तोंडली लागवड ची संपूर्ण माहिती (Tondali Lagvad)

Tondali Lagvad । Coccinia Lagvad । Tindora Lagvad । IVY Gourd Lagvad । तोंडली लागवड : (Tondali Lagvad) | तोंडली लागवड करण्यापूर्वी | माती आणि खतानुसार पोषण व्यवस्थापन | तोंडली लागवडीसाठी शेत कसे तयार करावे | वेल कलमांसह तोंडली लागवड कशी करावी | तोंडली लागवडीसाठी शेत कसे तयार करावे | तोंडली वनस्पतीचे सिंचन | तोंडली रोग आणि प्रतिबंध | तोंडली काढणी आणि उत्पन्न |

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

तोंडली लागवड : (Tondali Lagvad) :

तोंडली हे एक वेलवर्गिय पिक आहे. बहुवार्षिक असलेले हे पिक साधारणत २० मीटर उंची पर्यंत वाढु शकते. पिकाचे आयुष्यमान हे ३ ते ४ वर्षांचे असते. ह्या पिकाचे तळा कडील, जमिनी जवळील खोड हे पिकाच्या वयानुसार कडक, लाकडा सारखे होत जाते. तोंडली पिकास नर आणि मादी फुल हे वेगवेगळे असतात. नर फुलांचा देठ हा १ ते ७ सें.मी. लांब असतो, तर मादी फुलांचा देठ हा २.५ से.मी. लांब असतो. मादी फुलांत तिन किंवा चार स्रिकेंसर असलेले असे दोन प्रकारचे फुल असते. फुल रात्रीच्या वेळेस उमलते. फुलांचा रंग पांढरा असतो.

ह्या पिकास थंड हवामान मानवत नाही. पाण्याचा चांगला निचरा होणारी, हलकी जमिन पिकासाठी योग्य ठरते. हे पिक जास्त तापमान देखिल सहन करु शकते. आंतरपिक, बांधावरचे पिक, आणि काही ठिकाणी मुख्य पिक म्हणुन देखिल ह्या पिकाची लागवड होते. तोंडली पिकाची लागवड काडी लावुन केली जाते, १० ते २५ सें.मी. लांबीचा काडी ज्यावर ४ ते ५ डोळे असतात, अशी काडी लागवडीसाठी योग्य ठरते. तसेच बियाण्यापासुन देखिल ह्या पिकाची लागवड केली जाते. पिकाची लागवड हि जुन-जुलै आणि जानेवारी – फेब्रुवारी महिन्यात केली जाते. लागवडी नंतर पहिले फळ साधारणत ९०-१२० दिवसांत काढणीस येते. मोठ्या प्रमाणात फळे उन्हाळ्यात मिळतात. पिक थंडीच्या काळात आणि भरपुर पावसात सुप्तावस्थेतच असते. अशा वेळेस भरपुर प्रमाणात फळ काढणीनंतर जमिनीपासुन ६ ते ८ मीटर अंतरच्या वरिल वेल कापुन टाकला जातो, केवळ सशक्त आणि जाड काड्या ठेवल्या जातात. उपयुक्त वातावरणात अशा काड्यांना मोठ्या प्रमाणात फळ धारणा होते.

तोंडली लागवड करण्यापूर्वी :

तोंडले ही वनस्पती कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॉक्सिनिया ग्रँडीस आहे. ही वनस्पती मूळची भारतातील असून तिचा प्रसार आशिया आणि आफ्रिका खंडांतील अनेक देशांत झालेला आहे. त्यामुळे तिला कॉक्सिनिया इंडिका असेही शास्त्रीय नाव आहे. भारतात ही वनस्पती महाराष्ट्र व गुजरात राज्यांमध्ये प्रामुख्याने आढळते. अनेक ठिकाणी ती रानटी अवस्थेत वाढते. मात्र काही ठिकाणी फळांसाठी या वनस्पतीची लागवड करतात. तोंडली ही जोमाने वाढणारी बहुवर्षायू वेल असून ती वृक्ष, झुडूप, कुंपणे आणि इतर आधारांवर वाढते. खोड पंचकोनी असून टोकाला प्रताने असतात. प्रताने लांब व लवचिक असून त्यांचे स्प्रिंगांप्रमाणे वेटोळ्यात रूपांतर झालेले असते. या प्रतानांद्वारे तोंडल्याची वेल आधाराला पकडून चढते.

पाने साधी, एकाआड एक, रुंद, अंडाकृती, खंडित व केशहीन असतात. फुले पांढरी, घंटेसारखी व एकलिंगी असून ती टोकाला येतात. फळे लांबट गोल व हिरवी असून त्यांवर पांढरे पट्टे असतात. ती पिकल्यावर लाल होतात. फळांमध्ये अनेक, फिकट, चपट्या व किंचित लांबट बिया असतात. या वनस्पतीचे कडू व गोड असे दोन प्रकार आहेत. तोंडलीची फळे बीटा-कॅरोटिनाचे उत्तम स्रोत आहेत. याखेरीज त्यांत अ आणि क जीवनसत्त्वे असतात. कडू तोंडले आयुर्वेदात कफ, पित्तदोषावर उपचारांसाठी वापरले जाते. गोड तोंडले भाजीसाठी लागवडीत आणतात. पानांचा वापर त्वचेचे विकार व श्वास विकार यांवर केला जातो.
फळे काविळीवर, कुष्ठरोगावर व पांडुरोगावर गुणकारी आहेत.

ह्या पिकाच्या केरळ विद्यापिठाने सुलभा नावाची एक जात विकसित केली आहे जी हेक्टरी ६० टन पर्यंत उत्पादन देते. इंदिरा कुंदरु ५ आणि इंदिरा कुंदरु ३५ ह्या देखिल जाती उपलब्ध आहेत. एरवी स्थानिक जातीपासुन पिकापासुन १० ते १५ टन प्रती हेक्टर इतके उत्पादन मिळते. नर आणि मादी वेलांचे प्रमाण 1:10 ह्या प्रमाणात ठेवण्याची देखिल शिफारस केली जाते. पिकाची लागवड हि २.५ x २.५ मीटर अंतरावर करावी. वेल वाढविण्यासाठी, कारले, गिलके, भोपळा या पिकाप्रमाणे मंडप तयार करुन घ्यावा. पिक लागवडीनंतर काढणीस ९० ते १२० दिवसांत येते, पिकाचा फळांचा कालवधी संपल्यानंतर त्यास हलकी छाटणी करुन केवळ सशक्त काड्या ठेवतात.

पिकाची उत्पादन क्षमता भरपुर असल्याने लागवडी पुर्वी १ मीटर आकाराचे खड्डे खोदुन त्यात शेणखत ५ किलो, निंबोळी पेंड २ किलो, गांडुळ खत ५ किलो आणि गरजेनुसार मँन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड, व थायमेट २० ते ५० ग्रॅम घेवुन खड्डे भरुन घ्यावेत. रासायनिक खतांसाठी सिंगल सुपर फॉस्फेट २ ते ३ किलो, म्युरेट ऑफ पोटॅश २ ते ३ किलो देखिल त्यात वापरता येण्यासारखे आहे.

पिक, शेतात स्थिर झाल्यानंतर पिकास अमोनियम सल्फेट २० किलो प्रती एकर, तसेच झिंक सल्फेट ५ ते १० किलो, व फेरस सल्फेट ५ ते १० किलो प्रती एकर ह्या प्रमाणात द्यावे. ह्याच वेळेस जमिनीतुन ईमिडाक्लोप्रीड (७० टक्के) ५० ते ७० ग्रॅम, किंवा एसिटामॅप्रीड १०० ते १५० ग्रॅम ह्या प्रमाणात खोडाजवळ पाणी करुन टाकावे, जेणे करुन ते मुळांव्दारे शोषुन घेतले जाईल.

जर पिकाची वाढ कमी प्रमाणात जाणवत असेल तर वरिल खते १० ते १५ दिवसांनी पुन्हा द्यावीत. लागवडीनंगर ३० ते ४० दिवसांनी पिकास डि ए पी ५० किलो, आणि एम ओ पी ५० किलो ह्या प्रमाणात भरखत द्यावे. पिक फुलोरा अवस्थेत असतांना जर शेतात ड्रिप असेल तर ७ दिवसांच्या अंतराने १२-६१-०० हे विद्राव्य खत २ वेळेस द्यावे. सोबत बोरॉन २५० ग्रॅम घ्यावे. बोरॉन चा वापर एकदाच करावा.

फळ तयार होत असतांना १३-००-४५ हे विद्राव्य खत ५ किलो ह्या प्रमाणात ७ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळेस द्यावे. ह्या दरम्यान मिश्र सुक्ष्म अन्नद्रव्यांची एक किंवा दोन फवारणी घेता येईल. फळ काढणीचा काळ संपल्यानंतर पिकाच्या छाटणी पुर्वी १० ते १५ दिवस आधी पिकाचा थकवा काढण्यासाठी डि ए पी २५ किलो आणि एम ओ पी २५ किलो द्यावे. त्यानंतर छाटणी करुन घ्यावी. पिकास नविन बहार येत असतांना वरिल प्रमाणे अमोनियम सल्फेट पासुन पुन्हा सुरवात करावी.

माती आणि खतानुसार पोषण व्यवस्थापन :

तोंडल्याची लागवड सर्व प्रकारच्या मातीत करता येते, परंतु चिकणमाती माती अधिक सुपीक मानली जाते. रोपवाटिका आणि पुनर्लावणीपूर्वी, खोल नांगरणी करून शेत तयार केले जाते आणि त्यात ४ ट्रॉली शेणखत किंवा गांडूळ खत मिसळले जाते. चांगले उत्पादन आणि जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा सिंचनाचे काम केले जाते आणि संपूर्ण शेत हिरवाईने भरलेले असते. तोंडले वनस्पतींचे पुनर्रोपण आणि व्यवस्थापन याद्वारे पुढील ४ वर्षे कुंद्रूचे बंपर उत्पादन मिळू शकते.

भांडवली गुंतवणूक (७०० झाडांसाठी)

  • रोपे खरेदी (१५ रु. प्रतिरोप) – ११ हजार रुपये
  • बांबू खरेदी – २५ हजार रु.
  • शेणखत (चार ट्रॉली)- २० हजार रु.
  • मांडवासाठी लोखंडी अॅंगल्स व तारा- पावणेदोन लाख रु.
  • ठिबकसंच – ३० हजार रु.

तोंडली लागवडीसाठी शेत कसे तयार करावे ?

तोंडली पिकासाठी पहिली नांगरणी करून नांगर फिरवून काही दिवस शेत मोकळे सोडावे, त्यामुळे त्यात असलेले जुने अवशेष, तण व किडे नष्ट होतात. यानंतर आवश्यकतेनुसार शेणखत टाकून पाणी शेतात सोडावे. शेताचा वरचा थर कोरडा झाल्यावर दोन ते तीन तिरकस नांगरट करून माती मोकळी करून बांधून शेत समतल करा.

शेत तयार केल्यानंतर, 30 सेमी लांब, रुंद आणि खोल खड्डा खणून एक ओळीपासून ओळीत 1.5 मीटर आणि झाडांमध्ये 1.5 मीटर अंतर ठेवा. या खड्ड्यांमध्ये 3 ते 4 किलो शेणखत भरावे. कुंद्रूचे चांगले उत्पादन घेण्यासाठी हेक्टरी 40 ते 60 किलो स्फुरद, 60 ते 80 किलो नत्र, 40 किलो पालाश शेतात मिसळावे.

वेल कलमांसह तोंडली लागवड कशी करावी :

तोंडली ही वेल वनस्पती आहे. वेलीद्वारे लागवड करण्यासाठी, जुलै महिन्यात 4-12 महिने जुन्या निरोगी तोंडली वेलींपासून 10-20 सेमी लांब, 1.5 सेमी जाड 5-7 गाठीदार काड्यांचे कलम 45 अंशाच्या कोनात कापून घ्या. पॉलिथिन पिशव्यांमध्ये माती, कोकोपीट आणि इतर खतांचे मिश्रण भरा आणि या कलमांची सुमारे 3 इंच खोलीवर लागवड करा. तोंडली रोप 55-60 दिवसात लागवडीसाठी योग्य होते.

बियांपासून तोंडली कसे लावायचे :

तोंडली बियाण्यापासून वाढवण्यासाठी, माती, कोकोपीट आणि इतर खतांच्या मिश्रणाने पॉलिथिन पिशव्या भरा. तोंडली च्या बिया 0.5-1 सेमी खोलीवर वरून 1-2 इंच रिकाम्या पॉलिथिन पिशव्याच्या मध्यभागी लावा आणि मातीने झाकून टाका. जमिनीत पुरेसा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी स्प्रिंकलरने हलके पाणी द्यावे. तोंडली च्या बियांची चांगली उगवण होण्यासाठी ५-२७ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक आहे. तोंडली च्या बियांची उगवण होण्यास सुमारे 14-28 दिवस लागतात. उगवण झाल्यानंतर, वनस्पती 6-7 इंच असताना पुनर्लावणी केली जाऊ शकते.

तोंडली वनस्पतीचे सिंचन :

कलमे लावल्यानंतर लगेचच झाडांना पाणी द्यावे. थंडीच्या दिवसात जास्त सिंचनाची गरज नसते. परंतु उन्हाळी हंगामात तोंडली झाडांना 6-7 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पावसाळ्यात शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था असणे आवश्यक आहे. ठिबकचा वापर सिंचनासाठी केल्यास पीक चांगले येते.

तोंडली रोग आणि प्रतिबंध :

तोंडली पिकामध्ये कीड आणि रोगांचा अधिक प्रादुर्भाव आढळून आला आहे, ज्यामध्ये फ्रूट फ्लाय, पॉड बीटल, पावडर बुरशी, ऍफिड्स, माइट्स, थ्रिप्स आणि व्हाईटफ्लाय इ. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी, गोमूत्र किंवा कडुलिंबाच्या रसाचे मिश्रण मायक्रोझाइमसह तयार करा आणि ते झाडांवर शिंपडा.

तोंडली काढणी आणि उत्पन्न :

तोंडली काढणी लावणीनंतर सुमारे तीन-चार महिन्यांनी तोंडली काढणी सुरू होते. साधारणपणे तोंडली काढणी तोंडली आकार २ इंच झाल्यावर करावी. तोंडली योग्य वेळी कापणी करा अन्यथा ते लाल होतात आणि त्यांची चवही बदलते. तोंडली सरासरी उत्पादन हेक्टरी २४० क्विंटलपर्यंत जाते.

अश्या प्रकारे आपल्या शेतात करा झेंडू लागवड आणि मिळवा भरगोस उत्पन्न

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )