नेताजी पालकर म्हणजे दुसरे शिवाजी महाराजच (Sarsenapati Netaji Palkar)

नेताजी पालकर (Sarsenapati Netaji Palkar) | नेताजी पालकर यांचा जन्म | नेताजी पालकर यांची कारकिर्द |नेताजी पालकर मृत्यू आणि समाधी |

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

नेताजी पालकर (Sarsenapati Netaji Palkar) :

नेतोजी हे स्वराज्य स्थापने पासूनच राजांच्या सोबत होते. रायरेश्वरी शपथ घेताना नेतोजीराव देखील उपस्थित होते. प्रतापगडाच्या युद्धात नेताजींवर जबाबदारी होती औरंगजेबाच्या सैन्याला रोखत त्यांना जेरबंद अथवा कत्तल करायची जबाबदारी होती नेताजींनी प्रत्येक पळणारा आदिलशाही सैनिक कापून काढला. हंबीरराव मामांनी इथे बलाढ्य पराक्रम गाजवला त्याच प्रतिक आजही गडावरील मंदिरात त्यांची पालखी आणि तलवार सांगून जाते. याच लढाईत फितूर झालेल्या खंडोजी खोपडे याला महाराजांनी एक हात आणि एक पाय कापण्याची शिक्षा दिली, यावरून लक्षात येते कि स्वराज्यात फितुराची गय कधीच केली जात नव्हती.

यानंतर आदिलशहा ने स्वराज्यावर दुसरी मोहीम काढली.फाजलखान आणि रुस्तमजमा या दोन सरदारांना स्वराज्यावर चाल करून पाठवले. हा फाजलखान म्हणजे अफजलखानाचा मुलगा, खंडोजी ने त्याला तेव्हा मदत केली नसती तर आज हा स्वराज्यावर चाल करून आलाच नसता. परंतु या मोहिमेचा देखील नेतोजी पालकर यांनी कट उधळून लावून या दोघांचा पराभव केला. आदिलशहा ने आता सिद्धी जौहरची मदत घेतली. सिद्दी ने पन्हाळागडाला वेढा दिला, राजे पन्हाळा गडावर पकडले गेले. परंतु या वेळी महाराजांच्या आदेशानुसार नेतोजीनी विजापूरजवळील शहापूर लुटले आणि विजापूरला धक्का दिला. नेतोजी पुढे चाल करत गेले होते, कोंडी करण्याचा प्रयत्न ते करत होते परंतु सैन्याच्या अभावामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. नेतोजी पुन्हा राजगडावर आले, महाराज कोंडीत सापडल्याचे त्यांना कळले. नेतोजी सिद्दी हिलाल या अफजलखान वधावेळी स्वराज्यात शामिल झालेल्या सरदारला घेऊन वेढा फोडण्यासाठी गेले. परंतु या प्रयत्नात ते यशस्वी झाले नाही.

मिर्झाराजे जयसिंग यांच्या छावणीत संभाजी महाराज असताना त्यांच्या सोबत नेतोजी पालकर देखील सुरक्षेसाठी होते. तहाच्या बोलणीनुसार महाराज मोघलांकडून लढत होते. महाराज, नेतोजीराव, दिलेरखान हे विजापूरवर आक्रमण करण्यासाठी गेले परंतु सर्जाखान समोर निभाव लागला नाही. पहिल्या पराभवानंतर महाराजांनी मोर्चा पन्हाळा किल्ल्या कडे वळवला. रात्रीची वेळ होती आणि मदतीला पाठीमागून एक तुकडी घेऊन नेतोजी राव येणार होते. महाराजांनी अवघ्या १ हजार मावळ्यांनीशी गडावर हल्ला केला, महाराजांना असे वाटले की किल्लेदार बेसावध असेल, असे बरेच इतिहासकार लिहितात. परंतु महाराजांनी कुठलंच नियोजन अस विचार न करता केलेलं नव्हतं त्यामुळे हा निर्णय विचार करून घेतलेला असेल. नेतोजी राव वेळेवर पोहोचले नाही आणि महाराजांना पराभव स्वीकारावा लागला. जवळपास १ हजार मावळे मारले गेले संतापाने महाराजांनी नेतोजी पालकरांना खणखणीत बोल सुनावले की, ‘ समयास कैसा पावला नाही ? . असे सभासद बखरीत लिहितो. हे परखड बोल नेतोजी रावांच्या जिव्हारी लागले, नेतोजीराव नाराज होऊन आपले चुलते कोंडाजी सोबत आदिलशहा ला जाऊन मिळाले. विजापुरकरांनी नेतोजीना खमम परगण्यातील जमकोर ची जहागिरी प्रदान केली. मिरझाराजे जयसिंग यांनी पुढचा धोका लक्षात घेत नेतोजींना आपल्याकडे वळवत ५ हजारी मनसब आणि नांदेड जिल्ह्यातील हदगाव मधील तामसा परगण्यातील ५५ गावांची जहागिरी देऊ केली.

नेताजी पालकर यांचा जन्म :

नेताजी पालकर यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील चौक गावी झाला. नेताजी जन्माने हिंदू होते. याव्यतिरिक्त ते शिवाजी महाराजांची पत्नी पुतळाबाई पालकर भोसले यांचे काका होते. नेताजी 1657 साली हिंदवी स्वराज्याचे दुसरे सरनौबत झाले.नेताजी पालकर यांच्या पराक्रम मुळे त्यांना प्रति शिवाजी म्हणून असेही ओळखले जात होते.

