हिंदू धर्मात तुळस हे वृक्ष का महत्वाचे आहे ?

तुळशीचे फायदे,तुळशीचे औषधी उपयोग ,तुळस माहिती ,

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

तुळशी परमपवित्र वृक्ष :

पद्म पुराणामध्ये उत्तराखंडात तुळशीचे महात्म्य भगवान शंकरांनी स्वतःच्या मुखाने नारदांना सांगितलेले आहे , ते अत्यंत श्रेष्ठ असून, तुळशी आणि तिची सेवा ह्याचे महत्व सांगितले आहे. त्यांनी सांगितलं की जो मनुष्य तुळशीची सेवा करतो, तो खऱ्या अर्थाने भाग्यवान असतो . तुळशीची पानं, फुलं, फळ ,मूळ शाखा, इतकच काय तर तुळशीची माती सुद्धा सर्वकाही पावन आहे. तुळशीचे महत्व सांगत असताना आम्हाला अनेक प्रकारातून शंकर भगवान महत्त्व सांगतात.

  • ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, किंवा जो माळ धारण करतो, तो सदैव वैकुंठाचा अधिपती होतो. त्याची पाप प्रवृत्ती हळूहळू कमी होते, पुर्व जन्म संस्कार असल्याकारणामुळे , कमी व्हायला वेळ लागतो .
  • एखाद्याला मृत्यू आल्यास ,त्या वेळेला तुळशीची माळा त्याच्या गळ्यामध्ये असेल किंवा तुळशीच्या काष्ठात त्याचं दहन झाले, किंवा त्याच्या अंतिम संस्काराच्या वेळेला तुळशीची एखादी जरी काडी त्याच्या शरीराबरोबर दहन करताना ठेवली गेली ,तरीही तो पापमुक्त होतो. तुलसी काष्टा सह दहन होणाऱ्या व्यक्तीला पुनर्जन्म नाही शंकर भगवान सांगतात.
  • भगवंतासाठी अन्न शिजवत असताना जर तुळशीच्या काठावरती अन्न शिजवून जर देवाला आपण नैवेद्य केला तर तो नैवेद्य भगवंत सरळ स्वीकार करतात. त्यासाठी पर्यायी आहे. आपण आपल्या घरामध्ये कधीतरी चुलीवरची स्वयंपाक करावा आणि त्या चुलीत किंवा कोळशांच्या मध्ये एक काष्ठ ठेवून नैवेद्य करावा .तोसुद्धा भगवंताला अत्यंत प्रिय होतो .
  • भगवंताच्या अन्नामध्ये तुळशी कोणत्याही प्रकाराने ठेवून,नंतर नैवेद्य दाखवतात.तो भगवंत स्वीकार करतात . आणि त्यासाठी आपल्याकडे एक पद्धत आहे नैवेद्य दाखवत असताना नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवावे. तसेच तुळशीपत्र हातामध्ये घेऊन मग पाणी फिरवून ते तुलसीपत्र परमेश्वराला अर्पण करावे. तो नैवेद्य भगवंताला अर्पण होतो. अन्न शिजवताना अन्नामध्ये तुळशीपत्र टाकलं तर ,सर्व प्रकारचे दोष दूर होतात .
  • तुळशी भगवंताला अनेक प्रकारांतून प्रिय आहे. असे म्हणतात कि तुळशीला एक स्वतःचा सुगंध असतो तोच सुगंध ही भगवंतांच्या शरीराला असतो. त्यांनी कृष्णा अवतार धारण केला त्या वेळेला हाच सुगंध त्यांना होता .तुलसीच्या फुलांचा जो नीलवर्ण आहे तसाच भगवंतांच्या शरीराच्या अंगकांती चा होता. याचं प्रमाण श्रीमद्भागवत ग्रंथात मिळते.
  • तसेच तुळशी चा सुगंध भगवंतांच्या शरीराला असतो तो साधक ज्या वेळेला समाधीच्या द्वारा किंवा अध्यात्माच्या द्वारा आपण अधिक तरल होतो त्या वेळेला तो सुगंध आपल्याला अनुभवता येतो.
  • हरी चंदन म्हणजे नेमकं काय तर भगवंताला गंध उगाळत असताना चंदनाच्या जोडीने तुळशीचे काष्ट ही उगळावे. आणि त्याचे चंदन तयार होतं त्याला हरी-चंदन असं म्हणतात. हे भगवंताला अत्यंत प्रिय आहे.सर्वांगे हरीचंदनमः
  • तुळशीच्या मुळाशी असलेली माती जे कोणी अंगाला लावतात आणि स्नान करतात त्यांना तीर्थस्थानाचे फळ प्राप्त होते
  • आपण जर सहस्रनाम म्हणत भगवंताला तुळशी वाहिली तर त्याच्या पुण्याची गणना कोणालाही करता येणार नाही .संपूर्ण सहस्रनाम म्हणजे इतका वेळ नसेल किंवा आपल्याकडे तुळशी उपलब्ध नसेल तर संध्येतील प्रथम 24 नाव जी आहेत ,या चोवीस नावांनी जरी भगवंताला तुळशी वाहिली तरी अत्यंत प्रिय असते. तेवढे ही उपलब्ध नसेल तर केवळ दशावताराची दहा नाव घेऊन भगवंताला तुळशी व्हावी .आणि तेही शक्य नसेल तर एक तुळशीचे पान हातामध्ये घेऊन आपल्या गुरु मंत्राचा पूर्णपणे मनोमन जप करून तुळशीचे पान जर भगवंतावर किंवा गुरुपादुका वर.वाहिले तर ते भगवंताला अत्यंत प्रिय असे होते. केवळ तुळशी अर्चनाने च अंबरीष ऋषींनी भगवंताला कायमचा प्राप्त केलं होतं, असा भागवतामध्ये दाखला दिलेला आहे.
  • ज्या ठिकाणी तुळशीचा बगीच्या आहे त्या ठिकाणी बसून जर आपण गुरु मंत्राचा जप केला, गायत्रीचा जप केला, किंवा विष्णूसहस्त्रनामाचा पाठ केला तर अनेक प्रकारची संकटे तात्काळ दूर होतात ,जी व्यक्ती भगवान शिवाच्या मंदिरामध्ये पिंडीच्या समोर बसून विष्णुसहस्र नामाचा पाठ करतो तो दुःख मुक्त होतो.
  • त्याच बरोबर जे कोणी शंकराच्या मंदिरा मध्ये तुळशीची झाडे लावतात त्यांच्याबद्दल तर भगवान शंकर म्हणतात ते मला इतके प्रिय आहेत की त्या तुळशीला येणाऱ्या पानांच्या इतक्या संख्येने तो मनुष्य वैकुंठा मध्ये निवास करतो, असे अभिवचन भगवंताने दिलेला आहे

