्नघटक आढळतात.
अन्नघटक | प्रमाण | अन्नघटक | प्रमाण |
पाणी | 76.3% | प्रथिने | 0.9% |
स्निग्धांश | 0.1% | खनिजे | 0.7% |
शर्करा पदार्थ | 22.0% | चुना | 0.01% |
स्फुरद | 0.02% | लोह | 0.2% |
कॅरोटीन | 90 आय यू. | उष्मांक | 93 कॅलरी |
भौगोलिक प्रसार :
पॅशनफ्रुटची लागवड गियाना, जावा, सुमात्रा, मलाया, मेक्सिको, हवाई, श्रीलंका, न्यूझीलंड या ठिकाणी होते. भारतात याची लागवड निलगिरी, कोडायकॅनाल, हिमाचल प्रदेश, वाई, पाचगणी, इत्यादी भागांतही तुरळक प्रमाणात आहे. भारतात श्रीलंकेतून कोइम्बतूर भागात पॅशनफ्रुट प्रथम आले.
पॅशनफ्रुट लागवडी खालील क्षेत्र । पॅशनफ्रुट उत्पादन ।
महाराष्ट्रात पॅशनफ्रुट लागवडीसाठी क्षेत्र मोजके आणि तुरळक आहे. एकूण लागवड 100 हेक्टरच्या आसपास आहे. उत्पादन कमी असून हेक्टरी 2 ते 2.5 टनांपर्यंत फळे मिळतात.
पॅशनफ्रुट पिकास योग्य हवामान । पॅशनफ्रुट पिकास योग्य जमीन ।
हवामान :
पॅशनफ्रुटसाठी मध्यम प्रकारचे हवामान मानवते. कडक थंडी अथवा कडक ऊन या फळझाडास सहन होत नाही.
जमीन :
मध्यम प्रकारची, निचऱ्याची, किंचित उताराची जमीन या फळपिकास चांगली मानवते.
पॅशनफ्रुट पिकाच्या सुधारित जाती ।
पर्पल पॅशनफ्रुट :
या जातीची फळे गोल व आकाशी रंगाची असतात. फुले पांढऱ्या रंगाची असतात.
यलो पॅशनफ्रुट :
या जातीची फळे मोठी, अधिक रसाची आणि स्वादयुक्त असतात. फळांचा रंग पिकल्यावर पिवळा होतो.
पॅशनफ्रुट पिकाची अभिवृद्धी । पॅशनफ्रुट पिकाची लागवड ।
सामान्यपणे पॅशनफ्रुट लागवड बियांपासून केली जाते. गुटी कलमाने लागवड केल्यास फळे लवकर लागतात. लागवड स्वतंत्रपणे, कुंपणावर अथवा इतर आधारावर करतात.
पॅशनफ्रुट पिकास योग्य हंगाम । पॅशनफ्रुट पिकास योग्य लागवडीचे अंतर ।
पॅशनफ्रुटची लागवड जानेवारी-फेब्रुवारी अगर जून महिन्यात करतात. पॅशनफ्रुटची लागवड आयताकृती करतात. लागवडीचे अंतर 3 मीटर x 1.5 मीटर एवढे ठेवावे. 4.2.7 वळण आणि छाटणी
पॅशनफ्रुट वेलींना वळण आणि आधार यांची गरज असते. त्यासाठी सोईनुसार मांडव करावा. फुले-फळे येण्यासाठी छाटणीची गरज नसते. तथापि, फळांची काढणी झाल्यावर जून फांद्या छाटल्यास नवीन धुमारे येऊन अधिक फळे लागण्याची संधी मिळते.
पॅशनफ्रुट पिक खत व्यवस्थापन । पॅशनफ्रुट पिक पाणी व्यवस्थापन ।
पॅशनफ्रुट वेलींना कंपोस्ट खत : 5 कि., 5 10:5: 500 ग्रॅ., नीमपेंड 1 कि. इत्यादी खते घालावीत. वेलींना खते पावसाळ्यापूर्वी वेलींभोवती बांगडी पद्धतीने घालावीत… खते दिल्यानंतर वेलींना हलके पाणी द्यावे.
पाणी : पॅशनफ्रुटच्या वेलींना पावसाळा वगळून हिवाळयात 10 दिवसांनी तर उन्हाळयात 5 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. दर वेळी बेताचे पाणी द्यावे.
पॅशनफ्रुट पिकातील आंतरपिके । पॅशनफ्रुट पिकातील आंतरमशागत । पॅशनफ्रुट पिकातील तणनियंत्रण ।
लागवडीनंतर सुरुवातीचे काही महिने पालेभाज्या, घेवडा यांसारखी पिके घ्यावीत. वेळोवेळी आंतरमशागत – खुरपणी, निंदणी करून तणांचा नाश करावा.
पॅशनफ्रुट पिकाच्या महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।
पॅशनफ्रुटच्या वेलींवर किडींचा विशेष प्रादुर्भाव आढळत नाही.
पॅशनफ्रुट पिकाचे महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण ।
पॅशनफ्रुटच्या वेलींवर रोगांचा विशेष प्रादुर्भाव आढळत नाही.
पॅशनफ्रुट पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।
पॅशनफ्रुटच्या फळांचा रंग बदलल्यानंतर फळे देठाजवळ कापून काढावीत. तयार फळे गळून पडतात; ती गोळा करावीत. नोव्हेंबर – डिसेंबर या काळात फळे तयार होतात. फळे पुष्कळ दिवस टिकतात. वरून फळे सुरकतली तरी आतील गर खराब होत नाही. एका वेलीवर वर्षभरात 150-200 फळे मिळतात. त्यांचे वजन सुमारे 10 किलो भरते. पॅशन-फ्रुटची वेल 3 – 4 वर्षे उत्पादनक्षम राहते..
सारांश ।
पॅशनफ्रुट हे वेलवर्गीय फळझाड असून ही फळे रस, सरबत करण्यासाठी वापरतात. या पिकास समशीतोष्ण हवामान आणि निचऱ्याची जमीन मानवते. लागवड रोपापासून करणे सोपे जाते. फळे हिवाळयात पिकतात. एका वेलीवर 150-200 फळे लागतात. घराजवळ अथवा शेतावर या फळाच्या 1 2 वेली वाढविण्यास योग्य आणि उपयोगी आहेत.