श्री कृष्ण _______म्हणजे जणु मानवदेहधारी साक्षात परमेश्वरच (Shree Krushna)

कृष्ण (कृष्ण जन्माष्टमी): Krushna (Krushna Janmasthami) । गोपाळकाला- दहीहंडी । कृष्णचरित्र । जन्माष्टमी विशेष : वैभव, यश, सौभाग्य आणि कीर्ति प्रदान करणारे भगवान श्रीकृष्णाचे 108 नावे ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

कृष्ण (कृष्ण जन्माष्टमी): Krushna (Krushna Janmasthami)

जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.

हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. गुजराथमध्ये ‘सातम’ म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.

मध्य प्रदेशात आणि उत्तरी भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी कित्येकांच्या घरी गोकुळ- वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात. वृंदावन येथे या दिवशी दोलोत्सव असतो. याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वाची संकल्पना रासलीलाचे सादरीकरण केले जाते.

अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून पांढऱ्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून देवघर लता पल्लवानी सुशोभित करतात. त्या स्थानी देवकीचे सूतिकागृह स्थापन करतात. मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात. दुसऱ्या बाजूला यशोदा आणि तिची नवजात कन्या, वसुदेव, नंद, यांच्या मूर्ती बसवितात. सप्तमीच्या मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करतात व सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करतात. रात्रौ कथा, पुराण, नृत्य, गीत इ. कार्यक्रमांनी जागरण करतात. अष्टमीच्या दिवशी उपवास करतात व देवालाही फराळाच्या जिन्नसांचा नैवेद्य दाखवितात. नवमीच्या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करून महानैवेद्य समर्पण करतात.

गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण केल्यानंतर वैष्णवांनी परस्परांवर दही इ.चे सिंचन करावे. कारण ‘गोपाळांनी दही, दूध, तूप, उदक, यांनी परस्परांवर सिंचन व लेपन केले’असे भागवतामध्ये वचन आहे, त्यावरून असा विधी प्राप्त होतो. कृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा प्रसाद दिला जातो.

गोपाळकाला- दहीहंडी

उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.

गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. काला म्हणजे एकत्र मिळविणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ. हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते.

गोमंतकात याच काल्याला गवळणकाला म्हणतात. हा काला तिथल्या कलावंतिणी करतात. त्यात एका मुलीला कृष्णाचे सोंग देऊन कृष्णलीलेची गाणी म्हणतात. शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडवितात. हा गवळण काला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतर होतो…..

कृष्ण :

श्री कृष्ण ही अतिप्राचीन भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक वास्तविक व्यक्ती होऊन गेली… विष्णूच्या प्रसिद्ध दशावतारातील मत्स्यापासून वामनापर्यंतचे पाच अवतार झाले, तसा कृष्ण हा केवळ काल्पनिक अवतार नाही. श्री रामही अशीच ऐतिहासिक व्यक्ती असणे फार शक्य आहे, असे पुराणसंशोधकांचे मत आहे.

हिंदुधर्माला मानवदेहधारी साक्षात परमेश्वरच या दोन ऐतिहासिक व्यक्तींच्या रूपातच विशेषतः मिळाला. विष्णू, शिव, देवी, दत्त, गणेश इ. साक्षात परमेश्वस्वरूप मानलेले देव या ऐतिहासिक व्यक्ती होत्या, असे कोणीही मानीत नाही… श्री रामापेक्षाही कृष्णाला हिंदुधर्मात अधिक महत्त्व आले, ते त्यांनी स्थापन केलेल्या भागवतधर्मामुळे अथवा भक्तिमार्गामुळे होय. कृष्णाचाच भक्तिमार्ग हा रामभक्तीतही परिणत झाला.

श्री कृष्णचरित्रात अद्‌भुत असे प्रसंग व असेच पराक्रम वर्णिलेले आहेत.अशा अद्‌भुत प्रसंगांनी आणि पराक्रमांनी भरलेल्या या चरित्रातही वास्तविक ऐतिहासिक अंश किंवा बीजे सहज अनुमानिता येतात. वास्तवालाच कल्पनारम्य अद्‌भुत रूप दिलेले लक्षात येते. बाल्यावस्थेत कृष्णाने पूतना या साक्षसीचे स्तनपान करतानाच तिचे प्राणापहरण केले या कथेचा ‘पूतना’ नामक बालरोगातून त्याची त्वरित सुटका झाली असा अर्थ लागतो. उखळला दोराने बांधलेल्या बालकृष्णाने दोन अर्जुनवृक्षांमध्ये अडकलेल्या उखळाच्या जोरावर ते दोन अर्जुनवृक्ष पाडले, ही कथाही बांधलेले उखळ त्याने फरफटत नेले आणि बागेतील लहान बालवृक्ष त्यामुळे मोडून पडले, या वस्तुस्थितीशी जुळू शकते. गाडा उलथून टाकणे प्रचंड उन्मत्त बैलाशी झुंज घेऊन त्याची शिंगे मोडून त्याला ठार करणे बेलगाम व बेफाम झालेल्या दांडग्या घोड्याला काबूत आणून व लोळवून ठार करणे इ. पराक्रमही नवतरुण व मल्लविद्येत प्रवीण अशा बलिष्ठ कृष्णाला शक्य आहेत असंभवनीय नाहीत…..

शकटासुर, वृषभासुर, केशी दैत्य, मथुरेच्या दरवाजातील कुवलयापीड हत्ती इत्यादिकांच्या निर्दालनाच्या कृष्णाच्या नवयौवनातल्या घटना वास्तविक असू शकतात… त्यांत अलौकिक बुद्धिमत्ता, शरीरसामर्थ्य, चपलता, प्रसंगावधान, धैर्य आणि कुशलता हे गुण कृष्णाच्या ठिकाणी एकत्रित झालेले दिसून येतात. चाणूरासारखे अप्रतिम मल्ल, मल्लयुद्धात खेळ खेळत ठार करण्याचीही शक्ती मल्लविद्येत प्रवीण असलेल्या व्यक्तिला असू शकते…..

श्री कृष्णाच्या बाललीलांमध्ये त्याच्या नवयौवनातीस कथांचा अंतर्भाव केला आणि त्या अधिक अद्‌भुत रसात्मक केल्या ही गोष्ट कृष्णाला ‘दिव्यावतार’ मानण्याच्या कालखंडात झालेले परिवर्तन होय… यशोदेला बालकृष्णाने आपल्या मुखात विश्वरूप दर्शन दिले, ही कथा अशा परिवर्तनानंतर प्रविष्ट झाली. गोवर्धन पर्वत करंगळीवर कृष्णाने पेलला अशा तऱ्हेच्याही कथा त्याची दिव्यावतार म्हणून पूजा झाल्यानंतर कथा होत. या कथेतही वास्तवाचे बीज स्पष्ट दिसते…..

इंद्रपूजा किंवा इंद्रध्वजोत्सव बाजूला सारून गोप्रचार तसेच भूमीच्या किंवा पर्वताच्या पूजनाचा कृष्णाने पुरस्कार केला, ही गोष्ट कृष्णाच्या नवयौवनात घडणे शक्य आहे… वैदिक श्रेष्ठ देव असलेल्या इंद्राचे माहात्म्य कमी करून जुन्या धार्मिक परंपरांना महत्त्व देऊन त्या सुरू करण्याचा कृष्णाचा यत्न होता. वैदिकेतर व वेदपूर्व हिंदुधर्मातील परंपरांना उजाळा देणारा थोर धर्मसुधारक म्हणूनही कृष्णाचे महत्त्व या कथेने चांगले सूचित होते. वैदिक यज्ञधर्माच्या परंपरेला दुय्यम लेखणारा आणि वासुदेवभक्तिसंप्रदाय, उपनिषदांच्या तत्त्वज्ञानाचा आधार देऊन, दृढ करणारा कृष्ण ही सर्वश्रेष्ठ ऐतिहासिक व्यक्ती होय, असे त्याच्या चरित्रातील अनेक कथांवरून सूचित होते. गोपालन आणि गोमातेची पूजा हा हिंदुधर्मातील एक केंद्रवर्ती आचारधर्म आहे. या आचारधर्माला कृष्णाने प्राधान्य दिले…..

श्री कृष्णाचा ‘देवकीपुत्र कृष्ण’ असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात आला असून, मनुष्य जीवनच यज्ञ म्हणून चालवावे या यज्ञाच्या दक्षिणा तप, दान, ऋजुता, अहिंसा आणि सत्यवचन ह्या होत असा उपदोश घोर अंगिरस या ऋषीने केल्यामुळे कृष्ण हा तृष्णामुक्त झाला, असे त्यात म्हटले आहे… भगवद्‌गीतेशी हा उपदेश जुळतो. वासुदेव कृष्णाचा अर्जुनाबरोबर उल्लेख पाणिनीने केलेला आहे. क्षत्रिय म्हणून या दोघांनाही पाणिनिकाली मान्यता नसावी. मूळ महाभारत (इ. स. पू. सु. ३००), हरिवंश (इ. स. पू. सु. दुसरे-तिसरे शतक), विष्णुपुराणाचा (सु. पाचवे शतक) पाचवा अंश, भागवताचा (सु. नववे शतक) दशमस्कंध आणि अखेरीस ब्रह्मवैवर्तपुराण (सु. पंधरावे शतक) हे कृष्णचरित्राचे ऐतिहासिक क्रमाने मुख्य आधारग्रंथ होत…..

महाभारताच्या सभापर्वामध्ये राजसूय यज्ञात अग्रपूजेचा मान कृष्णालाच का देणे जरूर आहे, याचे समर्थन भीष्माने केले… त्या समर्थनाच्या निमित्ताने जे कृष्णचरित्र भीष्माने सांगितले आहे, ते हरिवंशातूनच जवळजवळ सगळे उचलले आहे, असे ‘भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरा’ ने प्रसिद्ध केलेल्या हरिवंशाच्या संशोधित आवृत्तीच्या प्रस्तावनेत डॉ. प. ल. वैद्य यांनी सिद्ध करून दाखविले आहे. म्हणून असा निष्कर्ष निघतो, की कौरव-पांडवांच्या संदर्भात सांगितलेल्या कृष्णाच्या कथा ह्या महाभारतातील मूळच्या असून सभापर्वातील भीष्मोक्त कृष्णचरित्र ही हरिवंशातून घेतलेली भर आहे…..

विष्णुपुराणातील कृष्णकथा ही हरिवंशांच्याच कथेत काही भर टाकून सांगितलेली आहे… आज भारतात सर्वत्र प्रसृत असलेली कृष्णकथा ही मुख्यतः भागवताच्या दशमस्कंधातील कृष्णकथा होय. दशमस्कंध हा कृष्णकथेला वाहिलेला स्कंध आहे. हरिवंशातीलच कथांना अधिक अद्‌भुत रम्य रूप दिले. वत्सक, अघासुर, प्रलंब आणि शंखचूड या असुरांच्या वधाचे प्रसंग, ही त्यातील हरिवंशापेक्षा निराळी अशी भर आहे. कुब्जेवरील प्रेमाच्या कथेतही अधिक रंग भागवताने भरला आहे. ‘ब्रह्मस्तुती’ आणि ‘वेदस्तुती’ हीही अधिक भर घातलेली प्रकरणे होत…..

रूक्मिणीस्वयंवर कथेमध्येसुद्धा रूक्मिणीने कृष्णाला पाठविलेले प्रेमपत्र हरिवंशात नाही, ते येथे आहे… हरिवंशातील केवळ कृष्णाची किर्ती व रूक्मिणीच्या सौंदर्याचे वर्णन कानावर आल्यामुळे, दोघांची प्रीती एकमेकांवर बसली, असे म्हटले आहे. भागवतात गोपी आणि कृष्ण यांच्या शृंगाराचे उत्तान वर्णन आले आहे. तसेच कृष्ण व गोपींची रासक्रीडा खूप खुलवून सांगितली आहे. हरिवंशात हा शृंगार आणि क्रीडा सूचक रूपानेच तेवढी आली आहे. महाभारत, हरिवंश व भागवत यांमध्ये कृष्ण हा गोपींचा प्राणवल्लभ म्हणून निर्दिष्ट केलेला असला, तरी तेथे कोठेही राधेचा निर्देश नाही. हालाच्या गाथासप्तशतीत (सु. पाचवे शतक) राधा व कृष्ण यांच्या प्रणयाचा उल्लेख आला आहे. राधा ही इतर गोपींप्रमाणेच परकीया आहे, असे एक मत धरून मध्ययुगीन काही काव्ये लिहिली आहेत, तर राधा व कृष्ण यांचा विवाह झाला, असे धरून काही काव्यांमध्ये वर्णन आहे…..

राधा ब्रह्मवैवर्तपुराण व जयदेवकविरचित गीतगोविंदात कृष्णाची परमप्रिया म्हणून चमकते. ब्रह्मवैवर्तात विष्णूची आदिमायाशक्ती हीच राधा बनली… मूळमहाभारतात जशी कालांतराने भर पडत गेली, तशी मूळ हरिवंशातही ती पडत गेली व मूळ ग्रंथ दुप्पट अथवा तिप्पट झाले. वरील सर्व ग्रंथांमध्ये असलेल्या कृष्ण चरित्रांपैकी भागवतातील कृष्णचरित्र हे मध्ययुगीन देशी भाषांमध्ये प्रामुख्याने प्रसृत झाले. कृष्णाच्या बाललीला आणि राधाकृष्णप्रणय मराठी संतांच्याही कवितांचा विषय बनला…

कृष्णचरित्र :

यदुवंशाच्या वृष्णिकुलात कृष्णाचा जन्म झाला… वृष्णी हा यदुवंशातील भीम सात्वत याच्या चार पुत्रांपैकी एक पुत्र. भजमान, देवावृध, अंधक व वृष्णी या चार भावांमध्ये यादवांचे राज्य विभागले होते. अंधकाकडे मथुरा व तिच्या भोवतालचा परिसर होता. अंधकाचा पुत्र कुकुर. कुकुराच्या वंशातील आहुकाला देवक, उग्रसेन इ. पुत्र झाले. देवकाला चार मुलगे व सात मुली झाल्या. त्यांपैकी देवकी ही कृष्णाची माता होय. उग्रसेनाला नऊ पुत्र व पाच पुत्री झाल्या. उग्रसेनाचा सगळ्यात ज्येष्ठ पुत्र कंस होय. कंसाने आपला पिता उग्रसेन यास बंदिखान्यात टाकून मथुरेचे राज्य बळकावले. वसुदेव उग्रसेनाचा मंत्री होता. वृष्णी, अनमित्र, देवमीढुष, शूर आणि शूराचा वसुदेव अशा पिढ्या सांगितल्या आहेत. वसुदेवाची सख्खी बहीण ‘पृथा’ म्हणजे पहिल्या तीन पांडवांची माता कुंती होय. कुंती ही कुंतभोज राजाला दत्तक गेली होती. देवकाची कन्या देवकी ही वसुदेवाची पत्नी आणि कृष्णाची माता होय. वसुदेवाला देवकी, रोहिणी इ. सात भार्या होत्या.

वसुदेवाच्या विवाहाच्या अखेरीस वसुदेव व देवकी यांची रथावरून मिरवणूक निघाली… या रथाचे सारथ्य कंसाने आपली चुलत बहीण जी देवकी तिच्यावरील प्रेमामुळे केले. या मिरवणुकीच्या प्रसंगी आकाशवाणी झाली, की ‘कंसा तुझा शत्रू, तुझा वध करणारा, देवकीच्या पोटी जन्माला येणार आहे’. हरिवंशातील चरित्रात मात्र असे म्हटले आहे, की नारदमुनींनी कंसाचा आतिथ्यसत्कार स्वीकारल्यावर त्याला भविष्य सांगितले, की ‘देवकीचा आठवा गर्भ हा तुझा अंत करणारा होणार आहे’. वसुदेव हा उग्रसेनाचा मित्र असलेला मंत्री. त्याच्याबद्दल कंसाच्या मनात अढी होतीच. जरासंधाचा कंस हा जावई. जरासंध हा सर्व भारतवर्षातील सर्वश्रेष्ठ सम्राट, राजांचा राजा होता. त्याच्या पाठिंब्यावर कंसाने उग्रसेनाला म्हणजे आपल्या पित्याला पदच्युत करून सिंहासन बळकावले होते. कंस एका मोठ्या सम्राटाच्या पाठिंब्यामुळे अत्यंत उध्दट बनून त्याने प्रजेकडून जबरदस्त करभार वसूल करण्याचा सपाटा लावला. कंस यादवकुलीन होता. यादवांची विशेषतः वृष्णी आणि अंधक कुलांची गणराज्ये होती. स्वतः कंस गणांच्या संमतीने राजा न बनता आपल्या सासऱ्याच्या बळावर राजा बनला. त्यामुळे गणराज्याची पद्धत बिघडविल्या मुळे आणि जुलमी धोरण पतकरल्यामुळे कंसाविरुद्ध असंतोष माजला असावा आणि या असंतोषाचे प्रतिनिधी वसुदेवाचे दोन पुत्र बलराम आणि कृष्ण बनले, असा तर्क करण्यास बरीच जागा आहे.

वसुदेव हासुद्धा या असंतोषाच्या मुळाशी असावा. अनेक यादव कुले ही कृषी व गोपालन या व्यवसायांतील होती. पशुपालन व कृषिकर्म हे जोडधंदे, गंगा यमुनेच्या दुआबात भरभराटीस आले होते. भारी कारभारामुळे पशुपालन करणाऱ्या गणांमध्ये असंतोष माजला व नंदगोप हा वसुदेवाचा मित्र, कंसाचा गोपालक असूनही वसुदेवाच्या पक्षाला येऊन मिळाला. मथुरेच्या तीरावर ‘व्रज’ म्हणजे गोकुळ होते. ही विपुल समृद्धी मिळालेली व्रज्रभूमी होती. नंदगोपाकडे वसुदेवाने आपली दुसरी पत्नी रोहिणी ही सुरक्षिततेकरिता पाठविली होती.

आकाशवाणी वा नारदाची भविष्यवाणी ऐकल्यावर कंस भडकला आणि तो देवकीचा वध करण्यास उद्युक्त झाला… वसुदेवाने त्याची समजूत घातली व स्त्रीवधापासून त्याला परावृत्त केले, असे भागवतात म्हटले आहे. हरिवंशात ही मिरवणुकीतील आकाशवाणी सांगितली नाही. तेथे असे म्हटले आहे, की नारदाची भविष्यवाणी लक्षात ठेवून कंसाने वसुदेवाच्या घरावर गुप्त रक्षक ठेवले त्यांत स्त्रियाही होत्या. देवकीला संतती झाल्याबरोबर कंसाला संदेश येई आणि त्याप्रमाणे तो नवप्रसूत बालकाचा ताबडतोब वध करून निकाल लावी. अशी सहा बालके त्याने नष्ट केली. सातवा गर्भ उदरात आल्याबरोबर देवकीच्या गर्भाशयातून ओढून घेऊन योगनिद्रादेवीने तो रोहिणीच्या गर्भाशयात ठेवला. तोच बलराम म्हणून जन्मला. त्याचे जन्मनाव ‘संकर्षण’ होय. एकीकडून ओढून दुसरीकडे नेलेला म्हणजे ‘संकर्षण’ होय. आठवा गर्भ म्हणजे साक्षात विष्णूने मानवशरीर धारण केलेला कृष्ण होय. हा प्रसूतिकाली चतुर्भुज विष्णूच्या रूपाने देवकीपुढे प्रगट झाला परंतु देवकीच्या प्रार्थनेने त्याने पुन्हा नवजात बालकाचे रूप धारण केले. हा श्रावण कृष्ण अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर किंवा अभिजित नक्षत्रावर जन्मला.

यावेळी भागवतात सांगितल्याप्रमाणे वसुदेव व देवकी यांच्या पायांत लोखंडी बेड्या कंसाने अडकविल्या होत्या, त्या एकदम निखळून त्यांचे पाय मोकळे झाले… हरिवंशाप्रमाणे बेड्या घातल्याच नव्हत्या. वसुदेवाने मध्यरात्रीच या बालकाला नंदगोपाच्या गोकुळात नेले. नंदगोपाची पत्नी यशोदा नुकतीच बाळंतीण झाली होती तिला मुलगी झाली होती. ती मुलगी वसुदेवाने उचलली, बालकृष्णाला तिच्या कुशीत झोपविले व तिच्या कन्येला घेऊन परत सूर्योदयाच्या आत तो मथुरेत स्वगृही परतला. भागवतामध्ये हा प्रसंग अधिक अद्भुतरम्य करून वर्णिला आहे.

कृष्णजन्माच्या वेळी भर पावसाळा सुरू होता, यमुना दुथडी भरून वाहत होती, तिने दुभंगून वसुदेवाला वाट दिली, असे तेथे म्हटले आहे. सकाळी कंसाला देवकी प्रसूत झाल्याची वार्ता मिळाली… वसुदेवाने आणलेली यशोदाकन्या त्याच्या हाती लागली. त्याने तिला शिळेवर आपटण्याकरिता उचलले. तोच ती त्याच्या हातातून निसटून तिने आकाशात आपले संपूर्ण शारदादेवीचे रूप प्रगट केले आणि कंसाला सांगितले, की ‘तुझा शत्रू अन्यत्र वाढत आहे’. ही योगनिद्रादेवी यशोदेच्या गर्भात आली, कंसाच्या हातून निसटली, विष्णूच्या वरदानामुळे विंध्यवासिनी देवी बनली आणि सर्व मानवांना पूजनीय, विघ्ननाशिनी व सर्वकाम प्रदायिनी बनली, असे सर्व पुराणांतल्या कृष्णचरित्रांत सांगितले आहे…

जन्माष्टमी विशेष : वैभव, यश, सौभाग्य आणि कीर्ति प्रदान करणारे भगवान श्रीकृष्णाचे 108 नावे :

जन्माष्टमीच्या दिवशी, सौभाग्य, ऐश्वर्य, कीर्ती, कीर्ती, पराक्रम आणि अफाट वैभवासाठी श्रीकृष्णाच्या नावांचा जप केला जातो. वाचकांसाठी येथे 108 नावे सादर केली आहेत.

भगवान श्रीकृष्णाची 108 नावे आणि त्यांचे अर्थ ……..

भगवान श्री कृष्णाची १०८ नावे :

  1. अचला : प्रभु.
  2. अच्युत : अचूक परमेश्वर किंवा ज्याने कधीही चूक केली नाही.
  3. अद्भुतह : अद्भुत प्रभु.
  4. आदिदेव : देवांचा स्वामी.
  5. आदित्य : देवी अदितीचा मुलगा.
  6. अजन्मा : ज्याची शक्ती अमर्याद आणि अनंत आहे.
  7. अजया : जीवन आणि मृत्यूचा विजेता.
  8. अक्षरा : अविनाशी प्रभु.
  9. अमृत : अमृताचे स्वरूप असणे.
  10. अनादिह : सर्वप्रथम.
  11. आनंद सागर : जो दयाळू आहे.
  12. अनंता : अंतहीन देव.
  13. अनंतजीत : नेहमीच विजयी.
  14. अनया : ज्याचा कोणी स्वामी नाही.
  15. अनिरुद्ध : ज्याला थांबवता येत नाही.
  16. अपराजित : ज्यांचा पराभव होऊ शकत नाही.
  17. अव्युक्ता : माणिकांसारखे स्वच्छ.
  18. बाल गोपाल : भगवान श्रीकृष्णाचे बाल रूप.
  19. बलि : सर्वशक्तिमान.
  20. चतुर्भुज : चार भुजा असलेला परमेश्वर.
  21. दानवेंद्रो : वरदान देणारा.
  22. दयाळू : करुणेचे भांडार.
  23. दयानिधी : सर्वांवर दयाळू.
  24. देवाधिदेव : देवांचा देव.
  25. देवकीनंदन : देवकीचा लाल (मुलगा).
  26. देवेश : देवांचाही देव.
  27. धर्माध्यक्ष : धर्माचा स्वामी.
  28. द्वारकाधीश : द्वारकेचा शासक.
  29. गोपाल : जो गोरक्षकांसोबत खेळतो.
  30. गोपालप्रिया : गोरक्षकांचे प्रिय.
  31. गोविंदा : गाय, निसर्ग, जमीन प्रेमी.
  32. ज्ञानेश्वर : ज्ञानाचा स्वामी.
  33. हरी : निसर्गाचा देव.
  34. हिरण्यगर्भा : सर्वात शक्तिशाली निर्माता.
  35. ऋषिकेश : सर्व इंद्रियांचा दाता.
  36. जगद्गुरू : विश्वाचे गुरु.
  37. जगदीशा : सर्वांचा रक्षक.
  38. जगन्नाथ : विश्वाचा स्वामी.
  39. जनार्धना : जो सर्वांना वरदान देतो.
  40. जयंतह : जो सर्व शत्रूंचा पराभव करतो.
  41. ज्योतिरादित्य : ज्याला सूर्याचे तेज आहे.
  42. कमलनाथ : देवी लक्ष्मीचे भगवान.
  43. कमलनयन : ज्याचे डोळे कमळासारखे आहेत.
  44. कामसांतक : ज्याने कंसचा वध केला.
  45. कंजलोचन : ज्याचे डोळे कमळासारखे आहेत.
  46. ​​केशव : ज्याला लांब, काळे मॅट केलेले कुलूप आहे.
  47. कृष्ण : गडद रंग.
  48. लक्ष्मीकांता : देवी लक्ष्मीची देवता.
  49. लोकाध्यक्ष : तीन जगाचा स्वामी.
  50. मदन : प्रेमाचे प्रतीक.
  51. माधव : ज्ञानाचे भांडार.
  52. मधुसूदन : जो मध-राक्षसांना मारतो.
  53. महेंद्र : इंद्राचा स्वामी.
  54. मनमोहन : जो सर्वांना मोहित करतो.
  55. मनोहर : अतिशय सुंदर स्वरूपाचे प्रभु.
  56. मयूर : जो मुकुटावर मोराचे पंख घालतो.
  57. मोहन : जो सर्वांना आकर्षित करतो.
  58. मुरली : बासरी वाजवणारा परमेश्वर.
  59. मुरलीधर : जो मुरली घालतो.
  60. मुरली मनोहर : जो मुरली खेळून मोहित होतो.
  61. नंदगोपाल : नंद बाबांचा मुलगा.
  62. नारायण : जो प्रत्येकाचा आश्रय घेतो.
  63. निरंजन : सर्वोत्तम.
  64. निर्गुण : ज्यामध्ये कोणतेही दोष नाही.
  65. पद्महस्ता : ज्याचे हात कमळासारखे आहेत.
  66. पद्मनाभ : ज्याच्याकडे कमळाचा आकार आहे.
  67. परब्रह्म : पूर्ण सत्य.
  68. परमात्मा : सर्व प्राण्यांचा स्वामी.
  69. परमपुरुष : ज्याचे व्यक्तिमत्व उच्च आहे.
  70. पार्थसारथी : अर्जुनाचा सारथी.
  71. प्रजापती : सर्व प्राण्यांचा स्वामी.
  72. पुण्य : शुद्ध व्यक्तिमत्व.
  73. पुरुषोत्तम : सर्वोत्तम पुरुष.
  74. रविलोचन : ज्याचा डोळा सूर्य आहे.
  75. सहस्राकाश : हजार डोळ्यांनी प्रभु.
  76. सहस्त्रजीत : हजारोंचा विजेता.
  77. सहस्रपात : ज्याला हजारो पाय आहेत.
  78. साक्षी : सर्व देवांची साक्षीदार.
  79. सनातन : जे कधीच संपत नाहीत.
  80. सर्वजन : सर्वकाही जाणून घेणे.
  81. सर्वपालक : सर्व सांभाळणारा.
  82. सर्वेश्वर : सर्व देवांपेक्षा उच्च.
  83. सत्य वचन : जे सत्य सांगतात.
  84. सत्यव्त : सर्वोत्तम व्यक्तिमत्त्व असलेला देव.
  85. शंतह : शांत आत्मा असलेले.
  86. श्रेष्ठ : महान.
  87. श्रीकांत : अद्भुत सौंदर्याचा स्वामी.
  88. श्याम : ज्यांचा रंग गडद आहे.
  89. श्यामसुंदर : गडद रंगातही सुंदर दिसणारा.
  90. सुदर्शन : सुंदर.
  91. सुमेध : सर्वज्ञ.
  92. सुरेशम : सर्व प्राण्यांचा स्वामी.
  93. स्वर्गपती : स्वर्गाचा राजा.
  94. त्रिविक्रमा : तीन जगाचा विजेता.
  95. उपेंद्र : इंद्राचा भाऊ.
  96. वैकुंठनाथ : स्वर्गवासी.
  97. वर्धमानह : कोणताही आकार नसणे.
  98. वासुदेव : जो सर्वत्र उपस्थित आहे.
  99. विष्णू : भगवान विष्णूचे रूप.
  100. विश्वदक्शिनह : कुशल आणि कार्यक्षम.
  101. विश्वकर्मा : विश्वाचा निर्माता.
  102. विश्वमूर्ती : संपूर्ण विश्वाचे रूप.
  103. विश्वरूपा : जो विश्वाच्या फायद्यासाठी स्वरूप धारण करतो.
  104. विश्वात्मा : विश्वाचा आत्मा.
  105. वृषपर्व : धर्माचा स्वामी.
  106. यदवेंद्रा : यादव घराण्याचे प्रमुख.
  107. योगी : मुख्य गुरु.
  108. योगिनाम्पति : योगीं

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )