
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
संत काशिबा महाराज गुरव (Sant Kashiba Maharaj Gurav)
गुरव हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. मुलाण्याप्रमाणेचहाही तिसऱ्या क्रमांकाचा बलुतेदार. गुरवाने देवळात देवाची पूजा करायची, आणि घरोघरी बेल, पत्री वगैरे पोचवायच्या. अजूनही अनेक गावांतील देवळांत ब्राह्मण पुजाऱ्याऐवजी गुरव असतो. इतिहासाप्रमाणे शैव ब्राह्मण आणि वैष्णव ब्राह्मण ह्या दोन ब्राह्मण जाती अस्तित्वात होत्या .
गुरव समाज हा समाज शैव ब्राह्मण समाज असून तत्कालीन कर्मठ वैष्णव ब्राह्मणांनी ह्या गोष्टीचा तीव्र विरोध केला. आजही गावागावात फक्त गुरव समाज मंदिरामध्ये पूजा अर्चना करताना दिसतात. कारण त्यांच्याकडेच हे काम पारंपरिक रित्या चालत आलेले आहे. संत काशीबा गुरव हे गुरव समाजातील थोर संत होऊन गेले.त्यांनी लिहिलेले ग्रंथ आजही आहेत. भगवान शंकरांच्या पूजेचा मान फक्त शैव ब्राह्मणांना असायचा तेच आजचे गुरव. गुरव हे नामकरण त्या काळात कर्मठ ब्राह्मणांनि त्यांचं अधिपत्य धोक्यात येऊ नये म्हणून केलं होतं. आणि काळानुरूपे ते गुरव च राहील .मंदिरातील पूजा अर्चना गुरव समाज करत असल्याने गावातून त्यांना धान्य किंवा काही वार्षिक मानधन अस दिल जात. आणि गुरवांचा उल्लेख हा 12 बलुतेदार मध्ये आता येतो. गुरवांचा इतिहास तसा खूप पुरातन काळापासून आहे फक्त त्यावर साहित्य निर्माण झालं नाही आणि गुरव म्हणजे शैव ब्राह्मण हे समाजझोता पासून बऱ्याच वेळा अलिप्त राहिले किंवा ठेवले गेले.
संत काशीबा गुरव महाराज हे गुरव समाजातील एक महान संत होते.संर सावता माळी व संत काशीबा गुरव हे अतिशय चांगले मित्र होते. शेतात काम करीत असताना संत सावता माळी भक्तिभावाने जे अभंग गात ते संत काशीबा गुरव लिहून ठेवत. त्यांचे मंदिर पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे मंदीरजवळ महाद्वार येथे आहे.
संत सावता यांचे एकनिष्ठ भक्त म्हणून काशिबा महाराजांचा नेहमीच आदराने उल्लेख होतो. संत काशिबा महाराजांनी, सावता माळी यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग घटना यांचे महत्त्वाचे साक्षीदार बनून प्रारंभापासून समाधी पर्यंत सर्व रचना लिहून ठेवल्या आहेत. सावतामाळी परमतत्व रुपात विलीन होतानाची नोंद काशिबा महाराजांनी समाधीच्या अभंगात लिहून ठेवल्याचा उल्लेख अनंत दिक्षीत यांच्या संत सावतामाळी महाराज या ग्रंथात सापडतो .
उठानि प्रातःकाली करूनिया स्नान । घालुनी आसन ,यथाविधी ।।
नवज्वरे देह झाला संतप्त । परी मनी आर्त, विठोबाचे ।।
प्राणायाम करूनि कुंभग साधिला । वायु निरोधला मुळ तत्वी ।।
शके बाराशे सतरा शालिवाहन शक मन्मथ नामक सवंत्सर ।
या रचनेचा आधार पाहता काशिबा महाराजांनी स्वतंत्र लेखन केले असावे. मात्र या बाबतीत अधिक संशोधन गरजेचे आहे. त्याद्वारे काशीबा महाराजांचे मौलिक कार्यकर्तुत्व आणि जीवन चरित्र यावर उजेड पडेल.