नेताजी पालकर यांची कारकिर्द

1657 मध्ये माणकोजी दहातोंडे यांच्या मृत्यूनंतर पालकर यांना सरनौबत करण्यात आले. 1645 ते 1665 या काळात शिवाजी महाराजांच्या उदयाच्या काळात नेताजींना अनेक मोहिमांची जबाबदारी देण्यात आली होती ज्या त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या. अफझलखानाच्या वधानंतर विजापूर सल्तनतच्या आदिलशहाविरुद्धची मोहीम हे त्याचे सर्वात मोठे यश होते. स्थानिक लोकांमध्ये त्यांची भूमिका अशी होती की त्यांना प्रति शिवाजी (छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा) म्हणून ओळखले जायचे.सन १६६५ पर्यंत त्याने मुघलांचा बराच भाग विस्कळीत केला. जयसिंग आणि दिलरखान यांच्या कारवायांची माहिती न दिल्याने शिवाजी महाराज त्याच्यावर नाराज झाले. जयसिंग आणि शिवाजी यांच्यात 1665 च्या पुरंदरच्या तहानंतर, शिवाजी महाराजांना मुघलांना 23 किल्ले देण्यास भाग पाडले गेले आणि विजापूरच्या आदिलशाहविरुद्धही लढा दिला. याच काळात नेताजी पालकर विजापूरच्या सैन्यात गेले. शिवाजी महाराज आपल्यासाठी लढावे अशी औरंगजेबाची इच्छा असल्याने स्वतःची लष्करी शक्ती कमी करण्यासाठी ही शिवाजीची रणनीती होती. अशा प्रकारे शिवाजी राजांनी नेताजी पालकरांना विजापूरच्या आदिलशहाकडे नेण्याची रणनीती आखली. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे मोगलांना आदिलशहा जिंकता आला नाही. आग्रा येथे शिवाजी महाराजांची औरंगजेबाशी भेट झाल्यानंतर नेताजी पालकर जयसिंगच्या सेवेत रुजू झाले. शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले औरंगजेबाने सूड म्हणून जयसिंगला नेताजी पालकरांना अटक करण्याचा आदेश दिला. त्यांना काही दिवस धारूर किल्ल्यावर नजरकैदेत ठेवण्यात आले. तसेच याच किल्ल्यावर शिवाजी राजांची आई राजमाता जिजाबाई यांनी जयसिंगाला काही पैसे पाठवले होते, जेव्हा शिवाजी महाराजांनी आग्रा येथे मिठाई वाटण्याची मागणी केली होती. त्यानंतर नेताजी पालकर यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. त्यानंतर त्यांच्या पत्नींना दिल्लीत आणण्यात आले आणि नेताजींनी इस्लामिक पद्धतीने त्यांचे पुनर्विवाह करण्यासाठी धर्मांतर केले. मुहम्मद कुली खान यांचे नाव घेऊन, नेताजी पालकर यांची अफगाणिस्तानातील कंदहार किल्ल्याचे गँरिसन कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तो लाहोर येथे सापडला. त्यानंतर, कंदाहार आणि काबूलच्या रणांगणांवर त्यांनी बंडखोर पश्तूनांविरुद्ध मुघलांसाठी लढा दिला. अशा प्रकारे त्याला औरंगजेबाचा सद्भावना प्राप्त झाली आणि त्यांना शिवाजी राजांचा प्रदेश जिंकण्यासाठी कमांडर दिलर खानसह दख्खनला पाठवण्यात आले. तथापि, रायगडावर आल्यावर त्यांचा १९ जून १६७६ रोजी विधिवत पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश झाला. नेतोजी राव पहिले ज्या निष्ठेने स्वराज्यासाठी काम करत होते ते मरेपर्यंत करत राहिले. संभाजी महाराजांच्या सोबत देखील पाठीवर काका सारखा हात नेतोजीरावांचा कायम राहिला. नेतोजीराव हे महाराजांवर रागावून गेलेच नव्हते हा तर खेळलेला गनिमी कावा होता परंतु वेळेवर ते मिर्झाराजे यांच्या छावणीतून निघू शकले नाही म्हणून हा डाव फसला. पन्हाळ्यावर जे सैनिक जायबंदी झाले ते कदाचित मावळे नसतील ही, कारण महाराज मावळ्यांचा जीव आपल्या मुलाच्या जिवासारखे जपत होते. ते कदाचित मिर्झाराजे जयसिंग चे सैन्य असेल. राजे आग्र्याहून सुटले परंतु इकडे नेतोजीराव अडकले व त्यांनी स्वराज्यासाठी खूप सोसले.

नेताजी पालकर मृत्यू आणि समाधी :

नेताजी पालकर हे अत्यंत पराक्रमी होते. त्यांना प्रतिशिवाजी असे म्हटले जायचे. सरसेनापती सरनोबत हे सैन्याचे सर्वोच्च पदे नेताजींनी ठेवली होती. स्वराज्य निर्मितीत नेताजींचा सिंहाचा वाटा होता. अशा शूरवीर सेनापतीचा मृत्यू अल्पशा आजाराने शिवरायांचा मृत्यू नंतर अवघ्या एकाच वर्षात म्हणजे 1681 साली तामसा, तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील जन्मभूमीत झाला. स्वराज्याचे सेनापती प्रतिशिवाजी म्हणून ओळखले जाणारे पालकर यांची समाधी तामसा गावातील तालुका हदगाव जिल्हा नांदेड ठिकाणी असून ती एका मुस्लिमांच्या शेतात आहे. अत्यंत दुरावस्थेत असलेल्या समाधीच्या भोवती गवत वाढलेले आहे. पालकर घराण्यातील माणूसच तिकडे वर्षानुवर्षे फिरकत नसेल, तर बाकीच्या काय अपेक्षा. जवळच्या पिंगळी गावात नेताजी चे वंशज राहतात.आज पिंगळी आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी नेताजी पालकर यांचे वंशज राहतात. त्याचप्रमाणे काष्टी, तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे ही पालकर यांची काही घराणी आहेत.

एका दिवसासाठी “शिवाजी महाराज” बनून अजरामर झालेला शिवबांचा मावळा वीर शिवा काशिद

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )