जाणून घ्या तगर फुलझाड लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Tagar flower Lagwad Mahiti Tagar Sheti-Chandni flower) – Tagar Farming

तगर लागवड । Tagar Lagwad | Tagar Sheti | तगर लागवडीचे महत्त्व । तगर लागवडी खालील क्षेत्र । तगर फुलपिकाचे उत्पादन । तगर पिकास योग्य हवामान । तगर पिकास योग्य जमीन । तगर पिकाच्या उन्नत जाती । तगर पिकाची अभिवृद्धी । तगर पिकाची लागवड पद्धती । तगर पिकास योग्य हंगाम । तगर पिकास योग्य लागवडीचे अंतर । तगर पिकास वळण । तगर पिकास छाटणीच्या पद्धती । तगर पिकास खतांचे व्यवस्थापन । तगर फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । तगर फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

तगर लागवड । Tagar Lagwad | Tagar Sheti |

महाराष्ट्र हे एक विस्तीर्ण राज्य असून हवामानाच्या दृष्टीने त्याचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असे प्रमुख विभाग पडतात. विभागवार जमिनीही वेगवेगळया प्रकारच्या आहेत. महाराष्ट्रात मोठी शहरे बरीच असल्याने व शहरात फुलांना मागणी असल्याने या शहरांच्या परिसरात फुलशेती करण्यास चांगला वाव आहे. तगर फुलपिकाची व्यापारी तत्त्वावरील लागवड आढळून येत नाही. परंतु बऱ्याच लोकांच्या अंगणात, बंगल्यात, परसबागेत, कुपणाला आणि शेतात तगरीची 1-2 झाडे हमखास पाहावयास मिळतात. याचे प्रमुख कारण म्हणजे, ह्या झाडापासून वर्षभर फुले मिळतात. देवपूजेसाठी तगरीचे फूल सर्वांत लोकप्रिय आहे. तगरीची फुले वाहतुकीत लवकर खराब होत असल्यामुळे तगरीची फुले काढणीनंतर लगेच बाजारपेठेत पाठविता येऊ शकतील, अशा परिसरात तगरीच्या लागवडीस भरपूर वाव आहे.

तगर लागवडीचे महत्त्व । Importance of Tagar Cultivation.

पंढरपूर, तुळजापूर, देहू, आळंदी, जेजुरी, अष्टविनायक, शिर्डी, शेगाव, इत्यादींसारख्या निरनिराळ्या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी तगरीच्या फुलांना मोठी मागणी असते. निरनिराळया धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी भविष्य काळात फुलांची मागणी वाढतच जाणार आहे. त्यामुळे सभोवतालच्या ग्रामीण भागातील अनेक खेड्यांमधून विशेषतः खेड्यातील व्यापारीपेठा असलेल्या भागांतून तगर फुलांची शेती करणे फायदेशीर ठरते.
तगर फुलपिकाच्या उगमस्थानाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु प्राचीन काळापासून भारतात तगरीची लागवड केल्याची नोंद आढळते. वाहतुकीच्या सुधारणेबरोबर व संस्कृतीच्या देवाणघेवाणीबरोबर बऱ्याच वनस्पतींची देवाणघेवाण झाल्याने अनेक फुले, फळे भारतात बाहेरून आली व ती तेथे रुजली. त्यांपैकी तगर हे एक फुलझाड आहे.

तगर लागवडी खालील क्षेत्र । तगर फुलपिकाचे उत्पादन । Area under Tagar cultivation. Tagar flower production.

महाराष्ट्रामध्ये व्यापारी दृष्टीने तगर फुलांची लागवड आढळत नाही. या फुलांची लागवड बागेच्या सभोवताली कुंपण म्हणून करतात. या फुलांचे महत्त्व आणि गरज लक्षात आल्यामुळे तगरीच्या लागवडीचे क्षेत्र प्रामुख्याने निरनिराळया धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणीही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र तगरीची व्यापारीदृष्ट्या स्वतंत्र लागवड केली जात नसल्यामुळे तगरीच्या लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन यांबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही.

तगर पिकास योग्य हवामान । तगर पिकास योग्य जमीन । Suitable climate for Tagar crop. Land suitable for Tagar crop.

तगरीच्या फुलझाडास उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. कोरड्या हवामानावली पाण्याची चांगली सोय असल्यास तगरीची लागवड यशस्वी होऊ शकते. तगरीच्या फुलपिकास पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम प्रकारची जमीन चांगली मानवते. तगरीची एकदा केलेली लागवड 10 ते 15 वर्षे ठेवता येते.

तगर पिकाच्या उन्नत जाती । Advanced varieties of Tagar crop.

तगरीच्या एकेरी व दुहेरी पाकळ्यांच्या अत्यंत शुभ्र रंगाच्या स्थानिक जाती उपलब्ध असून आपल्याकडील हवामानात त्या उत्तम वाढतात.

तगर पिकाची अभिवृद्धी । तगर पिकाची लागवड पद्धती । Growth of Tagar crop. Cultivation method of Tagar crop.

सर्वसाधारणपणे तगरीची अभिवृद्धी फाटे कलम पद्धतीने केली जाते. फाटे कलमासाठी 3 ते 4 डोळे असलेल्या पक्व फांद्या निवडाव्यात. या फाटे कलमांची बुडख्याकडील टोके आय.बी.ए. या संजीवकाच्या 5,000 पीपीएम तीव्रतेच्या किंवा आय. ए. ए. या संजीवकाच्या 2,000 पीपीएम तीव्रतेच्या द्रावणात बुडवून नंतर लागवड केल्यास मुळे लवकर व भरपूर फुटतात.
तगरीच्या लागवडीकरिता 1 x 1 x 1 फूट आकाराचे खड्डे खणून घ्यावेत. चांगले कुजलेले शेणखत व मातीने हे खड्डे भरून घ्यावेत. खड्ड्यांत तळाशी वाळवी व हुमणी या किडींच्या प्रतिबंधासाठी 50 ग्रॅम कार्बारिल (10%) पावडर टाकावी. तगरीची लागवड सपाट वाफ्यावर करावी.

तगर पिकास योग्य हंगाम । तगर पिकास योग्य लागवडीचे अंतर । Suitable season for Tagar crop. Suitable planting distance for Tagar crop.

तगरीची लागवड सर्वसाधारणपणे जुलै-ऑगस्टमध्ये करावी. खतमातीने भरलेल्या खड्डयात मधोमध मुळचा नीट बसतील अशा रितीने रोप बसवून चोहोबाजूंनी माती घट्ट दाबून बसवावी. लागवडीनंतर हलके पाणी द्यावे. नंतर आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. तगरीचे झाड हैं २ मीटरपर्यंत उंच वाढणारे झुडूप असल्यामुळे 6 x 6 फूट अंतरावर तगरीची लागवड करावी

तगर पिकास वळण । तगर पिकास छाटणीच्या पद्धती । Methods of pruning Tagar crops.

तगरीची फुले अधिक मिळावीत म्हणून काही प्रमाणात फांद्यांची हलकी छाटणी करावी. त्यामुळे नवीन फांद्या फुटून, चांगली दर्जेदार फुले येण्यास मदत होते. तगरीच्या झाडावरील जुन्या, बारीक, रोगट व निर्जीव फांद्या कापणे तसेच झाडाला योग्य आकार देणे आवश्यक असते. छाटणी करताना झाडावर शक्यतो निरोगी व सजीव फांद्या ठेवून बाकीच्या अतिजून, बारीक, कमजोर, रोगट, निर्जीव फांद्या कापून टाकाव्यात.

तगर पिकास खतांचे व्यवस्थापन । Management of Fertilizers in Tagar Crop.

तगरीच्या फुलझाडास पावसाळ्याच्या सुरुवातीस प्रतिहेक्टरी 50 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद द्यावे.

तगर फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । Harvesting, production and sale of Tagar flowers.

लागवड केल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून तगरीच्या झाडाला भरपूर प्रमाणात फुले येऊ लागतात. तगरीला वर्षभर फुले येतात. परंतु जुलै ते डिसेंबर या कालावधीत चांगली दर्जेदार, मोठ्या आकाराची फुले येतात. तगरीच्या फुलांची काढणी सकाळी करावी. काढणीनंतर लगेच फुले शक्यतो थंड ठिकाणी सावलीत ठेवावीत. बाजारात विक्रीसाठी पाठविताना फुलांची प्रतवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकाच प्रकारची (जाती) फुले शक्यतो एका टोपलीत भरावीत. तगरीच्या फुलांच्या पाकळया कडक असल्याने पॅकिंग करताना त्या तुटण्याची शक्यता असते. तगरीची फुले बांबूच्या टोपलीत अथवा बांबूच्या करंडीत भरून विक्रीकरिता पाठविल्यास फुले चांगली राहतात. बागेच्या क्षेत्रानुसार दररोज किंवा एक दिवसाआड तगरीच्या फुलांची काढणी करावी.

तगर फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण । Packaging and storage of Tagar flowers.

तगरीची फुले काढणीनंतर काही तासांतच सुकतात. तगरीच्या फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य अत्यंत कमी असल्यामुळे फुलांची साठवण करता येत नाही. फुलांची काढणी केल्यानंतर फुले लगेच बाबूंच्या टोपलीत अथवा करंडीत भरून बाजारात विक्रीसाठी पाठवावीत.

सारांश ।

तगरीचे फुलझाड अनेक वर्षे वाढणारे असून, त्यापासून वर्षभर फुले मिळतात. तगरीच्या पांढऱ्याशुभ्र फुलांचा उपयोग देवपूजेसाठी केला जातो. त्यामुळे या फुलांना वर्षभर चांगली मागणी असते.
तगरीची अभिवृद्धी फाटे कलमाने केली जाते. तगरीची फाटे कलमे तयार करताना आय.बी.ए. अथवा आय. ए. ए. या संजीवकांचा वापर केल्यास कलमांना लवकर मुळ्या फुटतात. तगरीची लागवड जुलै-ऑगस्ट महिन्यांत करावी. लागवडीनंतर दुसऱ्या वर्षापासून तगरीच्या झाडाला भरपूर फुले येतात. तगरीची पूर्ण उमललेली फुले देठाजवळ तोडून फुलांची काढणी करावी.

जाणून घ्या अबोली लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Aboli Lagwad Mahiti Aboli Sheti) – Aboli Farming

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )