मंदिरातील घंटा (The temple bells)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

मंदिरातील घंटानाद (The sound of temple bells)

आपल्या हिंदू धर्मातील मंदिरामध्ये प्रवेश द्वारा जवळ घंटा बसवलेली असते. आपण मंदिरात प्रवेश केल्यावर घंटा वाजवून आतमध्ये जातो. ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे.
काही जणांच्या मते मंदिरातील घंटा ही आपण मंदिरात प्रवेश केल्यावर देवाला जाग करण्यासाठी असते, पण मुळातच हे सगळे गैरसमज चुकीचे आहेत.
आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मातील ऋषीमुनींनी ही परंपरा वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुरू केलेली आहे. मंदिरातील घंटा ही एक ” ध्वनी उपचार चिकित्सा” पद्धत आहे.

मंदिरातील घंटा (The temple bells)

भारतात जितकी हिंदूंची मंदिरे आहेत या सर्व मंदिरांमध्ये घंटा असते.मंदिरात घंटेचे महत्त्व असाधारण आहे. मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवण्याची प्रथा आहे. इतकेच नव्हे तर देवाची आरती करतानाही घंटा वाजवली जाते. याशिवाय पूजा पूर्ण झाल्याचे समाधान होत नाही.

मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे ह्या मागेही दोन उद्देश आहेत :

१) पहिला म्हणजे ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात.घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात.घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्याखाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने (inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.

२) मंदिरात प्रवेश करतांना मोठी घंटा बांधलेली असते प्रवेश करणारा प्रत्येक भाविक प्रथम घंटानाद करतो आणि नंतर मंदिरात प्रवेश करतो काय असेल यामागचे कारण ?

यामागे आहे एक शास्रीय कारण जेव्हा आपण त्या घंटेच्या खाली उभे राहून मान वर करून हात उंचावून घंटा वाजवतो तेव्हा प्रचंड निनाद होतो हा ध्वनी 330 मिटर प्रती सेकंद ह्या वेगाने आपल्या उगम स्थानापासून दुर जात असतो ध्वनीची ही शक्ती कंपनांच्या माध्यमातून प्रवास करत असते आपण नेमके घंटेच्या खाली उभे असतो ध्वनीचा निनाद आपल्या सहस्रारचक्रातून प्रवेश करून शरिरमार्गे जमीनीकडे प्रवास करतो हा प्रवास करत असतांना आपल्या मनात (मस्तकात) चालणारे असंख्य विचार चिंता काळजी यांना आपल्यासोबत घेवून जात असतो आपण निर्वीचार अवस्थेमध्ये जेव्हा परमेश्वरासमोर जातो तेव्हा आपल्या मनातील भाव शुद्ध स्वरूपात परमेश्वरापर्यंत निश्चितच पोहचतो म्हणून मंदिरात प्रवेश करतांना घंटानाद जरुर करा आणि थोडा वेळ त्या ध्वनीचा आनंद घ्या.

हिंदू धर्मामध्ये मंदिरात घंटा बांधण्याची प्रथा पुरातन काळापासून सुरु आहे. The practice of building bells in temples in Hinduism has been going on since ancient times

असे मानण्यात येते की ज्या मंदिरात घंटेचा आवाज सतत येत राहतो ते जागृत देवस्थान असते. मंदिरात नेहमी घंटानाद होत असतो. सामान्यतः सर्व भक्त मंदिरात गेल्यानंतर घंटा आवश्य वाजवतात.

फार कमी लोकांना माहिती असावे की, मंदिरात घंटा बांधण्यामागे केवळ धार्मिक कारण नसून वैज्ञानिक कारणही आहे.

१) घंटेच्या आवाजामुळे आपल्याला परमेश्वराची अनुभूती तर होतेच त्याचबरोबर आपल्या शरीरासाठीही ते फायद्याचे आहे. घंटेच्या आवाजाच्या कंपनाचा आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. घंटेच्या आवाजामुळे आपल्या डोक्यातील वाईट विचार संपून जातात आणि आपले विचार शुद्ध बनतात.

२) पुराणानुसार मंदिरात घंटा वाजवल्याने आपले पाप नष्ट होतात. जेंव्हा सृष्टीचा प्रारंभ झाला तेंव्हा जो नाद(आवाज) झाला, तोच स्वर घंटेच्या आवाजातून निघतो. हाच नाद ओंकाराच्या उच्चारणानेही जागृत होतो. घंटेला काळाचे प्रतिक मानले गेले आहे.

३) धर्म पंडितांच्या म्हणण्यानुसार जेंव्हा प्रलयकाळ जवळ येईल तेंव्हाही अशाच प्रकारचा नाद प्रकट होईल.

४) घंटेच्या आवाजामुळे आपल्या डोक्यातील वाईट विचार संपून जातात आणि आपले नकारात्मक विचार शुद्ध बनतात. त्यामुळे मंदिरात घंटा बांधली जाते.

५) ज्या मंदिरात घंटेचा आवाज सतत येत राहतो ते जागृत देवस्थान असते. मंदिरात नेहमी घंटानाद होत असतो. सामान्यतः सर्व भक्त मंदिरात गेल्यानंतर घंटा आवश्य वाजवतात.

६) विचार शुद्ध बनतात – घंटेच्या आवाजामुळे आपल्याला परमेश्वराची अनुभूती तर होतेच त्याचबरोबर आपल्या शरीरासाठीही ते फायद्याचे आहे. घंटेच्या आवाजाच्या कंपनाचा आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. घंटेच्या आवाजामुळे आपल्या डोक्यातील वाईट विचार संपून जातात आणि आपले विचार शुद्ध बनतात.

७) पाप नष्ट होतात – स्कंद पुराणानुसार मंदिरात घंटा वाजवल्याने आपले पाप नष्ट होतात. जेंव्हा सृष्टीचा प्रारंभ झाला तेंव्हा जो नाद(आवाज) झाला, तोच स्वर घंटेच्या आवाजातून निघतो. हाच नाद ओंकाराच्या उच्चारणानेही जागृत होतो. घंटेला काळाचे प्रतिक मानले गेले आहे.

८) घंटेशिवाय पूर्ण होत नाही आरती देवी-देवतांची आरती घंटेच्या नादाशिवाय पूर्ण होत नाही. देवाच्या आरतीमध्ये अनेक प्रकरचे वाद्य वाजवले जाते. त्यामध्ये घंटेला सर्वप्रथम प्राधान्य दिले जाते. याच कारणामुळे घरातसुध्दा पूजा करताना घंटा अवश्य वाजवली जाते. घंटेचा नाद मनमोहून टाकणारा आणि मन प्रसन्न करणारा असतो. या ऊर्जेने बुध्दी प्रखर होते. मंदिरात जेव्हा आरती होते, तेव्हा तिथे उपस्थित भक्त मंत्रमुग्ध होतात.

९) जेव्हा तुम्ही अनोळखी परिसरात घंटेचा आवाज ऐकता तेव्हा लगेच समजते, की आसपासच्या परिसरात मंदिर आहे. घंटा मंदिराची ओळख आहे आणि प्राचीन काळापासून सर्व मंदिरांमध्ये घंटा लावलीच जाते. जी व्यक्ती मंदिरात जाते, तेव्हा अवश्य घंटा वाजवतो. जेव्हा तुम्ही अनोळखी परिसरात घंटेचा आवाज ऐकता तेव्हा लगेच समजते, की आसपासच्या परिसरात मंदिर आहे.

१०) जर एखादी व्यक्ती नियमित रुपात आरतीच्यावेळी कोणत्या मंदिरात जात असेल तर निश्चित रुपात त्याची बुध्दी प्रखर होण्याची शक्यता असते.घंटेच्या आवाजातून निघणारा स्वर आपल्या मेंदूत खोलवर परिणाम करतो. घंटेच्या आवाजाने आजुबाजूच्या वातावरणासह आपल्या शरीरातसुध्दा विशेष स्परुपाचे कंपन निर्माण होते.या कंपनामुळे आपल्या शरीरात एक अद्भूत शक्ती प्राप्त होते.मंदिरातील या घंटेचा आवाज नियमित रुपात ऐकला तर या अद्भूत शक्तीने मेंदूची एकाग्रता वाढते, चिंतन करण्याची शक्ती वाढते, नवीन आणि धार्मिक विचार करण्याची शक्ती निर्माण होते, बुध्दीचा विकास होतो, कोणत्याही समस्येवर उत्तर शोधण्यासाठी वेळ लागत नाही.

११) मंदिरात असलेल्या छोट्या-मोठ्या घंटेचा वाजव आसपासच्या वातारणाला शुध्द आणि पवित्र करते. घंटा वाजल्याने जो ध्वनी बाहेर पडतो,तो खूप चमत्कारी असतो.

१२) हवेमध्ये अनेक किटाणून आपल्या शरीरासाठी हनिकारक असतात.मंदिरात एका लयाती वाजणा-या घंटेतून निघणा-या आवाजाने या हानिकारक किटाणूंना नष्ट करतो. सोबतच या आवाजाने वातावरणील नकारात्मक शक्तीसुध्दा नष्ट होते.

१३) प्राचीन श्रद्धेनुसार असे सांगितले जाते,की नियमीत रुपात आरती केल्याने आणि सतत घंटा वाजवल्याने मंदिरात स्थापित देवी-देवतांच्या मूर्त्या जागृक होतात. त्यामुळे व्यक्तीला तातडीने फळ प्राप्तीची शक्यता असते.

१४) धर्म पंडितांच्या म्हणण्यानुसार जेंव्हा प्रलयकाळ जवळ येईल तेंव्हाही अशाच प्रकारचा नाद प्रकट होईल…

Recent Post

शंखाची उत्पत्ती (The origin of conch)

लग्नात मंगलाष्टकं का म्हणतात ? (Why are Mangalashtakam said at weddings?)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )