।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
वैकुंठ चतुर्दशी (Vaikuntha Chaturdashi)
चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो… वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात…..
चातुर्मास म्हणजे सण उत्सवाचा काळ होय… या संपूर्ण काळात विविध सण उत्सव असतात. चातुर्मासातील कार्तिक मासात हर हरेश्वर भेट हा खूप महत्वाचा दिवस असतो. चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात, तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात, असे म्हटलं जातं. या दिवशी ‘हरिहर भेट’ म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते…..
वैकुंठ चतुर्दशी : पुजा विधी महत्व आणि कथा
त्रिपुरारी पौर्णिमेचा आधिचा दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी… ही चतुर्दशी ‘वैकुंठ चतुर्दशी’ म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी ‘हरिहर भेट’ म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असं मानलं जातं. या दिवशी चतुर्मासाची सांगता होते. या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते…..
महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरांमधील मंदिरांतसुद्धा ‘हरिहर’ पूजा केली जाते. ही पुजा मध्यरात्री केली जाते…..
वैकुंठ चतुर्दशी कथा आणि महत्त्व
पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान विष्णु यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता… यावेळी महादेवाने विष्णुची परिक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. यावर भगवान विष्णु यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णुची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णुला वर दिला की, कार्तिक मासनंतर येणारी चतुर्दशी ‘वैकुंठ चतुर्दशी’ म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल…..
या दिवशी भगवान विष्णुची पुजा केली जाते… विष्णुला चंदन, फुलं, दुध, दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णुचा अभिषेक केला जातो. या दिवशी विष्णु नामस्मरण केलं जातं. विष्णुला गोड नैवद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी विष्णुंसह शिवाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. असे सांगितले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेचा आधिचा दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी… ही चतुर्दशी ‘वैकुंठ चतुर्दशी’ म्हणून साजरी केली जाते…..
बैकुंठ चतुर्दशीला स्वर्गाचे दार का उघडे असते ?
जो कोणी बैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूची आराधना करतो त्याला भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. मृत्यूनंतर आत्म्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते. वैकुंठ चतुर्दशीला सर्वसामान्यांसाठी स्वर्गाचे दरवाजे खुले राहतात, जेणेकरून त्यांना विष्णूच्या नामस्मरणानेच स्वर्ग प्राप्त होईल. नारदजींच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी जय आणि विजय यांना बैकुंठ चतुर्दशीला स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेवण्याचा आदेश दिला.
Recent Post