श्रावण बाळ योजना माहिती मराठी | Shravan Bal Yojana

Shravan Bal Yojana 2023 Online Application, Beneficiary List, | श्रावण बाळ योजना कागदपत्र, योजना यादी, लाभार्थी लिस्ट, ऑनलाइन फॉर्म | श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना | श्रावण बाळ योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी | महाराष्ट्र सरकारी योजना 2023 | श्रावण बाळ योजना लाभार्थी पात्रता : Shravan Bal Yojana Beneficiary Eligibility | महाराष्ट्र श्रावण बाळ योजना उद्दिष्ट : Objective of Maharashtra Shravan Bal Yojana | महाराष्ट्र श्रावण बाळ योजना अंतर्गत मुख्य घटक आणि वैशिष्ट्ये : Main components and features under Maharashtra Shravan Bal Yojana | महाराष्ट्र श्रावण बाळ योजना लाभ आणि विशेषता : Maharashtra Shravan Bal Yojana Benefits and Features | श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आवश्यक कागदपत्र : Shravanbal Seva State Pension Scheme Required Documents | श्रावण बाळ योजना ऑनलाइन अर्ज : Shravan Bal Yojana Online Application | श्रावण बाळ योजना अर्जाची स्थिती तपासणे : Checking Shravan Bal Yojana Application Status

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

श्रावण बाळ योजना : Shravan Bal Yojana

भारत देश हा एक विकासशील देश आहे, आणि कृषिप्रधान देश आहे त्यामुळे आपल्याकडील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहतात, आणि यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक दुर्बल व गरीब सामान्य नागरिक आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात समाजातील निरनिराळ्या स्तरांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित व निराधार नागरिक आहेत, राज्यात ग्रामीण भागात तसेच शहरी भागात मोठयाप्रमाणात कमी उत्पन्न असलेल परिवार आहेत, जे हात मजुरी करून जीवनयापन करतात, अशा बहुसंख्य कुटुंबांकडे जीवनावश्यक आणि मुलभूत वस्तूंची कमतरता असते तसेच बहुसंख्य नागरिक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगतात, त्यामुळे असे परिवार त्यांच्या घरातील वृद्धांकडे दुर्लक्ष करतात त्याचप्रमाणे बहुतांश वृद्धांकडे त्यांच्या वृद्धापकाळात धनार्जनाचे साधन नसते, त्यामुळे बहुतेकवेळा कुटुंबाकडून त्यांची उपेक्षा केली जाते, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यांचा अपमान केल्याजातो त्यामुळे अशा जेष्ठ नागरिकांना समाजात जीवन जगणे कठीण होते, अशा जेष्ठ नागरीकांना आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून, त्याचप्रमाणे वृध्द नागरिकांना समाजात मानाने जीवनयापन करता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने हि श्रावण बाळ योजना राज्यात राबविली आहे. वाचक मित्रहो, या लेखामध्ये आपण श्रावण बाळ योजना 2023 संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसे कि या योजनेचे फायदे, योजनेसाठी लागणारी पात्रता, श्रावण बाळ योजना काय आहे, महत्वाची कागदपत्रे, अर्ज पद्धती, वैशिष्टे, आणि लाभार्थ्यांची यादी इत्यादी संपूर्ण या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत.

श्रावणबाळ योजना 2023

राज्यातील 65 आणि 65 वर्षाच्या वरील जेष्ठ नागरीकांसाठी त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हि श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केली आहे, महाराष्ट्र सरकारव्दारे नेहमीच राज्याच्या नागरिकांसाठी कल्याणकारी आणि लोक उपयोगी योजना राबविल्या जातात, या योजनांव्दारे समाजातील कमी उत्पन्न असलेले, वंचित नागरिक, आर्थिक दुर्बल घटक त्याचबरोर निराधार जेष्ठ नागरिक आणि सामान्य गरीब नागरिक यांचे जीवनमान सुधारणे त्यांना आर्थिक सुरक्षा देणे तसेच त्यांना आरोग्यविषयक सुविधा निर्माण करून देणे आणि त्यांना समाजात मानाने जीवन जगण्यास पाठबळ देणे हा उद्देश शासनाचा असतो, त्याप्रमाणे या श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार दरमहा 600/- रुपये जेष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ निवृत्तीवेतन देत आहे. जेणेकरून वृद्ध नागरिक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील, ज्या पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवायचा आहे ते महाराष्ट्र शासनच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात, तसेच ऑफलाईन सुद्धा या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्याची प्रक्रिया पुढे लेखामध्ये दिली आहे.

योजनेचे नावश्रावण बाळ योजना / Shravan Bal Yojana
व्दारा सुरुमहाराष्ट्र शासन
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीगरीब जेष्ठ नागरिक
उद्देश्यवृध्द नागरिकांना आर्थिक मदत
प्रकारपेन्शन योजना
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
श्रावण बाळ योजना Highlights

महाराष्ट्र श्रावण बाळ योजना अंतर्गत मुख्य घटक आणि वैशिष्ट्ये : Main components and features under Maharashtra Shravan Bal Yojana

महाराष्ट्र श्रावणबाळ योजना 2023 हि योजना राज्यातील निराधार आणि वंचित वृद्ध नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवेल, हि योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक आणि विशेष साहाय्य विभागाकडून राबविली आणि नियंत्रित केली जाते, या योजनेप्रमाणेच निराधार व दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी संजय निराधार योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना शासनव्दारे राबविल्या जातात. श्रावण बाळ या योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या दोन श्रेण्या करण्यात आल्या आहे, श्रेणी – (अ) आणि श्रेणी- (ब), या योजनेंतर्गत 65 व 65 वर्षावरील आणि दारिद्र्य रेषेच्याखालील कुटुंबाच्या यादीत नाव समविष्ट असणाऱ्या निराधार स्त्री व पुरुष नागरिकांना श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना गट –(अ) मधून 400/- रुपये प्रतीमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते आणि याच लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे 200/- प्रतिमहिना असे एकूण 600/- प्रतिमहिना प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते.

याचप्रमाणे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट – (ब) हि योजना जे नागरिक खरोखरीच गरजू निराधार वृद्ध आहेत परंतु ज्यांची दारिद्य रेषेखालील यादी मध्ये नोंद नाहीत. तसेच या योजनेंतर्गत ज्या नागरिकांचे वय वर्षे 65 व 65 वर्षाच्या वरील आहे आणि ज्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 21,000/- रुपयेच्या आत आहे अशा वृद्ध नागरिकांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट – (ब) मध्ये 600/- रुपये प्रतिमहिना प्रतीलाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते.

महाराष्ट्र श्रावण बाळ योजना उद्दिष्ट : Objective of Maharashtra Shravan Bal Yojana

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना हि योजना महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी आणि मुख्य योजना आहे, या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे 65 वर्षावरील वृद्ध निराधार आणि वंचित राज्याच्या नागरिकांना आर्थिक सहाय्य आणि प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर या पेन्शन योजनेचा उद्देश राज्यातील वयोवृद्ध नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करून त्यांना समाजात मानाचे जीवन देणे हा आहे, जेणेकरून वृद्धांना कुटुंबातील कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही व त्यांना स्वावलंबीपणे जीवन जगता यावे. शासनाच्या या योजनेचा उद्देश आहे हि योजना समाजातील प्रत्येक गरजू निराधार वृद्ध नागरिकांपर्यंत पोहचवावी.

श्रावण बाळ योजना लाभार्थी पात्रता : Shravan Bal Yojana Beneficiary Eligibility

महाराष्ट्र सरकारने श्रावण बाळ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे (बीपीएल) यादीत समावेश असल्याच्या आधारावर दोन गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे, गट अ आणि गट ब त्यामुळे लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे पात्रता निकष आहे.

  • या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदार महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असावे
  • योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जादारचे वय 65 वर्ष किंवा 65 वर्षाच्या वर असावे
  • योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदाराचे नाव दारिद्य्ररेषेखालील यादीत असावे
  • या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा
  • योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदारचे वय 65 वर्ष किंवा 65 वर्षाच्या वर असावे
  • या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदाराच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 21,000/- रुपये पेक्षा जास्त नसावे
  • या योजनेमध्ये असे पात्र अर्जदार ज्यांच्या कुटुंबाची दारिद्र्यरेषेखालील यादीत नोंद नाही

महाराष्ट्र श्रावण बाळ योजना लाभ आणि विशेषता : Maharashtra Shravan Bal Yojana Benefits and Features

मुलभूत गरजांसाठी वृद्ध नागरिकांना कुटुंबावर अवलंबून राहावे लागत होते, या योजनेमुळे ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील, आणि त्यांना समाजात सन्मानाने जीवन जगता येईल.

  • श्रावण बाळ योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील निराधार आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वृद्धांना दर महिन्याला 600/- रुपयांची आर्थिक सहायता करणार आहे.
  • श्रावण बाळ योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील वंचित आणि कमी उत्पन्न गटातील वृद्ध नागरिक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील.
  • शासनाने हि योजना निराधार वृद्ध लोकांसाठी राबविल्यामुळे राज्यातील वृद्ध नागरिक आपल्या आर्थिक समस्यांवर मात करू शकणार आहे.
  • महाराष्ट्र सरकारने या योजनेंतर्गत दोन श्रेणी बनविल्या आहे श्रेणी (अ) आणि श्रेणी (ब) श्रेण्यांमध्ये असे नागरिक असतील श्रेणी (अ) मध्ये ज्यांचे कुटुंब (बीपीएल) यादीत नोंदणीकृत आहे, तसेच श्रेणी (ब) मध्ये ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकूण 21,000/- रुपयाच्या आत आहे, आणि श्रावण बाळ हि योजना महाराष्ट्रातील वृद्ध निराधार नागरिकांसाठी लागू आहे.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आवश्यक कागदपत्र : Shravanbal Seva State Pension Scheme Required Documents

  • वयाचा दाखला :- ग्रामपंचायत किंवा नगरपालिका / महानगरपालिका मधून अधिकृत
  • जन्म प्रमाणपत्र,
  • शाळा सोडल्याचा दाखला,
  • रेशनकार्ड मध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा ग्रामीण / नागरी रुग्णालयाच्या अधीक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला.
  • दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव :- दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असल्याचा अधिकृत पुरावा.
  • रहिवासी दाखला :- ग्रामीणभागामधील ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला.

श्रावण बाळ योजना ऑनलाइन अर्ज : Shravan Bal Yojana Online Application

महाराष्ट्र श्रावण बाळ योजना 2023 या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र लाभार्थी उमेदवारांनी सर्व प्रथम महाराष्ट्र शासनच्या आधिकारिक वेबसाईटवर भेट देऊन प्रथम नोंदणी करणे आवशयक आहे यासाठी संपूर्ण नोंदणी प्रक्रिया आणि अर्ज करण्याची प्रक्रिया शासनाच्या या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी पात्र लाभार्थी या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतात, या वेबसाईटवर नोंदणी आणि अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रियेच अनुसरण करावे.

  • तुम्हाला सर्व प्रथम महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, या नंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल.
  • होम पेजवर तुम्हाला ”New Registration” हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील तुम्हाला त्यापैकी एक पर्याय निवडावा लागेल,
  • जर तुम्ही पर्याय एक निवडला असेल तर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर नोंदणी साठी वापरावा लागेल
  • तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल आणि युजर आयडी व पासवर्ड मिळवावा लागेल
  • जर पर्याय दोन निवडला असेल तर आता तुम्हाला एक नोंदणी फॉर्म दिसेल ज्या ठिकाणी तुम्हाला विचारलेला स्वतः बद्दलचा संपूर्ण तपशील भरावा लागेल जसे कि अर्जदाराचा पत्ता, मोबाइल नंबर, युजर नेम वेरिफिकेशन, फोटो, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा इत्यादी आवश्यक माहिती भरावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला ”Register” क्लिक करावे लागेल, अशाप्रकारे शासनच्या या वेबसाईटवर आपली नोंदणी प्रक्रिया संपूर्ण होईल.
  • त्यानंतर आता नोंदणीकृत उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया सुरु ठेवण्यासाठी वेबसाईटवर लॉगिन करणे आवश्यक आहे, यानंतर तुम्हाला तुमचे युजर नेम आणि पासवर्ड वापरून दिलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  • यानंतर समोरील ड्रॉप डाऊन सूचीमधील तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल आणि त्यावर क्लिक करून पुढे जावे लागेल, आपण भरलेला सर्व तपशील त्योग्य असल्यास तुमचे आपले सरकार पोर्टवर लॉगिन होईल, आता आपण श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज करू शकता.
  • आता तुम्हाला डाव्या मेनू साईडबारमधून सबंधित विभाग निवडावा लागेल जसे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल, समोर असलेल्या यादीतून तुम्हाला संजय निराधार / श्रावण बाळ योजना हा पर्याय निवडून प्रोसिड वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हला लॉगिन फॉर्म दिसेल यामध्ये तुमचे सर्व लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.
  • आता यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव, तुमचा संपर्क तपशील, ईमेल आयडी, पत्ता माहिती इत्यादी प्रविष्ट करावे लागेल.
  • यानंतरच्या विभागात योजनेशी सबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील, आता तुम्हाला बँक सबंधित तपशील याप्रमाणे बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँकेचा IFSC कोड, हि माहिती प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
  • हि माहिती प्रविष्ट केल्यानंतर सर्व माहितीची पुन्हा तपशीलवार पडताळणी करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा, या नंतर अर्ज यशस्वीपणे सबमिट झाल्यावर एक अर्ज क्रमांक तयार होईल, तुम्हाला हा अर्ज क्रमांक भविष्यातील संदर्भासाठी नोट करून ठेवणे आवश्यक आहे.

श्रावण बाळ योजना अर्जाची स्थिती तपासणे : Checking Shravan Bal Yojana Application Status

  • महाराष्ट्र श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर उमेदवार त्यांच्या अर्जाच्या स्थिती शासनाच्या या वेबसाईटवर भेट देऊन पाहू शकतात, अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
  • तुम्हाला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत आपले सरकार वेबपोर्टलवर भेट द्यावी लागेल, त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल, या होम पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ”Track Your Application” या पर्यायावर क्लिक करा.
  • या पुढील स्टेप ड्रॉप-डाऊन यादी मधून सबंधित विभाग आणि योजनेचे नाव निवडा व दिलेल्या जागेत तुमचा आयडी प्रविष्ट करा आणि त्यानंतर go बटनावर क्लिक करा, हि प्रोसेस यशस्वीपणे केल्यानंतर तुम्हाला अर्जाची स्थिती तुमच्यासमोर प्रदर्शित होईल.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )