डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना | महाराष्ट्र स्वाधार योजना | महाराष्ट्र सरकारी योजना | स्वाधार योजना फॉर्म | समाज कल्याण योजना महाराष्ट्र | Swadhar yojana माहिती । स्वाधार योजना आवश्यक कागदपत्रे । Swadhar Yojana Necessary Documents । महाराष्ट्र स्वाधार योजना संपूर्ण माहिती । Maharashtra Swadhar Yojana Complete Information । स्वाधार योजना महाराष्ट्र वैशिष्ट्ये । Features of Swadhar Yojana Maharashtra । महाराष्ट्र स्वाधार योजना अंतर्गत मिळणारे लाभ । Benefits under Maharashtra Swadhar Yojana । महाराष्ट्र स्वाधार योजना उद्देश । Objective of Maharashtra Swadhar Yojana । स्वाधार योजना लाभार्थी पात्रता । Swadhar Yojana Beneficiary Eligibility । महाराष्ट्र स्वाधार योजना अटी आणि निकष । Maharashtra Swadhar Yojana Terms and Conditions । स्वाधार योजना लाभ वितरण प्रक्रिया । Swadhar Yojana benefit distribution process. । महाराष्ट्र स्वाधार योजना ऑनलाइन फॉर्म । Maharashtra Swadhar Yojana Online Form । महाराष्ट्र स्वाधार योजना अर्ज करण्याची प्रक्रिया । Maharashtra Swadhar Yojana Application Process । FAQ on महाराष्ट्र स्वाधार योजना । FAQ on Maharashtra Swadhar Yojana
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
स्वाधार योजना । Swadhar Yojana
भारत देश हा एक विकासशील देश आहे, त्यामुळे देशामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये विकास होत आहे, औद्योगिक क्षेत्रात मोठया प्रमाणात विकास होत आहे, तसेच या औद्योगिक क्षेत्रांमध्ये विकासाप्रमाणे कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे, त्यामुळे औद्योगिक क्षेत्रांबरोबर शिक्षण शेत्रात सुद्धा मोठयाप्रमाणात विकास होत आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुद्धा कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी व्यावसायिक/बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या वाढत आहे, तसेच या महाविद्यालयांमध्ये व्यवसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा संख्या वाढत आहे, या विद्यार्थ्यांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थी असतात जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये मोडतात.
अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे बहुतांश वेळा या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, या सर्व विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी हि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 सुरु केली आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण अबाधित पूर्ण करता यावे. वाचक मित्रहो या लेखामध्ये आपण महाराष्ट्र स्वाधार योजना, या योजने संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसेकी योजनेसाठी लागणारी पात्रता, योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, लाभ आणि अर्ज करण्याची पद्धत इत्यादी माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र स्वाधार योजना संपूर्ण माहिती । Maharashtra Swadhar Yojana Complete Information
राज्यात वाढत असलेली व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. आणि त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यामुळे त्यांचे उच्च शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासात बाधा निर्माण होते. या बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेता याव्या.
यासाठी आवश्यक असलेली अनुदानाची रक्कम सबंधित अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) व्दारे वितरीत करण्यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सन 2017 च्या निर्णयानुसार शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या माध्यमातून या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
स्वाधार योजना महाराष्ट्र वैशिष्ट्ये । Features of Swadhar Yojana Maharashtra
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 हि योजना महाराष्ट्र शासनाने 2016 ते 2017 मध्ये सुरु केली. हि योजना एक शैक्षणिक योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये शिकणारे तसेच इयत्ता अकरावी आणि बारावी नंतरच्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षण घेण्यात सहायता करण्यासाठी महाराष्ट्र स्वाधार योजना अंतर्गत अनुदानाच्या रुपात आर्थिक मदत केल्या जाते.
- महाराष्ट्र स्वाधार योजना या योजनेचा लाभ राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील कुटुंबातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहे.
- स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि इतर शैक्षणिक खर्च यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रतीवर्षी 51,000/- रुपये अनुदान म्हणून आर्थिक सहायता केली जाईल.
- स्वाधार योजने अंतर्गत विद्यार्थी इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी मध्ये शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी पदवी, डिप्लोमा तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेसाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी किंवा 12वी, पदवी / पदविका परीक्षेमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे,
- अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हि मर्यादा 50 टक्के असेल.
महाराष्ट्र स्वाधार योजना अंतर्गत मिळणारे लाभ । Benefits under Maharashtra Swadhar Yojana
महाराष्ट्र स्वाधार योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी, 12वी पदवी, पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि ज्यांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही, अशा पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता व निवासाची सोय आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे अनुदानाची रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.
वरील अनुदानाच्या धनराशी व्यतिरिक्त वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपये आणि अन्य अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2,000/- रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.
महाराष्ट्र स्वाधार योजना उद्देश । Objective of Maharashtra Swadhar Yojana
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न गटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही, तसेच या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करतांना अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना समोर जावे लागते, त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा होतकरू आणि गुणवंत अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करता यावे, तसेच त्यांना त्यांचे उज्ज्वल भविष्य निर्माण करता यावे, यासाठी अशा विद्यार्थ्यांना भोजन आणि निवासाची सोय व इतर शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या माध्यमातून अनुदानाच्या स्वरुपात या विद्यार्थ्यांची आर्थिक सहायता केली जाते.
स्वाधार योजना लाभार्थी पात्रता । Swadhar Yojana Beneficiary Eligibility
- महाराष्ट्र राज्यातील ज्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना स्वाधार योजने अंतर्गत लाभ मिळवायचा आहे त्यांना या योजनेमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे,
- या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लाभार्थी पात्रता निकष खालीलप्रमाणे राहील.
- या योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचा असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांनी जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
- विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी ज्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा शेड्यूल बँकेत खाते उघडले आहे, त्या खात्याशी स्वतःचा आधार क्रमांक संलग्न करणे बंधनकारक असेल.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वर्षी एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
- या योजने अंतर्गत विद्यार्थी स्थानिक नसावा, म्हणजे विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा.
- स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थी इयत्ता 11वी किंवा 12वी आणि त्यानंतरचे दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमांसाठी उच्च शिक्षण घेणारा असावा.
- स्वाधार योजनेमध्ये इयत्ता 11वी आणि 12वी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी मध्ये किमान 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.
- या योजनेच्या अंतर्गत दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन / CGPA चे गुण असणे आवश्यक आहे.
- स्वाधार योजनेच्या अंतर्गत इयत्ता 12वी नंतर पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा त्याचप्रमाणे पदवीनंतर पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाचा कालावधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
- स्वाधार योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी राज्य शासन, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद, वैद्यकीय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्र शिक्षण परिषद किंवा तत्सम सक्षम प्रधीकारी यांच्या मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये आणि मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
महाराष्ट्र स्वाधार योजना अटी आणि निकष । Maharashtra Swadhar Yojana Terms and Conditions
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडे अर्ज सादर करावा लागेल, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण हे या अर्जांची छाननी करतील व अर्जांची गुणवत्ता यादी जिल्ह्यानुसार करून पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवेश घेतलेल्या जिल्ह्यातील जवळच्या मागासवर्गीय वस्तीगृहाशी संलग्न करतील. सामाजिक न्याय विभागाने ठरवून दिलेल्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करवा लागेल.
- या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल, तसेच निवड झालेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत योजनेच्या लाभास पात्र असेल.
- स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल, या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारी मर्यादा 50 टक्के इतकी राहील.
- स्वाधार योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत निकाल लागल्यापासून पंधरा दिवसच्या आत नेमून दिलेल्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील.
- स्वाधार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांनी ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे, त्या अभ्यासक्रमाच्या कालावधीतच देय राहील, या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना एकूण शैक्षणिक कालावधीत जास्तीत जास्त सात वर्षा पर्यंत घेता येईल.
- स्वाधार योजनेंतर्गत योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे, अन्यथा विद्यार्थी या योजनेस पात्र राहणार नाही.
स्वाधार योजना लाभ वितरण प्रक्रिया । Swadhar Yojana benefit distribution process.
महाराष्ट्र स्वाधार योजना या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत आहे अशा गरीब अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांच्या विद्यार्थी मुलांना देण्यात येणार आहे.
- विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश देण्यात आला आहे, त्या वसतिगृहाचे गृहपाल विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, त्या संबंधित महाविद्यालयाकडून विद्यार्थ्याच्या उपस्थितीचा अहवाल प्राप्त करून संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांना सादर करतील आणि संबंधित सहाय्यक आयुक्त समाजकल्याण हे स्वाधार योजनेतील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक तिमाही उपस्थितीच्या आधारे अनुदानाची रक्कम त्या विद्यार्थ्याचा बँक खात्यामध्ये DBT पोर्टल मार्फत जमा करतील. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी संलग्न करणे आवश्यक आहे.
- स्वाधार योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना योजनेच्या अनुदानाची रक्कम DBT पोर्टल मार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.
- विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमांना महाविद्यालयात प्रवेश मिळविल्यानंतर या योजनेंतर्गत देय होणाऱ्या रक्कमेपैकी पहिल्या तिमाहीची रक्कम आगाऊ देण्यात येईल.
- स्वाधार योजनेंतर्गत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होत असलेल्या निर्वाह भत्याची रक्कम वजावट करून उर्वरित रक्कम निर्वाह भत्ता म्हणून देण्यात येईल.
- या योजनेच्या अंतर्गत जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असतील, त्या विद्यार्थ्यांना या योजनेतील निर्वाह भत्याचा लाभ मिळणार नाही..
- या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75 टक्के असणे आवश्यक आहे, या बाबत संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून प्रत्येक तिमाही उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
महाराष्ट्र स्वाधार योजना ऑनलाइन फॉर्म । Maharashtra Swadhar Yojana Online Form
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांनी लाभ मिळविण्याकरिता या योजनेमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांनी या योजनेची संपूर्ण माहिती प्राप्त करून योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून स्वाधार योजनेचा अर्ज डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. या योजनेच्या अर्जाचा विहित नमुना शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून योजनेचा अर्ज डाऊनलोड करून त्याबरोबर खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे जोडून, कागदपत्रांच्या यादीसह अर्ज विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्ह्यातून काढलेले आहे,
- त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयामध्ये स्वतः जाऊन जमा करावा किंवा टपालाव्दारे / कार्यालयाच्या ई–मेलवर, सादर करावा.
- या संबंधित अधिक माहिती मिळविण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.
- तसेच अपूर्ण भरलेले अर्ज आणि अर्जासोबत जोडलेले आवश्यक कागदपत्रे संपूर्ण नसलेले अर्ज रद्द समजण्यात येतील.
- या योजनेमध्ये 60 टक्केपेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही, तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हि मर्यादा 50 टक्के असेल.
- या योजनेंतर्गत जिल्ह्यानुसार अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हि संख्या निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे जर त्यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल.
- स्वाधार योजने अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालया मार्फत प्रसिद्ध केली जाईल.
स्वाधार योजना आवश्यक कागदपत्रे । Swadhar Yojana Necessary Documents
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 योजनेंतर्गत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे खालीलप्रमाणे असतील
- अधिकृत जातीचे प्रमाणपत्र
- महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र ( अधिवास प्रमाणपत्र / रेशनकार्ड / निवडणूक ओळखपत्र / जन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही)
- आधार कार्डाची प्रत
- बँकेत खाते उघडले याचा पुरावा म्हणून बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत
- तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा वडील नोकरीत असल्यास फॉर्म नंबर 16
- विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्या बाबतचे प्रमाणपत्र
- इयत्ता 10वी, 12वी किंवा पदवी परीक्षेचे गुणपत्रिका
- महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
- विद्यार्थिनी विवाहित असल्यास पतीच्या उत्पन्नाचा दाखला.
- बँकखाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबतचा पुरावा
- विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र
- स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
- वर्तमान रहिवासी पत्ता पुरावा
- महाविद्यालायचे उपस्थितीचे प्रमाणपत्र
- सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत
महाराष्ट्र स्वाधार योजना अर्ज करण्याची प्रक्रिया । Maharashtra Swadhar Yojana Application Process
- स्वाधार योजना अंतर्गत ज्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये अर्ज करायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे प्रक्रियेच अनुसरण करावे.
- सर्वप्रथम अर्जदार विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, या नंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल.
- या होम पेजवर तुम्हाला ‘’स्वाधार योजना PDF’’ हा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल, यानंतर तुम्हाला स्वाधार योजनेच्या अर्जाचा PDF डाऊनलोड करून घ्यावा लागेल.
- त्यानंतर योजनेचा फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर, स्वाधार योजनेच्या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल, तसेच या योजनेला आवश्यक असलेली वरील प्रमाणे संपूर्ण कागदपत्रे जोडून संबंधित समाज कल्याण कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल.
- याप्रमाणे प्रक्रियेचे अनुसरण करून तुमची, स्वाधार योजना 2023 योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 हि योजना महाराष्ट्र शासनाने सन 2016 – 17 मध्ये सुरु केलेली एक शैक्षणिक योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि अत्यंत कमी उत्पन्न गटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध परीवारामधील विद्यार्थ्यांना मिळणार आहे, या योजनेच्या अंतर्गत या विद्यार्थ्यांना भोजन व राहण्याची सोय आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी शासनाकडून आर्थिक सहायता देण्यात येणार आहे. वाचक मित्रहो, आम्ही या लेखामध्ये महाराष्ट्र स्वाधार योजनेबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही आपल्याला या योजने संबंधित आणखी काही प्रश्न किंवा माहिती हवी असल्यास आणि तसेच आपल्याला हि पोस्ट आवडली असल्यास आम्हाला कमेंट्स करून जरूर कळवा.
FAQ on महाराष्ट्र स्वाधार योजना । FAQ on Maharashtra Swadhar Yojana
Q. महाराष्ट्र स्वाधार योजना काय आहे ? What is Maharashtra Swadhar Yojana ?
महाराष्ट्र शासनाने राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न गटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबामधील पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणसाठी प्रोत्साहित करण्यासाठी हि शैक्षणिक योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे जेणेकरून या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता यावे आणि त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण व्हावे.
Q. महाराष्ट्र स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहेत ? Who is eligible for Maharashtra Swadhar Yojana ?
महाराष्ट्र स्वाधार योजना राज्यातील गरीब अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांच्या परिवाराचे वार्षिक एकूण उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे. ते विद्यार्थी या योजनेस पात्र आहेत.
Q. महाराष्ट्र स्वाधार योजनेचा PDF कसा डाऊनलोड करावा ? How to download PDF of Maharashtra Swadhar Yojana ?
महाराष्ट्र स्वाधार योजनेची या लेखा मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, तसेच या योजनेचे PDF आपण शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकतो.
Q. महाराष्ट्र स्वाधार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक सहायता किती मिळते ? How much financial assistance do students get under Maharashtra Swadhar Yojana ?
महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवेश मिळवलेल्या संस्थांच्या क्षेत्रांप्रमाणे अनुदानाची धनराशी निश्चित केल्या गेली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वार्षिक 51,000/- रुपये आर्थिक मदत दिली जाते.