  • अनेक प्रकारची पातके नष्ट करण्याचं सामर्थ्य हे तुळशीमध्ये आहे म्हणून पूर्वीच्या काळी जर रोज तुळशीची सेवा केली जायची. दारापुढे तुळशीवृंदावन असायचे . तुळशीला रोज संध्याकाळी दिवा लावला, उदबत्ती, आणि प्रदक्षिणा करत असताना जर ,आपण तुळशीला एखादी गोष्ट सांगितली आणि एखादं संकट सांगितलं तर तिच्या कृपेने ते संकट लवकरात लवकर दूर होतं असा अनुभव सर्वांना येतो.

  • भगवान शंकर सांगतात पृथ्वीवरती तुळशी सारखं दिव्य अशी कोणतीही गोष्ट नाही .आता आपण फ्लॅट संस्कृतीत राहतो त्या वेळेला आपल्याला तुळशीवृंदावन आधी ठेवणे अवघड जातं. त्या ऐवजी आपण जर आपल्या घरात एका कुंडीमध्ये जरी तुळशी लावली आणि नित्य तिची सेवा केली तरीही आपल्याला पुण्य प्राप्त होतं.

  • तुळशीची पानं फुलं म्हणजे त्याचबरोबर माती सर्वकाही पुण्यकारक आहे. रोज तुळशीला स्पर्श करून नमस्कार करून जर तीर्थ घेतलं तर अपमृत्यू टळतो.आपण पूर्वजांना पिंडदान करत असताना जर त्यांच्या पिंडा मध्ये तुळशीचं पान टाकलं किंवा पिंडाचा भात शिजवत असताना सुद्धा त्या तुळशी टाकून तुळशी सह तो भात शिजवून त्याची पिंड केली तर नरकात गेलेले पितर सुद्धा तृप्त होतात ,हे भगवान शंकरांनी वचन दिलेलं आहे .तुळशीच्या मुळामध्ये ब्रह्मदेव आहे. तुळशीच्या पानांच्या मध्ये भगवान जनार्दन आहेत ,तर तुळशीच्या मंजिरी मध्ये भगवान शंकर निवास करतात.जो दुर्दैवाने अत्यंत दरिद्री आहे किंवा कर्जामध्ये आहे किंवा पिढ्यान्पिढ्या दुःखयुक्त आहे, अशा व्यक्तीने तुळशीची सेवा अवश्यमेव करावी .

  • श्रावणामध्ये जो कोणी तुळशीचं झाड लावतो, त्याला अनेक प्रकारच्या दोषातून मुक्तता मिळते. तुळशी भगवान श्रीकृष्णांची प्रीती प्राप्त करून देणारी असून अनेक प्रकारच्या दोषातून मुक्त करणारी आहे व ती श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. आपल्या घरी जर शाळीग्राम असेल आणि त्या शाळीग्राम ची नित्य तुळशी अर्चनानेसेवा होत असेल तर ,अशा व्यक्तीचे भाग्य भगवान शंकर स्वतः सांगतात की मी ही वर्णन करू शकणार नाही .काशी मध्ये दानधर्म केला तर ,गंगेमध्ये स्नान केलं तर, जे पुण्य मिळतं त्याच्या शंभर पट पूर्ण केवळ शाळीग्राम सेवे वरती प्राप्त होतं. असं साधं सरळ सोपं आपल्या पूर्वजांनी शास्त्र सांगून ठेवलेले आहे.

  • विज्ञानाची जरी आपण कास धरणे आवश्यक असले तरीही ह्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात ठेवाव्यात, आणि आचरण करावं प्रयत्न करून पहा. एक वर्षाच्या अंतरामध्ये आपल्याला स्वतः मध्ये झालेला बदल, आपल्या भाग्यात झालेल्या बदल, आणि आपल्या मध्ये झालेल्या बद्ल, निश्चितपणे अनुभवायला येईल अशा रितीने हे आपल्याला भगवंताने आपल्यासाठी निर्माण केलेलं सर्वात सुंदर असं रहस्य आहे. हे तुळशी रहस्य देवी भागवतात, श्रीमद्भागवत, आणि पद्म पुराणांमध्ये यथार्थपणे वर्णन केलेले आहे, ते मुळातून पाहणे अत्यंत आनंददायी आहे.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )