शिवस्तुती (Shivstuti with Audio)

Shivstuti । शिवाष्टक । Shivashtakam । Shivstuti Audio | Shivstuti with Audio

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

शिवस्तुती

कैलासराणा शिव चंद्रमौळी । फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १॥

रवींदुदानावल पूर्ण भाळीं । स्वतेज नेत्रीं तिमीरौघ जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनान्तकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २॥

जटा विभूती उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३॥

वैराग्य योगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरान्तकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४॥

उदारमेरु पति शैलजेचा । श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधी तो गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५॥

ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरी दोष महविदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥६॥

कपूरगौरी गिरीजा विराजे । हळाहळें कंठ निळाच साजे ।
दारिद्र्य दुःख स्मरणें निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥७॥

स्मशानक्रीडा करिता सुखावे । तो देवचूडामणि कोण आहे ।
उदासमूर्ती जटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥८॥

भूतादिनाथ अरि अंतकाचा । तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥९॥

नंदी हराचा हर नंदिकेश । श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१०॥

भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदें करि काम भग्न ।
तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥११॥

इच्छा हराची जग हे विशाळ । पाळी रची तो हरि ब्रह्मगोळ ।
उमापती भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१२॥

भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१३॥

प्रयाग वेणी सकळा हराच्या । पदारविंदी वहाती हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१४॥

कीर्ती हराची स्तुती बोलवेना । कैवल्यदाता मनुजा कळेना ।
एकाग्रनाथ विष अंगिकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१५॥

सर्वांतरी व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगाजवळी महंता ।
अंकी उमा ते गिरिरुपधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१६॥

सदा तपस्वी असे कामधेनु । सदा सतेज शतकोटी भानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१७॥

कर्पूरगौर स्मरल्या विसावा । चिंता हरी जो भजकां सदैवा ।
अंती स्वहितसुचना विचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१८॥

विरामकाळी विकळे शरीर । उदास चित्तीं न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतनि चित्तहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१९॥

सुखावसानीं सकळें सुखाची । दुःखावसानी टळती जगाचीं ।
देहावसानी धरणी थरारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२०॥

अनुहतशब्द गगनी न माय । तिचेनि नादें भव शून्य होय ।
कथा निजांगे करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२१॥

शांतिस्वलीला वदनीं विलासे । ब्रह्मांडगोळीं असुनी न दिसे ।
भिल्ली भवानी शिवब्रह्मचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२२॥

पीतांबरें मंडित नाभि ज्याची । शोभा जडीत वरि किंकिणींची ।
श्रीवेददत्त दुरितान्तकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२३॥

जिवाशिवांची जडली समाधी । विटला प्रपंचीं तुटली उपाधी ।
शुद्धस्वरे गर्जती वेद चारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२४॥

निदान कुंभ भरला अभंग । पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुरचक्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२५॥

मंदार बिल्वें बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरी भैरव विश्व तारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२६॥

जाई जुई चंपक पुष्पजाती । शोभे गळा मालतिमाळ हातीं ।
प्रतापसूर्य शरचापधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२७॥

अलक्ष्यमुद्रा श्रवणी प्रकाशे । संपूर्ण शोभा वदनीं विकासे ।
नेई सुपंथे भवपैलतारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२८॥

नागेशनामा सकळां जिव्हाळा । मना जप रे शिवयंत्रमाळा ।
पंचाक्षरी ध्यानगुहा विहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२९॥

एकान्ति ये रे गुरुराजस्वामी । चैतन्यरुपी शिव सूखनामी ।
शिणलों दयाळा बहुसाळ भारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३०॥

शास्त्राभ्यास नको, व्रत वैकल्ये नको, तीव्र तपें ती नको।

काळाचें भय मानसीं धरु नको दुष्टांस शंकू नका। ज्याचीया स्मरणें पतीत तरती, तो शंभु सोडूं नको

शिवाष्टक (Shivashtakam)

जय शिव शंकर, जय गंगाधर, करुणाकर करतार हरे। । जय कैलाशी, जय अविनाशी, सुखराशि सुखसार हरे ।। जय शशि शेखर, जय डमरूधर, जय जय प्रेमागर हरे। । जय त्रिपुरारी, जय मदहारी, अमित, अनन्त, अपार हरे।।। निर्गुण जय जय, सगुण अनामय, निराकार साकार हरे।। पारवती पति हर हर शम्भो, पाहि पाहि दातार हरे ।।१।।

जय रामेश्वर, जय नागेश्वर, वैद्यनाथ, केदार हरे ।।। मल्लिकार्जुन, सोमनाथ जय, महाकाल ओंकार हरे।। त्रयम्बकेश्वर, जय घुश्मेश्वर, भीमेश्वर, जगातार हरे।। काशी पति श्री विश्वनाथ जय, मंगलमय, अघहार हरे॥ नीलकण्ठ जय, भूतनाथ जय, मृत्युञ्जय अविकार हरे। । पारवती पति हर हर शम्भो, पाहि पाहि दातार हरे ।।२।।

जय महेश, जय जय भवेश, जय आदिदेव, महादेव विभो। | किस मुख से हे गुणातीत, प्रभु तव अपार गुण वर्णन हो ।। जय भवकारक तारक, हारक, पातक-दारक शिव शम्भो ।। दीन दुःखहर, सर्व सुखाकर, प्रेम-सुधाधर दया करो।।। पार लगा दो भवसागर से, बन कर कर्णाधार हरे। पारवती पति हर हर शम्भो, पाहि पाहि दातार हरे ।।३।।

जय मनभावन, जय पतितपावन, शोक नशावन शिवशम्भो। विपद विदारन, अधम उद्धारन, सत्य सनातन शिवशम्भो।। सहज वचनहर, जलज नयनवर, धवल-वरन-तन शिवशम्भो । मदन-कदन-कर, पाप-हरन-हर, चरन-मनन-धन शिवशम्भो ।। विवसन, विश्वरूप प्रलयंकर, जग के मूलाधार हरे। पारवती पति हर हर शम्भो, पाहि पाहि दातार हरे ।।४।।

भोलानाथ कृपालु, दयामय, औढरदानी शिव योगी। निमिष मात्र में देते हैं, नव निधि मनमानी शिव योगी।। सरल हृदय, अति करुणा सागर, अकथ कहानी शिव योगी ।। भक्तो पर सर्वस्व लुटाकर, बने मसानी शिव योगी ।। । स्वयं अकिंचन, जन मन रंजन, पर शिव परम उदार हरे। पारवती पति हर हर शम्भो, पाहि पाहि दातार हरे ।।५।।

आशुतोष ! इस मोहमायी निद्रा से मुझे जगा देना।। विषम वेदना से विषयों की मायाधीश छुड़ा देना ।। रूप सुधा की एक बूंद से जीवन मुक्त बना देना। दिव्य ज्ञान भण्डर युगल चरणों की लगन लगा देना ।। एक बार इस मन मन्दिर में कीजे पद-संचार हरे।। पारवती पति हर हर शम्भो, पाहि पाहि दातार हरे ॥६॥

दानी हो दो भिक्षा में, अपनी अनुपायनी भक्ति प्रभो। शक्तिमान हो दो अविचल, निष्काम प्रेम की शक्ति प्रभो। त्यागी हो दो इस असार, संसार से पूर्ण विरक्ति प्रभो ।। परमपिता हो दो तुम अपने, चरणों में अनुरक्ति प्रभो ।। स्वामी हो निज सेवक की, सुन लेना करुण पुकार हरे।| पारवती पति हर हर शम्भो, पाहि पाहि दातार हरे ॥७॥

तुम बिन ‘बेकल’ हूँ प्राणेश्वर, आ जाओ भगवन्त हरे। चरण शरण की बांह गहो, हे उमारमण प्रियकन्त हरे।। विरह व्यथित हूँ दीन दु:खी हूँ, दीनदायल अनन्त हरे। । आओ तुम मेरे हो जाओ, आ जाओ श्रीमन्त हरे ।। मेरी इस दयनीय दशा पर, कुछ तो करो विचार हरे।। पारवती पति हर हर शम्भो, पाहि पाहि दातार हरे ॥८॥

ॐ नमः शिवाय 

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )